क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही सर
माझ्या मते k l राहुल!

* ( पंत ) आजच्या तारखेला सर्वात भरवश्याचा फलंदाज आहे..*. पंत देखील असं म्हणताना कचरेल ........More loyal than the king himself !!! Wink

“ पंत आजच्या तारखेला सर्वात भरवश्याचा फलंदाज आहे” - देव आनंदवर अभिनयाचा आरोप त्याचे कट्टर चाहते सुद्धा करत नसत. Happy

तीन दिवस पाऊस पडू शकेल असे भाकीत आहे. आपण अशा फुटकळ गोष्टींकडे लक्ष देत नाही. दोन वर्ल्ड फायनलच्या वेळी कोच नि कप्तानांनी हे ठासून सांगीतले होते. तेंव्हा कुलदीप खेळला तरी आश्चर्य वाटू नये Wink

मला वाटते नायरला अजून एक संधी द्यावी पण ह्या वेळी किमान पन्नास नाहि केले तर साईला आणावे शेवटच्या सामन्यासाठी तरी.

पंत देखील असं म्हणताना कचरेल
>>>>>>>>>>

तो पंतचा मोठेपणा झाला.
मी अश्विनच्या मताशी सहमत आहे.

Ravichandran Ashwin stated that Rishabh Pant should not be compared to Adam Gilchrist, emphasizing Pant's superior defensive skills. Ashwin believes Pant is a better batsman than Gilchrist and should be compared to the best in the business, rather than the legendary wicketkeeper-batter. Ashwin highlighted that while Gilchrist was a great player, his defense wasn't as strong as Pant's.

मला वाटते नायरला अजून एक संधी द्यावी>>>> सहमत आहे.
सुरेश मेनन म्हणतो त्या प्रमाणे त्याच्या कडे "पर्ची" नाहीये.

“ मला वाटते नायरला अजून एक संधी द्यावी” - मिळेल असं वाटतंय. त्याने ह्या संधीचं सोनं करावं हीच अपेक्षा. ह्या सिरीजमधे साई पण त्यापलिकडे विचार करता अय्यर आणि सर्फराझ हे सगळे वाट बघत असताना नायरला फार वेळ वाया घालवता येणार नाही.

“ कुलदीप खेळला तरी आश्चर्य वाटू नये” Happy ह्यातला उपहासाचा भाग सोडला तरी कुलदीपने प्रत्येक मॅचमधे - उपलब्ध असल्यास खेळावच. ऑस्ट्रेलिया जशी लॉयनला खेळवतेच, तसाच कुलदीपसुद्धा चार प्रमुख बॉलर्सपैकीच एक असला पाहिजे. रन्स काढणं ही प्रामुख्याने बॅट्समेनची आणि विकेट्स काढणं ही प्रामुख्यानं बॉलर्सची जबाबदारी आहे.

आश्विन आणि मी वेडे नाही आहोत.

जर कोणाला कल्पना नसल्यास सांगू इच्छितो, २०२० दशकात भारतातर्फे सर्वाधिक धावा ऋषभ पंत यांच्या आहेत
आणि त्या देखील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक सरासरीने. फक्त यशस्वी जयस्वालची सरासरी त्यापेक्षा जास्त आहे.

२६१९ धावा ४४.३८ सरासरी

६३ इनिंग मध्ये २१ वेळा ५०+ स्कोअर केला आहे. म्हणजे दर तिसऱ्या इनिंगला तो अर्धशतक मारतोच.

अजून कोणी असे सातत्य राखून असल्यास दाखवा.

खाली चेक करा सर्वांचे या दशकातील आकडे.

किंबहुना या मालिकेत सुद्धा ६ इनिंगमध्ये सर्वाधिक ४ वेळा तो अर्धशतकापलीकडे गेला आहे. त्यामुळे त्याची पुन्हा अर्धशतक मारायची खात्री सुद्धा सर्वाधिक आहे हे कुठलेही हवेत केलेले विधान नाही.

IMG-20250723-WA0004.jpgआश्विन मागे सुद्धा एकदा म्हणाला होता की प्रॅक्टिस करताना ऋषभ पंत कधी डिफेन्सिव खेळताना बाद होत नाही.

जेव्हा पंत इंग्लंडमध्ये आपली पहिलीच कसोटी खेळला तेव्हा भले त्यात त्याने मोठा स्कोअर केला नसला तरी दादा (सौरव गांगुली) त्याच्या सॉलिड स्टान्सचे कौतुक करताना म्हणाला होता की भारताला ओव्हरसीज खेळणारा एक फलंदाज मिळाला. जे पुढे जाऊन पंतने खरे ठरवले. उगाच काही तो भारताचा सर्वोत्तम लीडर नाहीये. खेळाडू ओळखता येतात त्याला..

सर्वसाधारणपणे क्रिकेटप्रेमी जनता पंतचे टेक्स्ट बुक पलीकडचे स्कोअरिंग शॉट बघते आणि त्यावर बेभरवशाच्या शिक्का मारून मोकळे होते. पण ती त्याची धावा बनवायची शैली आहे. तुमच्या आमच्यापेक्षा जास्त तो स्वतःचा खेळ ओळखतो आणि रिस्क कॅल्क्युलेट करतो. हल्ली बरेचदा तो आपल्या विकेटला प्राईस टॅग लावताना दिसतो पण आपली शैली आपला इम्पॅक्ट न बदलता..

आणि हो, हे सगळे तो करतो ते दिवसभर विकेट कीपिंग करून उठाबशा काढल्यावर...
त्यानंतर पुन्हा दिवसभर फलंदाजी करून मॅरेथॉन इनिंग खेळण्यापेक्षा आपल्या शैलीनुसार आक्रमक खेळून त्याचा धावा वेगात जमवणे सोयीचे आणि फायद्याचे पडते हा मुद्दा देखील त्यांच्या लक्षात आला तर बरे...

*तसाच कुलदीपसुद्धा चार प्रमुख बॉलर्सपैकीच एक असला पाहिजे.* - +१. गोलंदाजीत फिरकी हे आपलं पारंपरिक शक्तिस्थळ आहे व सर्वसाधारणपणे उपखंडाबाहेरील फलंदाजांचं मर्मस्थळ ; आता आपल्याकडे प्रतिभावान फास्ट गोलंदाज आहेत, ही चांगलीच गोष्ट असली तरीही हल्ली आपणच फिरकीला अगदीच दुय्यम स्थान देवून स्वत:चंच नुकसान करून घेतो आहोत, असं मला नेहमीच वाटतं रहातं. ( हॉकी मध्ये पाश्चात्यांच्या नादी लागून आपण आपली खास अशी शॉर्ट पासिंगची जादुई नजाकत सोडून आडदांड लाँग पासिंगची कास धरली व नुकसान करून घेतलं, तसंच कांहीसं ! ).

"Lies, damned lies, and statistics" is a phrase that highlights how statistics can be manipulated to support weak arguments or mislead people. It suggests that statistics can be as deceptive as outright lies, often used to cast doubt on the validity of data presented by others
डबक्यातील पाण्याची सरासरी खोली केवळ सहा इंच होती, तरीही त्यात एक माणूस बडून मेला.

फिरकीला अगदीच दुय्यम स्थान देवून स्वत:चंच नुकसान करून घेतो आहोत, असं मला नेहमीच वाटतं रहातं. >>>> +१

तसेच फिरकी गोलंदाजीसमोर फलंदाजी कशी करावी ह्याचे देखिल स्किल आता फलंदाज आत्मसात करत नाहीत. पुर्वी तासंतास फिरकीसमोर आपले फलंदाज नांगर टाकून फलंदाजे करीत. काल १९ वर्षांखालील सामना पाहताना प्रकर्षाने जाणवले. जलद गती गोलंदाजी समोर ६+ गतीने धावा करणार्‍या फलंदाजांनी फिरकी समोर सपशेल नांगी टाकली.

शेअर मार्केट मधील एक विचार
एखाद्या कंपनीचा कालचा performance चांगला होता म्हणून आजचा आणि उद्याचा चांगला असेल ह्याची खात्री देता येत नाही.

@ केशवकूल
तुम्हाला माझ्या पोस्ट मध्ये फक्त statistics दिसत असेल तर तुम्ही केवळ नावडतीचे मीठ अळणी तत्वाला अनुसरून ऋषभ पंतला केवळ विरोधाला विरोध करत आहात.
इन द्याट केस चालू द्या आपले Happy

अँड धिस वन फॉर ऋषभ पंत -
लव्ह यू चुम्मा !!
असाच खेळत राहा भावा.. जगाला ओरडत राहू दे, तू आपला खेळ बदलू नकोस..
आणि मला माहित आहे तू तसेच वागतोस Happy

सर
जयस्वाल गिल पंत ह्या सारखे दिग्गज भारी भारी statistics वाले खेळाडू असून देखील आपण तिसरी टेस्ट हरलोच की.
जेव्हा पाहिजे तेव्हा खेळणारा खेळाडू ==त्याचे statistics जरी भारी नसले तरी ==== पाहिजे. रोलकॉल सारखे एक के बाद एक जाणारे. त्यांचा काय उपतोग?

भारी भारी statistics वाले खेळाडू असून देखील आपण तिसरी टेस्ट हरलोच की.
>>>>

आता काहीही मुद्दा काढणार का Happy

“ अँड धिस वन फॉर ऋषभ पंत” - त्याचा माबो आयडी काय आहे? Proud

“ आश्विन आणि मी वेडे नाही आहोत” Rofl

सर
असो. काहीही करा पण सामना जिंका. एव्हढीच अपेक्षा. हा सामना जिंकायलाच हवा. with पंत ऑर w/o पंत. पंत चांगला खेळला तर फारच छान.

पंत चांगला खेळला तर फारच छान.
>>>>

आजवर कित्येकदा छान खेळला आहेच तो.. इतर कोणापेक्षाही जास्त वेळा Happy

आणि तितकाच जास्त आनंद दिला आहे आजवर त्याने...

केशवकूल,
पाच दिवसांची कसोटी असते.
निकाल शेवटच्या दिवशी लागतो.
खेळाचा आनंद तुम्ही प्रत्येक दिवशी लुटता की शेवटच्या दिवशी निकाल काय लागतो ते बघून मग ठरवता आनंदी व्हायचे की नाही Happy

जेव्हा पंतची सेंचुरी आणि सेलिब्रेशन बघून समस्त क्रिकेटप्रेमी खुश झाले होते आणि गावस्कर सुपर सुपर सुपर म्हणाला होता तेव्हा त्याने ईफ इंडिया विन ही कंडीशन टाकायला हवी होती वाटते Happy

ईफ इंडिया विन >>> हे महत्वाचे.
नाही तर काय होतेय की "सगळी वैयक्तिक Records आपल्याकडे, आणि विजय मात्र त्यांच्याकडे " असे नको व्हायला.

फेफ.. Rofl

आकडेवारीचाच विषय चाललाय तर मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात त्याची एक आकडेवारी देतो..
ते म्हणतात की ७२.५३८ % मनोरुग्ण मी वेडा नाहीये असंच म्हणतात.

अंशूल कंभोज चा डेब्यू. त्याला आणि इंडियन टीमला शुभेच्छा!! रौंद डालो कॅप्टन रसल के अहंकार को!!

करूणच्या जागी साई आणि रेड्डीच्या जागी ठाकूर!

First Hour No blood

Pages