खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधं जेवण चिकन रस्सा ... मलाही कायम असेच साधे ठेव देवा Happy

@ केक, प्रो असायलाच हवा कारण बनवणारी तशी एकेकाळी केकच्या ऑर्डर घेणारी प्रो च होती Happy
आता मात्र गेले वर्षभर घरच्या कोणाच्या वाढदिवसाला सुद्धा बनवला नाही तिने.. पण आमच्या पिकनिकला दरवर्षी बनवून देते Happy

@ अनिंद्य, तुम्ही हसला ते लीगचे नाव नाही तर चारपैकी एका टीमचे नाव असावे. पहिल्या रांगेत ते चार संघाचे चार लोगो आहेत.
हा मूळ कोलाज फोटो ज्यात ते ते क्लिअर दिसतील.

IMG-20250710-WA0017.jpg

बेफाम दिसतोय कोंबडी रस्सा. वाटीने तब्बेतीत प्यायची चीज आहे. बढिया !

असं 'साधं' जेवण रोज असेल तरी चालेल. Happy

अनिंद्यच्या राजम्याखालचा भात अप्रतिम!
मंजूताईंची राजम्याची प्लेट मिकी माउस वाटतेय!
अल्पनांची डिश चारीठाव म्हणावी अशीच आहे!
सूर्यगंगांचा पुरणावरणाचा स्वयंपाक मस्त!
ऋन्मेऽऽषच्या उपम्यावरची शेव सुंदर!
सर्वांना 💖

प्राज क्ता धन्यवाद, सुधारणेस खूप वाव आहे.
- एक तर कॉर्न स्टार्च संपलेला. फार कमी राहीला होता त्यामुळे बाईंडिंग नीट झाले नाही.
- लंपन यांनी सांगीतलेले की ते पनीर नीट मऊ मळून घेणे पण आळस नडला.
- फॅट फ्री दुधाचा बासुंदी-पाक होउन होउन कसा होणार Sad

मस्त दिसतेय रसमलाई. खूप आवडता पदार्थ आहे हा, पण स्वतः करण्याइतका उरक नाही. त्यापेक्षा बाजारातून आणून पोर्शन कंट्रोल करून खाणे जास्त सोपं आहे इथे भारतात.

काल दुपारी छोले पुरी आणि मिठी लस्सी ( फोटो काढायचा राहून गेला) असा दमदार मेन्यू झाल्यावर रात्री हलकं काहीतरी खायचे होते. शिळी, आदल्या दिवशीची खिचडी आणि सलाड ( peenut butter+ balsamic vineger dressing.
IMG-20250720-WA0004.jpg

अल्पना, तू बाकीचे बरेच अवघड पदार्थ करते, रसमलाई नक्की जमेल तुला... कारण ती मला सुद्धा जमते Wink
सरिता किचन ची पाकृ बघून बघून करते मी, खूप छान टिप्स आहेत, जसे की पनीर साठी गाईचे दूध वापरा इ इ..

image_0.jpg केना, पालक भजी
मलाही रसमलाई खूप आवडते . आता नागपूरला गेले होते हल्दीराममध्ये खाल्ली.
कल्पनांचे पदार्थ फार निगुतीने केलेले असतात.

चिकनचा रस्सा, केक, रस मलई आणि खिचडी आणि सलाड बोल मस्त आहे.
भजी पण एकदम कुरकुरीत दिसतायेत.
चामुंडराय, कसले पॅटीस आहेत.
प्लेटिंग मस्त एकदम.

@ चामुंडराय

सुंदर प्लेटिंग. चेरी तर फारच सुंदर आयडिया 👍

मंजूताई काय खमंग दिसतेय भजी. >>>११०००+

चामुंडराय >>> पॅटिस, फ्रिटर्स की पनीर पकोडे? जे काय आहे ते एकदम उचलून तोंडात टाकावेसे वाटतेय.

आज इथे चांगला पाऊस पडतोय आणि असे फोटो पाहून तोंड आणि भूक चाळवतेय

अनिंद्य एकदम फ्रेश/ ताजातवाना फोटो Happy
>>>>>>>>>रसाहार + फलाहाराचा तिसरा आणि अंतिम दिवस.
का? बॉडी डिटॉक्स वगैरे काही नेम केलेला का?

@ सामो,

विशेष काही नाही, हे द्विवार्षिक ritual आहे माझे.

मूळच्या खादाड स्वभावावर थोडा कंट्रोल रहावा म्हणून केलेला प्रयत्न. 😀

चामुंडराय यांचे मला इडली फ्राय वाटत आहेत..
नसतील कदाचित.. पण आमच्याकडे दर आठवड्याचा मेनू असल्याने पहिले डोक्यात तेच आले

मोसंबी + pineapple ज्यूस मस्त...
मी लहान होतो तेव्हा आजारी पडल्यावरच ज्यूसचा खुराक सुरू व्हायचा. इतरवेळी ती चैन होती. त्यामुळे आजारी पडले की जरा बरे वाटायचे. तेव्हाही मोसंबी ज्यूसच फेवरेट होता. मोठे होता होता चव आणि आवड बदलली. शेवटचा कलिंगड वगळता कुठलाही ज्यूस कधी प्यायलो हे आठवत नाही..

पॅटिस, फ्रिटर्स की पनीर पकोडे? >>>>

इडली फ्राय आहे.
थोडेसे तेल आणि मिरची पावडर इडलीच्या तुकड्यांवर टाकून हवेवर तळले आहेत.

भजी मस्त आहेत. माझ्याकडे तळण फारच कमी केलं जातं (वर्षातून १-२ वेळाच जास्तीत जास्त). काल पुर्‍या तळल्यानंतर उपासाचे पापड, पापड्या आणि चकल्या तळल्या होत्या. त्याचवेळी कढई ठेवलीच आहे तर भजी पण तळू असं वाटलं होतं.

त्या इडल्यांचे किती मस्त एकसारखे तुकडे केलेत.
ज्युस मस्त दिसतोय. आयता कोणी देत असेल तर कधीही चालेल ताजा ज्युस.

Pages