नमस्कार मायबोलीकरांनो,
मजेत आहात ना सगळे?
कसे काय गेले तुम्हाला हे वर्ष?
या वर्षी मायबोलीवर शब्दकोडी, शब्दखेळ, कोडी यांचे धागे बरेच प्रसिद्ध झाले नाही?
आपले आणि विविध प्रकरच्या कोड्यांचे नाते आजचे नाही. लहानपणी, कॉलेजात असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आलेली कोडी सोडवायला, नंतर तीच कोडी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना घालायला मजा यायची नाही?
यावर्षी परत जरा ती मजा अनुभवू या का? पण ती मजा मायाबोलीकरांसोबतच घेऊ या.
या वर्षी आपण गंमतखेळ म्हणून सवाल-जवाब घेत आहोत. पुर्वीच्या काळी मराठी चित्रपटात असत ना तसेच.
खेळ अगदी साधा आहे.
आम्ही पहिले कोडे म्हणजेच सवाल देऊ. जो कोणी पहिले उत्तर देईल तो पुढचे कोडे देईल आणि मग हा खेळ असाच पुढे चालू राहील.
तर हे आहे तुमचे पहिले कोडे....
नाही मी पक्षी, तरी उडते,
नाही मी पाणी, तरी वाहते ,
नाही मी हात, तरी स्पर्श करते,
कधी थंड कधी गरम,
कधी शांत कधी वादळासारखी,
घरातही असते, बाहेरही,
ओळखा पाहू, कोण मी?
@अस्मिता, उत्सुकता ?
@अस्मिता, उत्सुकता ?
मानव, आठवा?
मानव, आठवा?
@अस्मिता: उदबत्ती
@अस्मिता: उदबत्ती
बरोबर स्वाती.
वीसच. ते वीस बा वीस
वीसच.
ते वीस
बा वीस
हे झाले का माधव?
उदबत्ती चालेल कारण मेणबत्ती उत्तर होतं.
>>> उदबत्ती
>>> उदबत्ती
हो, मी मेणबत्ती म्हणणार होते.
हे झाले का माधव? >>> हो. बा
हे झाले का माधव? >>> हो. बा वीस ही फोड पण मस्त आहे.
ओके.
ओके.
कुठल्या महिन्यात अठ्ठावीस दिवस असतात? एकदम सोपं.
अरे! सगळी भेसळ झाली ही!
अरे! सगळी भेसळ झाली ही!
अंतू बर्वा सानुनासिक आवाजात ने बरोब्बर समजले.
सगळ्या!
@अस्मिता
सगळ्या!
नाडा नाही. हातशिलाईची मशीन
नाडा नाही. हातशिलाईची मशीन नाही.
बरोबर आहे अमित.
बरोबर आहे अमित.
आपण गूगलून एकाच साईटवर गेलो बहुतेक.
नाही. हा टिकटॉकचा एकदम फेमस
(No subject)
@भरत, विळी ?
@भरत, विळी ?
भरत, सूतकताई, हातमाग वगैरे.
भरत, सूतकताई, हातमाग वगैरे.
जातं?
जातं?
स्वाती, बरोबर.
स्वाती, बरोबर.
एकच खुंटा हात
तळ्यांची मांडी ते जाते
गरगर फिरते देते पीठा
उपास त्याविण सर्व जगाते.
कुठल्या महिन्यात अठ्ठावीस
कुठल्या महिन्यात अठ्ठावीस दिवस असतात? >>>>> सर्वच
वस्त्रावाचून काम का अडतं ते
वस्त्रावाचून काम का अडतं ते ज्याने वापरलं आहे त्यालाच कळेल!
वस्त्र नाही, एक हात
वस्त्र नाही, एक हात म्हटल्याने गांधीजीच डोळ्यासमोर येऊन मी सूतकताईला गेले.
जात्याला वस्त्र नसते म्हणुन
जात्याला वस्त्र नसते म्हणुन तसे म्हटलेय ना?
बाकी खुंटी घट्ट बसवायला लगतं.
वस्त्रावर जातं ठेवून पीठ पडते
वस्त्रावर जातं ठेवून त्या वस्त्रावर पीठ पडते. वस्त्र न त्यावरी. वस्त्र तर त्या खाली. ...
कळालं, कळालं. खुंटा चिंधीने
खुंटा घट्ट करायला कापडाचा
खुंटा घट्ट करायला कापडाचा बोळा खोचतात. तो घट्ट झाल्याशिवाय जातं ओढता येत नाही.
आता हत्तीची गोष्ट होणारे. आपण
आता हत्तीची गोष्ट होणारे. आपण तिघांनी वस्त्राचे तीन अर्थ चपखल बसवले.
अर्रे: काम जात्यावाचुन अडतं,
अर्रे: काम जात्यावाचुन अडतं, वस्त्रावाचुन नाही.
वस्त्र नसलेले काही हा सुद्ध एक क्लु आहे.
बरोबर मानव. सवालातली
बरोबर मानव. सवालातली प्रत्येक ओळ हे जात्याचे वर्णन आहे.
रात्री बैल काय करतात?
रात्री बैल काय करतात?
गाई गाई
गाई गाई
>>> काम जात्यावाचुन अडतं,
>>> काम जात्यावाचुन अडतं, वस्त्रावाचुन नाही.
लोल असं झालं का! बरं बरं!
>>> मी सूतकताईला गेले.
मी हातशिलाईला.
भारी आहे भरतच्या आईचा संग्रह!
Pages