खाऊगल्ली - आजचा मेनू - (६)

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ Happy

क्रमवार पाककृती: 

आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415

तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या Happy

फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556

वाढणी/प्रमाण: 
माहितीचा स्रोत: 
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कानडा गो निप्पट्टु, कर्नाटकू

आजच्या चहापानाला “निप्पट्टु” ची संगत

498302ba-9742-4731-974d-1b11fea896a3.jpeg

# Gluten-free
# राग कानडा
# Tea time delights from culinary antiquity

रात्रीच बंगलुरुतून योग्य सोर्सकडून आयात करण्यात आले होते. फार पसंतीचा मामला.

इंटरेस्टिंग आणि tempting दिसतोय हा प्रकार...
कधी खाल्ले नसावे बहुधा. पण Tea time delights हे बघून कळतेय.. म्हणजे बघून सोबत चहा घ्यावा अशीच इच्छा झाली.

अल्पना, मी पक्की घासपूसवालीच आहे . आमंत्रण स्वीकारलं!
सामो, मेथांबा आणि तिमीपुरी फार आवडीचं काम्बो!
अनिंद्य, क्रिस्पी प्रकार दिसतोय

>>> कानडा गो निप्पट्टु, कर्नाटकू

माझे फेवरीट !

---

उपम्यावरची शेव पाहून या फोटोची आठवण झाली.

---

मागच्या आठवड्यात बोनालू उत्सव होता. शेजाऱ्यांनी मुरुकुलु आणून दिले होते...

मुरुकुलु

---

कालची संथ शनिवार सकाळ... इडलीचा बेत... सांबार करण्याचा कंटाळा म्हणून सोबत नुसती चटणीच...

इडली-चटणी

---

आजची आळसावलेली रविवार सकाळ... श्रावण सुरु झालाय म्हणून कांदा न घालता केलेले पोहे... सोबत नेहमीचेच पदार्थ...

पोहे

>>> आळसावलेली रविवार सकाळ म्हणताय आणि फोटो इतका sagrasangit...
तर साग्रसंगीत सकाळचा फोटो कसा असेल ????

अहोंनी पोहे केले होते आणि मी गाजर-बीट चिरले, बाकी तर सगळं तयारच होतं... सकाळ आळसावलेली होती पण फोटो काढायचा उत्साह असतोच ना नेहमी!

बऱ्याच दिवसांनी काल मोजमजाही मार्केटला गेलो होतो. कराची बेकरीच्या मूळ दुकानातून फरुट बिसकिटां घेतले. सोहमलाल चहाच्या दुकानातून मिच्चर चिवडा घेतला.‌ कोणते ना कोणते भिजवलेलं धान्य ( मूग, मटकी, हरभरा, चवळी, शेंगदाणे, मूगडाळ, चणाडाळ इ) घरी असतंच.

फोटो काढायला म्हणून असेच दोन-तीन पदार्थ ठेवले की झालं!

… फोटो काढायचा उत्साह असतोच…

हे झ्याक आहे. फार देखणे फोटो असतात तुमचे

@ मुरुकुलु = मुरक्कू इन चैन्नै. आवडतात, सुपर क्रिस्पी आहेत हे फोटोतूनही समजते आहे 🤤

वडापावसोबत चहा मी देतो.
स्पेशल असा नाही पण इतकेच की मी माझ्या पद्धतीने केलेला आहे. असे मुद्दाम फोटो काढले कारण शाळेच्या ग्रूपवर चर्चा चालू होती की कोण कसे चहा करते..

IMG-20250727-WA0001.jpg

वामनरावांची पोहे प्लेट मस्त. पण ती नुसती कच्ची मटकी नाही आवडणार. मस्त फोडणी दिलेली असेल तर भारी लागते.

कराचीची बिस्किटे खूप आवडतात. या वेळेस आम्हाला चक्क त्यांची रोज सोन पापडी मिळालेली आहे. पहिल्यांदाच पाहिली म्हणून घेऊन आलोय. कशी आहे ते खाल्ल्यावर सांगतो Happy

मलाही असा मिल्की चहा आवडतो. सोनेरी रंगाचा, पण Zero Sugar >>> +१. पण मी दूध वरून घालते. दूध पाणी मिक्स असा चहा नाही करत. एकत्र उकळलेला चहा पिऊन मला अ‍ॅसिडिटी होते.

वडापाव जबरदस्त. आता हवाच आहे Happy

चहा उकळून पूर्ण तयार झाल्यावरच दूध घालतो. त्यामुळे दूध जास्त उकळले जात नाही. लगेच पुन्हा उकळी येते. वेगळे थंड कोमट दूध घातले तर सरासरी तापमान कमी होते. मला चहा उकळताच लागतो. एकदा गॅस बंद केला की थेट कपात आणि कपातून पोटात. एक सेकंद मी इथे तिथे वाया घालवत नाही. चहा सोबत खायचे पदार्थ काढून रेडीच ठेवतो.

मला चहा उकळताच लागतो. एकदा गॅस बंद केला की थेट कपात आणि कपातून पोटात. एक सेकंद मी इथे तिथे वाया घालवत नाही. +११ same here
गटग ला बाकरवडी कॉफीत बुडवून खायची idea कुणीतरी सुचवली तेव्हा तुमची आठवण काढली होती Lol
चहा चकली म्हणजे ऋ

@ किल्ली खूप दिवसात तुमचे फोटो आले नाहीत इथे - घरचे नाही दारचे नाही. खादाडीला ब्रेक की काय ?

घरादाराला कुलूप आणि किल्ली कपाटात..की बघा धाऊगल्ली धाग्यावर सापडते का.. डायटींग मोड मध्ये असेल Happy

बाई दवे,
मी बाकरवडी नाही चहात बुडवून खात. छान नाही लागत. चकली yes, ऑल टाईम फेवरेट. शेव फरसाण सोबत टाकली की ते फुगून वर येते आणि चकली चहा पिऊन तळाशी जाऊन बसते.

खादाडीला ब्रेक की काय ?>> हे तर शक्य नाही..
Photo घेणं आणि upload करणं ह्याचा कंटाळा.
टाकत जाईन photo इथून पुढे

मस्त! मी सुद्धा मसाला डोसा खाऊन आलो..
अर्थात मी ऑफिसला संध्याकाळी ५ पैकी ३ ते ४ दिवस साधा किंवा मसाला डोसाच खातो. शुद्ध सात्विक आहार!

Pages