गंमतखेळः सवालजवाब

Submitted by संयोजक on 12 August, 2025 - 11:25

नमस्कार मायबोलीकरांनो,

मजेत आहात ना सगळे?

कसे काय गेले तुम्हाला हे वर्ष?

या वर्षी मायबोलीवर शब्दकोडी, शब्दखेळ, कोडी यांचे धागे बरेच प्रसिद्ध झाले नाही?
आपले आणि विविध प्रकरच्या कोड्यांचे नाते आजचे नाही. लहानपणी, कॉलेजात असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आलेली कोडी सोडवायला, नंतर तीच कोडी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना घालायला मजा यायची नाही?

यावर्षी परत जरा ती मजा अनुभवू या का? पण ती मजा मायाबोलीकरांसोबतच घेऊ या.

या वर्षी आपण गंमतखेळ म्हणून सवाल-जवाब घेत आहोत. पुर्वीच्या काळी मराठी चित्रपटात असत ना तसेच.

खेळ अगदी साधा आहे.

आम्ही पहिले कोडे म्हणजेच सवाल देऊ. जो कोणी पहिले उत्तर देईल तो पुढचे कोडे देईल आणि मग हा खेळ असाच पुढे चालू राहील.

तर हे आहे तुमचे पहिले कोडे....

नाही मी पक्षी, तरी उडते,
नाही मी पाणी, तरी वाहते ,
नाही मी हात, तरी स्पर्श करते,
कधी थंड कधी गरम,
कधी शांत कधी वादळासारखी,
घरातही असते, बाहेरही,
ओळखा पाहू, कोण मी?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्या सवालासाठी क्लू:

क्लिष्ट जरी वाटे प्रथमदर्शनी
सवाल तो सोपा दिसता वाट
असे दोन पंक्तीत वर्णन जिचे
मधल्या पंक्तीत श्लेषांचा घाट

पंचम पंक्तीतील समानार्थीची
द्या वाचक हो त्या शब्दाला साथ
स्पष्ट दिसे मग बदल तो कोणता
उत्तर लिहिण्या सरसावतील हात

र्‍र्‍हस्व - दीर्घ याकडे दुर्लक्ष करावे लागेल सोडवताना.
किंवा ध्वन्यात्मक (phoentc clue) आहे हे सांगण्यास खालील प्रमाणे छोटा बदल ठीक राहील.

रुप तिचे काय वर्णावे ऐका
बोध न्यूनत्वाचा करीते हो
साम्य दर्शनही करविते ती
येई मनात तेव्हा उडते हो

वागणुकीची मिळता तिज संगत
बदल कोणता हा झाला जी?
जवाब न देता निव्वळ एकशब्दी
बोध सार्‍या पंक्तींचा सांगा जी.

----
ही फ्क्त तांत्रिक बाब झाली
याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन कोडे सोडवा.
सुटल्यावर मग ही तांत्रिक बाबही आपसुक कळेलच.

एक शब्द एकाक्षरी आहे का?

जवाब न देता निव्वळ एकशब्दी, म्हणजे एकाहून जास्त शब्द आहेत तर!

बोध न्यूनत्वाचा म्हणजे इंग्रजी some आणि साम्य दाखवणे म्हणजे मराठी सम. पण बाकीचे जुळत नाहीये.

<<एक शब्द एकाक्षरी आहे का?>> नाही.

<<जवाब न देता निव्वळ एकशब्दी, म्हणजे एकाहून जास्त शब्द आहेत तर!>>>

नाही. मला उत्तर एकशब्दी आहे हे सांगुन फक्त उत्तर ने देता ते कसे आले हे सुद्धा स्पष्ट करा (सगळ्या पंक्ती उलगडून) असे म्हणायचे आहे त्यात.

<<बोध न्यूनत्वाचा म्हणजे इंग्रजी some>> नाही मराठीच श्लेष आहे.
<<< आणि साम्य दाखवणे म्हणजे मराठी सम.>> दिशा बरोबर. सम ऐवजी दुसरा शब्द शोधा. साम्य दाखण्यास , उपमा देण्यास.

ती असा उल्लेख असल्याने स्त्रीलिंगी शब्द असावा.

न्यूनत्वाचा बोध म्हणजे कमीपणा दाखवते. समानता दर्शवते.
मनात येईल तेव्हां उडणे हे बहुतेक श्लेष असावं.

वागणुकीची साथ मिळता बदल झाला ? साथ संगत असा शब्द आहे. हे वाक्य बरंच कन्फ्युजिंग आहे. वागणूक वरून वर्तन, वर्तनचं बर्तन, बर्तन म्हणजे भांडी आणि भांडी कुंडी असा प्रवास झाला.

पण वागणुकीची संगत मिळाली कि बदल होतो. कशात ? कमीपणात ?
प्रेम ही भावना बदल घडवून आणू शकते. प्रेम साठी स्रीलिंगी शब्द माया.

बहुधा आईची माया उत्तर असावं. आईची माया मिळाली कि बदल घडून येतो.
चित्तवृत्ती आनंदी राहिल्याने उडण्याची उपमा असेल.

ज्ञान, प्रेरणा आणि सत्य या शक्यता पण पडताळून पाहिल्या. ज्ञान, सत्य स्त्रीलिंगी शब्द नसल्याने बाद.

प्रेरणा आणि माया मधे माया सुसंगत वाटतं.

रानभुली एक phonetic श्लेष स्त्रीलिंगी आहे.
(सगळं मराठीत आहे.)

<<वागणुकीची साथ मिळता बदल झाला ? साथ संगत असा शब्द आहे. हे वाक्य बरंच कन्फ्युजिंग आहे. वागणूक वरून वर्तन, वर्तनचं बर्तन, बर्तन म्हणजे भांडी आणि भांडी कुंडी असा प्रवास झाला.>> दिशा अगदीच योग्य होती पण भलताच प्रवास केलात. तो प्रवास न करता बघा. तुम्ही तीन पंचमांश सोडवलेच आहे असे समजा.

उत्तर एकशब्दी आहे, वस्तु अथवा व्यक्ती नाही, फक्त शब्द.

<<पण वागणुकीची संगत मिळाली कि बदल होतो. कशात ? कमीपणात ?>> इथंच मेख आहे. नवा शब्द तयार होतो आणि तो झाला की बदलच दिसून येतो.

<<<माया आणि प्रेरणा दोन्ही नसेल तर मग सावली ?>>
दिशा चुकली.

उत्तर पाच अक्षरी आहे.

तिज संगत
अक्षरे फिरवून उत्तर येईल का ?
गतिजसंत, संतजगती संतति
जगसंतति...

यू आर सो क्लोज, ३/५ सुटलेच आहे तुम्हाला.
हे रानभूली यांच्या साठी होते.

माधव, कसे काय ते सांगाल का?

रुप तिचे काय वर्णावे ऐका - परीकथेतली परी दिसायला सुंदर असते
बोध न्यूनत्वाचा करीते हो
साम्य दर्शनही करविते ती - परी या शब्दाने साम्य दाखवले जाते
येई मनात तेव्हा उडते हो - परी उडते

वागणुकीची मिळता तिज संगत
बदल कोणता हा झाला जी? - परीला वर्तन जोडले की बदल (परीवर्तन) होतो.

मला ते न्यूनत्व नाही कळले फक्त

बिंगो माधव! तुम्हाला लखनवी कुर्ता पैजामा बक्षीस.

परि: पण, परंतु या अर्थी न्यूनत्वबोधक अव्यय (उभयान्वयी)

एक पीजे कोडं.
जर मोटरसायकलच्या ऐवजी गायीवर बसून जाण्याची फॅशन आली तर होंडा, यामा, सुझुकी, बजाज प्रमाणे या वाहनाला काय नाव द्यावं ?

@राभु, कावेट.

गाईच्या अहोंची बुलेट, म्हणून गाईची कावेट Wink

कावेट Lol
आवडलं. पण जे पीजे उत्तर अपेक्षित आहे ते वेगळं आहे.

Pages