गंमतखेळः सवालजवाब

Submitted by संयोजक on 12 August, 2025 - 11:25

नमस्कार मायबोलीकरांनो,

मजेत आहात ना सगळे?

कसे काय गेले तुम्हाला हे वर्ष?

या वर्षी मायबोलीवर शब्दकोडी, शब्दखेळ, कोडी यांचे धागे बरेच प्रसिद्ध झाले नाही?
आपले आणि विविध प्रकरच्या कोड्यांचे नाते आजचे नाही. लहानपणी, कॉलेजात असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आलेली कोडी सोडवायला, नंतर तीच कोडी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना घालायला मजा यायची नाही?

यावर्षी परत जरा ती मजा अनुभवू या का? पण ती मजा मायाबोलीकरांसोबतच घेऊ या.

या वर्षी आपण गंमतखेळ म्हणून सवाल-जवाब घेत आहोत. पुर्वीच्या काळी मराठी चित्रपटात असत ना तसेच.

खेळ अगदी साधा आहे.

आम्ही पहिले कोडे म्हणजेच सवाल देऊ. जो कोणी पहिले उत्तर देईल तो पुढचे कोडे देईल आणि मग हा खेळ असाच पुढे चालू राहील.

तर हे आहे तुमचे पहिले कोडे....

नाही मी पक्षी, तरी उडते,
नाही मी पाणी, तरी वाहते ,
नाही मी हात, तरी स्पर्श करते,
कधी थंड कधी गरम,
कधी शांत कधी वादळासारखी,
घरातही असते, बाहेरही,
ओळखा पाहू, कोण मी?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वीसच.
ते वीस
बा वीस

हे झाले का माधव?

उदबत्ती चालेल कारण मेणबत्ती उत्तर होतं.

>>> उदबत्ती
हो, मी मेणबत्ती म्हणणार होते. Happy

ओके. Happy
कुठल्या महिन्यात अठ्ठावीस दिवस असतात? एकदम सोपं.

बरोबर आहे अमित.
आपण गूगलून एकाच साईटवर गेलो बहुतेक. Lol

जातं?

स्वाती, बरोबर.

एकच खुंटा हात
तळ्यांची मांडी ते जाते
गरगर फिरते देते पीठा
उपास त्याविण सर्व जगाते.

वस्त्र नाही, एक हात म्हटल्याने गांधीजीच डोळ्यासमोर येऊन मी सूतकताईला गेले.

Happy कळालं, कळालं. खुंटा चिंधीने घट्ट बसल्यावरच फिरवता येते. सगळं पीठ गोळा करायला खाली पसरवलेले एक वस्त्र - ते एक.

>>> काम जात्यावाचुन अडतं, वस्त्रावाचुन नाही.
लोल असं झालं का! बरं बरं! Lol

>>> मी सूतकताईला गेले.
मी हातशिलाईला. Lol

भारी आहे भरतच्या आईचा संग्रह! Happy

Pages