सध्या महाराष्ट्रात, पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या विरोधात अनेक मराठी प्रेमी नी महाराष्ट्राचे हित चिंतनाऱ्या संघटना विरोधात उतरल्या आहेत!
-महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे का?
- उत्तर भारतीय फुगलेली लोकसंख्या महाराष्ट्रात आणून वसवण्यासाठी भाजप हे करतय का?
- २२ अधिकृत भाषांमधली एक भाषा हिंदी लादण्यामागे भाजपाचे कारस्थान काय?
- हिंदीचा नी महाराष्ट्राचा संबंध काय?
- हिंदी भाषकांच्या सोयीसाठी १ लितील कोवळ्या जीवाना हिंदी लादून त्रास द्यायचा का?
संघटनांच्या मागण्या:-
१. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती केवळ इतर भारतीय भाषांप्रमाणेच एक राज्यभाषा असून तिची सक्ती करणे अयोग्य आहे.
२. राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेवर आघात: महाराष्ट्राची ओळख ही स्वतंत्र मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व परंपरेशी निगडित आहे. अन्य राज्यातील भाषा लादणे हे सांस्कृतिक आक्रमणच म्हणावे लागेल.
३. शिक्षणाचे ओझे वाढवणारा निर्णय: पहिलीपासूनच तीन भाषा सक्तीने शिकविणे बालकांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी अयोग्य व अन्यायकारक ठरेल.
४. मराठीतील बोलीभाषांना सरकारकडून प्रोत्साहन नाही: मराठीच्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासन काहीही प्रयत्न करीत नाही, हे दुर्दैवी आहे.
५. स्थानिक विद्यार्थ्यांवर स्थलांतरितांचे भाषिक वर्चस्व लादले जात आहे, ज्यामुळे स्थानिक भाषिक विद्यार्थ्यांचा अधिकार आणि संधी हिरावली जाऊ शकते.
६. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राचा चुकीचा अर्थ: त्रिभाषा सूत्र हा प्रशासनापुरता मार्गदर्शक आहे; त्याची सक्ती शालेय शिक्षणात लादणे अन्यायकारक आहे.
७. भाषिक स्वायत्ततेचा संपूर्ण अभाव: प्रत्येक राज्याला त्याच्या भाषिक गरजेनुसार शिक्षण धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या दबावाखाली घेतलेला निर्णय हे राज्याच्या स्वायत्ततेचे उल्लंघन आहे.
त्यामुळे, आम्ही खालील मागण्या आपल्यास सादर करीत आहोत –
१. राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
२. या निर्णयाच्या रद्दबाबत तात्काळ शासन आदेश किंवा स्पष्ट परिपत्रक निर्गमित करावे.
३. सदर बाबीबाबत शालेय शिक्षण संचालनालय, शिक्षण आयुक्त, शिक्षण मंडळ, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्या यांना स्पष्ट सूचना द्याव्यात.
४. बालभारतीसह इतर सर्व पुस्तक छपाई केंद्रे व मुद्रण विभागांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी हिंदी सक्तीबाबत कोणतीही योजना राबवू नये, याबाबत स्पष्ट लेखी सूचना द्याव्यात.
५. यापुढील अभ्यासक्रम नियोजन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना तृतीय भाषा निवडीचा संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावा, कोणतीही सक्ती करू नये.
६. त्रिभाषा सूत्राचे पालन हे राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने व ऐच्छिक स्वरूपात मर्यादित ठेवावे.
७. राज्यातील मराठी बोलीभाषा, लोकपरंपरा व स्थानिक संस्कृती यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करून स्थानिकतेला प्राधान्य द्यावे.
८. सदर निर्णयामुळे निर्माण होणारा संभ्रम, असंतोष आणि प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी त्वरित ठोस कृती करण्यात यावी.
स्वाती, परफेक्ट बोललीस!
स्वाती, बरोब्बर बोललीस!
स्वाती २
स्वाती २
शंभर टक्के सहमत. अशाच अर्थाची एक पोस्ट मी मराठी चित्रपट धाग्यावर कि तत्सम धाग्यावरून खोडून टाकली.
श्रेयस तळपदेचा एक किस्सा / मुलाखत वाचनात आला होता. कदाचित व्हिडीओ असेल , नक्की लक्षात नाही. त्याला सुभाष घई यांनी मुक्ता बॅनर्स साठी मराठी फिल्म्स बनवण्यासाठी साईन केलं होतं. दर वर्षी दहा ते अकरा सिनेमे बनवायचे पण अट अशी होती कि ७०% हिट , सेमी हिट झाले पाहीजेत. दोन कि तीनच फिल्म्स बनवल्यानंतर घईंनी या उपक्रमातून अंग काढून घेतलं. त्यांनी केलेल्या सर्व्हेत त्यांना असं आढळलं कि मराठी सिनेमाची निर्मितीमूल्यं चांगली ठेवली तरी त्याला प्रेक्षक मिळत नाही. थिएटर मिळत नाही. घईंनी मराठीत पडायचं कारण म्हणजे शेजारच्या तमिळ, तेलगु, मल्याळम इंडस्ट्री मधे होत असलेला धंदा. त्या मानाने महाराष्ट्राची लोकसंख्या जास्त आहे.
यातली विजेता ही फिल्म ज्या दिवशी रिलीज झाली त्याच दिवशी संध्याकाळी कोविड मुळे थिएटर्स बंद झाले. त्यानंतर ही फिल्म रिलीज झाली नाही. घईंनी बहुतेक प्रयत्न केला पण अनेक हिंदी, दक्षिण भारतीय फिल्म्स साठी थिएटर्स बुक झाले होते.
https://www.youtube.com/watch?v=USoGB5Kia74#:~:text=Description:%20Subha...
महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी
महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी लोकांनी पुढील प्रयोग करून पाहावा असे सुचवतो.
- हा प्रयोग एक आठवडा आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या संभाषणांमध्ये करा. उदा. शेजारी पाजारी, प्रवास (रिक्षा पासून विमान प्रवासापर्यंत), खरेदी, बँक, डॉक्टर, कस्टमर सर्व्हिस, रेस्टॉरंट्स, सोसायटीच्या मिटींग्स, ऑफिस मधल्या कलीग्स सोबत जेवताना, कॉफी पिताना मारलेल्या गप्पा वगैरे .
- कुटुंबियांशी केलेले संभाषण ह्या प्रयोगात धरू नका
- कामाच्या ठिकाणी मिटींग्स मध्ये वगैरे जर इंग्लिशच वापरली जात असेल तर तेही प्रयोगात धरू नका (पण जर मराठी किंवा हिंदी चालत असेल तर धरा)
प्रयोग १)
आपल्याला मराठी येते हे विसरून जा. मराठीत बोलू नका. हिंदीत बोला. जर कुणी मराठीत बोलू लागले तर "मला मराठी येत नाही. कृपया हिंदीत बोला" असे म्हणा. जर त्यांना हिंदी येत नसेल तरच इंग्लिशमध्ये बोला. priority order : हिंदी > इंग्लिश >>>>> (अगदी खूपच अडलं तरच मराठी)
किती टक्के वेळा हिंदी, इंग्लिश, आणि मराठीत बोलणे झाले ह्याचा पाय चार्ट करा.
किती वेळा अगदी अडल्यामुळे मराठी बोलायलाच लागलं ह्याची नोंद करा.
किती वेळा ग्रुप कन्व्हर्सेशन तुमच्यासाठी मराठी/इंग्लिश मधून हिंदीमध्ये स्विच केले गेले ह्याची नोंद करा.
प्रयोग २)
आता आपल्याला हिंदी येते हे विसरून जा. मराठीत बोला आणि हाच प्रयोग पुन्हा करा. जर कुणी हिंदीत बोलू लागले तर "मला हिंदी येत नाही. कृपया मराठीत बोला" असे म्हणा. जर त्यांना मराठी येत नसेल तरच इंग्लिशमध्ये बोला.Priority ऑर्डर: मराठी > इंग्लिश >>>>> (अगदी खूपच अडलं तरच हिंदी)
किती टक्के वेळा मराठी, इंग्लिश, आणि हिंदीत बोलणे झाले ह्याचा पाय चार्ट करा.
किती वेळा अगदी अडल्यामुळे हिंदी बोलायलाच लागलं ह्याची नोंद करा.
किती वेळा ग्रुप कन्व्हर्सेशन तुमच्यासाठी हिंदी /इंग्लिश मधून मराठीमध्ये स्विच केले गेले ह्याची नोंद करा.
मराठीची पायरी लक्षात येईल.
मराठीची पायरी लक्षात येईल.>>>
मराठीची पायरी लक्षात येईल.>>> नक्कीच अजबराव, मी आधीच एका प्रतिसादात सांगितल्याप्रमाणे ही महाराष्ट्रात गेल्या ८० वर्षे फोफावलेल्या हिंदी चित्रपटसृष्टीने मराठी माणसात नकळत रुजवलेली मराठी भाषेच्या नाशाची बिजं आहेत.....या संदर्भात हिंदी चित्रपटसृष्टीने त्याच्या रिच मुळे, त्याच्या झगमगीत श्रीमंत दुनियेबद्दल असलेल्या आकर्षणामुळे, आणि एकूणच त्या इंडस्ट्रीत काम करताना आवश्यक असलेल्या भाषेच्या प्राधान्यक्रमामुळे, मराठी भाषेच्या intoxication मधे मोठा वाटा उचलला आहे...लाखो स्थलांतरीत जे काम करु शकले नसते ते एका
मेनस्ट्रीम इंडस्ट्रीने आपल्या वलयांकित प्रभावाने घडवून आणले आहे. The irreversible damge is already done.
एका मित्रा ने सांगितलेला आणखी
एका मित्रा ने सांगितलेला आणखी एक मुद्दा - मराठीसाठी मोडी लिपी सोडून देवनागरी स्वीकारली, तिथून र्हासाला सुरुवात झाली.
मराठीसाठी मोडी लिपी सोडून
मराठीसाठी मोडी लिपी सोडून देवनागरी स्वीकारली, तिथून र्हासाला सुरुवात झाली.>>> माझ्या मते याचा प्रभाव अत्यल्प ठरेल....कारण एक तर महाराष्ट्रात देवनागरी ही सामान्य जनांच्या वापरात ८०० वर्षांहूनही अधिक काळ लिपी म्हणून वापरली गेली आहे, त्यातील ४५० वर्षे मुघल राज्यकर्त्यांचे शासन होते म्हणजेच उर्दू- हिंदी भाषिकांचे....तरीही एवढ्या प्रदिर्घ कालखंडात स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत कुठेही हिंदी स्थलांतरीतांचे महाराष्ट्र पट्ट्यात मराठीवर भाषिक आक्रमण दिसत नाही....दुसरे जरी लीपी सारखी असली तरी फार फार तर शब्द पाहून शब्दोच्चार करता येईल त्याचा अर्थ उमगणे ती भाषा सतत कानावर पडून रुळल्याखेरीज नवख्याला कठीण.
२१ एप्रिल रोजी ही प्रतिक्रिया
२१ एप्रिल रोजी ही प्रतिक्रिया दिली होती. अगदी अस्संच घडलंय.
>>आतासुद्धा फडणवीसांनी टाकलेली गुगली जास्त लोकांच्या लक्षात आलेली नाही. मुळात पहिलीपासून तिसरी भाषा लादणे हेच चूक आहे. हिंदी सक्तीवर लक्ष विचलित करून तिसरी भाषा गळ्यात मारली. आता हिंदी सक्तीची न करता कुठलीही भाषा घेण्याचा पर्याय देणार आहेत. म्हणजे बहुतांशी विरोध थंडावेल. पण प्रॅक्टिकली तिसरी भाषा शिकवायचीच झाली तर बहुतेक शाळांमध्ये हिंदीच शिकवली जाईल. ... त्यामुळे मराठी लोकांना गंडवून हिंदीकरणाचा हा डाव यशस्वी झालेला आहे.
>> थोडक्यात महाराष्ट्रात "मराठी नही आती. हिंदी बोलो." हे normalize करण्याचा डाव आहे. महाराष्ट्रात ग्राहक तर सोडाच पण सेवादात्याला सुद्धा मराठी कळणे/बोलणे ह्याचे काही obligation ठेवायचे नाही. पण हिंदी येणं हे मात्र सगळ्यांना कम्पलसरी आहे; हिंदी आलं नाही तर ती तुमचीच चूक. अशी स्थिती निर्माण करायची आहे. काँग्रेसच्या काळापासून महाराष्ट्रात हिंदीचे फाजील लाड झाले. पण भाजपने मात्र पद्धतशीरपणे आणि ruthlessly महाराष्ट्राला हिंदी राज्य करायचा विडा उचललेला आहे.
हिंदीची सक्ती करणार नाही असं
हिंदीची सक्ती करणार नाही असं सांगून झुलवत ठेवलं.
उल्लू बनाया , बडा मजा आया.
मन्त्रीमडळात सगळे मेन्दुत
मन्त्रीमडळात सगळे मेन्दुत भुसे भरलेले आहेत
मेंदूत भुसे नाहीत. त्यांचा
मेंदूत भुसे नाहीत. त्यांचा मेंदू चांगला तल्लख आहे. सत्तेसाठी दिल्लीपुढे लाचारीने आपल्या भाषा आणि संस्कृतीचा सौदा करणारे अत्यंत लबाड कोल्हे आहेत.
आणखी किती करंटेपणा करतील काही
आणखी किती करंटेपणा करतील काही नेम नाही
हिंदी चित्रपट समजावे यासाठी.
हिंदी चित्रपट समजावे यासाठी.
इतर देशात नक्की प्राथमिक
इतर देशात नक्की प्राथमिक शिक्षणात काय शिकवले जातंय म्हणून ChatGPT वर बघितलं, तर...
चीनसारख्या देशात इंग्रजी केवळ तिसरीपासून शिकवली जाते. तिथे मुलांचं लक्ष गणित, विज्ञान, नैतिक शिक्षण, आणि देशप्रेमाचे मूल्य यावर केंद्रित केलं जातं.
इस्रायलमध्येही तसंच आहे. इंग्रजी तिसरी पासून आहे. बाकीचा अभ्यासक्रम हा देशाची ओळख, नागरिकशास्त्र, विज्ञान, आणि मूल्यशिक्षणावर आधारित असतो.
पण महाराष्ट्रात? तीन भाषा शिकवून एक संपूर्ण भाषा (बहुतेक वेळा हिंदी) केवळ राजकीय कारणांसाठी लादली जात आहे.
अशा पद्धतीने आपण मुलांच्या खांद्यावर अनावश्यक बोजा ठेवतो आहोत. ज्या वयात जे शिकायला पाहिजे ते न शिकता हिंदी सारखी भाषा शिकवली गेल्यास ह्याचा फार मोठा दूरगामी परिणाम होणार आहे.
महाराष्ट्राची वाट लावण्याची
महाराष्ट्राची वाट लावण्याची ही सुरुवात आहे! आश्चर्य म्हणजे मराठी माणसाला ह्याच्याशी आजिबात घेणेदेने दिसत नाही. मराठी माणूसच करंटा आहे!
महाराष्ट्राची वाट लावण्याची
महाराष्ट्राची वाट लावण्याची ही सुरुवात आहे! >> ती तर केव्हाच झाली आहे.
त्रिभाषा सूत्राचे पालन उत्तर
त्रिभाषा सूत्राचे पालन उत्तर भारतात ताबडतोब करा. त्यांना मराठी शिकणे सक्तीचे करा. मग इकडे या. लिपी एकच आहे ना? मग मराठी का नाही?
त्रिभाषा सूत्र जर नवीन
त्रिभाषा सूत्र जर नवीन शैक्षणिक उपक्रमाचा भाग असेल तर तिकडे उत्तरप्रदेश, बिहारच्या सरकारी शाळांमध्ये मराठी तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करा. हे केल्यास होणारे फायदे अनेक असतील, त्यातील काही:
- इथे येणाऱ्या भविष्यातील लोंढ्याला मराठीची तोंड ओळख झाली असेल
- इथल्या स्थानिक पक्षांना भविष्यात इतर राज्यामध्ये आपला प्रभाव दाखवता येईल
- काही होतकरू बीएड, डीएड धारकांना मराठी शिक्षक म्हणून या उत्तरप्रदेश, बिहारच्या सरकारी शाळांमध्ये तासिकेवर अथवा पगारी नोकरी करता येईल, किती मोठा रोजगार निर्माण होईल आणि राज्य भाजप यातून काहीशे जागा निर्माण करून परिवारातील काहींची सोय करू शकतील.
फायदे अनेक त्यामुळे जाणकारांनी त्यांना सुचतील तसे लिहीत जावे आणि एक जन चळवळ उभी करायला एखाद्या निद्रिस्त नेत्याला/पक्षाला आऊटसोर्स करावी. अरे हाय काय आणि नाय काय.
जैतापूर आणि नाणार
जैतापूर आणि नाणार प्रकल्पानंतर हे हिंदीचं गाठोडे पाठीवर टाकलं आहे.
कॉन्ग्रेस असो वा भाजप , दिल्लीश्वरांचं ओझं वाहाणे हेच महाराष्ट्रातील नेत्यांचं काम.
इकडे भाषण असले की त्याचे मराठीत भाषांतर करणारा ठेवा. जसा तमिळनाडूत ठेवलेला. योग्य संदेश जाईल.
उगाच नाही मराठी भाषेला अभिजात
उगाच नाही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला... घ्या अभिजात दर्जा आणि बसा प्राचीन साहित्य घेऊन कोपऱ्यात
मायबोलीवर सरकारच्या विरोधात
मायबोलीवर सरकारच्या विरोधात एवढा प्रचंड असंतोष दिसतोय, मराठी कलाकार आणि साहित्यिक एवढ्या मोठया संख्येने रस्त्यावर उतरले आहेत हे पाहता मोदी-फडणवीस सरकारला हा निर्णय मागे घ्यावाच लागेल
बहुभाषिक असण्याबद्दल विरोध
बहुभाषिक असण्याबद्दल विरोध नाही. पण त्यात राजकारण आणले जाते आहे. इतर राज्यांतल्या तीन भाषा दाखवा हा हेका सोडता कामा नये.
Srd मूळात पहिलीपासून हिंदी
Srd मूळात पहिलीपासून हिंदी (किंवा कुठलिही तिसरी भाषा, जे अर्थात न जमलेले समर्थन आहे फडणवीस सरकारने केलेले) सक्ती का?
काय साध्य करायचे आहे तीन भाषा एवढ्या लहानपणी लादून? इतर राज्यात तीनच काय पाच का असेनात.
फडणवीस हे फार अहंकारी
फडणवीस हे फार अहंकारी राजकारणी आहेत त्यामुळे सहजा सहजी ते निर्णय माघे घेतील असं वाटत नाही. पण वाढता विरोध मोदी शहाच्या कानावर गेला आणि त्यांचा फोन आला तर मात्र फडणवीस हिंदीच काय मराठीही शिकवण्याचं बंद करतील.
सक्ती नकोच.
सक्ती नकोच.
जेवढा विरोध जास्ती तेवढं मुख्य मंत्र्यांचे काम सोपं होईल. "बघा मी करतोय पण विरोध फार आहे " हे सांगून मोकळे होतील.
उत्तर प्रदेश आणि हरयाणा या
उत्तर प्रदेश आणि हरयाणा या राज्यांत यंदापासून त्रैभाषिक लागू होईल. ( महाराष्ट्रात अनेक दशके आहे. ) पण तेही नववी दहावीत. पहिली नाही.
हरयाणात संस्कृत पंजाबी उर्दू. उत्तर प्रदेशात कागदावर सगळ्या भारतीय भाषा. पण किती विद्यार्थी मराठी किंवा द्रविड भाषा शिकतील?
गाय पट्ट्यातल्या इतर राज्यांतही उर्दू किंवा संस्कृत असाच पर्याय दिसतो. मध्य प्रदेशात मराठी आहे.
इंग्रजी ही परकीय भाषा चालते आणि हिंदी या भारतीय भाषेला विरोध का? असं फडणवीस म्हणाल्याचं वाचलं.
इंग्रजी शिकून फायदा होईल असं वाटतं तसा हिंदी शिकून होईल का?
माझ्या वेळी आणि अगदी गेल्या साताठ वर्षांत जर्मन, फ्रेंच ही तिसरी भाषा निवडायचा पर्यायही होता.
एंजिनिअरिंग करणाऱ्या
एंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर्मन ठीक आहे.
फ्रेंच ही गमतीची भाषा आहे. कॅनडात जायचे असेल तर ठीक.
दक्षिण भारतात हिंदी कामाची नाही. इंग्रजी तोकडी मोडकी सर्वांनाच येते.
संस्कृत शाळेत नकोच. ज्याची त्याने वेगळी शिकावी . कंटाळवाणी भाषा आहे. सगळा द्वयर्थीपणा भरून ठेवला आहे.
उगाच भाषेचा घोळ घालत आहेत.
दोन भाषा पुरे आहेत.
माझ्या आठवणीनुसार पंजाब मध्ये
माझ्या आठवणीनुसार पंजाब मध्ये पंजाबी शिकणे सक्तीचे आहे सर्व शाळांमध्ये.
महाराष्ट्रातील CBSE शाळांमध्ये मराठी सक्तीचे नाहीये का?
हल्ली सीबीएसई शाळांमध्ये
हल्ली सीबीएसई शाळांमध्ये मराठी अनिवार्य आहे.
संस्कृत मध्ये जास्त गुण मिळतात म्हणून काही जण ती निवडतात. आमच्या शाळेत पाचवी ते सातवी हिंदी आणि आठवीपासून हिंदी - संस्कृत असे विषय होते. काही शाळा पूर्ण संस्कृतही शिकवत.
फडणवीस आता चर्चा करणार म्हणे.
तिसऱ्या भाषेबद्दल बोला.
तिसऱ्या भाषेबद्दल बोला. पंजाबमध्ये तिसरी भाषा कोणती?
“ पंजाबमध्ये तिसरी भाषा कोणती
“ पंजाबमध्ये तिसरी भाषा कोणती?” - दिवेलागणीनंतर बोलली जाणारी इंग्रजी

Pages