नमस्कार मायबोलीकरांनो,
मजेत आहात ना सगळे?
कसे काय गेले तुम्हाला हे वर्ष?
या वर्षी मायबोलीवर शब्दकोडी, शब्दखेळ, कोडी यांचे धागे बरेच प्रसिद्ध झाले नाही?
आपले आणि विविध प्रकरच्या कोड्यांचे नाते आजचे नाही. लहानपणी, कॉलेजात असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आलेली कोडी सोडवायला, नंतर तीच कोडी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना घालायला मजा यायची नाही?
यावर्षी परत जरा ती मजा अनुभवू या का? पण ती मजा मायाबोलीकरांसोबतच घेऊ या.
या वर्षी आपण गंमतखेळ म्हणून सवाल-जवाब घेत आहोत. पुर्वीच्या काळी मराठी चित्रपटात असत ना तसेच.
खेळ अगदी साधा आहे.
आम्ही पहिले कोडे म्हणजेच सवाल देऊ. जो कोणी पहिले उत्तर देईल तो पुढचे कोडे देईल आणि मग हा खेळ असाच पुढे चालू राहील.
तर हे आहे तुमचे पहिले कोडे....
नाही मी पक्षी, तरी उडते,
नाही मी पाणी, तरी वाहते ,
नाही मी हात, तरी स्पर्श करते,
कधी थंड कधी गरम,
कधी शांत कधी वादळासारखी,
घरातही असते, बाहेरही,
ओळखा पाहू, कोण मी?
भरत, पतंग?
.
तोवर हे एक सोपे.
तोवर हे एक सोपे.
अखंड पर्जन्याने होते
वन ते ओले चिंब
तरी पक्षीगण तहानलेले
नवल कोणते तुवां पाहिले?
यात पर्जन्यप्रक्रियेतली एक पायरी सुटली आहे.
दिसतो जरी इटूकला मी,
दिसतो जरी इटूकला मी,
भूक भागवि भारी हो
गरीब खाती नाईलाजाने
श्रीमंत मिटक्या मारती हो जी जी रं जी
कोण तपस्वी तपास करितो ?
कोण तपस्वी तपास करितो ?
अखंड स्नाना करितो कोण?
सर्व रसांना कोण ओकितो?
प्राशन करिते त्यांचे कोण?
मानव, आता सूर्यदेवाची गल्ली चुकली.
प्राशन करणारी पृथ्वी बरोबर. पण रस ओकणार्या देवाचं नाव अजून आलेलं नाही.
आता बघा. दोन देवांची नावं आली आहेत. मात्र त्यांची गल्ली चुकली.
ओके ब्र्ह्मदेवाची फक्त गल्ली
ओके ब्र्ह्मदेवाची फक्त गल्ली चुकली आहे. तो रस ओकत नाही.
सूर्याची गल्ली चुकल्याने तो ही रस ओकत नाही.
प्राशन करणारी पृथ्वी.
म्हणजे तपस्वी किंवा स्नान करणारा ब्र्ह्मदेव आणि सूर्य एकेक आहेत.
रस ओकणारा: नटराज
रस ओकणारा: नटराज?
अखंड स्नान: ब्रह्मस्नान म्हणतात - ब्रह्मदेव?
तपस्वी: विष्णु?
स्नान करणारा ब्रह्म असेल तर
स्नान करणारा ब्रह्म असेल तर मग तप करणारा सूर्य.
रस ओकणारा गणपती ही असेल. सगळ्या विद्या कलांचा अधिपती.
हे शेवटचं. यात उपमा आहेत.
हे शेवटचं. यात उपमा आहेत.
लहरीवाचुन तलाव कोठे?
शाखांवाचुन वृक्ष कोणता?
पंखावाचुन पक्षी कोणता?
यमदेवाविण मृत्यू कोण?
एक अवयव , बाकी तात्त्विक.
लिहितो उत्तर.
लिहितो उत्तर.
सूर्य तपस्वी अखंड तपतो
ब्रह्मदेव करि चिरंतन स्नान
सर्व रसांना इंद्र ओकतो
सर्वांचे करि धरती पान
>>> ब्रह्मदेव करि चिरंतन
>>> ब्रह्मदेव करि चिरंतन स्नान
एवढं सोडून बाकी कळलं. मस्त!
पंखांवाचुन पक्षी = प्राण?
लहरीवाचुन तलाव = अश्रू?
पंखांवाचुन पक्षी = प्राण?
यमदेवाविण मृत्यू = अपमान?
शाखांवाचुन वृक्ष = परांजपे मोतीवाले
परांजपे कुठून आले काही न कळून
परांजपे कुठून आले काही न कळून पण खळखळून हसायला आलं.
त्यांची जाहिरात असायची
त्यांची जाहिरात असायची रेडिओवर - 'आमची कोठेही शाखा नाही!'
आपला ऋन्म्या मायबोली सोडून
आपला ऋन्म्या मायबोली सोडून गेला (खयाल अच्छा है
आपल्याला शाखा नसलेल्या
आपल्याला शाखा नसलेल्या वृक्षाला टांगून भरत गेला वाटतं झोपायला.
उपमा बाजुला ठेवून: माड /ताड.
उपमा बाजुला ठेवून: माड /ताड.
आता उपमा खात विचार करतो.
आहे आहे.
आहे आहे.
नयन सरोवरी नसती लाटा
शाखाहिन गे धर्मवृक्ष हा
जीवन पक्षी पंखावाचुन
निद्रामरणा यम ना कारण
धर्मात पंथ असतात त्या शाखा नाहीत का?
--
ब्रह्मस्नान शोधताना राक्षसस्नानही असतं असं कळलं. ब्रह्मस्नान पहाटे ४-५ च्या दरम्यान. देव स्नान ५ ते ६. मानवस्नान ६ ते ८. राक्षसस्नान ८ नंतर.
आता पर्जन्यात तहानलेल्या पक्ष्यांचा सवाल राहिला आहे आणि अजिंक्यरावांचं कोडं.
ओह म्हणजे अश्रू आणि प्राण
ओह म्हणजे अश्रू आणि प्राण बरोबर होती की उत्तरं!
>>> धर्मात पंथ असतात त्या शाखा नाहीत का?
हो, खरंतर.
>>> आता पर्जन्यात तहानलेल्या पक्ष्यांचा सवाल राहिला आहे आणि अजिंक्यरावांचं कोडं.
हो, विचार करते आहे.
निद्रामरणा यम ना कारण >>>
निद्रामरणा यम ना कारण >>> झोपेत मरण आलं तर त्याला यम का कारणीभूत नसावा?
का झोपेत मरणासारखी अवस्था होते पण ते मरण नसते म्हणून ते न-यम असते असा अर्थ आहे?
हो, निद्रा हेच टेम्पररी मरण.
हो, निद्रा हेच टेम्पररी मरण.
@अजिक्यराव, बटाटेवडा ?
@अजिक्यराव, बटाटेवडा ?
>>> आता पर्जन्यात तहानलेल्या
>>> आता पर्जन्यात तहानलेल्या पक्ष्यांचा सवाल
हे समुद्राचं वर्णन आहे का?
(समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही!)
वन ओले कशाने होईल?
वन ओले कशाने होईल?
बटाटेवडा खाऊन गरीबश्रीमंत
बटाटेवडा खाऊन गरीबश्रीमंत सगळे मिटक्या मारतात की, माधव!
पण गरिबांना फक्त शिववडाच
पण गरिबांना फक्त शिववडाच मिळतो शिवपिझ्झा, शिवचिपोटले गेला बाजार शिवपाणीपुरीही मिळत नाही. म्हणून नाइलाजाने ते बवच खातात
अरे देवा! मी अपांच्या कोड्याला राजकीय पक्षाची जाहिरातच बनवून टाकले
@अजिंक्यराव: गुळाचा खडा?
@अजिंक्यराव: गुळाचा खडा?
गरीब इतर खायला नाही म्हणुन नाईलाजाने खातात तर श्रीमंत साखरेपेक्षा मिनरल्स असलेला हेल्दी समजल्या गेलेला तो आवडीने खातात.
मला असं वाटतंय की त्याचं
>>> राजकीय पक्षाची जाहिरात

मला असं वाटतंय की त्याचं उत्तर डायेट/उपास/फाका (हिंदीत 'फाके पड़ना' म्हणतात तसं) अशा कुठल्यातरी वळणावरचं आहे.
डाएट, त्यातला उपास कुठे
डाएट फूड, त्यातला उपास कुठे मिटक्या मारत खातात?
स्मायली देऊन सांगतात आणि इतर लोकांनी खादाडीचे फोटो टाकले की दुष्ट दुष्ट, मी उद्या हेच खाणारे म्हणतात.. 
आज माझा उपास आहे हे
जाऊ दे, मी आता पर्जन्यात
जाऊ दे, मी आता पर्जन्यात तहानलेल्या पक्ष्यांबद्दल चिंतन करते.
तोंड असेल का ते? पक्षी म्हणजे
तोंड असेल का ते? पक्षी म्हणजे दात?
Pages