चित्रपट कसा वाटला - ११

Submitted by धनि on 28 January, 2025 - 21:53

नवीन चिकवा.

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/85328

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'आप जैसा कोई' बघायचा प्रयत्न केला, पण कंटाळले. चक्क माधवनसकट सगळं खोटंखोटं, बेगडी, ओढूनताणून जुळवलेलं, क्लीशेड, बावळट्ट आणि परिणामी अत्यंत प्रभावहीन वाटत राहिलं.
चाळिशीचा बाप्या व्हर्जिन असला तर असो बापडा, पण वाढ खुंटल्यासारखा बालिश का दाखवलाय?
सेट्स, घरं, कपडेपट, रंगसंगती, प्रकाशयोजना, संवाद, कथा, घटनाक्रम, संगीत, काहीकाही आवडलं नाही. वैतागून बंद केला!

स्वाती आंबोळे +100
प्रचंड bore झाला आप जैसा कोई...संपता संपेना..फार च कृत्रिम आहे सगळ..

आप जैसा कोई बघितला. मधे मधे बरा आहे. गाणी पार्ट पुढे ढकलला.
मला एक प्रश्न पडला आता ती कुसुम भाभी मधु बोस ची कोण लागणार मामी की भाभी सासू.? Lol

मालिक - हा काल थेटरात जाऊन (का!!!!) बघितला!
स्पॉयलर.... बघणार असलात तर वाचू नका.. पण मुद्दलात बघुच नका.. ...
राजकुमार रावचे बाबा 'मालिकचं' शेत कसुन उदरनिर्वाह करत असतात. एकदा तो मालिक त्यांच्या घरी येतो. बाबा पोराला पाया पडायला सांगतात. पोरगा बायकोच्या सांगण्यावरुन फुटबॉलची मॅच हरुन आलेला असतो कारण विरुद्ध टीम बायकोच्या गावची असते. काय लॉजिक! आता मॅच हरुन आलोय तर बायको शरीरसुख देईल अशी त्याची माफक अपेक्षा असते. त्यात बाप मालिकच्या पाया पडायला सांगतो. रा.रा टिळकांच्या बाणेदारपणे 'मालिक असेल तो तुमचा! माझा नाही' म्हणून 'मी शेंगा खाल्ल्या नाहीत' करत बेडरुम मध्ये शेंगेसारख्या बायको बरोबर (कोणी तरी चिल्लर, ही म्हणे मिस इंडिया होती) शरीरसुखाच्या अभिलाषेने जातो. तिकडे बायको ते देतच नाही, कारण तिला दहा दिवसांनंतर परत महिना आलेला असतो.... तुम्ही म्हणाल काय ही डीटेल माहिती सांगतोय.. पण असंच आहे पिक्चर मध्ये!
त्याच रात्री ह्याच्या बापाच्या कापणीला आलेल्या शेतात कोणे गुंड नांगर फिरवतो. हे समजल्यावर बाप लगेच शेतात जातो आणि बुलडोझर फिरवणार्‍या समोर विनवण्याकरतो. तो अर्थात अक्राळविक्राळ हसतो फक्त. मग मेरी लाश से गुजरना होगा वगैरे बोलुन हा बुलडोझर समोर उभा ठाकतो. पुढचा शॉट सरकारी अस्पतालमे हात पैर बाधलेल्या अवस्थेत. तिकडे पोट्टा पोहोचतो तोवर मालिक पण आलेला असतो. पोट्ट्याला मालिक सांगतो की दद्दा (सौरभ शुक्ला)ने हे सगळं केलं. का केलं? मला शेवट पर्यंत कळले नाही. पण केलंय ना आता! दाद तर मागितली पाहिजे. राजकुमारराव दद्दा कडे! हे सगळं कधी फ्लॅशबॅक, कधी फॉरवर्ड असं आपल्याला दिसलं की आपण इम्प्रेस व्हायचं की काय एडिटिंग वगैरे. तद्दन बेकार आहे ते. पण तरी...

तर काय सांगत होतो.. दद्दा! तर दद्दाकडे त्या भागाचा विधायक (स्वानंद किरकिरे) पण आलेला असतो. दद्दा म्हणतो, जो स्वतःच्या बापाला वाचवू शकत नाही तो ... ब्ला ब्ला. तर आणि एका फ्लॅशबॅक मध्ये हा दद्दा रा.रा. च्या युनिवर्सिटी मध्ये फुटबॉल मॅच झाल्यावर भाषण देऊन गेलेला असतो. आता रारा लग्न झालेला आहे, पण मग तो विद्यापीठात काय शिकत असतो, त्याचं उदरनिर्वाहाचं काय साधन काय असतं असले प्रश्न पडले नाही पाहिजेत.

तर काय सांगत होतो.. दद्दा कडून बापाच्या हल्लेकर्‍याचा सूड घ्यायचा करुन कर्मधर्मसंयोगाने त्याला तो कुठे आहे हे सांगणारा एक मिळतो. रारा तिकडे जातो, आणि त्या लंगड्याला (हेच त्याचं नाव आहे, व्यंगावरुन मी बोलत नाहीये) कुंदलकुंदलके मारतो. अगदी शॉवल छातीत सहासात वेळा घुसवून मारतो.
मग हा गुंडच बनतो. का? का? काहीही लॉजिक नाही... असं कसं नाही! हा आता स्वतःला 'मालिक' बनवतो. हेच फक्त लॉजिक. मै नौकर नही मालिक बनुंगा. सगळ्यांनी मालिक म्हणून हाक मारायची. बरं गुंड बनतो म्हणजे करायचं काय? ते ही मला उलगडलं नाही. घरी रहायचं नाही. कुठल्यातरी भलत्या गावात कुणा भलत्याच्या गच्चीवर मच्छरदाणी लावून झोपायचं. मला वाटलं तिकडे कोणी ठेवलेली वगैरे असेल, काही गाणंगिणं होईल. पण नाही. एकटाच गच्चीत मच्छरदाणीत झोपतो. डास काही दिसले नाहीत मला. पण असतील काय सांगावं!

मग स्वानंद किरकिरे प्रासंजीत चॅटर्जी या ९८ एनकाऊंटर केलेल्या पण सध्या बडतर्फ पोलिस ऑफिसरला या मालिकला मारायला बोलावतो. हा म्हणे बंगालीतला एकदम तोफ कलाकार आहे. पणअगदीच बाळबोध बोलतो, वावरतो, धावतो. मला तो अजिबातच आवडला नाही. तर त्या पोलिसला काय हा मिळत नाही.
मग काय! तेरी चित मेरी पट मेरी चित तेरी पट करत बसतात. अडीच तास चालवायचा आहे ना पिक्चर.
हा मालिक एकवेळी दद्दाला पण मारतो. पण दद्दा मेला हे तो स्वतः, पोलिस, स्वानंद किरकिरे सगळे विसरुनच जातात. दद्दा मेल्यावर कुणी चकार शब्दच काढत नाही. एक अध्याय संपला म्हणजे संपलाच. गायबलाच.

प्रेक्षक उल्लू मूर्ख बावळट आहेत हे गॄहित धरुन काहीही होत रहातं. शेवटी रारा अर्धमेला झालेला आहे हे त्या पोलिसला समजतं. तिकडे तो एकटा आहे हे ही समजतं. हा पोलिस दोन अडीचशे फौजफाट्यासह त्या अर्धमेला रारा झालेल्या इमारती बाहेर दुपार ते रात्र नुसता बघत बसतो. मग किर्र काळोख पडल्यावर एका पोलिसला परत गोळ्या मारायला सांगतो. अरे!!!! आधी आत जाऊन चार गोळ्या डोस्क्यात मारल्या असत्या तर पूर्ण मेला नसता का?
तो आत जिवंत आहे समजल्यावर गोळ्या मारुन पूर्ण मारायचं सोडून गवताच्या गंजीला आणि त्या इमारतीला आग लावून मोकळा होतो.

लाक्षागृहातून पांडव पळाले पासून आज पर्यंत किती लोक असे पुनर्रुज्जिवित झाले आहेत! अरे, मार ना त्याला! संपूर्ण! का गवताच्या गंजीला आग लावून तो पण मेला असेल गृहित धरतोस. अर्थातच तो मेलेला नसतो! हा भोआकफ! मालिक -२ मध्ये होईल आता.

क्रेडिट्स येताना ती चिल्लर आणि रा रा उत्तान काही तरी गाणं म्हणतात! ही तर बिट्रेअलची परिसीमा होती. ती चिल्लर मेलेली आहे, पण क्रेडिट्स मध्ये नाचाला कशी जिवंत झाली. काही तरी लॉजिक ठेवणार का नाही?
अडीच तास फुकट दवडले झालं!
पुलकित नावाचा लेखक दिग्दर्शक आहे. अर्थात मल्याळी चित्रपटाचा रिमेक आहे.

रारा ला त्याच त्याच बनारसच्या गल्लितल्या रिकामटेकड्या माणसाच्या भुमिका करायचा कन्टाळा आला आणि त्यावर उपाय म्हणून "चलो कुछ तुफानी करत है" करत मालिक बनला अस एकदरित चित्र दिसतय.

मालिक - हा काल थेटरात जाऊन (का!!!!) बघितला!>>> ट्रेलर न बघताच गेलास का?

लाक्षागृहातून पांडव पळाले पासून आज पर्यंत किती लोक असे पुनर्रुज्जिवित झाले आहेत>>>>

हे सगळ्यात जास्त आवडले. व्यासोच्छिटं जगत सर्वत्र हे किती खरे आहे.

मालिक - हा काल थेटरात जाऊन (का!!!!) बघितला!>>> ट्रेलर न बघताच गेलास का? >> ट्रेलर पण पूर्ण बघवले नव्हते. आता राजकुमार रावचा अतिरेक झाल्यासारखा वाटतो आहे. आणि तो हिरो पण वाटत नाही. नेहमी ते पूर्वी extras असायचे तसा वाटतो.

ट्रेलर न बघताच गेलास का? >>> मी पण हेच विचारायला आले होते Lol

स्टोरीच्या नावाखाली जे काही आहे ते फारच वैतागवाडी दिसतंय. आमचा अंदाज खरा ठरला हे सांगणारी पोस्ट टाकल्याबद्दल धन्यवाद, अमित Happy

प्रासंजीत चॅटर्जी >>> हा विश्वजीतचा मुलगा आहे Proud

मी अर्धा बघितला "आप जैसा कोई" आणि मला आवडला. तो एमसीपी भाग जस्ट सुरू होतोय असे दिसते - माधवनला तिच्या संवादावरून त्याचे फोन कॉल्स आठवलेले दिसत आहेत. मनीष चौधरी मिशांशिवाय बघायला ऑड वाटतोय Happy त्याचे एमसीपी प्रसंग पुढे असावेत. आत्तापर्यंत तरी फार रोल नाही त्याला.

मी बघताना एंगेज झालो. माधवन हे एक कारण आणि दुसरे म्हणजे संवाद. निदान पहिल्या भागातील संवाद भारी आहेत. त्यातील अनेक पुढे मीम्स बनले तर आश्चर्य वाटणार नाही.

तो बंगाली जॉय पहिल्या सीन मधे त्याच्या उच्चारावरून तमिळ वाटतो. त्यातली आजी "बीना" बर्‍याच दिवसांनी दिसली. ती कायमच ग्रेसफुल वाटली आहे.

चहा पिणारे रोमॅण्टिक्स. ते ही कॉफी हाऊस मधे मिळत नाही म्हणून बाहेर जाउन चहा पिणारे. what's there to not like Wink

स्वाती, 'मोगॅम्बो खुश हुआ' म्हणण्यासाठी हातातलं काम टाकून आलेय. तर मो खु हु Proud

स्वाती, केया, केकू -
आम्ही आमच्या नेहमीच्या कश्टमरला नाराज करत नाहीत म्हणून 'इरादा'ही ठेवला आहे दुकानात, ट्राय करून बघा. यूट्यूब वर आहे. Happy

माझं या मीम मधल्या मनिमाऊ सारखं झालं होतं पण धुगधुगी मोमेंट सापडला. Happy
IMG-20250714-WA0002.jpg

बंगाली जॉय पहिल्या सीन मधे त्याच्या उच्चारावरून तमिळ वाटतो. >>>> Lol फातिमा सोडून बाकीची गॅंग मला बंगालीच वाटली पण त्या जॉयचे डोळे आहट मधल्या भुतासारखे वाटले पहिल्या सीनमधे. बीना खरंच ग्रेसफुल दिसते.

>>> Push her
Lol

>>> 'इरादा'ही ठेवला आहे दुकानात
बघते. तुम्ही कष्टमर-स्पेसिफिक काउंटर्स करा आता. भलता माल भलत्यांनी उचलला म्हंजी लुस्कानी कोन भरून दील?! Proud

Lol अगं, शेरोशायरी व नसीरुद्दीन शाह आहे हे वाचून तू प्लॅंचेट झाल्यासारखे येशील वाटलं होतं पण दुसरीकडेच गेलीस. अशाने अंधश्रद्धांवरचा विश्वास उडतो माणसाचा. मीमनेच लुस्कानी भरून देतेय समजा.‌ Happy

'आप जैसा कोई' >> मधे मधे चांगला वाटता वाटता हरवून जातो पार. सिनेमा संपल्यावर बघितला तरी काही फरक पडला नाही नि नसता बघितला तरी अशा क्वांटम स्टेटमधे होतो.

मी आधी हा बघायचा म्हणून कटाक्षाने न वाचलेल्या पोस्टी या पानावर नजरेखालून गेल्याच. आता बघावा का नाही! माधवन काही फार आवडत वगैरे नाही. त्याचे हल्लीच कर्कश्य चित्रपट बघितले आहेत. नजरेला पडला तर बघू.

मवाली राज बद्दलः, क्यूट मवाली लोल

मारामारी करताना तो लुंगी फोल्डही करत नाही आणि हवेत उड्या बिड्या सुद्धा मारतो. तरी लुंगी जशीच्या तशी. >>> हे म्हणजे साउथच्या प्रेक्षकांना "हेड्स अप" न देता मारामारीचा सीन आणून त्यांची पंचाईत केलेली दिसते. लुंगी फोल्ड करणे म्हणजे प्रेक्षकाना संदेश असतो की आता सावरून बसा. नुसत्या हाताच्या अ‍ॅक्शनने दहा लोक मागे फेकले जाणार आहेत. गाडीचे पुढचे चाक सर्रकन फिरवून धूळ उडवली जाणार आहे वगैरे वगैरे.

हावडा ब्रिजबद्दल तर तो पिक्चर्सचा नियमच आहे. प्रत्येक मोठ्या शहरात घडणारी कथा त्या शहरातील फेमस लॅण्डमार्कजवळच घडते. इव्हन "आप जैसा कोई" मधे हावडा ब्रिज येउन जातो.

गृहस्थीबद्दल वाचून मला सर्वात मोठे आश्चर्य वाटले ते निरूपा रॉय आठच्या आठ मुले सुरूवातीपासून शेवटपर्यंत सांभाळते हे. पुढे तिचे हे कौशल्य हरवले.

अमित - मालिक बद्दल धमाल पोस्ट आहे. राराचा चॉईस अगदीच गंडलेला दिसतोय पिक्चर्सचा. टोटल कायच्या काय वाटतोय.

मला वाटलं तिकडे कोणी ठेवलेली वगैरे असेल, काही गाणंगिणं होईल. पण नाही >>>
लाक्षागृहातून पांडव पळाले पासून आज पर्यंत किती लोक असे पुनर्रुज्जिवित झाले आहेत >>> Lol

आता राजकुमार रावचा अतिरेक झाल्यासारखा वाटतो आहे. आणि तो हिरो पण वाटत नाही >>> हो. त्याच्याकडे मेनस्ट्रीम हीरोचा लुक किंवा पर्सनॅलिटी नाही. तो अशा रोल मधे सूट होणार नाही. जेथे सर्वसामान्य व्यक्तीचा रोल करायचा आहे पण कथेत जर काही इंटरेस्टिंग असेल तर त्यात तो सूट आहे.

>>प्रत्येक मोठ्या शहरात घडणारी कथा त्या शहरातील फेमस लॅण्डमार्कजवळच घडते. >> Lol हे भारी निरीक्षण आहे.
पण सॅनफ्रान्सिस्को मध्ये जाऊन गोल्डन गेट आणि केबल कार्सवर काही न घडता किंवा मुंबईत गेटवे, लोकल ट्रेन्स, राणीची बाग, मरिनलाईन्स आणि झोपडपट्टीत काही न घडता डोंबिवलीला ... आता डोंबिवली मुंबईत नाही म्हणणारे आले तर मुलुंड... ओके, माहिम किंवा लोअर परळला प्रेम केलं आणि खून पाडले काय आणि नाही पाडले तर कोण बघायला जाईल?

माऊ मीम >>> अस्मिता Lol

निरूपा रॉय आठच्या आठ मुले सुरूवातीपासून शेवटपर्यंत सांभाळते हे. पुढे तिचे हे कौशल्य हरवले. >>> Rofl

कालीगंज लापता सावध केल्याबद्दल आभार अमितव !
लापतागंज, लापत लेडीज अशा नावांमुळं हा ही लापतापट असेल असं वाटलं.

मालिक पाहिलेला नाही. नोट केला आहे.

एकाच गृहस्थाची दिसतेय सगळीच्या सगळी गृहस्थी! >>> Lol

जुने अकस्मात पट कधी कधी बरे वाटतात. Lol

मनिमाऊ मीम Lol
वेफर्स जर बुधानींचे लोण्यातले आणि ताजे असले कि पिक्चर आवडतो असं सर्व्हे सांगतो.
वातड लाह्या वाट्याला आल्या कि शोले सुद्धा मै तुलसी सारखा वाटतो.

वेफर्स जर बुधानींचे लोण्यातले आणि ताजे असले कि पिक्चर आवडतो असं सर्व्हे सांगतो.
वातड लाह्या वाट्याला आल्या कि शोले सुद्धा मै तुलसी सारखा वाटतो.
>>>>> Lol

निरूपा रॉय आठच्या आठ मुले सुरूवातीपासून शेवटपर्यंत सांभाळते हे. पुढे तिचे हे कौशल्य हरवले. >>> Lol

आता राजकुमार रावचा अतिरेक झाल्यासारखा वाटतो आहे. आणि तो हिरो पण वाटत नाही >> हो. मलाही भूल चूक पासून तसेच वाटतेय.

अमित, तुला आवडणार नाही बहुतेक 'आप जैसा कोई', पण दोन गट पडत आहेत. अमलताशसारखी रणधुमाळी उडवून टाकू.

'मालिक' आमच्या amc मधे लागलाय, तेथे कधीही कुठलाही हिंदी चित्रपट येत नाही. हाच कसा आला काय माहीत. मला ओळखूही आला नाही, माहितीही नव्हता. सुपरमॅनचा शो टाईम बघताना दिसला.

>>वेफर्स जर बुधानींचे लोण्यातले आणि ताजे असले कि पिक्चर आवडतो असं सर्व्हे सांगतो.
वातड लाह्या वाट्याला आल्या कि शोले सुद्धा मै तुलसी सारखा वाटतो.>> Biggrin

'आप जैसा कोई', पण दोन गट पडत आहेत. >>> नाही आवडला तर उतारा म्हणून सतराव्या शतकातला कृष्ण धवल पिक्चर बघू.

वेफर्स जर बुधानींचे लोण्यातले आणि ताजे असले कि पिक्चर आवडतो असं सर्व्हे सांगतो.
वातड लाह्या वाट्याला आल्या कि शोले सुद्धा मै तुलसी सारखा वाटतो.
>>> Lol

आप जैसा कोई >>> हा नक्की पाहाणार आहे. पण इतक्यात नाही. सध्या MI मॅरेथॉन चालू आहे आमची Proud ती संपली की लगेच पाहू हा.

मलाही भूल चूक पासून तसेच वाटतेय. >>> मला त्याच्या गेल्या अनेक पिक्चरांपासून वाटतंय असं Uhoh

चित्रपट जरी १९६३ मध्ये बनला तरी कथेचा काळ स्वातंत्र्यपुर्व असावा. <<
कोणालाही आधीचे आठ असताना नववा का आणताय हा प्रश्न विचारावासा वाटत नाही. <<
हे काळ-सुसंगतच नाही का ?

आणि कालीगंज नसून कालीधर आहे.

मला सर्वात मोठे आश्चर्य वाटले ते निरूपा रॉय आठच्या आठ मुले सुरूवातीपासून शेवटपर्यंत सांभाळते हे. पुढे तिचे हे कौशल्य हरवले. <<
Lol

चित्रपटाच्या शेवटी नि रॉच्या गळ्यात तिची ९ व तिच्या बहिण-कम-सवतीची ४ अशी १३ पोरे पडतात. असल्या अनुभवातुनच पुढे एखाद दुसरे पोर हरवले तरी तिच्या लक्षात येईनासे झाले असणार..

निरु, काळसुसंगत आहेच पण मी टाईम ट्रवेल करुन तिथे गेल्यावर मला ते थोडे ऑड वाटले. त्यात दोघांची लाजालाजी, हे कसे झाले याबद्दल आश्चर्य वगैरे पाहुन र धों कर्व्यांचे कार्य महाराष्ट्रातुन दिल्लीपर्यंत पोचले नव्हते, सो मि नसल्याचा दुष्परिणाम असेही वाटले. Happy Happy

Pages