Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<
<< Special ops चा तिसरा सीझन येतोय. ताहिर भसीन ची एंट्री होणार आहे<<
हा कधी येतोय?
July 11, 2025
July 11, 2025
Criminal justice न्यू सीजन..
Criminal justice न्यू सीजन..
थोड़ा स्लो आहे आधी च्या सीजन पेक्षा
>>> संवादफेक हिंदीची सक्ती
>>> संवादफेक हिंदीची सक्ती केल्यासारखी आहे

सामी, illegal कशावर आहे? मला
सामी, illegal कशावर आहे? मला फार आवडतात कोर्टातल्या गोष्टी, वकीली डावपेच.> jiohotstar वर आहे ग. पियुष मिश्रा चे काम मस्त आहे. मेन लीड नेहा शर्मा - दिसते छान, acting ok आहे तरी मला ती आवडते.
थँक्स सामी.
थँक्स सामी.
पंचायत ४ आवडली!
पंचायत ४ आवडली!
सीजन ३ पेक्षा हा आवडला.. भूषण आणि गँगला जास्त स्क्रीन टाइम आहे... विनोद चे काम पण आवडले मला..
स्पेशल ऑप्स सीजन १ अन १.५
स्पेशल ऑप्स सीजन १ अन १.५ नंतर फायनली सीजन २ येतोय. ११ जुलै ला. गरम तार्यावर टीजर आलाय.
अमर अकबर अँथनी मधील ब्लड
अमर अकबर अँथनी मधील ब्लड ट्रान्सफुजन प्रसंग तेव्हा चेष्टेचा विषय बनला होता , squid game सिझन 3 ने त्याच प्रसंगाची नक्कल केली आहे.
युट्युबवर प्रतिमा कुलकर्णी
युट्युबवर प्रतिमा कुलकर्णी यांची अर्धवट मुलाखत बघून प्रपंच युट्युबवर आहेच तर बघुया म्हणून बघितली. त्यावेळी ती खूपच गाजलेली होती आणि सगळ्यांना आवडली होती तशी आम्हांलाही आवडली होती. पण आता बघताना त्यात भरपूर चुका दिसल्या. त्यांचं एकत्र कुटुंब आणि घरातलं वातावरण हे एकमेव पॉझिटिव्ह वाटलं त्यात. स्क्रिप्ट वगैरे जरा गंडलेली आहे. म्हणजे भार्गवी चिरमुले(जानकी) ही रसिका जोशी (अलका) ची मैत्रिण आणि त्यांच्या घरी येणं जाणं असणारी. त्यातूनच तिची ओळख सुनील बर्वे (प्रशांत)शी जो अलकाचा भाऊ आहे त्याच्याशी होते. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. तो तिच्या घरी आईवडिलांना भेटायला जातो. त्यांना पसंत पडतो. दोन्ही घरचे ठराविक मोठे भेटून लग्न कसं करायचं ह्यावर चर्चा करतात आणि मग पुढच्या एपिसोडमध्ये तिचे आईवडील तिला ‘तुझी आणि ह्याची पुरेशी ओळख आहे का‘ टाईप प्रश्न विचारतात.
सुमार किंवा बिलो अॅव्हरेज अॅक्टींगवाले कलाकार- संजय मोने आणि आनंद इंगळे. संजय मोनेचा तर अॅक्टिंगशी काही संबंध असेल असं अजिबात वाटत नाही आणि त्यातून दोघांचीही विचित्र बॉडी लँग्वेज. ह्यात सुहास जोशी आणि अमिता खोपकर ह्या दोन रड्या, हतबल आणि सारख्या डोळ्याला पदर लावणार्या बायका.
त्यातल्या त्यात नॅचरल अॅक्टिंग मला सुधीर जोशी, प्रेमा साखरदांडे आणि रेखा, शर्वरी पाटणकर यांची वाटली. बाळ कर्वेही ओके आहे. रसिका जोशी, सुनील बर्वे, भरत जाधव आणि सोनाली पंडितही ओके. मच्छिंद्र कांबळीनेही वात आणला पकवून.
दोन रड्या, हतबल आणि सारख्या
दोन रड्या, हतबल आणि सारख्या डोळ्याला पदर लावणार्या बायका. >>>
लगेच डोळ्यासमोर आले. 
दोन रड्या, हतबल आणि सारख्या
दोन रड्या, हतबल आणि सारख्या डोळ्याला पदर लावणार्या बायका. >>>
लगेच डोळ्यासमोर आले. 
एका वेळी एकाच डोळ्यासमोर आलं
एका वेळी एकाच डोळ्यासमोर आलं का मै?
पण चुका काय दिसल्या ते सांग
पण चुका काय दिसल्या ते सांग की, सायो
नुसता आईबाबांचा प्रश्न ही एकच चूक दिसली नसणार तुला.
प्रपंच आवडती मालिका आहे. आजही
प्रपंच आवडती मालिका आहे. आजही त्यातला एखादा एपिसोड पाहिला जातो. संजय मोनेने जरासा eccentric आपल्याच तंद्रीत असणारा काका परफेक्ट उभा केला आहे! सगळे relatable वाटतात. सगळ्यात जास्त काय आवडतं तर संवाद - साधे सोपे आणि अर्थपूर्ण.
मला झोका बघायची आहे खरी परत. पण ई-टिव्ही म्हणजे आता स्टार प्रवाह (बहुतेक) च्या कृपेने कधी पहायला मिळेल तर खरं!
सगळ्यात जास्त काय आवडतं तर
सगळ्यात जास्त काय आवडतं तर संवाद - साधे सोपे आणि अर्थपूर्ण >>> +१
मला झोका बघायची आहे खरी परत >>> मलाही! तेव्हा खूप आवडली होती ही मालिका.
त्यावरून आठवले. मधे "एका
त्यावरून आठवले. मधे "एका लग्नाची दुसरी गोष्ट" चे काही भाग पाहिले. फार मस्त वाटले. पूर्वी अधूनमधून पाहिली होती. सर्वांचे काम अगदी स्वाभाविक वाटले.
एका लग्नाची दुसरी गोष्ट >>>
एका लग्नाची दुसरी गोष्ट >>> त्यातली आजी मात्र माझ्या डोक्यात जाते
इला भाटे सुद्धा कधीकधी - स्पेशली जेव्हा 'अरे घनाऽ' म्हणत ती सरळ त्यांच्या बेडरूममधे घुसत राहते तेव्हा.
प्रपंच बघितली नव्हती, क्वचित
प्रपंच बघितली नव्हती, क्वचित माहेरी आल्यावर एखादा एपिसोड बघितला, त्यामुळे रिलेट करू शकत नाही.
झोका मात्र सुरुवातीचे काही एपिसोडस बघायला आवडेल. सुनील बर्वे आवडतोच पण अमृता सुभाष त्यात आवडली आणि नंतर फारशी कुठे आवडली नाही.
सर्वात मला त्यात अमिता खोपकरची मम्मा आवडली, कसली गोड दिसते स्लीव्हलेमध्ये आणि एकदम दिलखुलास.
नंतर ती सुनील बर्वेची मानलेली बहीण रहायला येते, वयाने चांगली घोडी असून लहान दाखवली आहे त्यात, लाडकी वगैरे, ते बोअर व्हायला लागलं, जास्त फुटेज खायला लागली ती मग सोडून दिली.
इला भाटे जवळजवळ नेहेमीच
इला भाटे जवळजवळ नेहेमीच डोक्यात जाते. एकच बेअरिंग आपल्या अमृता सुभाष सारखं.
प्रपंच मला ही तेव्हा खूपच आवडलेली. आता पर्यंत बघितलेल्या मराठी मालिकांत सगळ्यात वरची असेल. परत अजिबात बघणार नाही, न आवडली तर काय घ्या!
रमड, स्क्रिप्टही तेच तेच घोळत
रमड, स्क्रिप्टही तेच तेच घोळत ठेवलं आहे. म्हणावं तितकं पुढे सरकत नाही. अर्थात त्यांना ते तसंच ठेवायचंही असू शकेल कारण घरगुती मालिका आहे तर रोज रोज नव्याने काय घडणार टाईप. त्यांचं ते घर पाडून बिल्डींग बांधायची की नाही ही चर्चाही घोळत रहाते.
ज्या मालिकेचं नावच प्रपंच आहे
ज्या मालिकेचं नावच प्रपंच आहे ती अशी निवांत असणंच अपेक्षित असावं बहुतेक. तरी मध्यमवर्गीय कुटुंबाच्या मानाने त्यांच्याकडे काही थरारक घटना घडतात. उदा: नंदू मार खाऊन येतो तो सिक्वेन्स, लतिका नवर्याला सोडून येते ही घटना. बाकी ती मालिका संथ, शांत अशीच बेतलेली. तुला बहुतेक नेटफ्लिक्स वगैरे वरच्या वेबसिरीज बघायची सवय झालीये - १० एपिसोड मधे पटापट सिरीअल संपली टाईप
त्यामुळे प्रपंच बोरिंग वाटली असेल 
तू हीच मुलाखत पाहिलीस का? -
https://www.youtube.com/watch?v=09WVbZof57M
तसंही असू शकेलच पण आपली आवडही
तसंही असू शकेलच पण आपली आवडही बदलते. इथे आल्यावर इंग्लिश मालिका वगैरे पाहिल्यावर स्क्रिप्ट्/अॅक्टींग किती चांगलं असतं हे लक्षात येतं आणि आपल्याकडे ते किती अॅव्हरेज आहे हे ही. त्यामुळेही असू शकेल. पण हा झाला माझा विचार. सगळ्यांना तसं वाटायला हवं असं नाही.
तू वर दिलेली मुलाखत पाहिलीच
तू वर दिलेली मुलाखत पाहिलीच पण आरपारमध्ये मुग्धा गोडबोलेने घेतलेली प्रतिमा कुलकर्णींची मुलाखत थोडी बघितली.
< ई-टिव्ही म्हणजे आता स्टार
< ई-टिव्ही म्हणजे आता स्टार प्रवाह (बहुतेक) > नाही. ई टीव्ही म्हणजे आता कलर्स.
प्रपंच तेव्हाही आवडली होती
प्रपंच तेव्हाही आवडली होती आणि आताही आवडते. मधेच एखादा एपिसोड बघितला तरी छानच वाटते. त्यातली अमिता खोपकर तर फार आवडते. तो तिच्या मुलीचा ट्रॅक छान घेतलाय. छान संगीत, शीर्षक गीत, आणि सगळेच कलाकार, मस्त भट्टी जमून आली आहे त्यात. फारच उजवी मालिका.
हॉट स्टारवर राम कपूरची नवीन
हॉट स्टारवर राम कपूरची नवीन सिरीज 'मिस्त्री' आली आहे. अजिबात बघितली नाही तरी चालेल अशीच आहे. अगदी बाळबोध सस्पेन्स, राम कपूरचा ओढून ताणून आणलेला ओसीडी, तशीच ओढून ताणून आणलेली कॉमेडी.मोना सिंग अक्षरशः वाया घालवली आहे.
मिस्त्री- मी पण काल दोन भाग
मिस्त्री- मी पण काल दोन भाग पाहिले. मंक ची अगदी तंतोतंत कॉपी आहे. सेम टु सेम प्लॉट , तो देशी बॅकग्राउंड मधे कन्वर्ट करण्याचा अटेम्ट बरा आहे. मात्र राम कपूर हा प्रॉब्लेम आहे. त्याची ओसिडी अजिबात कन्विन्सिंग वाटत नाही. अदरवाइज तो बरा अॅक्टर आहे पण इथे तुलना टोनी शालॉब च्या एड्रिअन मन्क शी होते आणि तो जवळपास पण नाही येत. मन्क पाहिली असेल तर ही नका बघू. नसेल पाहिली तर ही ट्राय करू शकता पण नाही पाहिली तरी चालेल. ( मन्कच बघा त्यापेक्षा. )
ई tv म्हणजे कलर्स बरोबर. आता
ई tv म्हणजे कलर्स बरोबर. आता स्टार आणि कलर्सचं एकीकरण झालंय त्यामुळे ott एकच आहे बहुतेक. चॅनल्स मात्र वेगळी आहेत.
आपली आवडही बदलते >>> करेक्ट.
आपली आवडही बदलते >>> करेक्ट. तुझा मुद्दा लक्षात आला.
Pages