क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्या सामन्यानंतर हे न बघता सरळ 4-0…5-0 ठरवून मोकळे झाले होतात >> तुला 'ठोकताळा' नि 'चुकांमधून शिकणे' ह्यातला फरक काडीचाही कळत नाही हे कळून चुकले आहे.

खरे मुत्सद्दी हेच. >> Lol त्याच्या डोक्यावरून जाणार रे हे ! "खरे मुत्सद्दीच हे" असे हवे होते का ?

बुमराह संघात असताना सामना जिंकणे न जिंकणे या आकडेवारीत काही अर्थ नसतो कारण क्रिकेट हा सांघिक खेळ आहे.
निकाल काहीही लागला तरी बुमराह कामगिरी जबरदस्तच असते

मी जे वर दिलेले आकडे आहेत ते वैयक्तिक कामगिरीचे आहेत.

या दोन्ही गोष्टींची तुलना कशी होऊ शकते?

किंबहुना ते आकडे तसे आहेत म्हणून तर रहाणे आणि पुजारा संघाबाहेर गेला. कोहली जरी व्हाईट बॉल क्रिकेट कामगिरीच्या जीवावर कसोटी संघात राहिला तरी आधीचा दरारा त्याने गमावलाच.

असो,
पण त्या आकड्यांची रोचकता अशी की हे तीन खेळाडू शर्मा, धोनी, पंत, जडेजा यांच्या तुलनेत तंत्रशुद्ध आहेत पण सरासरीत मागे आहेत.

बुमराह पोस्ट आमच्या ग्रूपवर सुद्धा फिरत होती.
तसे आकडे का आले असावेत यावर मला जे वाटले त्यानुसार एक पोस्ट लिहीली होती.
आता विषय निघाला आहे तर इथे कॉपी पेस्ट करतो.
------------------------

त्याला बरेचदा मोठ्या सामन्यात खेळवतात आणि छोट्या सामन्यात विश्रांती देतात.

भारतात कमी खेळवतात आणि परदेशात जास्त खेळवतात.

मध्यंतरी कोहली आणि रोहित शर्मा फ्लॉप होते. त्याआधी बराच काळ कोहली पुजारा रहाणे वगैरे मिडल ऑर्डर फ्लॉप होती ज्यात त्याचा दोष नव्हता.

तो असला की कप्तान सगळे डावपेच त्याच्याभोवती ठरवतो यात बाकीचे गोलंदाज नाराज होत असतील आणि त्यांच्या खेळावर परिणाम होत असेल.
तेच तो नसला की ते आपला खेळ उंचावतात असे बरेचदा बघायला मिळते.

असेच काही प्रतिस्पर्धी संघाबाबत सुद्धा होत असावे.
म्हणजे तो समोर गोलंदाजीला असला की आपला खेळ उंचावणे. अजून फोकस करणे. एकदा त्याला खेळले की इतर गोलंदाज तुलनेत सोपे वाटणे. आणि त्यांना टारगेट केले जाणे...

बरीच कारणे कमी अधिक प्रमाणात एकत्रित असावीत...

ज्यांना अश्या पद्धतीने विचार करून बघावा हे कळत नाही ते त्याला पनवती ठरवून मोकळे होत असतील.

पण ही जी नंतरची कारणे आहेत तसे काही घडत असेल तर भारतीय थिंकटँकने या मानसिकतेत बदल कसा घडवता येईल याचा विचार केला पाहिजे.

खरे मुत्सद्दी हेच. बाकी कोच-कॅप्टन-सिनियर प्लेयर वगैरे नुसतीच खोगीरभरती.
>>>>

उलट मी पूर्ण दौरा भारतीय थिंक टँकला सपोर्टच करत आहे.
आणि जे पहिल्या सामन्यातील पराभवानंतर यांना लगेच झोडपायला लागले होते त्यांना संयम बाळगायचा सल्ला देत आहे.

जर ही मालिका पुढे जाऊन हरलो तर याच कोच-कॅप्टन-सिनियर प्लेयर ना झोडपायला चढाओढ लागेल.

“ "खरे मुत्सद्दीच हे" असे हवे होते का ?” - सरांच्या बाबतीत ‘च’ कुठेही लावला तरी चालतं.
रास्तों से कारवाँ तक,
इस ज़मीं से आसमाँ तक
मैं ही मैं हूँ, मैं ही मैं हूँ

*..अन् असल्या आकड्यांकडे पाहून त्याला बाहेर ठेवायचा मूर्खपणा कुणीही कॅप्टन किंवा कोच किंवा सिलेक्टर करणार नाही.* +१. -

सर, पण आकडेवारी बघा ना ! गेल्या तीन डावात माझा स्कोअर 7, 14 व 28 आहे , त्यामुळे उद्या 56 व नंतर सेंत्युरी, डबल सेंच्युरी आहेतच ना !!!20190715_133903.jpg

मस्तच भाऊ!

आणि हे प्रेडिक्शन भाऊंनीच इथे केलं होतं हे ही नमूद करून ठेवावं. (प्लेयरचं नाव नंतर अ‍ॅड करता येईल). Wink Happy

इस ज़मीं से आसमाँ तक
मैं ही मैं हूँ, मैं ही मैं हूँ >>>>>>>ते महागुरूंचे फॅन असल्यामुळे हेच अपेक्षित आहे...

ते महागुरूं>>>

धागांतर...

महागुरुंवरून आठवले काल कुठे तरी वाचले केकता कपूरला 'क्यों की सास भी कभी..' हे सिरेलचे नांव महागुरुंनी सुचविले होते असे महागुरुंनी सांगितले.

Ravindra Jadeja was batting well and defending resolutely, but it never looked like he was taking the kind of risks needed to help India win. He was playing a waiting game and hoping against hope,” he bemoaned. “The real star in that partnership, though, was Jasprit Bumrah.
- Sanjay Manjrekar

भारतात सेलिब्रिटी आणि त्यातही क्रिकेटर होणे काटेरी मुकुट आहे Happy
बहुतेकांना तुमच्याबद्दल कॉमेंट पास केल्याशिवाय जेवण जात नाही...
त्यात स्कोअर सेटल करायची संधी मिळाली तर क्या बात..!!

IND vs ENG: रिषभ पंतला इतिहास रचण्याची संधी! एवढ्या धावा करताचा 'या' दिग्गजाला टाकणार मागे https://share.google/4aPuYFV6dx3EzT6jv

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज सध्या रोहित शर्मा आहे. नुकतेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या रोहितने WTC मध्ये 40 सामन्यात 2,716 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावर पंतचे नाव आहे. पंतने आतापर्यंत 37 सामन्यात 2,677 धावा केल्या आहेत. त्याला रोहितला मागे टाकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. जर पंतने मँचेस्टरमध्ये खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात 39 धावा केल्या, तर तो रोहित शर्माची बरोबरी करेल. तर 40 धावा करताच तो रोहितच्या पुढे जाईल.

रेड्डीच्या इंजरीमूळे टीम कशी निवडली जाणार ह्यावर जबरदस्त बंधने येणार. त्यात दोन्ही दीप हो नाही मधे हेलकावे खात असल्यामूळे जास्तीत जास्त नायरच्या जागी जुरेल एव्हढाच इच्छिक बदल होईल असे दिसतेय. रेड्डी/आकाशदीप काते कोणी तरी दोन बॉलर्स हा फोर्स्ड असणार असे वाटतेय. त्यात कुलदीपची वर्णी लागण्याची शक्यता फारच कमी दिसते आहे.

सर्फराज चा १७ किलॉ कमी झाल्यानंतरचा फोटो बघितला का ? किमान आता त्याच्या फिटनेसवर शंका घेतली जाणार नाही. त्याच्या खेळावर नि प्रकृतीवर परीणाम होउ नये अशी आशा धरूया.

रेड्डीची इंज्युरी ब्लेसिंग इन डिसगाईज ठरू शकते (अनलेस त्याच्या जागी ठाकूरला खेळवलं). इंडिया एक स्पेशलिस्ट खेळवू शकते. (साई?)

अर्शदीप रूल-आऊट झालाय. आकाश चं तळ्यात-मळ्यात आहे. प्रसिध खेळेल बहूदा (जर अचानक कुंभोजचा नंबर नाही लागला तर).

If Kamboj gets his Test cap, it won't be as desperate a selection as it sounds.
Kamboj has 79 first-class wickets at an average of 22.88 since 2022. He comes with the approval of Chennai Super Kings MS Dhoni, who complimented his seam movement during this year's IPL

Espn@cricinfo

आत्ताची विकेट फिरकीला साथ देणारी आहे, असंही बोललं जातंय. पावसाची शक्यता फारच कमी आहे व त्यामुळे पांच दिवस खेळ होईल व अधिकाधिक फिरकी प्रभावी ठरेल, ही शक्यताही आहे. यासाठी जडेजा, सुंदर पुरेसे आहेत की कुलदिपही आवश्यक आहे व असल्यास परिणामी संघात काय बदल करावे लागतील हा अतिशय कठीण निर्णय ठरेल !!

कॅप नं. ३१८ अभिमन्यू ईश्वरन > जैस्वालच्या बिनडोकपणाबद्दल कमरेखाली ला...

कॅप नं. ३१९ अंशुल कांबोज > आकाशदीप बदली

जुरेल > नायरच्या सुद्धा क.खा.ला...

हे तीन बदल व्हायला हवेत. असंही जिंकणार नाहीच्च आहोत तर उरलेल्या दोन कसोटीत "नवीन संघ आहे..आम्ही शिकत आहोत.." a.k.a Learning Process असं म्हणायला तरी वाव मिळेल.

"नवीन संघ आहे..आम्ही शिकत आहोत.." a.k.a Learning Process असं म्हणायला तरी वाव मिळेल.
>>>>>

असे नाही म्हणू शकत आता
कारण आम्ही शिकायला नाही तर शिकवायला आलो आहोत अशी जाहिरात केली आहे.

आणि तसेही रेकॉर्डबुकमध्ये निकाल जातो. कारणे नाहीत.

पण मुळात २-१ हा निकाल आपण पिछाडीवर असल्याचे दाखवत असला तरी प्रत्यक्षात तसे नाहीये.
त्यामुळे उगाच पॅनिक होत काही बदल करायची गरज नाही. बदल डावपेचानुसारच व्हावेत.

जखमी आकाशदीप
आणि
यष्टीरक्षण जुरेल (पंत फक्त बॅटिंग पुरता जर तो यष्टिरक्षण करणार नसेल तर)

हे नॉन पॅनिकी बदल करावेच लागणार आहेत.

राहिला अभिमन्यू ..जाऊ दे की त्याला चक्रव्यूहात. ऑस्ट्रेलिया दौर्‍यापासून त्याला उगाचच जगभ्रमंती करण्यासाठी घेतलाय का?

रेड्डी सुद्धा नाहीये ना...
मला अश्या संघाची शक्यता वाटत आहे,

यशस्वी
राहुल
नायर
गिल
पंत
जडेजा
ज्युरेल/साई/सुंदर
शार्दुल
बुमराह
सिराज
कंबोज

ज्युरेल/साई/सुंदर यापैकी एक अनुक्रमे पंत बॅकअप प्लान, बॅटिंग मजबूत करायला, स्पिन गोलंदाजी पर्याय म्हणून निवडतील.

सगळे अनिश्चित आहे. म्हणजे पंत फलंदाजी आणि याष्टीरक्षण दोनी करेल/ किंवा नाही.
आकाशदीप खेळेल किंवा नाही.
कंबोज संघात येणार का प्रसिद्ध खेळणार.
पाउस येणार की नाही.
आणि पंत झोपून स्कूप सिक्स मारणार की झेलबाद होणार.
अजून ठरवलेले बाही.
सध्या परिस्थिती द्राव्य आहे उद्यापर्यंत स्फटिक बनेल

पंत एखादे अर्धशतक तर मारेलच हे पंतबाबत सांगता येते....
पण हेच खात्रीने दुसऱ्या कुठल्या खेळाडूबद्दल नाही सांगता येत..
आजच्या तारखेला सर्वात भरवश्याचा फलंदाज आहे..

Pages