मला चुकीची ऐकू आलेली गाणी -३

Submitted by परदेसाई on 5 December, 2022 - 08:33

पहिली दोन पाने २०००+ पोष्टीनी पूर्ण झाल्यामुळे हे तिसरे पान सुरू करतोय.

आधीची पाने इथे पहायला मिळतील..

http://www.maayboli.com/node/2660
https://www.maayboli.com/node/52599

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

Cute: )
चोल Happy
इतिहासाचा अभ्यास झाला सुद्धा मॅडम चा
हर्पा पुत्री आहे ती Lol

नानी तेली मोलनी.... मोल ले गये
Nappy जो बचा था... चोल ले गये >>

हे वाचल्यावर
नानी तेली मोलनी कमोड ले गये
असं ऐकु आलं मनात.

हिना सिनेमातील, अनारदाना अनारदाना हे गाणं आजवर मी "नारदाना नारदाना हजारोमें टोपीवाले नारदाना" असं ऐकत आलो.
ते खरं तर,
"अनारदाना अनारदाना असा रूनी टोपीवाले अनारदाना" असं आहे.

वादळ वारं सुटलं ग....

गाण तर बरोबरच ऐकू येतं. पण माझ्याच मनात ओळी सुरू होतात,

......
.....
भिर भिर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात
सजणानं सजणीला पाण्यात लोटलं ग...

"अनारदाना अनारदाना असा रूनी टोपीवाले अनारदाना"
<<<<<
'असा रुमी टोपी वाले नाल जाना...'
आम्हांला रुमी टोपी घातलेल्या (माणसा)बरोबर जायचं आहे.

मामी, बरोबर!

सजणानं सजणीला पाण्यात लोटलं >> Lol
आम्ही मुद्दाम 'घर से निकलते ही कुछ दूर चलते ही' गाण्यात 'बाल बनाती वो खिडकी से आयी उतर' म्हणायचो Proud
तसंच मोहोब्बतें मधलं गाणं ' हम को हमीं से चुरा लो' आहे, त्यात 'आओ गले से लगा लो' ऐवजी 'आओ गला ये दबा लो' !

>>सजणानं सजणीला पाण्यात लोटलं<<
आम्ही तर हेच म्हणायचो. बरोबर नाहि आहे?
नक्की काय आहे ते हि लिहा. शोधायचा त्रास वाचेल आणि डोक्याचा भुंगा.

असेच एक गाणे अगदी अलीकडे गायचे जोवर तुनळी पाहिली नाही.

मी तर जाते जत्रेला, गाडीचा खोंड बिथरला
बरं नाही घरच्या गणोबाला,
कुणीतरी बोलवा दाजीबाला

बोल आहेत, बळं. आणि मी तर बरं म्हणायचे

अल्ला ते रोना, इश्वर ते रोना….

पंजाबी शब्द हिंदी गाण्यात सर्रास मिसळत असल्याने ह्या गाण्यातही तसेच झाले असल्याची दाट शक्यता असणार असेही मी स्वतःला समजावले होते. गाण्याचा भावही रडकाच असल्याने जे ऐकु येतेय ते चुकीचे असावे हा विचारही कधी केला नाही.

(तसेही गाण्याच्या मिटरात बसतील ते शब्द हिंदी गाण्यात धडाक्याने खपवतात. बोलताना ‘आप’ बोलायची सवय असलेल्याच्या तोंडुन कधीही ‘तुम’ येणार नाही. पण हिंदीत पहिल्या ओळीत आप बोलणारा दुसर्‍यात तुम वर घसरतो. तरीही मिटर बोंबलतच राहिला तर तिसर्‍यात तू वरही येईल.)

Pages