Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>> दोन्ही घरचे ठराविक मोठे
>>> दोन्ही घरचे ठराविक मोठे भेटून लग्न कसं करायचं ह्यावर चर्चा करतात आणि मग पुढच्या एपिसोडमध्ये तिचे आईवडील तिला ‘तुझी आणि ह्याची पुरेशी ओळख आहे का‘ टाईप प्रश्न विचारतात

आधी लग्नसोहळ्याचे डीटेल्स ठरवतात आणि मग हे विचारतात?
एक तर एपिसोड्सचा क्रम चुकला आहे किंवा हे भलतंच प्रोग्रेसिव कुटुंब आहे!
प्रपन्च... सगळ्यात जास्त काय
प्रपन्च... सगळ्यात जास्त काय आवडतं तर संवाद - साधे सोपे आणि अर्थपूर्ण आणि शीर्शक गीत
प्रपंचचे थोडे भाग आता पहावेच
प्रपंचचे थोडे भाग आता पहावेच लागतील.
भरत , तुमच्या reco वरून dark
भरत , तुमच्या reco वरून dark desire पाहून संपवली.इतके दिवस नुसतीच इराटिका असेल म्हणून टाळत होते.
Plot मध्ये काही प्रश्न अनुत्तरीत राहिले किंवा मला नीटसं कळलं नाही. पण एकंदरीत बघणेबल वाटली. Twist n turns , प्रत्येक episode ला संशयाची सुई फिरत राहते. खर काय ,खोट काय , मनाचे खेळ काय .
आल्मा आणि इडिथ दिसायला खूप छान आहेत. बाकी इस्टबान आवडला.
मी हास्यजत्रेचे मागचे बरेच
मी हास्यजत्रेचे मागचे बरेच भाग पाहिले होते त्यातले काही खूप आवडले , काही नाही. हल्लीचे जरा जास्त आवडेनात. म्हणुन सरळ पहिल्या भागापासुन पहायला सुरु केले आहे. समीर चौघुले - विशाखा , गौरव-वनीता, प्रथमेश-श्रमेश, नम्रता प्रचंड आवडत आहेत. ही माणसं फार टॅलेंटेड आहेत. हल्लीच्या भागात विशाखाची जागा त्या इशा डे ने घेतलीये. ती अजिबातच नाही आवडली. जराही हसु येत नाही.
स्वस्ति, हो मलाही काही गोष्टी
स्वस्ति, हो मलाही काही गोष्टी कळल्या नाहीत. पण तेवढ्यासाठी मागे जाऊन पुन्हा पाहावी असं वाटलं नाही. शेवटी श्वेतांबरा करतात की काय असं वाटलेलं.
सेक्स सीन मध्ये तोचतोचपणा होता.
डारियो च्या आयुष्यात किती तो ट्रॉमा.
डार्क डिझायरनंतर फेक प्रोफाइलचा पहिला सीझन संपवला.
स्पॉयलर.
.
.
.
.
.
.
इथे शेवटी सगळेच फेक करून टाकलेत. ते दोघे जिवघेण्या अपघातांतून / घातपातांतून वारंवार वाचतात. हे जरा बॉलीवुडिश होतं. शिवाय सगळीकडे कॅमेरे कसे लावतात? सगळेच डिटेक्टिव्हगिरी कसे करतात, असे प्रश्न पडले.
कोणीतरी नवीन धागा काढा प्लीज.
कोणीतरी नवीन धागा काढा प्लीज..
आज पहाटेच एक जुनी पण भन्नाट वेब सिरीज संपवली आहे त्याची पोस्ट लिहायची आहे
नवा धागा काढलावेबसीरीज ४https
नवा धागा काढला
वेबसीरीज ४
https://www.maayboli.com/node/86917
Pages