नमस्कार मायबोलीकरांनो,
मजेत आहात ना सगळे?
कसे काय गेले तुम्हाला हे वर्ष?
या वर्षी मायबोलीवर शब्दकोडी, शब्दखेळ, कोडी यांचे धागे बरेच प्रसिद्ध झाले नाही?
आपले आणि विविध प्रकरच्या कोड्यांचे नाते आजचे नाही. लहानपणी, कॉलेजात असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आलेली कोडी सोडवायला, नंतर तीच कोडी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना घालायला मजा यायची नाही?
यावर्षी परत जरा ती मजा अनुभवू या का? पण ती मजा मायाबोलीकरांसोबतच घेऊ या.
या वर्षी आपण गंमतखेळ म्हणून सवाल-जवाब घेत आहोत. पुर्वीच्या काळी मराठी चित्रपटात असत ना तसेच.
खेळ अगदी साधा आहे.
आम्ही पहिले कोडे म्हणजेच सवाल देऊ. जो कोणी पहिले उत्तर देईल तो पुढचे कोडे देईल आणि मग हा खेळ असाच पुढे चालू राहील.
तर हे आहे तुमचे पहिले कोडे....
नाही मी पक्षी, तरी उडते,
नाही मी पाणी, तरी वाहते ,
नाही मी हात, तरी स्पर्श करते,
कधी थंड कधी गरम,
कधी शांत कधी वादळासारखी,
घरातही असते, बाहेरही,
ओळखा पाहू, कोण मी?
Oh तेरी असे आहे होय ते
Oh तेरी
असे आहे होय ते
महि म्हणजे पृथ्वी वाटलं मला.
महि म्हणजे पृथ्वी वाटलं मला.
ऋतुराज, बरोबर.
ऋतुराज, बरोबर.
अमित, महि = पृथ्वीच आहे (जमिनीवर आपटल्यामुळे कानाला लागले).
जबरी कोडी आणि उकलही. काही
जबरी कोडी आणि उकलही. काही येईना मला.
नाजुक नार पतिसह झोपे
नाजुक नार पतिसह झोपे
अंगी अंग मिसळून
सारे जग हे जागृत असता
पती बसे खाऊन
पतिव्रता परि तिला बोलती
म्हणती सती महान
अशी कोण ती सांगा
किंवा जावे इथुन निघून
आर रेटेड कोडं आहे की हे तर.
आर रेटेड कोडं आहे की हे तर.
तारा?
तारा?
वेल?
माधव, स्त्रीलिंगी करायला चांदणी म्हणता येईल.
इथे 'पतिव्रता परि तिला' वाचे
म्हटलं पती खातोय तरीसुद्धा तिला पतिव्रता म्हणताहेत म्हणजे पतिव्रता टेस्टचे नियम काय असतील?
नाही. माधव यांनी एक लक्षण
नाही. माधव यांनी एक लक्षण बरोबर ओळखले आहे.
कंदिलाची वात?
कंदिलाची वात?
चंद्र?
चंद्र?
सूर्यामुळेच प्रकाशमान असून दिवसा दिसत नाही म्हणून?
>>> पती बसे खाऊन
म्हणजे पती तिला खातो की ती पतीला, हे संदिग्ध आहे.
रात्रीच्या अंधाराच्या कुशीत
रात्रीच्या अंधाराच्या कुशीत तारा (चांदणी) असतो. (आता इथे सेम जेंडर म्यारेज आहे - ते चालवून घ्या)
तोच तारा (सूर्य) दिवसा मात्र अंधाराला खाऊन टाकतो.
तारा - पंच पतिव्रतांपैकी एक
असा अर्थ लावला मी.
सूर्य आणि रजनी?
सूर्य आणि रजनी?
दिवसा सूर्य तिला खातो/झाकोळतो.
मानव, बरोबर. कंदिलाचीच असं
मानव, बरोबर. कंदिलाचीच असं नाही, तेल असलेल्या कोणत्याही दिव्याची वात.
दिवा उजळुनी प्रकाश देतो
वात समज गे पत्नी
तेल पतीला जाळुन जगते
ऐक सतीची महती
तेल संपता वातही जळते
स्वतः होउनी सती
मस्त!
मस्त!
माझं उलट लॉजिक झालं कंदिल
माझं उलट लॉजिक झालं
कंदिल- वातअरे, बरोबर आहे.
-------------
दिवसा कंदिल, चिमणीची वात आत ओढुन घेतात, म्हणुन पती खातो.
कुणीही द्या कोडं पुढचं. मला अशी कोडी माहित नाहीत.
ओह बरं बरं. बघा! तीच खाते
ओह बरं बरं. बघा! तीच खाते आहे पतीला!
द्या पुढचं.
तीच खाणार. तिने खाल्लं तरी पण तिलाच पतिव्रता म्हणतात. त्याने तिला खाल्लं तरी तिला पतिव्रता म्हणायला नरसिंह अवतार घ्यायला लागेल
द्या पुढचं.
मी देऊ का? हे सवालजवाब मला
मी देऊ का? हे सवालजवाब मला माझ्या आईच्या खूप जुन्या डायरीत मिळाले.
हे सोपं आहे.
बालपणी जिस तीस वार
ती तारुण्यामधि चारच वार
वृध्दपणी हो साठ वार
अशी अन्नपाणी ना घेई नार
सावली?
सावली?
बरोबर.
बरोबर.
सूर्योदयी जी तीस वार
ती ऐन दुपारी चारच वार
सायंकाळी लांबत जाते
अशी अलौकिक छाया नार
मस्त!
मस्त!
मस्त.
मस्त.
सही!
सही!
असा कोणता आवाज आहे जो
असा कोणता आवाज आहे जो वर्षातल्या फक्त दोन महिन्यांत ऐकू येतो?
वारी.. जानेवारी फेब्रुवारी
वारी..
जानेवारी फेब्रुवारी 
थंडीचा - थंडी वाजतेय म्हणतो
थंडीचा - थंडी वाजतेय म्हणतो म्हणून.?
एकदाच आल्या आहेत पोस्टी तर
एकदाच आल्या आहेत पोस्टी तर बक्षीस विभागून द्यावे.
माझ्या डोक्यात ऐ हा स्वर
माझ्या डोक्यात ऐ हा स्वर (आवाज) होता - चैत्र आणि वैशाख!
)
(कॅलेन्डर हिंदू हे…
पण ते स्पष्ट न केल्यामुळे ‘वारी’ (हा आवाज आहे?!) उत्तर ॲक्सेप्ट करू.
Pages