चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>मधुबालाने सर्वात सुंदर काम 'गेटवे ऑफ इंडिया' मधे केले आहे हे माझे वैयक्तिक मत.
नक्की बघेन. बाकी भारतभूषणची फॅन नाही.

>>>>हा रेको समजायचा की वैधानिक इशारा?
Happy काय गं माझे मन Happy
भारत भूषणच्या मुलीची मुलाखत मी विविध भारती वरती ऐकली होती. फार उत्तम आणि साधेपणाचे संस्कार आणि मूल्ये त्यांनी आपलय मुलांना दिली. मला ती मुलाखत फार आवडल्याचे स्मरते. गरीब व साधे होते अशा प्रकारचे मत बनलेले. तेव्हापासून मी त्यांच्यावरती टिका करणे सोडले Happy

दोन्ही समजा हवं तर Happy

पण त्या गाण्यावरून त्या दोघांची ही हळुवार प्रेमकथा असेल असा समज होऊ शकतो पण तसं काही नाहीये. प्रदीपकुमारही आहे पण त्याला ग्रे शेड्स आहेत. फोकस मधुबालावर आहे. तिने सुरवातीला घाबरलेली पण नंतर चलाख, प्रसंगावधानी, fiesty, streetsmart मुलगी चांगली रंगवली आहे. ही कुठेही नायकावर अवलंबून असलेली damsel in distress न वाटता स्वतःच्या हुशारीने मार्ग काढणारी नायिका आहे. अशा नायिका हिंदी चित्रपटात क्वचित आढळतात Happy

>>> नायकावर अवलंबून असलेली damsel in distress न वाटता स्वतःच्या हुशारीने मार्ग काढणारी नायिका आहे
अरे वा! बघायला हवा. धन्यवाद. Happy

मागे असच भयाण अवांतरावर अवांतर होत असतेवेळी कोणीतरी म्हटलेले - माफ करा मी विषयाला धरुन लिहीतोय, ब्लाह ब्लाह ब्लाह
Lol Lol माबो वरती हास्यकल्लोळ उमटला होता. कोण म्हणालेले आठवत नाही आता Happy

गेट वे ऑफ इंडिया निर्मिती आणि दिग्दर्शन - ओमप्रकाश. फार आवडला होता हा चित्रपट.
दो घडी वो जो पास आ बैठे या गाण्यात मधुबाला शाईचं पेन बंद करता करता निबेवर फुंकर मारते. खट्याळपणा आणि त्याच वेळी प्रेमात पडत असल्याचे भाव झरझर बदलत दाखवलेत. बघणारे भारतभूषणवर जळत असतील. शाळकरी मुलीसारख्या दोन वेण्या वर बांधून रिबिनी. तरीही सुंदर दिसते.
प्रदीपकुमार आणि भारतभूषण यांची नावं आल्यावर त्यांच्या न -अभिनयावरून विनोद करणं आता कंटाळवाणंच्या पलीकडे गेलं आहे. शिरीष कणेकरांनी सुरुवात केली त्याला अर्ध शतक झालं असेल.

मला मुगल ए आझम मधली मधुबालाही आवडतेच. प्यार किया तो डरना या गाण्यात बंडखोरीचं तेजाची चेहर्‍यावरची धग अकबरापर्यंत पोचते.

तिचं तिसरं ( क्रमाने नाही) सर्वाधिक आवडतं गाणं आइए महरबाँ.

त्या त्या काळातले सिनेमे त्या त्या काळात जाऊन पाहता आले नाहीत, तरी समजून घेणं कठीण नाही.

मदर इंडिया आता बघायला घेतला तर नर्गिसचा अभिनय फार नाटकी वाटतो. हा चित्रपट लगानच्या आधी ऑस्करच्या नॉमिनेशन पर्यंत पोचलेला पहिला भारतीय चित्रपट. नर्गिसला अभिनयासाठी अनेक पारितोषिक मिळाली. पण आता आपण त्यालाही यथेच्छ नावं ठेवू शकतो.

>>> प्रदीपकुमार आणि भारतभूषण यांची नावं आल्यावर त्यांच्या न -अभिनयावरून विनोद करणं आता कंटाळवाणंच्या पलीकडे गेलं आहे.
माझ्या मते ते विनोदावर अवलंबून आहे. इथे माझेमनची डिलीव्हरी स्पॉट ऑन होती! Happy
ते ठोकळे होते हे खरंच आहे, आणि तरीही दोघांचीही करिअर उत्तम झाली हेही.

हे चितळ्यांवरच्या १ते४ विनोदांसारखंच आहे - अशा विनोदांमुळे त्यांचा धंदा बसला नाही, उलटपक्षी त्याला हातभारच लागला असण्याची शक्यता जास्त! Happy

गेट वे ऑफ इंडिया निवडणुकांच्या वेळी टिव्ही वर दाखवला होता. छान होता. असे म्हणजे या थीम वर नंतर बरेच वेस्टर्न सिनेमे पाहिले आहेत. एका रात्रीतला थरार , पाठलाग, साहस किंवा तत्सम गोष्ट, एन्ड्स विथ पहाटेचा पॉझिटिव सीन.

“ त्या त्या काळातले सिनेमे त्या त्या काळात जाऊन पाहता आले नाहीत, तरी समजून घेणं कठीण नाही.” +१ किंबहूना ते त्या काळाच्या लेन्समधूनच पहावे लागतात. कालातीत कलाकृती अशी काही नसते.

हेच माधुरी दिक्षित विषयी पण खरंय. ९० च्या दशकात ‘लेडी अमिताभ‘ म्हटलं जायचं तिला. त्या काळात अमिताभ कँप ऐवजी अनिल कपूर कँप निवडून स्वतःचं स्थान निर्माण करणं, मोठं करणं सोपं नव्हतं (बाकी अभिनय, सौंदर्य ई ची आवड सब्जेक्टीव्ह आहे).

“ त्या त्या काळातले सिनेमे त्या त्या काळात जाऊन पाहता आले नाहीत, तरी समजून घेणं कठीण नाही.” +१ किंबहूना ते त्या काळाच्या लेन्समधूनच पहावे लागतात. कालातीत कलाकृती अशी काही नसते. >> +१ ला +१

भरत, फेफ पोस्ट्स आवडल्या.
मदर इंडीया माझा कधीच पहिल्या अर्धा तासाच्या पुढे बघून होत नाही. बघायचा आहेच.

>>> स्वतःचं स्थान निर्माण करणं, मोठं करणं सोपं नव्हतं
अगदी! त्याचं कौतुक आहेच, प्रश्नच नाही. Happy
पण करिअर नीट मॅनेज करता येणं आणि ग्रेट अभिनय करता येणं ही निरनिराळी स्किल्स आहेत, आणि लाइकेबिलिटी हा तर कम्प्लीटली वेगळा - आणि कम्प्लीटली सब्जेक्टिव - बॉलगेम आहे.

सैगल नंतरच्या काळात अगदी क्लासिक (थेट्रीकल) नाही तरी थोड्याशा नाटकी अभिनयाचीच रीत होती ना ?
अशोककुमार, मधुबाला असे अपवाद सोडून.

https://bjas.in/how-bollywood-has-changed-its-acting-style/

कालातीत कलाकृती अशी काही नसते.>>> हो पटलं. रामायण महाभारत इलीअड शेक्सपिअर चार्ल्स डिकन्स इत्यादि वाचल्यावर तसेच लेओनारडो वॅन घो.

केकू Lol

माधुरीबाबत - ती अभिनय सुद्धा सहज करू शकली असती पण तिने केला नाही ही तक्रार आहे. ती 'सेफ' खेळत राहिली, वैविध्यपूर्ण काम न करताही तिचं चालून गेलं. स्वतःचे स्थान निर्माण करणे कोणत्याही आऊटसायडरला किंवा इनसायडरला सुद्धा कठीणच असते. शेवटी सगळेच कलाकार आपापला काळ गाजवतात, कोणीही असो. रंग, रूप, प्रसन्न वावर, नृत्य निपुणता याबाबत शंका नाही. फक्त स्वतःचे स्थान निर्माण केले आहे म्हणून जे केलंच नाही त्याचे कौतुक मात्र करणार नाही. उलट मग ते जास्त खुपतं कारण ती अभिनेत्री आहे. तिच्याकडून सकस आणि चॅलेंजिंग अभिनयाची अपेक्षा करणं वावगं नाही. खरंतर ह्या दुसऱ्या गोष्टी पर्यायी हव्यात. बाकी पोस्टींशी तीव्र असहमत वगैरे नाही.

माधुरीकडे आव्हानात्मक , वेगळ्या भूमिका देणारे चित्रपट आले होते आणि ते तिने नाकारले का? त्या काळात तसे कोणते चित्रपट बनले होते?

तिकडे शबाना आझमीने इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या. जितक्या इतर सगळ्या अभिनेत्र्यांनी मिळून केल्या नसतील. तिलाही तिच्या दिसण्यावरून, स्टिफ बॉडी लँग्वेज वरून तुम्ही नावं ठेवणार.

अब करे तो क्या करे?

माधुरी अत्यंत आवडती होती. सध्या आवडती आहे. तिचा स्क्रीन प्रेझेन्स जबरी आहे, पूर्ण पडदा व्यापून टाकते. रेखा श्रीदेवी पण त्याच कॅटेगरी मधल्या. हेच सध्याच्या कोणत्याच हिरोईन बद्दल म्हणता येणार नाही. पुन्हा डान्स, अभिनय दोन्ही छान करते. रडणारी जुही किंवा काजोल बघवत नाही. तिला जेव्हा जेव्हा चांगला डायरेक्टर मिळाला तेव्हा तिने चांगले काम केले आहे, तिचे संतोषी बरोबरचे दोन्ही सिनेमे मस्त आहेत, लज्जा , पुकार. खेल आणि किशन कन्हैय्या मध्ये चांगली कॉमेडी केली आहे, खेल तर फारच मस्त आहे.तिने फार रिस्क मात्र कधी घेतली नाही. प्रहार, मृत्युदंड असे काही मोजके वेगळ्या धाटणीचे सिनेमे केले चढत्या काळात. कपडेपट पण कैच्या काय असे. त्यावरून तिचे लग्न झाले त्या नंतर टाईम्स ऑफ इंडियाच्या शनिवार पुरवणीला एक लेख आल्याचे आठवत आहे, त्यात लिहिले होते की बेकार कपडेपट, यथा तथा स्टोरी लाइन असून सुध्दा मासेस आणि क्लासेस मधला पडदा माधुरीने दूर केला आणि पूर्ण देशाला वेड लावले. अजून एका लेखात आले होते की ती स्वतःच्या नावाच्या जोरावर पिच्चरला ओपनिंग मिळवून देत असे जे आजची एकही हिरोईन करू शकणार नाही. तिचे लग्न झाले त्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाला पहिल्या पानावर होती हे ठळक आठवत आहे.
श्रीदेवी नंतर ची शेवटची सुपरस्टार म्हणता येईल तिला.
देवदास मध्ये तर ती सोडून काहीही बघण्यालायक नाही. तिचा देढ इश्किया पण मस्त आहे. त्यात तिचा आणि हुमाचा जो काही सटल नैन मटक्का आहे तो छान घेतला आहे. बाकी टोटल धमाल, कलंक तद्दन भिकारी आहेत. फेम गेम मध्ये आवडली होती. तरी पण देढ इश्किया सोडून देवदास नंतर तिचं कोणतंच काम फार जास्त आवडलं नाही. तिला लवकर चांगला एखादा दिग्दर्शक मिळो आणि ती ९० वाली माधुरी आपल्याला बघायला मिळो. नागेश कुकनूर ची एक मालिका येत आहे त्यात ती मेन लीड आहे.

अभिनेता/ अभिनेत्री, त्यांचे कपडेपट, पूर्ण व्यक्तिमत्व कसे वाटले असा उपधागा काढायला हवा. + त्यांची अफेअर्स , वंशावळ , त्यांच्याबद्दल कोणी कोणी काय काय गॉसिप केलं आणि त्यांनी कोणाकोणाबद्दल काय काय गॉसिप केलं . कोणाचा अंत कसा करुण झाला. या सगळ्या गोष्टी चघळताना वेळ काय मस्त जातो.

यात गायक गायिका संगीतकार हे पण येऊन गेलेत इथे.

हा रेको समजायचा की वैधानिक इशारा? >>> Lol

>>> प्रदीपकुमार आणि भारतभूषण यांची नावं आल्यावर त्यांच्या न -अभिनयावरून विनोद करणं आता कंटाळवाणंच्या पलीकडे गेलं आहे.
माझ्या मते ते विनोदावर अवलंबून आहे. इथे माझेमनची डिलीव्हरी स्पॉट ऑन होती! >>> हो Happy

गेटवे ऑफ इण्डिया बघायला हवा. जुन्या पिक्चर्सपैकी नौ दो ग्यारह सुद्धा भारी आहे असे ऐकले आहे.

वेगळा धागा चालेल. पण पिक्चर्स बद्दल गप्पा मारताना त्यातल्या कलाकारांच्या इतर रोल्स बद्दल आपल्याला जे वाटते ते एकदम धागा बदलून दुसरीकडे लिहीणे स्वाभाविकपणे कितपत होईल माहीत नाही. जनरली अशा गप्पा सुरू होतात कारण कोणीतरी एखादे निरीक्षण मांडते मग कोणीतरी त्याबद्दल आणखी सहमती/असहमती वाले काही लिहीते आणि ते वाढत जाते.

पण अजून हेच चालू आहे याचे दुसरे कारण इतक्यात कोणी एखादा पिक्चर पाहिलेला नाही किंवा त्याबद्दल लिहीण्यासारखे कोणाला काही सुचलेले नाही. नाहीतर गाडी रूळावर येईलच की परत.

हल्लीच याचा मुळ हॉलिवुड पाहिला dirty rotton scroundals. मस्तच. >>> हा बहुधा "खेल" आणि "दीवाना मस्ताना" दोन्हींचा मूळ पिक्चर असावा. साधारण थीम तशीच वाटते.

तिचा स्क्रीन प्रेझेन्स जबरी आहे, पूर्ण पडदा व्यापून टाकते. रेखा श्रीदेवी पण त्याच कॅटेगरी मधल्या. हेच सध्याच्या कोणत्याच हिरोईन बद्दल म्हणता येणार नाही. पुन्हा डान्स, अभिनय दोन्ही छान करते.>>> याला खुपच अनुमोदन

ती अभिनय सुद्धा सहज करू शकली असती पण तिने केला नाही ही तक्रार आहे. ती 'सेफ' खेळत राहिली, वैविध्यपूर्ण काम न करताही तिचं चालून गेलं.>>> असहमत ! प्रहार, परिन्दा, तेजाब, म्रुत्युदन्ड, पुकार मधे तीच्या अभिनयाचा कस लागला आहे, यातल वैविध्य आणी तिचा अभिनय वादातित उत्तम आहे.
प्रहार मधे झिरो मेकप नानाने तिला कॅमेरासमोर उभ केल होत...आजची काय ,तेव्हाची काय कुठल्याही इरातली हिरोईन तयार होणार नाही.

“ पण करिअर नीट मॅनेज करता येणं आणि ग्रेट अभिनय करता येणं ही निरनिराळी स्किल्स आहेत” - सहमत आहे. माधुरीने वाईट अभिनय केल्याचं पटकन उदाहरण आठवत नाही. फार सशक्त भुमिका तिच्या वाट्याला आल्या नाहीत (का तिने नाकारल्या माहीत नाही).

“ रामायण महाभारत इलीअड शेक्सपिअर चार्ल्स डिकन्स” Lol केकू, सहीं पकडे़ हैं| मला पण ह्यातली काही उदाहरणं आठवली होती ‘कालातीत कलाकृती‘ पोस्ट लिहीताना. ह्यातली कथाबीजं अत्यंत सशक्त आहेत. पिढ्यानपिढ्या टिकली आहेत. त्यामागचे मानवी स्वभावाचे कंगोरे, नातेसंबंधातले प्रवाह रिलेटेबल आहेत. पण त्यांची सादरीकरणं बदलली आहेत. मूळ कथा जरी सादरीकरणाइतक्या प्रवाही नसल्या तरी स्थळकाळाची बंधनं आणि त्यानुरूप होणारे होणारे इंटरप्रिटेशन्स चे बदल ह्या कलाकृतींनाही चुकले नाहीत.

Pages