Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आवरा!
आवरा!
चिंबोर्या!!!!!!! जुई, किती
चिंबोर्या!!!!!!! जुई, किती त्रास देशील माझ्या इवल्याश्या मनाला?
Wow जुई.. त्या खेकडा कालवणाला
Wow जुई.. त्या खेकडा कालवणाला अगदी आमच्या घरच्यासारखा रंग आला आहे.. किंबहुना ते टोप बघून तर आमच्या घरचाच फोटो वाटला
rmd मी पण फक्त फोटो काढलाय
rmd मी पण फक्त फोटो काढलाय बाकी मी शुद्ध शाकाहारी आहे

हो आपले बहुतेक पदार्थ दिसायला सारखे असतात... अगदी वर कोणीतरी आता नाव आठवत नाही म्हंटले त्याप्रमाणे कोकणातल्या सर्वांचे पदार्थ सारखेच दिसतात असे असले तरी रंग टेक्शर मधे फरक दिसतोच...
ऋन्मेऽऽष
तरी रंग टेक्शर मधे फरक दिसतोच
तरी रंग टेक्शर मधे फरक दिसतोच...>>> हो अगदीच.. मला तो रंग टोप टेक्शर तेलाचे प्रमाण वगैरे सगळेच सारखे वाटले. सध्या आई हातामुळे जमत नसल्याने खेकड्याचा खटाटोप करत नाही त्यामुळे लेटेस्ट फोटो नाहीये कुठला मोबाईलमध्ये...
मी पाच वर्षांपूर्वी इथे केले
मी पाच वर्षांपूर्वी इथे केले होते हे कालवण
मासवड्या आणि त्यांचे प्लेटींग
मासवड्या आणि त्यांचे प्लेटींग - उच्च!>>>>+१
rmd छान दिसतेय
rmd छान दिसतेय
आता या दिवसांत कोकणात चिक्कार खेकडे असतात.. नदीतून आणि शेतातून रात्रीचे पकडून आणतात..
खेकडे खूप आवडतात. यम्मी
खेकडे खूप आवडतात. यम्मी दिसतंय कालवण.
जुई आणी रमड दोघिचे खेकडे
जुई आणी रमड दोघिचे खेकडे रस्से/कालवण भारी आहेत.
अल्पनाचा ब्रेड एकदम प्रो दिसतोय..
साजचा अॅव्हाकोडो ब्रेड मस्त..
(No subject)
थट्टे इडली


इडली-सान्बार
इडली सांबर
इडली सांबर

इथे येणं म्हणजे पाऽऽऽप की ओ!!
इथे येणं म्हणजे पाऽऽऽप की ओ!!
इडली सांबर बेस्ट मेन्यू.
इडली सांबर बेस्ट मेन्यू. 👌
घरच्या इडल्या थोड्या कमी फ्लफी होतात पण जास्त हलक्या होतात, जास्त क्वांटिटीत खाता येतात. 🙂
इथे येणं म्हणजे पाऽऽऽप की ओ!!
इथे येणं म्हणजे पाऽऽऽप की ओ!!>>> मी पण हेच्च म्हणते की हो
राजमा-चावल. बॉलीवुडात काम
राजमा-चावल.
बॉलीवुडात काम करणाऱ्या समस्तजनांना कंपल्सरी आवडून घ्यावा लागणारा मेन्यू. 😀
असेच कंपल्शन मराठी celebrities ना “उकडीचे मोदक” आणि “वरण भात तूप” आवडण्याबद्दल असते. प्रत्यक्षात रोज तांबडा-पांढरा रस्सा का ओरपत असेनात, क्यामेरासमोर हेच सांगतात. 😉
राजमा चावल (बॉलिवूडात काम करत
राजमा चावल (बॉलिवूडात काम करत नसले तरी) आवडतात. आणि ते सलाड पण छान दिसतं आहे.
मासवड्या अगदी उचलून घ्याव्या
मासवड्या अगदी उचलून घ्याव्या वाटल्या. मला हे असे निगुतीने करायचे पदार्थ करायला जमत नाहीत.
सीफुड खत नसले तरी ते खेकड्याचे कालवण टेम्पटिंग वाटतेय.
इडली सांबर छान दिसतेय.
राजमा चावल पूर्वी अजिबात आवडत नव्हते. आता काही ठराविक ठिकाणचे आणि ठराविक लोकांच्या हातचे बनलेले फक्त आवडतात. त्यामुळे त्याला पास, सलाड चालेल सोबतचे.
राजमा-चावल >>> डोळ्यात बदाम!
राजमा-चावल >>> डोळ्यात बदाम! प्रचंड आवडता प्रकार.
प्राजक्ता, थट्टे इडली जबराट दिसते आहे.
छान राजमा चावल, अनिंद्य!
छान राजमा चावल, अनिंद्य!

अजून कोयरीच्या आकाराचे ऑबसेशन गेले नाही का?
कोयरीच्या आकाराचे ऑबसेशन
कोयरीच्या आकाराचे ऑबसेशन 😀
.. ठराविक लोकांच्या हातचे बनलेले राजमा चावल आवडतात..
+ १
बाहेर चुकूनही खात नाही. भदाभदा क्रीम + ज्यादा मसाले नै पसंद मेरे कू इस में
घरात नवऱ्याच्या आणि
घरात नवऱ्याच्या आणि गावाकडच्या मोठ्या जावेच्या हाताचे आवडतात आणि बाहेर खायचे तर घराजवळच्या छोट्या ढाब्यावरचे आणि पंजाबमधल्या बहूतेक सगळ्या ठिकाणी खाल्लेले आवडलेत
मला नाही चांगले बनवता येत.
धन्यवाद सगळ्याना!
धन्यवाद सगळ्याना!
घरच्या इडल्या थोड्या कमी फ्लफी होतात पण जास्त हलक्या होतात, जास्त क्वांटिटीत खाता येतात. >>> नवर्याने चुकुन सालाची उडिद डाळ आणली, ती पण ४ एल बी..मग आता सपवायला इडल्या मधे खपवली काही..त्यामुळे काळे डॉट दिसतायत इडल्या मधे..बरिच साल काढली होती तरी काहि राहिलिच होती.
आमच्याकडे डोसा बॅटर चान्गल मिळत पण इडली बॅटर मात्र यथातथाच असत..
राजमा चावल मस्त दिसतायत, पोराना फार आवडतात..त्याना सगळच पन्जाबी फुड आवडत.
>>> राजमा-चावल
>>> राजमा-चावल
ही मायबोली आहे का स्वीगी? पाहून चटकन ऑर्डर करावीशी वाटते!
प्राजक्ता, थट्टे इडली जबराट
प्राजक्ता, थट्टे इडली जबराट दिसते आहे.

अनिंद्य, राजमा चावल सलाड मस्त! तुम्ही टाकलेला फोटो पाहून मी टाकू की नको ... राजहंस वगैरे काहीतरी म्हणतात ... हा चाल'वून घ्या ! राजमा अनयाच्या शेतातला
अरे वा मंजूताई, राजमा चावल
अरे वा मंजूताई, राजमा चावल झब्बू आणि तोही farm fresh ingredients वापरून केलेला ! जय हो.
… पोरांना फार आवडतात…
@ प्राजक्ता, सेम. Gennext च्या आग्रहावरूनच होतो राजमा-चावल बेत.
देवदयेने आमच्याकडे राजमा कोणतेही आढेवेढे न घेता गपगुमान शिजतो. 😀 That’s one added blessing.
मंजू, मस्तच दिसतेय डिश.
मंजू, मस्तच दिसतेय डिश.
राजमा वाचल्यावर मला ही तोच धागा आठवला.
प्राजक्त, थट्टे इडली जबरी.
प्राजक्त, थट्टे इडली जबरी.
इडली चटणी सांबार कधीही खाऊ शकतो.
त्या खेकड्या पण मस्त दिसतायेत. कालवण पण मस्त.
अनिंद्य, राजमा भात मस्त. कुयरी काही सोडू नका अजून....
मंजूताई, राजमा चावल झब्बू मस्त दिसतोय. प्लेटिंग मस्त.
मलाही राजमा म्हटलं की माझेमन नी दिलेला मिम आठवतो.
अशा काळे...हलके हलके शिजवा....
धन्यवाद सगळ्याना!
धन्यवाद सगळ्याना!
राजमा झब्बु पण मस्त.
हमस अँड व्हेजी राईस बोल
हमस अँड व्हेजी राईस बोल
पिरी पिरी हमस, स्टर फ्राय भाज्या (फक्त मीरे -जीरे पुड आणि लसूण घातलेल्या), साधे कांदा-काकडी -टोमॅटो सलाड (यात पण फक्त मीठ आणि जीरे पुड घातली), मिंंट हंग कर्ड ड्रेसिंग आणि लेमन राईस (शिळा भात लसूण आणि कांदा घालून परतला. त्यात थोडी किसलेली लिंबाची साल, अर्धं लिंबू आणि भरपूर कोथिंबीर घालून मिक्स करून परतलं. चवीसाठी थोडी जीरेपुड + मीठ घातले. परतून झाल्यावर भात दाबून मंद आंचेवर शिजत ठेवला, खालून खरपुस होईपर्यंत), वरून यात घरच्या पिकल्ड / फरमंटेड मिरच्या घातल्या.
Pages