गंमतखेळः सवालजवाब

Submitted by संयोजक on 12 August, 2025 - 11:25

नमस्कार मायबोलीकरांनो,

मजेत आहात ना सगळे?

कसे काय गेले तुम्हाला हे वर्ष?

या वर्षी मायबोलीवर शब्दकोडी, शब्दखेळ, कोडी यांचे धागे बरेच प्रसिद्ध झाले नाही?
आपले आणि विविध प्रकरच्या कोड्यांचे नाते आजचे नाही. लहानपणी, कॉलेजात असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आलेली कोडी सोडवायला, नंतर तीच कोडी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना घालायला मजा यायची नाही?

यावर्षी परत जरा ती मजा अनुभवू या का? पण ती मजा मायाबोलीकरांसोबतच घेऊ या.

या वर्षी आपण गंमतखेळ म्हणून सवाल-जवाब घेत आहोत. पुर्वीच्या काळी मराठी चित्रपटात असत ना तसेच.

खेळ अगदी साधा आहे.

आम्ही पहिले कोडे म्हणजेच सवाल देऊ. जो कोणी पहिले उत्तर देईल तो पुढचे कोडे देईल आणि मग हा खेळ असाच पुढे चालू राहील.

तर हे आहे तुमचे पहिले कोडे....

नाही मी पक्षी, तरी उडते,
नाही मी पाणी, तरी वाहते ,
नाही मी हात, तरी स्पर्श करते,
कधी थंड कधी गरम,
कधी शांत कधी वादळासारखी,
घरातही असते, बाहेरही,
ओळखा पाहू, कोण मी?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

मला कोडी येत नाहीत. चॅटजीपीटीने हे विचारायला सांगितलं आहे. तिकडे उत्तर शोधू नका. पण उत्तर अगदी पाचकळ आहे.

अशी कोणती वस्तू आहे
जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरमच राहतो.

hot-dog

Lol

मी नेहमीच असते
पण तरीही शोधायला कठीण
(उत्तर -किल्ली, असं म्हणू नका लगेच)
(- हे कोडं ai कडून आलंय )

Logically बसतंय
पण मनात उत्तर वेगळं आहे Proud

शांती -
माधवा
तुमचे उत्तर बरवा
(बरोबर वा )

>>> अक्कल?! Lol
(कधीकधी नसतेही... Proud )

एकच आहे हात
घातली मांडी कैसी छान
वस्त्र न अंगावरती
अडते त्याविण काम

वीस पाहुणे आले
बावीस आंघोळीला गेले
तेवीस जेवायला आले

नक्की किती पाहुणे आले? का?

खूपच सोप्पं आहे.

एकदम सोपे:

स्मरणशक्तीवर जोर देऊन माझा क्रमांक ओळखा.

वरची झाली असतील तर
माझं एक -
मी लहान असते तेव्हा उंच असते, वय वाढते तशी लहान होत जाते - मी कोण?

@माधव: वीस
बावीस - बाव - विहीर
ते वीस

२०.
ते-वीस जेवायला गेले.
बा-वीस ची फोड सांगा कोणी. बावडी वर आंघोळीला गेले म्हणून? Proud

Pages