नमस्कार मायबोलीकरांनो,
मजेत आहात ना सगळे?
कसे काय गेले तुम्हाला हे वर्ष?
या वर्षी मायबोलीवर शब्दकोडी, शब्दखेळ, कोडी यांचे धागे बरेच प्रसिद्ध झाले नाही?
आपले आणि विविध प्रकरच्या कोड्यांचे नाते आजचे नाही. लहानपणी, कॉलेजात असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आलेली कोडी सोडवायला, नंतर तीच कोडी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना घालायला मजा यायची नाही?
यावर्षी परत जरा ती मजा अनुभवू या का? पण ती मजा मायाबोलीकरांसोबतच घेऊ या.
या वर्षी आपण गंमतखेळ म्हणून सवाल-जवाब घेत आहोत. पुर्वीच्या काळी मराठी चित्रपटात असत ना तसेच.
खेळ अगदी साधा आहे.
आम्ही पहिले कोडे म्हणजेच सवाल देऊ. जो कोणी पहिले उत्तर देईल तो पुढचे कोडे देईल आणि मग हा खेळ असाच पुढे चालू राहील.
तर हे आहे तुमचे पहिले कोडे....
नाही मी पक्षी, तरी उडते,
नाही मी पाणी, तरी वाहते ,
नाही मी हात, तरी स्पर्श करते,
कधी थंड कधी गरम,
कधी शांत कधी वादळासारखी,
घरातही असते, बाहेरही,
ओळखा पाहू, कोण मी?
कोणी नाही ये तर आपण या
कोणी नाही ये तर आपण या लेव्हलचं खेळू. कारण मला तितकंच येतं.
तुम्ही आजारी बोटीला कुठे घेऊन जाल?
डॉक कडे?
डॉक कडे?
येस्स!
येस्स!
आता मी
आता मी
एक अशी गोष्ट जिच्याकडे खूप किल्ल्या आहेत पण एकही किल्ली कुलूपाला चालत नाही.
किल्लीचे ड्यु-आयडी.
किल्लीचे ड्यु-आयडी.
कीबोर्ड हे पूर्वी ऐकलेलं आहे. पण तू किल्ल्या म्हणते आहेस तर काही वेगळं पण असेल.
ट्राय हार्डर
ट्राय हार्डर

पियानो, कीबोर्ड बरोबर आहे.
और ये गया सात करोड सिधे आपके बॅंक अकाऊंट में...
स्मार्ट लॉक/ इलेक्टॉनिक लॉक
स्मार्ट लॉक/ इलेक्टॉनिक लॉक
(No subject)
धो धो पाऊस पडत असताना एक
धो धो पाऊस पडत असताना एक माणूस छत्री रेनकोट काही न घेता चालत बाहेर पावसात जातो. तरी त्याचा एक केस सुद्धा ओला होत नाही. कसं?
तो टकला आहे ?
तो टकला आहे ?
बरोबर.
आता मी -
आता मी -
एक टन विटा जड असतील का एक टन पिसं?
एक टन काहीही एक टनच असेल. पण
एक टन काहीही एक टनच असेल. पण म्हणून लाल सिंग चढ्ढाच्या डोक्यात विटा टाकू नका. पिसंच टाका.
शाब्बास. आज चौदा करोड जिंकलेस
अरे वा! सिक्स सेsssव्हन!
अरे वा! सिक्स सेsssव्हन!
विटा जर घरी पाडून घेतल्या
विटा जर घरी पाडून घेतल्या असतील तर ...
पूर्वी काय एकेक वजने असायची! पूर्वीचा एक टन म्हणजे आत्ताचे दोन.
सतत फिरते थांबत नाही
सतत फिरते थांबत नाही
तिच्याशिवाय काहीच चालत नाही|
ती गेली की काळ थांबतो
ती आली की दिवस उजळतो |
हातात धरता येत नाही
तरी प्रत्येकाच्या आयुष्यात असते|
ओळखा पाहू कोण आहे मी
वेळ?
वेळ?
घड्याळ?
घड्याळ?
जिम रॅट च्या नजरेतून ट्रेडमिल
जिम रॅट च्या नजरेतून ट्रेडमिल
प्रेयसी
प्रेयसी
कविन,
कविन,
वेळ हे बरोबर आहे.
पुढचे कोडे तुम्ही द्या.
शी कोणती जागा आहे जिकडे रस्ता
अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे
पण गाडी नाही जंगल आहे पण झाड नाही,
आणि शहर आहे पण पाणी नाही
(कोडी घालता येत नाहीत, पण शोधता येतात
तुम्ही उत्तर द्या पण शोधू नका
)
नकाशा
नकाशा
बरोब्बर भरत
बरोब्बर भरत
द्या तुम्ही पुढले कोडे.
आई काळी पुत्रही काळा
आई काळी पुत्रही काळा
काळे सर्व विचार
पुत्र करंटा आईबापां
धपके देतो चार
नार पाहता नवरा जळतो
घरी न देता थार
असे कोण हे कुटुंब
द्यावे उत्तर करून विचार
दमलो विचार करून, काहीच सुचेना
दमलो विचार करून, काहीच सुचेना.
माझ्या डोक्यात उगाच... ही
माझ्या डोक्यात उगाच... ही काळी आई, धनधान्य देई.. गाणं चालू झालं
काळी दारू काळा गोळा
जवाब
काळी दारू काळा गोळा
काळी त्याची वात
बत्ती देता या सर्वांची
होते वाताहात
कोळश्याची शेगडी?
कोळश्याची शेगडी?
तोफ.
Pages