सध्या महाराष्ट्रात, पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या विरोधात अनेक मराठी प्रेमी नी महाराष्ट्राचे हित चिंतनाऱ्या संघटना विरोधात उतरल्या आहेत!
-महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे का?
- उत्तर भारतीय फुगलेली लोकसंख्या महाराष्ट्रात आणून वसवण्यासाठी भाजप हे करतय का?
- २२ अधिकृत भाषांमधली एक भाषा हिंदी लादण्यामागे भाजपाचे कारस्थान काय?
- हिंदीचा नी महाराष्ट्राचा संबंध काय?
- हिंदी भाषकांच्या सोयीसाठी १ लितील कोवळ्या जीवाना हिंदी लादून त्रास द्यायचा का?
संघटनांच्या मागण्या:-
१. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती केवळ इतर भारतीय भाषांप्रमाणेच एक राज्यभाषा असून तिची सक्ती करणे अयोग्य आहे.
२. राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेवर आघात: महाराष्ट्राची ओळख ही स्वतंत्र मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व परंपरेशी निगडित आहे. अन्य राज्यातील भाषा लादणे हे सांस्कृतिक आक्रमणच म्हणावे लागेल.
३. शिक्षणाचे ओझे वाढवणारा निर्णय: पहिलीपासूनच तीन भाषा सक्तीने शिकविणे बालकांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी अयोग्य व अन्यायकारक ठरेल.
४. मराठीतील बोलीभाषांना सरकारकडून प्रोत्साहन नाही: मराठीच्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासन काहीही प्रयत्न करीत नाही, हे दुर्दैवी आहे.
५. स्थानिक विद्यार्थ्यांवर स्थलांतरितांचे भाषिक वर्चस्व लादले जात आहे, ज्यामुळे स्थानिक भाषिक विद्यार्थ्यांचा अधिकार आणि संधी हिरावली जाऊ शकते.
६. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राचा चुकीचा अर्थ: त्रिभाषा सूत्र हा प्रशासनापुरता मार्गदर्शक आहे; त्याची सक्ती शालेय शिक्षणात लादणे अन्यायकारक आहे.
७. भाषिक स्वायत्ततेचा संपूर्ण अभाव: प्रत्येक राज्याला त्याच्या भाषिक गरजेनुसार शिक्षण धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या दबावाखाली घेतलेला निर्णय हे राज्याच्या स्वायत्ततेचे उल्लंघन आहे.
त्यामुळे, आम्ही खालील मागण्या आपल्यास सादर करीत आहोत –
१. राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
२. या निर्णयाच्या रद्दबाबत तात्काळ शासन आदेश किंवा स्पष्ट परिपत्रक निर्गमित करावे.
३. सदर बाबीबाबत शालेय शिक्षण संचालनालय, शिक्षण आयुक्त, शिक्षण मंडळ, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्या यांना स्पष्ट सूचना द्याव्यात.
४. बालभारतीसह इतर सर्व पुस्तक छपाई केंद्रे व मुद्रण विभागांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी हिंदी सक्तीबाबत कोणतीही योजना राबवू नये, याबाबत स्पष्ट लेखी सूचना द्याव्यात.
५. यापुढील अभ्यासक्रम नियोजन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना तृतीय भाषा निवडीचा संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावा, कोणतीही सक्ती करू नये.
६. त्रिभाषा सूत्राचे पालन हे राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने व ऐच्छिक स्वरूपात मर्यादित ठेवावे.
७. राज्यातील मराठी बोलीभाषा, लोकपरंपरा व स्थानिक संस्कृती यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करून स्थानिकतेला प्राधान्य द्यावे.
८. सदर निर्णयामुळे निर्माण होणारा संभ्रम, असंतोष आणि प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी त्वरित ठोस कृती करण्यात यावी.
पंजाब मधल्या इंग्रजी
पंजाब मधल्या इंग्रजी माध्यमाच्या CBSE शाळांमध्ये पहिली ते पाचवी हिंदी, इंग्रजी आणि पंजाबी या तीन भाषा असतात. खूप पूर्वीपासून आहे ते. माझ्या दोन्ही पुतण्या तिथेच शिकल्या आहेत. सहावी ते आठवी त्यांनी चौथी भाषा स्टँडर्ड फ्रेंच घेतली होती, बहूतेक हिंदी ऐवजी. नववी आणि दहावी ला दोन भाषा होत्या, पंजावितानी इंग्रजी.
दिल्लीत मात्र CBSE शाळेत नर्सरी ते पाचवी पर्यंत हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषा होत्या. सहावी ते आठवी आमच्या शाळेत फक्त संस्कृत चा पर्याय होता तिसरी भाषा म्हणून. पण इथल्या बऱ्याच शाळांमध्ये उर्दू आणि पंजाबी हे पर्याय होते. काही ठिकाणी जर्मन आणि फ्रेंच भाषा पण होत्या. नववी आणि दहावी परतफक्त दोन भाषा. इंग्रजी आवश्यक आणि दुसऱ्या भाषेत हिंदी, संस्कृत, पंजाबी आणि उर्दू हे पर्याय मिळाले.
दिल्लीत गुरुद्वाराशी संलग्न शीख धर्मीय शाळांमध्ये पहिली पासून तिसरी भाषा म्हणून पंजाबी आणि गुरुमुखी लिपी शिकवतात असं ऐकलं आहे.
Cbse शाळांमध्ये आहे की हे तीन
Cbse शाळांमध्ये आहे की हे तीन भाषा प्रकरण पहिली पासून. इंग्रजी, हिंदी आणि मराठी. हिंदी तर बऱ्यापैकी अवघड पण आहे. मुलीला हिंदीबद्दल अतिशय तिटकारा निर्माण झाला आहे. पाचवी पर्यंत अनिवार्य आहे हिंदी. सहावीला संस्कृत किंवा जर्मन आहे पर्याय. हिंदी तर अजिबात चालू ठेवणार नाहीये त्यामुळे.
हो. पहिली पासून जिथे तीन भाषा
हो. पहिली पासून जिथे तीन भाषा शिकवल्या जातात, तिथे हिंदीचा त्रास होतो मुलांना. पुतण्या आणि भाची महाराष्ट्रात शिकले सीबीएसई मध्ये. हिंदी अवघड वाटायचे त्यांना.
पंजाब मध्ये शिकलेल्या दोन पुतण्यांनात हिंदीचा त्रास वाटू नये म्हणू. त्या शाळेत असताना आमच्या घरी त्या दोघींशी पंजाबी ऐवजीहिंदीत बोलणे सुरू केलं होते.त्यांना पर्याय मिळाल्यावर हिंदी विषय सोडला त्यांनी.
मुलाच्या शालेय अभ्यासक्रमाचे हिंदी मला सुद्धा अवघड वाटायचे
पंजाबी भाषा म्हणजे, गुरुमुखी
पंजाबी भाषा म्हणजे, गुरुमुखी लिपी का?
पंजाबी भाषा शिकवताना शाळेत
पंजाबी भाषा शिकवताना शाळेत गुरुमुखी / पंजाबी लिपी सुद्धा शिकवतात.
आजच्या लोकसत्तेत भाजप
आजच्या लोकसत्तेत भाजप प्रवक्त्याचा हिंदीसक्तीचा अपप्रचार अनाठायी हा लेख आला आहे.
त्यातले मुद्दे -
१. हिंदी सक्ती झाली अशी आवई राजकीय पक्षांनी उठवली.
२. हिंदी अनिवार्य नाही. तिसरी भाषा निवडीचे स्वातंत्र्य आहे. मग ते २० विद्यार्थी , ऑनलाइन इ. गुर्हाळ आहे.
३. देशभरात बहुतेक राज्यांनी त्रिभाषा सूत्र स्वीकारले आहे. ( या वर्षीपासून ते सांगितले नाही)
४. सीबीएस ई - आयबी शाळा पहिलीपासून तीन भाषा शिकवतात.
५. तिसर्या भाषेमुळे मराठीचे स्थान कमी झाले नाही. उलट मराठीतून व्यावसायिक (अभियांत्रिकी / वैद्यकीय) शिक्षण मिळू लागले / लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. काँग्रेसने या गोष्टींसाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत.
६. इतर भाषा शिकल्याने भाषिक सौहार्द व संवादक्षम पिढी निर्माण होईल. ( हा राज ठाकरेंना टोमणा असावा).
७. समजूतदारपणा, सहिष्णुता, संवादक्षमता , सामाजिक सलोखा असे शब्द वाचून माझ्या तर टडोपा आले. धार्मिक सहिष्णुता वाढावी म्हणून शाळांत सर्व धर्मीय प्रार्थना आणि सर्व धर्मांचे सण साजरे करणार का?
धन्यवाद अल्पना.
धन्यवाद अल्पना.
अल्पना+१
अल्पना+१
Cbse शाळांमध्ये आहे की हे तीन भाषा प्रकरण पहिली पासून.>>> मुलांना ३ भाषा शिकायला अवघड जाईल असा मुद्दा दिसला काही ठिकाणी चर्चेत. म्हणून विचारले.
माझ्या मुलीला ५वीपर्यंत दोनच भाषा होत्या. नंतर संस्कृत होते. मी काही वर्षं प्रायमरी स्कूलमध्ये हिंदी शिकवले आहे. पण मुलीचे हिंदी इतके अफलातून होते की मी तिला 'आई हिंदीची शिक्षिका आहे हे कोणाला सांगू नकोस ' असं चेष्टेत म्हणायचे.
माझ्या मते हिंदी -मराठी लिपी जरी एकच असली तरीही काही उच्चार वेगळे आहेत. जसे की ऋ,ऐ,ए. इतक्या लहान मुलांना तो फरक लक्षात ठेवणे अवघड जाईल आणि परिणामतः दोन्ही भाषा नीट शिकल्या जाणार नाहीत.
आम्ही आपले पहिलीपासून इंग्रजी
आम्ही आपले पहिलीपासून इंग्रजी येण्याचीही आधी शिकलेलो. त्यामुळे पहिली ते चौथी मस्त मराठी शिकलो. त्यानंतर मग पाचवीला इंग्रजी आणि हिंदी आले. मग काही दिवस हिंदी + संस्कृत होते. अर्धे अर्धे. आठवीला मात्र स्कोअरिंग विषय म्हणून संस्कृत १०० घेतले.
हिंदी शाळेत न येऊन काही नुकसान झाले असे वाटत नाही. तसेही शाळेत मराठी शिकून काय दिवे लावतात ते आजकालचे वर्तमानपत्रातले मराठी वाचून कळते आहे.
माझ्या वेळेस काही मुलांनी आधी पहिली दुसरी इंग्रजी माध्यमात केली होती. पण मग ते पूर्ण सगळे जमत नाही म्हणून आमच्या शाळेत आली ती मुले. आता काळ बदलला आहे पण इतके सगळे विषय लहान मुलांच्या डोक्यात घालणं किती बरोबर आणि किती चूक मी काय बोलणार.
मुलांना ३ भाषा शिकायला अवघड
मुलांना ३ भाषा शिकायला अवघड जाईल असा मुद्दा दिसला काही ठिकाणी चर्चेत. म्हणून विचारले.>> प्राची अवघड आहेच. पूर्वी मराठी नव्हते cbse ला. इंग्रजी आणि हिंदी असायचे. मग मराठी आले. फक्त इंग्रजी चांगले शिकतात मुले. बाकी मराठी हिंदी ची बोंब आहे. हिंदी तर खरेच अवघड आहे.
हो लंपन. अवघड जाईल हे मान्य
हो लंपन. अवघड जाईल हे मान्य आहे.
माझ्या मते हिंदी -मराठी लिपी
माझ्या मते हिंदी -मराठी लिपी जरी एकच असली तरीही काही उच्चार वेगळे आहेत. जसे की ऋ,ऐ,ए. इतक्या लहान मुलांना तो फरक लक्षात ठेवणे अवघड जाईल आणि परिणामतः दोन्ही भाषा नीट शिकल्या जाणार नाहीत >>> +१
आधी मराठी पक्कं करून घेऊन मग इतर भाषा शिकवाव्यात. आम्हाला पण पहिली ते चौथी फक्त मराठी भाषा होती. पाचवीत हिंदी आणि इंग्रजी सुद्धा अभ्यासक्रमात आल्या. आठवीनंतर हिंदी सोडून १०० मार्कांचे संस्कृत घेतले. तर मग त्यानंतर मराठी, इंग्रजी आणि संस्कृत अश्या तीन भाषा होत्या.
आपल्यावेळी असेच होते rmd धनी.
आपल्यावेळी असेच होते rmd धनी. मी आता मगाशी मुलीला ते सांगत होतो की मी पाचवीत abcd शिकलो तर तिला ते खरेच वाटत नाहीये
लंपन
लंपन
मला वाटतं आपलाच पॅटर्न चांगला होता. मराठी त्या लहान वयात पक्कं केलं तरच पक्कं होतं. बाकी हिंदी , इंग्रजी नंतर गरज असते म्हणून एरवीच शिकल्या जातात. आपण शिकलोच की
मला वाटतं आपलाच पॅटर्न चांगला
मला वाटतं आपलाच पॅटर्न चांगला होता. मराठी त्या लहान वयात पक्कं केलं तरच पक्कं होतं. बाकी हिंदी , इंग्रजी नंतर गरज असते म्हणून एरवीच शिकल्या जातात. आपण शिकलोच की>> +११
AI च्या जमान्यात फक्त एक भाषा
AI च्या जमान्यात फक्त एक भाषा नीट शिकले तरी चालू शकेल.
त्यामुळे पहिली ते चौथी मस्त
त्यामुळे पहिली ते चौथी मस्त मराठी शिकलो. त्यानंतर मग पाचवीला इंग्रजी आणि हिंदी आले. मग काही दिवस हिंदी + संस्कृत होते. अर्धे अर्धे. आठवीला मात्र स्कोअरिंग विषय म्हणून संस्कृत १०० घेतले.>> सेम, फक्त माझ्या वेळेस इग्रजी फक्त भाषेपुरतेच होते बाकी सायन्स-मॅथही मराठितच ते पुढे ११ विला फार अवघड गेले.
तिसर्या भाषेची सक्ती नकोच..
इथे दुसरी भाषा स्पॅनिश्,मॅन्डॅरियन्,फ्रेन्च वैगरे थेट ८वी किवा ९वीत घ्यावी लागते.
माझ्या मुलाने टिन्स मधे
माझ्या मुलाने टिन्स मधे अभ्यास करणं अगदीच सोडलं होतं. पण बारावी नेमकी तेव्हाच येते. तिथे आधी फ्रेंच घेतलं होतं पण तो class अटेंड करायला वेळ नाही (असं त्याला वाटलं म्हणून ) पूर्ण हिंदी घेतलं.
बारावीला prelim मधे प्रश्न आला, 'देव के बरे मे अपने विचार लिखिये ', सहा मार्कांना.
त्याने अगदी जीव तोडून एक पानभर लिहिलं, 'देव कितना अच्छा होता हैं.... वो भक्तो के लिये क्या क्या करता हैं....' वैगेरे वैगेरे....
परीक्षा झाल्यावर बाहेर येऊन मित्राकडे फुशरकी मारत असतांना कळलं, देव नावाचा फ्रीडम fighter होता (पुस्तकात).
तेव्हा हिंदीचा अभ्यास नं केल्याची शिक्षा म्हणून बहुतेक, आता बायकोशी अन तिच्या नातेवाईकांशी कायम हिंदी बोलावं लागतंय त्याला.
आम्हाला पण पाचवी ते सातवी
आम्हाला पण फक्तं पाचवी ते सातवी होते हिन्दी.
आठवी पासून १०० मार्कांचे संस्कृत , स्कोअरींग साठी, मला फार कंटाळवाणे वाटायचे संस्कृत पाठांतर !
मला पर्सनली संस्कृत पेक्षा हिन्दी भाषा सोपी जायची /आवडायची विषय म्हणून पण गरवारे हायस्कुलमधे अ तुकडीला कम्पलसरी संस्कृत होते , हिन्दी बन्दच झाले सातवी नंतर.
पहिलीपासून तीन भाषा एका वेळेला माहित नाही कसे वाटेल, सध्याच्या कॉस्मोपॉलेटिन वातावरणात ऑलरेडी हिन्दी बर्यापैकी येतच असेल तर नाही अवघड जाणार कदाचित.
हिंदी समजणे आणि हिंदीचा एका
हिंदी समजणे आणि हिंदीचा एका भाषा म्हणून अभ्यास करणे यात बराच फरक आहे .
मी मुंबईत कॉस्मो वातावरणात वाढले . हिंदी लहानपणापासून समजत होतीच. त्यामुळे ती कठीण जाणार नाही असे आईला वाटलेले.
पण झाले भलतेच . दाये/ बाये, है वर कधी अनुस्वार द्यायचा , वाक्याच्या शेवटी पूर्णविराम बसून दंड द्यायचा, शिक्षा या शब्दाचा मराठी / हिंदीत अर्थ वेगवेगळा असतो हे लक्षात ठेवण्यात दम निघायचा. परीक्षेत मार्काची घसरण चालू झाली. हिंदीचा त्यामुळे कंटाळा येत होता. कधी एकदा ही कटकट संपते आहे असे वाटले होते. शेवटी आठवीला सुटका झाली .
बर! हिंदी सोडल्याने काही नुकसान झाल ? तर नाही . औपचारिक हिंदी शिकण्याच्या आधीही हिंदी येत होती, संवाद साधता येत होताच ..
बर त्या औपचारिक हिंदी शिकण्याच्या व्यवसायिकदृष्ट्या पुढे काही उपयोग झाला ? तर नाही . सेबीची, मिनिस्ट्रीची सर्क्युलर्स हिंदी /इंग्रजीत असतात . मी सर्रास हिंदीचे व्हर्जन टाळून इंग्लिश वाचायाला सुरुवात करते . मीच काय माझे अनेक हिंदी भाषिक सहकारी देखील हेच करतात .
त्या है / दाये /बाये इत्यादी पीडेचा व्यवहारिक उपयोग शून्य !
जी भाषा सहज बोलली जात होती ती निव्वळ तिसऱ्या भाषेच्या अट्टाहासापायी वैतागवाडी झाली . प्लस हिंदीच ओझ वाटू लागल आणि वेगळच !
#saynotihindi
जाई, एकदम बरोबर. चित्रपटात
जाई, एकदम बरोबर. चित्रपटात कधी वह गमला है - वे गमले हैं बोलू लागतील, तेव्हाच मी मान्य करीन की हिंदी समजायला शाळेत ते शिकायची गरज आहे म्हणून.
परीक्षा झाल्यावर बाहेर येऊन
परीक्षा झाल्यावर बाहेर येऊन मित्राकडे फुशरकी मारत असतांना कळलं, देव नावाचा फ्रीडम fighter होता (पुस्तकात). >>> शर्मिला
या निर्णयाचा निषेध! हा निर्णय
या निर्णयाचा निषेध! हा निर्णय त्वरीत रद्द व्हावा आणि पुन्हा आडमार्गाने देखील राबवला जाऊ नये.
गेले वर्षभर प्राध्यापक डॉ. दिपक पवार यांच्या विविध मुलाखती ऐकते आहे. त्यांच्या विचारांशी सहमत आहे.
जर त्यांची भुमिका/विचार ऐकले नसतील तर त्यांच्या एका छोटया मुलाखतीची लिंक देत आहे. जरूर ऐका.
https://youtu.be/4q0Bn6fgOPE?si=o2fek-lFmRUlDZ_H
सिनेमाची हिंदी फारच पुरेशी
सिनेमाची हिंदी फारच पुरेशी आहे. शाळेत हिंदी 'शिकणे' हे आपल्या सातजन्मांत होणार नाही. कारण शाळेत तर मराठीसुद्धा आपण नीट शिकत नाही. संपूर्ण शिक्षण संपल्यावरही आपल्याला 'क्वचित' आणि 'खचित' एकच वाटतात. ऊन, ऊन्हं, ऊन्ह, उन्ह यातलं बरोबर काय आणि सार्यांचा एकच अर्थ आहे का, आणि नसेल तर कोणत्या संदर्भात वापरले जातात- हेही आपल्या गावी नसतं. प्रतिष्ठाण, कानाडोळा यातलं काय बरोबर-चूक - असले विषय आपण 'चलता है' खात्यात टाकतो.
भाषा ही लहान असतानाच जास्त पटकन आत्मसात होते, लवकर शिकली जाते, असं समर्थन करणारे म्हणतात. (त्यांची ती नेहेमीचीच गंमत. याच्या एक्झॅक्टली विरुद्ध निर्णय येता, तरी त्यांनी समर्थनच केलं असतं) असं असेल तर मग मराठीही नीट का शिकली आणि शिकवली जात नाही?
हिंदी भाषेचं 'शिक्षण' एवढं सोपं नाही. महाराष्ट्रातच काय, पण युपी-बिहारमध्येही हिंदी भाषेचं 'शिक्षण' सोपं नाही. याचाच अर्थ असा, की कुठच्याच भाषेचं 'शिक्षण' इतकं सोपं नाही. ती शिकवणार्या मास्तराचाच मुळात अभ्यास पाहिजे. शब्दांचे अर्थ शिकवणे म्हणजे भाषा शिकवणे नव्हे. त्या भाषेचे शब्द, व्याकरण, अलंकार-उपमा-म्हणी वगैरेंची इकोसिस्टीम, त्या भाषेतले साहित्य, ते लिहिणारे लेखक या सार्यांचा पुरेशा प्रमाणात अभ्यास पाहिजे मस्तरांचा. (मुलांच्या सिलॅबसमध्ये यातलं काय काय आहे- याच्याशी त्याचा संबंध नाही) म्हणूनच मी नेहेमी म्हणत असतो, की या मास्तरांना शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांच्या लेव्हलचे पगार मिळाले पाहिजेत. थोडक्यात हे मास्तरही त्याच लायकीचे पाहिजेत.
नुसतेच राजकारण सतत घेऊन वावरणारे हलक्या डोक्याचे राज्यकर्ते नसते, जरा जरी धोरणी असते, तरी त्यांनी कलेची भाषा मुलांना लहाणपणापासून शिकवायला प्राधान्य दिलं असतं. या संदर्भातल्या जाणीवा आणि नजर मुलांना लहाणपणापासूनच मुलांना मिळेल अशी मुलभूत व्यवस्था तयार करण्याचे प्रयत्न केले असते. इतर शिक्षण देऊन लाईफस्टाईल सुधारता येईल., पण लाईफ सुधरवण्यासाठी हीच भाषा असते- हे दुर्दैवाने कुणालाच कळत नाही. अधिकचा अभ्यासक्रम मुलांच्या माथी मारतानाच या कलाविषयक शिक्षणाचा वेळही कमी केल्याचे घाट घातले जाऊ लागले आहेत. हे दुप्पट नुकसान आहे. हे व्हिजन, धोरण, गांभीर्य कुणालाही नाही, राज्यकर्ते, राजकारणी, विरोधक आणि जनता- या सार्यांसकट- हे फार दुर्दैव आहे.
तरी त्यांनी कलेची भाषा
तरी त्यांनी कलेची भाषा मुलांना लहाणपणापासून शिकवायला प्राधान्य दिलं असतं. >> कलेची भाषा ही माणसात बंडखोरीची बीज रोवते, आखून दिलेली चौकात मोडायला शिकवते, इतकी मोठी जोखीम राजकारणी कसे घेतील? त्यांना हवीत पोपटपंची करणारी, री ओढणारी अक्कलशून्य सुशिक्षित मेंढरं, मेंढरांना जितक्या कमी वयात बाळगुटी पाजाल तितका परिणाम हमखास नी दीर्घकालीन. त्यासाठी भाषा बोलता येणं, नी बोललेली समजणं एवढं पुरेसं आहे. कला, विज्ञान, समाजशास्त्र, न्यायशास्त्र हे विषय जितके कमी शिकले जातील तितके चांगलं, न शिकले गेल्यास आणखीनच उत्तम ( मग द्या १ली ते ८ वी मुलांना ढकलून वरच्या वर्गात ). इतिहासाचं पुनर्लेखन कधीचंच सुरु झालंय.....एकूणच काम फत्ते!!!
खरं आहे.
खरं आहे.
हेही जनतेतूनच आलेत ना. आपल्याकडची याबाबतची उदासीनता थक्क करणारी आहे.
Whilst you are getting raped
Whilst you are getting raped, enjoy it.
You’ll soon get used to it.
जेव्हा दुसऱ्यांच्यावर अन्याय होत तेव्हा तुम्ही काय केले?
कुंपणावर बसून बसून तुमचे ते दुखायला लागले तरी तुम्ही उडी मारून मैदानात उतरला नाहीत.
आता तुमची पाळी आली आहे.
तुमच्या मदतीसाठी कोणी येणार नाहीये.
आपल्याकडची याबाबतची उदासीनता
आपल्याकडची याबाबतची उदासीनता थक्क करणारी आहे. >> अगदी! एका तमिळ मित्राने सांगितले की त्यांच्या सर्व whatsapp group मध्ये याची चर्चा सुरू आहे. पण आपल्या आजूबाजूला पाहिले तर माझ्या वर्तुळात तरी याबाबत फार उदासीनता दिसते आहे
म्हणूनच तर यांचं फावतं
म्हणूनच तर यांचं फावतं
तिसर्या भाषेपायी PT आणि
तिसर्या भाषेपायी PT आणि गणिताचा वेळ कमी करणार आहेत शाळांमधून असंही ऐकलं. खरं आहे का?
तसं असेल तर महाराष्ट्रातल्या पुढच्या पिढ्यांना दुर्बळ आणि बिनडोक बनवायचा घाट घातला आहे असंच म्हणावं लागेल.
साजिराची पोस्ट पटली. असंही वाटून गेलं की खरंच मराठी शिकवणारे तरी तेवढे पात्र राहिले आहेत का?
Pages