Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
झी ५ वर एक लहानशी हॉरर वेब
झी ५ वर एक लहानशी हॉरर वेब सिरीज बघितली. अंधार माया. फार आवडली. २० -२० मिनिटाचेच ७ एपिसोडस असल्यामुळे पटपट संपली.
किशोर कदम बाप माणूस आहे अॅक्टींग मधे. बाकी सगळे अनोळखी आहेत. स्टोरीलाईन एकदम धक्कादायक आहे शेवटी. वाडा, रात्र, अंधार हे सगळे यशस्वी कलाकार आहेतच. पण तरीही बर्यापैकी गुढ आहे. मुंबई मधे राहणारं मोठं कुटुंब त्यांच्या लहान गावात असलेल्या घराचा व्यवहार करणार असतात त्यासाठी तिथे राहणारी शेवटची व्यक्ती गेल्यावर दिवसकार्यासाठी येतात आणि घर विकायच्या आधीच काय काय अभद्र घटना घडायला लागतात. स्पॉयलर्स अभावी जास्त लिहित नाही. नुकतीच आली असल्याने कोणाची बघून व्ह्यायची असेल.
आणि पात्रनिर्मिती विलोभनीय?
आणि पात्रनिर्मिती विलोभनीय? >>
वाटलंच होतं! विंटरेस्टिंग असं न लिहिता मराठीत लिहिलं की असंच होतं 
स्वाती
स्वाती
अंजली12 रेको साठी आभार.
अंजली12
रेको साठी आभार.
ग्राम चिकित्सालय बघतेय,
ग्राम चिकित्सालय बघतेय, हळूहळू आवडतेय. फक्त अशा गावात अशा माणसांत काम करून घ्यायला जिद्द, चिकाटी व्हिजन लागेल, ती सर्वांच्यात नसते. हिरोत आहे पण यापेक्षाही मोठा गुणच आजकालच्या काळात म्हणायला लागेल, बडे बाप का बेटा त्यामुळे पोलिसात ओळखी वगैरे, नाहीतर पोलीसही अतरंगी, कामचोर दाखवलेत. सामान्य माणसाचे गुण कमी पडायचे या एकंदरीत यंत्रणेसमोर, गावातल्या अतरंगी लोकांसमोर. हिरो सकारात्मक पद्धतीने चांगल्या गोष्टींसाठी ओळखीचा वापर करून घेतो ते आवडलं. स्लो वाटतेय पण बघेन पूर्ण.
पहिला भाग पाहिल्यावर ही
अंधारमाया पहिला भाग पाहिल्यावर बास केलं होतं तेच योग्य होतं.
कुठून पूर्ण बघायची बुद्धी झाली.
शेवट तर अगदीच अतार्किक.
किती छान गूढकथा होऊ शकली असती.
सामान्य माणसाचे गुण कमी
सामान्य माणसाचे गुण कमी पडायचे या एकंदरीत यंत्रणेसमोर
>>>
यावरून 'लाखों में एक'चा डॉक्टर सीझन आठवला. त्यातली उत्साही डॉक्टर नायिका यंत्रणेसमोर हतबल होते.
अंधार माया टोटल बकवास...
अंधार माया टोटल बकवास... कुठलाही प्रसंग खुलवत नेला नाहीये.कलाकारांचे बटबटीत क्लोजअप एका वेळेनंतर डोक्यात जायला लागतात.
कुणीतरी आहे तिथं मधला वाडा
कुणीतरी आहे तिथं मधला वाडा आणि तोच बॅकग्राउंड स्कोअर वरून त्यांचीच असावी असं वाटलं.
मालिका जास्त बघत नाही. पण चेहरे सगळेच झी च्या मराठी मालिकातले वाटले. पाट्या टाकणारे.
मुद्दामून स्त्री पात्र करणारा कलाकार नसता तरी चाललं असतं.
मराठीत एक से एक गूढ/भय कथा लेखक होऊन गेले. पण दुर्दैवाने चित्रपट, वेबसिरीज तशा बनत नाहीत.
पन्चायत २ जुलै का त्याच्या
पन्चायत २ जुलै का त्याच्या आधिच येणार?? वोट करा ह नक्की..
https://www.youtube.com/watch?v=XqhPSkpimHw
बम्बई मेरी जान
बम्बई मेरी जान
दाऊद इब्राहिमचं बालपण आणि गुंडगिरीचे सुरुवातीचे दिवस - अशी थीम आहे. (थेट उल्लेख नाहीये, पण सगळं तेच आहे). दाऊदच्या वडिलांच्या दृष्टीकोनातून स्टोरी सांगितली आहे.
फरहान अख्तर प्रोड्युसर आणि के के मेननमुळे पहायला सुरुवात केली. पण ३-४ भागांनंतर पुढे बघाविशी वाटेना.
सतत अंधारे सेट्स, अति-क्लोज अप्स, ओव्हरअॅक्टिंग, मुंबईच्या रस्त्यांवरचा अचाट रक्तपात अशी अनेक कारणं.
दाऊदचं काम करणारा अॅक्टर चांगला आहे.
क्रेडिट्स अॅनिमेशन आणि गाणं आवडलं.
फरहान अख्तर प्रोड्युसर आणि के
फरहान अख्तर प्रोड्युसर आणि के के मेननमुळे पहायला सुरुवात केली. पण ३-४ भागांनंतर पुढे बघाविशी वाटेना.>>> सेम हियर. रक्तपात नकोसे वाटतात मी ३-४ भाग ही नाही पाहिले.
अंधार माया- पाहून झाली.
अंधार माया- पाहून झाली. क्लीशेंनी पुरेपूर आहेत पहिले सगळे भाग. जुना वाडा, रात्री येऊन पोचलेले प्रवासी, जुना भितीदायक दिसणारा नोकर. आल्या आल्या गाडीतून उतरायच्या आधी लायटर पेटवणारे लोक अन त्या प्रकाशात दिसणारे त्यांचे चेहरे. त्यातले काही उघड संपत्तीचे लोभी. एक प्रेग्नन्ट बाई, मधेच कुणाला तरी दिसणारा गूढ लहान मुलगा, पैंजणाचे आवाज . सगळे कसे साग्रसंगीत टिपिकल
सगळे भाग जेमतेम १५-१६ मिनिटाचे आणि ७ भागांची सीरीज, त्यामुळे जास्त रंगवायला वेळच नाही. फार फटाफट घटना घडून जातात. शेवटचा ट्विस्ट मात्र चांगला आहे, एका नव्या सीरीज चे पोटेन्शियल आहे .
मंकची जगातली सर्वात मोठी मी
मंकची जगातली सर्वात मोठी फॅन मी आहे (हे मी स्वतःच ठरवलं आहे कारण मी सगळे सिझन ७ का ८ वेळा पाहिले आहेत.) आता ती नेटफ्लिकसवरुनही गेली म्हणुन पाहु शकत नाही. पण वरची रामकपुरची, जरी मंकची सर नसली तरी गंमत म्हणुन पाहीन, पहायला मिळाली तर.
अंधार माया कुठे आहे?
अंधार माया कुठे आहे?
झी ५ वर आहे पण मी आय्पीटिवी
झी ५ वर आहे पण मी आय्पीटिवी वर पाहिली.
मी शोधली होती तेथे मला सापडली
मी शोधली होती तेथे मला सापडली नव्हती. मराठी वेबसिरीजच्या मेन्यूत दिसत नाहीये.
युट्युब वर पौर्णिमेचा फेरा
युट्युब वर पौर्णिमेचा फेरा नावाच्या मराठी वेब सिरीज चा पहिला सिझन संपवला. खूप खूप आवडला. निखिल बने, मंदार मांडवकर व अजून एक अशा तीन मित्रांची गोष्ट आहे. हॉरर कॉमेडी आहे. कोकणातील वातावरण आहे. कथा पटकथा कथेचा वेग अभिनय दिग्दर्शन कॅमेरा संकलन सर्वच खूप छान जमून आले आहे. त्यांनी नुकताच दुसऱ्या सिझनचे नवीन भाग टाकायला सुरू केले आहे.
पाताल लोक - सी.२
पाताल लोक - सी.२
खूप आवडली.
पहिल्या सीझनपेक्षा हा सीझन भारी झालाय.
फक्त ते नागा दाखवलेले कलाकार काही काही वेळा वेगवेगळे ओळखू येत नाहीत. तिथे पॉज करून कडेचं नाव/डिस्क्रिप्शन जे असेल ते वाचावं लागलं.
प्राइमला ही एक चांगली गोष्ट असते. ट्रिव्हिया. ते वाचायलाही मला आवडतं.
२४ जून ला येतोय नवीन सीझन
२४ जून ला येतोय नवीन सीझन
प्राइमला ही एक चांगली गोष्ट
प्राइमला ही एक चांगली गोष्ट असते. ट्रिव्हिया >> +१
शो बंद न करता त्या त्या प्रसंगातले कलाकार सुद्धा समजतात.
तुमचे रेको मस्त असतात हे बरेच दिवसांपासून सांगायचे राहून जातेय.
युट्युब वर पौर्णिमेचा फेरा
युट्युब वर पौर्णिमेचा फेरा नावाच्या मराठी वेब सिरीज चा पहिला सिझन संपवला. खूप खूप आवडला. >> थँक्यु बघणार.
बाईदवे, तुमच्या आयडी नावाचा शॉर्ट फॉर्म मावा होतो
Special ops चा तिसरा सीझन
Special ops चा तिसरा सीझन येतोय. ताहिर भसीन ची एंट्री होणार आहे
ग्रामचिकित्सालयचे फक्त पाचच
ग्रामचिकित्सालयचे फक्त पाचच एपिसोडस आहेत पहिल्या सिझनला, मला आवडली. स्लो वाटली पण अभिनय छान केलाय सर्वांनी आणि डायलॉग्ज बरेच छान आहेत. मेन डॉक्टर आणि वॉर्डबॉय दिसायला हिरो आहेत. ती लेडी डॉक्टरही छान दिसते. सिझन वनचे फारच कमी एपिसोडस वाटले.
पंचायत लवकर येतेय का, मस्त. आधी जुलैत येणार होती, वेटिंग, लगेच बघेन असं नाही.
इकडे illegal हि legal
इकडे illegal हि legal thriller कुणी बघितली आहे का? कोर्ट रूम drama बघायला आवडतात सो सगळे सीझन्स बघितले. कुणी बघितली असेल तर चर्चा करायला आवडेल .
पंचायत पहिला एपिसोड बघितला
पंचायत पहिला एपिसोड बघितला
कसा आहे सांगून शकत नाही कारण जे काही असेल ते आवडणारच असे मनाने आणि मेंदूने आधीच ठरवून टाकले आहे.
एका दमात न बघता हळू हळू एकेक एपिसोड बघायचे असे ठरवले आहे.
अत्यत आवडीची सिरिज असल्याने
अत्यत आवडीची सिरिज असल्याने बिन्ज वॉच केली, अगदि काल-आज आल्याने काहिच लिहत नाही.सगळ्यानी बघितल्यावर चर्चा करु एवढच लिहते.
सामी, illegal कशावर आहे? मला
सामी, illegal कशावर आहे? मला फार आवडतात कोर्टातल्या गोष्टी, वकीली डावपेच.
पंचायत पहिला एपि पाहिला. जरा
पंचायत पहिला एपि पाहिला. जरा कोमट वाटाय लागलीये, पण आशा करतेय की पुढे धमाल असेल.
भुषण ज्याची आधी चीड यायची तो अॅक्टींग मुळे आवडू लागलाय, त्याची भंपक वचवच करणारी कजाग बायको पण
हसू यायचे बाकीये अजून.
A sutable boy -Netflix बघायचा
A sutable boy -Netflix बघायचा प्रयत्न केला. विक्रम सेठ, मीरा नायर, तबु ही आकर्षणे.
पहिल्याच भागात लग्न लागतंय. त्यामुळे भरपूर पात्रे. त्यात कोण कोण आहे? कोण कोणाचं काय लागतं हेच कळेना.
भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालंय . एक मंत्री म्हणतो होळी हा हिंदूंचा सण. मशिदीच्या की दर्ग्याच्या अगदी जवळ नवं देऊ़ळ बांधायला घेतलंय. पुढे दंगे, हिंसाचार आणि आंतरधर्मीय प्रकरणं असावीत.
ईशान खट्टर एनर्जी ड्रि़ंक्स पिऊन अभिनय करतो. नायिकेची कॉलेजातली मैत्रीण गिरिजा ओक आहे. तिला विचित्र वाटणारा ब्लाउज दिलाय. तर नायिकेला पंजाबी ड्रेस. नायिके तिचा मुद्राभिनय कृत्रिम आहे. संवादफेक हिंदीची सक्ती केल्यासारखी आहे.
अर्ध्या एपिसोडनंतर सोडून दिलं.
Pages