नमस्कार मायबोलीकरांनो,
मजेत आहात ना सगळे?
कसे काय गेले तुम्हाला हे वर्ष?
या वर्षी मायबोलीवर शब्दकोडी, शब्दखेळ, कोडी यांचे धागे बरेच प्रसिद्ध झाले नाही?
आपले आणि विविध प्रकरच्या कोड्यांचे नाते आजचे नाही. लहानपणी, कॉलेजात असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आलेली कोडी सोडवायला, नंतर तीच कोडी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना घालायला मजा यायची नाही?
यावर्षी परत जरा ती मजा अनुभवू या का? पण ती मजा मायाबोलीकरांसोबतच घेऊ या.
या वर्षी आपण गंमतखेळ म्हणून सवाल-जवाब घेत आहोत. पुर्वीच्या काळी मराठी चित्रपटात असत ना तसेच.
खेळ अगदी साधा आहे.
आम्ही पहिले कोडे म्हणजेच सवाल देऊ. जो कोणी पहिले उत्तर देईल तो पुढचे कोडे देईल आणि मग हा खेळ असाच पुढे चालू राहील.
तर हे आहे तुमचे पहिले कोडे....
नाही मी पक्षी, तरी उडते,
नाही मी पाणी, तरी वाहते ,
नाही मी हात, तरी स्पर्श करते,
कधी थंड कधी गरम,
कधी शांत कधी वादळासारखी,
घरातही असते, बाहेरही,
ओळखा पाहू, कोण मी?
आधीचे कोडे उकल होण्यापूर्वी
आधीचे कोडे उकल होण्यापूर्वी मी एक जरा वेगळे कोडे देतो. मला सोडवता तर येत नाहीत, म्हटलं निदान एक कोडं घालू. ओपन बुक आहे. बिनधास्त कुठेही शोधा - गुगल, चॅट जिपीटी वगैरे.
सात अक्षरे लिहिता येना
अतरंगी नावाची वाट
अति करविता माती होते
वेमा ऐसा त्रास अफाट
Function @ native code का काय
Function @ native code का काय एरर. तो माबोचा अ आणि त जवळ आले की त्यांना ब्रह्मचर्याचे पालन करण्यासाठी दूर पाठवतो.
सही जवाब अस्मिता. पैठणी घेऊन
सही जवाब अस्मिता. पैठणी घेऊन टाक.
ब्रह्मचर्याचे पालन करण्यासाठी दूर पाठवतो >>
य्ये पैठणी मिळाली. छान चारोळी
वडापाव
वडापाव
वा वा! हपा, हे एकदम आवडलं.
वा वा! हपा, हे एकदम आवडलं.
अखंड पर्जन्याने होते
अखंड पर्जन्याने होते
वन ते ओले चिंब
तरी पक्षीगण तहानलेले
नवल कोणते तुवां पाहिले?
यात पर्जन्यप्रक्रियेतली एक पायरी सुटली आहे.
जवाब
दवांत भिजती अवघ्या रात्री
वनांत होते वृष्टी
चोच वासुनी तहानलेले
पक्षी होती कष्टी
तांत्रिकदृष्ट्या वृष्टी होत नसेल , पण दव पडणे dewfall असंच म्हणतो ना आपण ?
भरत मस्त. हर्पा नॉव्हेल कोडे.
भरत मस्त.
हर्पा नॉव्हेल कोडे.
दिनदर्शिका आता म्हणाली
दिनदर्शिकाकॅलेंडर हे अता म्हणालेससा बनूया कवा तरी
एक अक्षरापुढती येते
डबल करोनी तया परि
कथा सांगते थोडक्यात ही
शब्दामाजी अडू नका
क्षणात एका ओळखले तर
नाव सत्वरी फोडु नका
बराच वेळ झाल्याने : उत्तर
बराच वेळ झाल्याने : उत्तर शशक.?
स च्या पुढचे अक्षर श, डबल करून शश + (कथा थोडक्यात =) क
या आधीचा सवालही मस्त होता हपा.
उत्तर बरोबर आहे मानव. ससा
उत्तर बरोबर आहे मानव. ससा संस्कृतमध्ये शशक: असा शब्द आहे.
कॅलेंडर = शक
पहिलं अक्षर डबल करून बनते शशक.
मानव _/\_
मानव _/\_
यंदा श्रद्धा दिसली नाही.
ओह दंव होतं का ते? मस्त!
ओह दंव होतं का ते? मस्त!
(आता 'द'वर अनुस्वार देत नाहीत का?)
हर्पाच्या काव्यप्रतिभेला बहर आला आहे की!
आम्ही कालपासून इतकी उत्तरं दिली. आम्हाला कोणी पैठणी काय, साधा रुमाल ऑफर करेना!
भरत, द्या की काहीतरी एवढी
भरत, द्या की काहीतरी एवढी अवघड कोडी सोडवणाऱ्यांना. स्वाती, तुला "महावस्त्र".
थँक्यू थँक्यू!
थँक्यू थँक्यू!

स्वाती, एकदम सोप्या कोड्यांना
स्वाती, एकदम सोप्या कोड्यांना पैठणी व तिसरी क लेव्हलला सात करोड आहेत. अवघडला काय कुणीही बक्षीस ठेवेल.
(No subject)
पोकळ असती भावना तिच्या
पोकळ असती भावना तिच्या
लक्ष देऊनी हे ऐका हो
अन गावली बुध्दी तिज ऐसी
कपट युक्तीने करते हो
अलेक्सा!
अलेक्सा!
(No subject)
पहिल्या ओळ योग्य त्या शब्दावर
पहिली ओळ योग्य त्या शब्दावर योग्य ती क्रिया करायला सुचवतेय. मग तिसऱ्या ओळीतील सूचना पाळा.
भानामती
भानामती
बरोबर विकु.
बरोबर विकु.
भावना (हा शब्द) पोकळ करून भाना + मती
कसले अवघड अवघड कोडी आहेत राव
कसले अवघड अवघड कोडी आहेत राव
'अरेरे ! चौथ्यांदा हिंदी
'अरेरे ! चौथ्यांदा हिंदी विशारद ची परिक्षा देतोयस तू, हे प्रयत्न म्हणावेत की थट्टा? '
'ते तुम्ही हिंदी मेडियम वाले की मराठी त्यावर आहे'
छान कोडं मानव. त्याबद्दल
छान कोडं मानव. त्याबद्दल तुम्हाला धोतरजोडी...
नाहीतर कल्पक प्रश्न विचारणाऱ्यांना कुणीच काही देत नाही.
धन्यवाद. पुढच्या गटगला धोतर
धन्यवाद. पुढच्या गटगला धोतर नेसुन जाण्याचा विचार होताच माझा.
मानव
मानव

मानवदादा व हर्पा
मानवदादा व हर्पा
पण खरेच फार कल्पक कोडी रचली होती.
रुप तिचे ते काय वर्णावे
रुप तिचे ते काय वर्णावे
बोध न्यूनत्वाचा करीते हो
साम्य दर्शनही करविते ती
येई मनात तेव्हा उडते हो
वागणुकीची मिळता तिज संगत
बदल कोणता हा झाला जी?
जवाब न देता निव्वळ एकशब्दी
बोध सार्या पंक्तींचा सांगा जी.
Pages