Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रीस विदरस्पून >>> ही स्वीट
रीस विदरस्पून >>> ही स्वीट होम अलाबामा वाली असेल तर मला खूप आवडते, बबली वाटलेली त्यात.
मामी,
मामी,
अॅक्ट्रेस की हैसियत से ती आवडत नाही मला
तिच्या बुक क्लबबद्दल बर्याच किंडल रिव्ह्यूजमध्ये वाचलंय.
सध्या दूरदर्शन काळातल्या
सध्या दूरदर्शन काळातल्या सिरीयल्स बघायला घेतल्या आहेत. वागले की दुनिया आणि कशिश. यापैकी कशिश सलग बघतेय, मालविका तिवारी आणि सुदेश बेरी परत आवडतायेत. सर्व जुनं जुनं बघून वेगळं वाटतंय. पुर्वीइतकं नाही तरी एन्जॉय करतेय. वागळेचा एकच बघितला माळावाला, तेव्हा कसले हसलो होतो आम्ही सर्व चाळीतले, आता तेवढं नाही वाटलं, तरी माफक मजा आली.
काशिश मी पण पहिली पुन्हा काही
काशिश मी पण पहिली पुन्हा काही महिन्यांपूर्वी. मला खूप मजा आली. किती साधी, भाबडी सिरीयल आहे!
काशिश मी पण पहिली पुन्हा काही
काशिश मी पण पहिली पुन्हा काही महिन्यांपूर्वी. मला खूप मजा आली. किती साधी, भाबडी सिरीयल आहे! >>> मी पण
अरेकाय? ‘यु’ पाहिली नाही अजुन
अरेकाय? ‘यु’ पाहिली नाही अजुन लोकांनी?
रेसिडन्सचे ३ भाग पाहिले, मजा येत होती पण मग त्याच स्टाईलचा कंटाळा आला म्हणुन थेट शेवटचा भाग पाहिला, ‘उकल’ करण्याचा. तो मस्त होता.
Adolescence बर्यापैकी आवडली पण मास्टरपीस नाही वाटला. पहायला हरकत नाही. मुलगा व ती बाई यांचा सीन बराच जमुन आलाय.
ललिता दुसरा सीझन मिस नका करू.
ललिता big Little lies चा दुसरा सीझन मिस नका करू..Meryl Streep आहे त्यात आणि स्टोरी लाइन छान engaging ठेवली आहे.
सध्या दुपहीया बघतेय. लिड
सध्या दुपहीया बघतेय. लिड हिरॉईन छान आहे. तो लापता लेडीजचा हिरो भाऊ आहे, भूगोल. रेणूका शहाणेची मुलगीही स्मार्ट असते, उगाच तिला तिच्या सावळ्या रंगाचा कॉम्प्लेक्स असतो. मला तर आहे तशीच आवडली. तो मित्र बरोबर म्हणतो की उगाच फेअर व्हायला जाऊ नकोस.
पुरुषांना डास संरक्षण होण्यासाठी मच्छरदाणी, बायका तशाच झोपतात. वाईट वाटलं.
पुरुषांना डास संरक्षण
पुरुषांना डास संरक्षण होण्यासाठी मच्छरदाणी, बायका तशाच झोपतात. वाईट वाटलं.>>> ह्या गोष्टीकडे तर लक्षच गेलं नाही माझं :O
झाली बघून दुपईया. मस्त होती,
झाली बघून दुपहीया. मस्त होती, मला नाही एवढी स्लो वाटली, नाचगाणी सीन्स मी पुढे ढककले, जाम बोअर . मेन चोर अगदी शेवटीच ओळखता आला. तो चोरणारा मास्टरमाईंड कोण ते सांगू का म्हणतो तेव्हा क्लिक झालं. चोरणारा कोण सेकंड लास्ट भागात अंदाज आला. एकंदरीत खिळवून ठेवलं. अमावसला कुठेतरी बघितलं आहे या आधी, आठवत नाही. पाताललोक सिझन 1 मध्ये होता का.
शेवट मस्त केला. कामं सर्वांनी छान केली. स्मोकिंग, दारू, तंबाखू अगदी must असल्यासारखं दाखवतात, एक डिस्क्लेमर दिलं की झालं, हे आवडत नाही.
अन्जू अमावस फर्जी मधे शाहिद
अन्जू अमावस फर्जी मधे शाहिद चा मित्र दाखवलाय.
अरे हा, थँक्स आशू, साफ
अरे हा, थँक्स आशू, साफ विसरलेले. पाताललोक मधे आठवत राहीले.
आता फर्जीची आठवण निघालीच आहे तर सेकंड सीझन येऊदे.
>>झाली बघून दुपहीया. मस्त
>>झाली बघून दुपहीया. मस्त होती, मला नाही एवढी स्लो वाटली, नाचगाणी सीन्स मी पुढे ढककले, जाम बोअर .
++१ मी पण. नाचगाणी लग्गेच फास्ट फॉर्वर्ड.
बाकी ठिकच वाटली. पंचायतच्या तोडीची नाही वाटली.
अर्थातच पंचायत उजवीच.
अर्थातच पंचायत उजवीच.
खाकी- बंगाल चॅप्टर बघितली.
खाकी- बंगाल चॅप्टर बघितली. टिपिकल नीरज पांडे सिरीज आहे . त्यामुळे काय होणार याचा अंदाज येऊन देखील एंगेजिंग आहे . बंगालची राजकीय परिस्थिती रक्तरंजित असल्याने सिरीज मध्येही हिंसाचार आहे . सिरीज मधला इशू तोंडी लावणे आहे .खरी स्टोरी लाइन गुंड आणि नेते यातील नेक्सस ही आहे . अशी स्टोरीलाईन परिचयाची असली तरीही बंगाली तडक्यामुळे बघणेबल होते . अपवाद वगळता सगळे कलकार बंगाली घेतलेत. एकंदरीत वन टाइम वॉच आहे .
जाता जाता : मराठी सोमीवरच टिपीकल रबींद्र वातावरण न दाखवता कोलकाताच्या ग्राउंड रिएलिटी च वातावरण असल्याने नाजूक मनाना धक्का बसू शकतो ..
हो खाकी एन्गेजिंग वाटली मलाही
हो खाकी एन्गेजिंग वाटली मलाही. मेन एसीपी चे कॅरेक्टर मधला जो अॅक्टर आहे तो जरा ठोकळा वाटला अॅक्टिंग मधे! बाकी सगळे चांगले आहेत मात्र.
शर्मा जी की बेदी नावाची छोटी
शर्मा जी की बेदी नावाची छोटी सिरिज प्राइम वर बघितली, हलकी फुलकी आहे, सगळ्या स्टोरिज मधे तस नविन काहि नाही पण वन टाइम वॉच म्हणून ठिक आहे.
पॅरानॉईड - नेटफ्लिक्स
पॅरानॉईड - नेटफ्लिक्स
भर दिवसाची वेळ, अनेक बायका आपल्या चिल्ल्यापिल्ल्यांना खेळायला पार्कमध्ये घेऊन आलेल्या असतात. त्यातलीच एक अँजेला पण. एक हूडी घातलेला माणूस येऊन सगळ्यांसमोर तिचा खून करतो.
पोलीस यंत्रणा कामाला लागते. पहिला संशयीत असतो गावातलाच जेकब. तो अनेक दिवस सिझोफ्रेनीआशी झुंझत असतो. त्याच भरात त्याने अँजेलाला मारले असा निष्कर्ष काढला जातो. जेकबला अटक होण्यापूर्वीच त्याची बॉडी एका पुलाखाली मिळते. वरकरणी आत्महत्याच वाटते ती. पण इतक्या लांब कधीच न गेलेला जेकब त्या दिवशी तिथे कसा गेला या संशयामुळे पोलीसांतल्या अॅलेकला संशय येतो. पुढे अशा काही घटना घडत जातात की अँजेलाचा खून हे हिमनगाचे टोक ठरते आणि त्या निमित्ताने एक मोठा घोटाळा उघड होत जातो.
इंग्लंड मध्ये नीना, अॅलेक आणि बॉबी हे ऑफीसर्स या प्रकरणाचा शोध घेत असतात आणि त्यांना मदत असते ती जर्मनीतल्या लिंडा आणि वोल्टी या पोलिसांची. रहस्य असे फार नसले तरी केस उभी रहायला आणि खर्या अपराध्याला शिक्षा होण्याकरता केलेला तपास मालिकेचा वेग कमी होऊ देत नाही. मूळ कथानकाला दिलेली अॅलेक आणि बॉबी यांच्या आयुष्यातल्या प्रॉब्लेम्सची फोडणी पर्फेक्ट आहे. त्यातल्या त्यात नीनाचे पात्रच थोडे कमजोर वाटले - तपासापेक्षा जास्त ती पर्सनल प्रॉब्लेम्समध्येच अडकलेली दाखवली आहे.
सगळ्यात सशक्त कॅरेक्टर आहे ते ल्युसीचे. भूतकाळात केलेल्या चुकांमुळे तिला ब्लॅकमेल केले जाते तेंव्हा ती क्षणभर हादरून जाते. पण नंतर "ती तेंव्हाची मी होते, काही चुका केल्या मी. पण आता तो भूतकाळ आहे आणि आजची मी त्या चुकांत अडकून पडणार नाही" हे तिचे अॅटीट्यूड प्रचंड आवडले. ते पात्र सादर करणारी अभिनेत्री पण तेवढीच सशक्त आहे म्हणून ते पात्र खूप सुंदर उतरलंय पडद्यावर.
८ भागांची लिमिटेड सीरीज बींजवॉचला पण मस्त आहे.
परफेक्ट! आवडतो तो सगळा मसाला
परफेक्ट! आवडतो तो सगळा मसाला चेक होतोय. बघणार. धन्यवाद माधव.
मी पण बघेन.
मी पण बघेन.
ब्लॅक मिररचे कोणी फॅन आहेत का? आज पुढचा सिझन येतोय.
मी! मी!!
मी! मी!!
हो ब्लॅक मिरर चा पुढचा सीझन
हो ब्लॅक मिरर चा पुढचा सीझन माझ्या पण लिस्टीत आहे !! आता पॅरानॉइड पण बघून घेईन.
शर्मा जी की बेदी >>> "बेटी"
शर्मा जी की बेदी >>> "बेटी" ना?
खाकी नावाच्या २-३ सिरीज दिसत आहेत. त्यातल्या एकीचा पहिला भाग पाहिला होता. खूप एंगेज झालो नाही म्हणून पुढे पाहिलेली नाही अजून.
माधव - इंटरेस्टिंग वाटत आहे पॅरॅनॉइड. छान लिहीले आहे.
इंटरेस्टींग पोस्ट माधव.
इंटरेस्टींग पोस्ट माधव. पॅरानॉईड मधे इंदिरा वर्मा आहे, ती मीरा नायरच्या कामसूत्र मधेही होती.
खाकी - बिहार चॅप्टर आणि खाकी
खाकी - बिहार चॅप्टर आणि खाकी - बंगाल चॅप्टर असे दोनच आहेत. एका आयपीएस अधिकार्याच्या पुस्तकावर आधारित आहेत ना हे दोन्ही.
अजून पण कुठला आहे का?
फा, खाकीच्या पहिल्या
फा, खाकीच्या पहिल्या सिझनमध्ये हिरोपेक्षा खलनायक (अविनाश तिवारी) भारी आहे. तो सिझन पहिल्या १-२ एपिसोड्सनंतर इंटरेस्टींग होत जातो पण तरी कसाबसा बघणेबलच्या पलीकडे जातो.
ब्लॅक मिररच्या चाहत्यांनो, ती मालिका "डार्क" सारखा डोक्याचा भुगा करते का "थ्री बॉडी प्रॉब्लेम" सारखी इंटरेस्टींग आहे? ब्लॅक मिररचे ६ सिझन्स आहेत. डार्क नंतर इतक्या मोठ्या सायफाय मालिकेचा धसका घेतला आहे मी
ब्लॅक मिरर प्रत्येक एपिसोड
ब्लॅक मिरर प्रत्येक एपिसोड वेगळा आणि काहीतरी डोक्यात विचारचक्र सोडून जातो. ती बिंज करण्यासारखी नाही, एक एपिसोड बघितला की अंगावर आणि जिवावर आल्याने पुढचा लगेच माझ्याच्याने तरी बघवला जात नाही.
पण आहे मस्त एकदम. माधव तुम्हाला आवडेल नक्की असं वाटतं.
प्रत्येक एपिसोड वेगळा आणि
प्रत्येक एपिसोड वेगळा आणि काहीतरी डोक्यात विचारचक्र सोडून जातो. >>> ओह, हे भारी वाटतय. आता बघेन.
ब्लॅक मिरर इंट्रेस्टींग आहे.
ब्लॅक मिरर इंट्रेस्टींग आहे. प्रत्येक एपिसोडचा कन्सेप्ट वेगळा आहे.
भुगा करणार्या गोष्टी नाहीयेत.
ब्लॅक मिरर अक्षरश:
ब्लॅक मिरर अक्षरश: नावाप्रमाणे आपल्यातल्याच डार्क साइडला आरसा दाखवते. अमित म्हणाला तसं एकेक एपिसोड पचवायला वेळ लागतो. फॅन्टसी/फिक्शन म्हणून सोडून देता येत नाही, कारण रोजच्या आयुष्यातही त्याचे पडताळे येत राहातात आणि एकदा दिसले की ते अन्वयार्थ 'अनसी' करता येत नाहीत.
छळवाद आहे, तरीही पाहणारच पुढचा सीझन.
Pages