सध्या महाराष्ट्रात, पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या विरोधात अनेक मराठी प्रेमी नी महाराष्ट्राचे हित चिंतनाऱ्या संघटना विरोधात उतरल्या आहेत!
-महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे का?
- उत्तर भारतीय फुगलेली लोकसंख्या महाराष्ट्रात आणून वसवण्यासाठी भाजप हे करतय का?
- २२ अधिकृत भाषांमधली एक भाषा हिंदी लादण्यामागे भाजपाचे कारस्थान काय?
- हिंदीचा नी महाराष्ट्राचा संबंध काय?
- हिंदी भाषकांच्या सोयीसाठी १ लितील कोवळ्या जीवाना हिंदी लादून त्रास द्यायचा का?
संघटनांच्या मागण्या:-
१. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती केवळ इतर भारतीय भाषांप्रमाणेच एक राज्यभाषा असून तिची सक्ती करणे अयोग्य आहे.
२. राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेवर आघात: महाराष्ट्राची ओळख ही स्वतंत्र मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व परंपरेशी निगडित आहे. अन्य राज्यातील भाषा लादणे हे सांस्कृतिक आक्रमणच म्हणावे लागेल.
३. शिक्षणाचे ओझे वाढवणारा निर्णय: पहिलीपासूनच तीन भाषा सक्तीने शिकविणे बालकांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी अयोग्य व अन्यायकारक ठरेल.
४. मराठीतील बोलीभाषांना सरकारकडून प्रोत्साहन नाही: मराठीच्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासन काहीही प्रयत्न करीत नाही, हे दुर्दैवी आहे.
५. स्थानिक विद्यार्थ्यांवर स्थलांतरितांचे भाषिक वर्चस्व लादले जात आहे, ज्यामुळे स्थानिक भाषिक विद्यार्थ्यांचा अधिकार आणि संधी हिरावली जाऊ शकते.
६. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राचा चुकीचा अर्थ: त्रिभाषा सूत्र हा प्रशासनापुरता मार्गदर्शक आहे; त्याची सक्ती शालेय शिक्षणात लादणे अन्यायकारक आहे.
७. भाषिक स्वायत्ततेचा संपूर्ण अभाव: प्रत्येक राज्याला त्याच्या भाषिक गरजेनुसार शिक्षण धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या दबावाखाली घेतलेला निर्णय हे राज्याच्या स्वायत्ततेचे उल्लंघन आहे.
त्यामुळे, आम्ही खालील मागण्या आपल्यास सादर करीत आहोत –
१. राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
२. या निर्णयाच्या रद्दबाबत तात्काळ शासन आदेश किंवा स्पष्ट परिपत्रक निर्गमित करावे.
३. सदर बाबीबाबत शालेय शिक्षण संचालनालय, शिक्षण आयुक्त, शिक्षण मंडळ, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्या यांना स्पष्ट सूचना द्याव्यात.
४. बालभारतीसह इतर सर्व पुस्तक छपाई केंद्रे व मुद्रण विभागांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी हिंदी सक्तीबाबत कोणतीही योजना राबवू नये, याबाबत स्पष्ट लेखी सूचना द्याव्यात.
५. यापुढील अभ्यासक्रम नियोजन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना तृतीय भाषा निवडीचा संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावा, कोणतीही सक्ती करू नये.
६. त्रिभाषा सूत्राचे पालन हे राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने व ऐच्छिक स्वरूपात मर्यादित ठेवावे.
७. राज्यातील मराठी बोलीभाषा, लोकपरंपरा व स्थानिक संस्कृती यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करून स्थानिकतेला प्राधान्य द्यावे.
८. सदर निर्णयामुळे निर्माण होणारा संभ्रम, असंतोष आणि प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी त्वरित ठोस कृती करण्यात यावी.
मुलं घरीच मराठी बोलायला
मुलं घरीच मराठी बोलायला शिकतात.
शाळेत हिंदी शिकताना देवनागरी लिपी शिकतील, आणि त्यावरून मराठी लिहिलायला वाचायला सुद्धा शिकतील.
मग पहिली पासुन काय गरज आहे शाळेत मराठी शिकण्याची? आणि पाचवी पासुन सुध्दा?
म्हणजे आता मुलांना पहिली पासुन नव्हे तर दहावी पर्यन्त तीन तीन भाषासक्तीचा प्रश्न मिटला. हिंदी इंग्रजी दोनच.
हे पटत असेल तर पुढल्या मुद्द्यावर येऊ.
हिंदीच शिकली पाहिजे असे नाही, दुसरी कुठलीही भारतीय भाषा मुलं निवडु शकतात हिंदी ऐवजी असे मुख्यमंत्री म्हणताहेत.
फक्त किमान वीस विद्यार्थी हवेत म्हणे.
मग मुलांनी हिंदी ऐवजी मराठी निवडली तर मराठी शिकवावी लागेल. आता काय २० मुलं तयार होणार नाहीत का मराठी ऐच्छिक भाषा निवडायला!
या सगळ्यांत काल एक मुद्दा
या सगळ्यांत काल एक मुद्दा आठवला : आमच्यावेळेस पहिली ते चौथी सगळे विषय एकच शिक्षक शिकवायचे. त्यावेळेस त्यांना ते सोपे होते. पण आता त्यांना हिंदी किंवा जी तिसरी भाषा असेल ती शिकवता येणार आहे का? की आता विद्यार्थी मेको तेको हिंदी शिकणार?
अनेक शाळांमध्ये अनिवार्य
अनेक शाळांमध्ये अनिवार्य विषयांना शिक्षक नाहीत. आहेत त्या शिक्षकांना एकापेक्षा जास्त इयत्तांचे सर्व विषय काही काही ठिकाणी शिकवावे लागत आहेत आणि सरकार म्हणे ऑनलाईन शिकवू...
फारच विनोदी
हिंदीची चिंधी करण्याचा प्लॅन
हिंदीची चिंधी करण्याचा प्लॅन आहे हा. हिंदी भाषकांनीच विरोध करायला हवा.
आम्ही ( मराठी माध्यम)
आम्ही ( मराठी माध्यम) पाचवीपासून हिंदी शिकत होतो. एकदा मेच्या सुटीत इमारतीतल्या गुजराथी कुटुंबात बडोद्यातील भाचे मंडळी आली .ती मुलं आमच्याच वयाची होती आणि हिंदी शाळांत शिकत होती. त्यांचं हिंदी ऐकल्यावर इतकं सोपं आणि गोड वाटत होतं. शिकत होतो ते हिंदी फारच कंटाळवाणा होतं.
'पंजाबमध्ये तीन भाषा कोणत्या' यासाठी आलेले सर्व प्रतिसाद आवडले.
( नवभारत टाइम्स हिंदी पेपरातलं हिंदी आणि अग्रलेख तर अगदी डोक्यावरून जातात. खूप बोजड हिंदी.)
. फडणवीस वगळता बाकी सगळे जे
. फडणवीस वगळता बाकी सगळे जे काही अगाध हिन्दी बोलतात त्यावरून महराष्ट्रातील सर्व मंत्री लोकांना हिन्दी शिक्षण घेण्याची गरज आहे
पहिलीपासून हिंदी सक्तीवरुन
पहिलीपासून हिंदी सक्तीवरुन फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे, १६ एप्रिल आणि १७ जूनचे दोन्ही शासन निर्णय रद्द
जनतेचं आणि विरोधी पक्षांचं लक्ष , शक्ती आणि वेळ अशा भावनिक मुद्द्यांवर खर्च करायला लावून महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून घ्यायचं. कात्रजचा घाट#
तिसरी भाषा शिकली नाही तर मराठी मुलांना मार्क्स मिळणार नाहीत. मात्र इतर मीडियामचे लोक पुढे जातील - हे नवीन पिलू सोडलं आहे.
पहिल्यांदा आदेश काढला त्याचं
पहिल्यांदा आदेश काढला त्याचं justification देताना नाही वाटतं सुचलं हे...
आणि हिंदीच विषय बरा सापडला यासाठी...
दुसरा काही उपयोगी विषय तरी शोधायचा
तशाही सगळीकडे वेगळ्या enterence परीक्षा असतातच...
आता पहिलीपासूनचे मार्क आय आय
आता पहिलीपासूनचे मार्क आय आय टी आणि मेडिकलच्या प्रवेश परीक्षांसाठी मोजतात हे माहीत नव्हतं.
तिसरी भाषा शिकली नाही तर
तिसरी भाषा शिकली नाही तर मराठी मुलांना मार्क्स मिळणार नाहीत. मात्र इतर मीडियामचे लोक पुढे जातील - हे नवीन पिलू सोडलं आहे.>>>
यावर तर काय बोलावे समजत नाही. कधीपासून भाषा विषयातील गुणांवरुन कटऑफ ठरू लागले. दहावीचे बेस्ट ऑफ फाईव्हचे मार्क अकरावी ऍडमिशन ला घेतात आणि बारावीला तर ढीगभर प्रवेश परीक्षा असतात, त्यामुळे बारावीचे मार्क दाखवण्यापुरते असतात (कट ऑफ असतो, तो प्रवेश परीक्षेचा अभ्यास करून नक्कीच गाठता येतो). मग यात क्रेडिट कुठून आले. गिरे तो भी टांग उपर असा एकंदरीत आविर्भाव आहे.
मराठी-हिंदी वाद तयार करून मूळ
मराठी-हिंदी वाद तयार करून मूळ बडगा गुपचुप पास केला जाणार आहे.

सांभाळा लोकहो.
काय आहे हे जनसुरक्षा?
काय आहे हे जनसुरक्षा?
विरोध का होत आहे.
https://www.bbc.com/marathi
https://www.bbc.com/marathi/articles/c3vwg2n47ddo
हिंदीसक्तीचा आदेश रद्द
हिंदीसक्तीचा आदेश रद्द केल्यावर ‘मराठीची सक्ती आणि हिंदीचा अभिमान’असं म्हणणारे फडणवीस केवळ कावेबाज नाहीत निर्लज्जसुद्धा आहेत. यांना हाकला!
#DevendraFadanvis
हिंदी सक्तीच्या विरोधातल्या
हिंदी सक्तीच्या विरोधातल्या आंदोलनाचा आणि ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा संबंध अधिकतर हिंदीभाषकांनी महाराष्ट्रात परप्रांतियांनी मराठी बोलण्याच्या आग्रहाशी जोडला आहे. इथल्या शालेय शिक्षणात काय चाललं आहे, याचा त्यांना पत्ता नाही. अर्थात परप्रांतियांनी मराठीतून न बोलण्याचा मुद्दा मनसेने गेले काही महिने घेतला आहे आणि विशेषतः हिंदी भाषकांमध्ये त्याचीच चर्चा आहे.
यासंदर्भात रिबॉर्न मनिष यांची ही फेसबुक पोस्ट आवडली ; त्यातलं हिंसाचाराचं समर्थन सोडून - अगदी ते टपलीत मारणं किंवा थाप मारणं असलं तरी. झुंडशाही, धाकदपटशा सोडून विधायक मार्ग निवडता आला तर उत्तम.
https://www.facebook.com/reborn.manish/posts/pfbid035Ms8XEt4V7uEseFm8BvL...
एक मातृभाषा होती है।
ये आपकी मम्मी बोलती है, घरवाले बोलते हैं। इसी भाषा मे आप अम्मा अप्पा अब्बा बोलना सीखते है। इससे इतना लगाव हो जाता है कि जहां पर भी बोली जा रही हो, वो जगह घर सी फीलिंग देता है।
दिस इज योर ओन लैंग्वेज।
●●
दूसरी भाषाएं, आपके अवसर की, स्वार्थ की भाषा है।
जैसे आप अंग्रेजी सीखते है, क्योकि उसमे दुनिया भर के ज्ञान की मेन स्ट्रीमिंग है। याने जो किताब या ज्ञान उड़िया या बंगाली में उपलब्ध नही, वह अंग्रेजी अनुवाद में मिल जाएगी। अब वो ज्ञान भले फ्रेंच या जर्मन में पैदा हुआ रहा हो।
हम सबने अंग्रेजी सीखी, अपने अवसर, अपने लाभ, अपने स्वार्थ के लिए। एक्को न मिला मुझे जो, UK की सभ्यता या बायरन की कविता से प्रभावित होकर अंग्रेजी सीखा हो।
●●
अमूमन भारत के भीतर हिंदी की भी वही स्थिति है। वह भी अवसर की भाषा है। सम्पर्क भाषा भी है, क्योकि देश मे ज्यादातर लोग, और आपके गिर्द का ऑलमोस्ट हर बन्दा "तोरा तोरा तो इंदी बोलताईच है"।
सरकारी भाषा होने के कारण भी हिंदी को प्रोत्साहन मिलता है। फिल्मों और मनोरंजन की मेन स्ट्रीमिंग भी हिंदी में है, जिसका लाभ हिंदी को मिला है।
हिंदी साहित्य पढ़ लो, और नौकरी न मिले, ज्यादा लोगो से बात न कर पाओ, मनोरंजन न मिले, तो हिंदी की हालत गुजराती, मराठी, मलयालम जैसी होती।
महज एक इलाके की भाषा!!!
●●
आप अवसर भुनाने को हिंदी सीखते है, अंग्रेजी सीखते है तो जरूरत भर की क्षेत्रीय भाषा सीखने में भी क्या हर्ज है...
यदि आप स्वार्थ साधने ही उस प्रदेश में गए है??
मने पहले तो अपने प्रदेश को धर्म- जाति- मन्दिर- घण्टा- घड़ियाल- मुसलमान- हिन्दू- पाकिस्तान में मटियामेट करके, मुंह चियार के, झक मारकर, लार टपकाते...
मजदूरी- नौकरी करने बंगलौर, पूना, चेन्नई, अहमदाबाद, हैदराबाद में कटोरा लेकर जाओ। और वहां वालो को हिंदी सीखने की धौंस जमाओ??
वाह बेटा!!!
●●
कोई तुमसे गुजराती, बंगाली, मलयालम पढ़कर साहित्य रचना करने नही कह रहा। लेकिन जहां गए हो, जहां का नमक खा रहे हो, जहां के पानी से बने हो, वहां शक्कर की तरह घुल मिल जाओ, मिठास बढ़ाओ।
जीवन संवारने के अवसर जहाँ मिला है,
वहां की भूमि भाषा सीखो।
उनके ट्रेडिशन्स, कल्चर लैंग्वेज की इज्ज़त करो। ज्यादा नही, 10-20 शब्द, 5-10 वाक्य सीख लो। "केम छो" सतश्री अकाल" 'ओर्र ग्लास वेल्लम पा" बोलो।
अगर लंबे समय से जमे हो, वहां व्यापार, दुकान, मकान बनाकर निवासी हो गए हो, तो लोकल्स के त्योहारों में शरीक होना तुम्हारी सदाशयता/महानता नही, कर्तव्य है।
जिम्मेदारी है।
बी ए रोमन, वेन इन रोम!!!
●●
नही!!! भइया जी लौंडिया लन्दन से लाएंगे,
रोम को पटना बनाएंगे।
ये सुसरे पानी का शक्कर नही, दही का जामन बनेंगे। दूध में गिरकर, उसे भी दही बनाएंगे। पटना से तिरुवनंतपुरम तक यूपी और लखनऊ से मुम्बई तक सबको बिहार बनाएंगे। गन्दे भोजपुरी गाने गाते हुए सूरत की सड़कों में नाचेंगे।
अरे, नंगे नाचने के कल्चर को छोड़ दो वहीं..
जहां से बचकर, भागकर आये।
अब किसी सभ्य और विकसित प्रदेश में हो। वहां शरणार्थी हो, लोटा पोटली लेकर गए हो, वहां अवसर और आश्रय मिला है। बी ग्रेटफुल।
●●
और ये राष्ट्रभाषा वाला चोंचला रहने दो। हिंदी महज सरकारी कामकाज की भाषा है। सर्कुलर, लिटिगेशन की भाषा है। उसे राजभाषा कहना अतिरंजना है। यहां कोई राजा नही, औऱ कोई राजा की भाषा नही।
और तुम तो वो राजा कतई नहीं हो। देश के दूसरे राज्य हिंदी भाषियों के, याने तुम्हारे उपनिवेश भी नहीं है। अगर तुम जैसो बेवकूफों को लोकल्स ठोकते है..
तो बहुते बढ़िया करते हैं।
●●
दू ठो धौल धप्पा हमरी ओर से भी जमाया जाए। माई ब्लेसिंग्स टू राज ठाकरे।
मनसे पार्टी जिंदाबाद।
राज ठाकरे जिंदाबाद!
धन्यवाद भरत! मनीष यांची पोस्ट
धन्यवाद भरत! मनीष यांची पोस्ट योग्य आहे.
सध्या तरी संकट टळले आहे. पण रात्र वैऱ्याची आहे त्यामुळे बेसावध राहून चालणार नाही.
काही जण असा विचार करतात तीन
काही जण असा विचार करतात तीन भाषा शिकल्या तर त्यात काय. आणि ह्याच कारणांमुळे सरकार मऊ झालेल्या मातीला कोपराने खणत आहे.
शहरांमधल्या मराठी घरांमध्ये सध्या अशी परिस्थिती आहे की मुले मराठीचा एखाद दुसरा शब्द आणि हिंदी-इंग्रजी भेसळ अशा प्रकारे घरी देखील बोलत असतात. पालक त्यावर काहीच आक्षेप घेत नाहीत की पाल्याला समजावत नाहीत. बाहेर तर मराठी मुले-मुलींच आपआपसात हिंदी-इंग्रजी मध्ये बोलत असतात. उगाच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला म्हणून ती अनंत काळ टिकणार नाही, तर तिचा वापर रोजच्या जीवनात केला तरच टिकेल.
आमच्या कित्येक अमराठी शेजाऱ्यांना मराठी चांगले बोलता येत असे आणि ते पण आम्हाला त्यांच्या भाषेतील शब्द शिकवत असत. नवीन भाषा शिकल्यावर आणि त्या भाषेतील साहित्य वाचल्यावर अनुभव वाढतो, पण त्याकरता कुणाची जबरदस्ती असू नये.
आमच्या कित्येक अमराठी
आमच्या कित्येक अमराठी शेजाऱ्यांना मराठी चांगले बोलता येत असे >> माझ्या शेजारी तामीळ कुटुंब राहत असत. आजूबाजूला गुजराती देखील आहेत. सगळे अगदी झकास मराठी बोलतात. कानावर पडून आम्हालाही तामीळ शब्द समजू लागले होते. किमान ते काय बोलत आहेत इतपत समज तर नक्कीच ! माझ्या बॉस जळगांवचा मारवाडी होता. त्यांच्या घरी देखील मराठी बोलत. आणि ती देखील अगदी ब्राह्मणी म्हणावी अशी मराठी.
एक अतिशय चांगली मुलाखत
एक अतिशय चांगली मुलाखत (डोळ्यात अंजन घालणारी). त्यात एके ठिकाणी असे म्हटले आहे कि
मतितार्थ असा
"आपल्याला वाकवण्याचा प्रयत्न होत असताना आपण (म्हणजे मराठी लोकं) सरळ रांगयलाच लागलो "
https://www.youtube.com/watch?v=jH12kdeCwL0
सरळ रांगयलाच लागलो
सरळ रांगयलाच लागलो
<<
भाजपच्या आशीर्वादाने रांगणारे नव्हे तर सरपटणारे प्राणी इये देशी पैदा झाले आहेत.
त्यापैकी काही विखारी आणि बाकीचे माती खाऊ.
आता पुढे काय?
आता पुढे काय?
साकीनाका येथील एका शाळेत
साकीनाका येथील एका शाळेत इयत्ता तिसरीपासून हिंदी शिकवण्याची तयारी सुरू आहे. शाळेने पालकांना अर्ज देऊन त्यांची संमती मागितली आहे, ज्यामुळे प्राथमिक स्तरावर हिंदी सक्तीने लादली जात आहे की काय, अशी शंका भाषातज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
आणखी किती शाळांनी हा प्रकार सुरू केला असेल? लोकसत्तेच्या बातमीत शाळेचं नाव नव्हतं. इथे दिसलं.
सगळा अभ्यासक्रम, इतकंच कशाला वेळापत्रक सुद्धा राज्यशासन ठरवून देत असताना एखादी तरी शाळा असा प्रकार कसा करू शकते?
दर आठवड्याला हिंदीच्या चार
दर आठवड्याला हिंदीच्या चार तासिका होणार आहेत>>>> हिंदीची चांगली तासली जाणार आहे?
हिंदीची सक्ती कशाला हवी?
हिंदीची सक्ती कशाला हवी? एच्छीक ठेवावी. महाराष्ट्रात सर्वच हिंदी बोलतात. आपणच समजूतदारपणा दाखवतोच कि बाहेरून आलेल्यांना कळत नाही म्हणून आपणच हिंदीच बोलतो.
लहान मुलांवर कशाला भार?
तसेही, कितीही काहीही करून भाषा शिकले तरी, सवयीचा भाग आहे ती कशाप्रकारे बोलली जाते. त्यात शिकवणारे दिव्य असले कि काय कर्माचे शिकणार मुलं?
भाषा शिकलो कि धंदा करायला बरं हा कुठला युक्तिवाद?
भैया लोकं मग मुंबईत येवुन शिकले का मराठी आणि करतायत ना धंदा?
गुजराती गेले ना केनियाला आणि धंदा केला ना परक्या देशात?
त्यामुळे असले फंडे आपल्याच देशात उगीच नको.
मराठी माध्यमात शिकून कितीतरी लोकं बोलतातच कि,
कार्ड भेटलं, साडी घातली, जेवण बनवलं…
दुसर्यांना मराठी बोलण्याचा आग्रह करण्याएवजी , आपणच दणक्यात मराठी बोलायचं महाराष्ट्रात असताना तरी. मग समोरच्याला कळो का नको.
उगाच मारामार्या करायची गरज नाही.
उद्याला नाहीतर मराठी बंदच होइल. मराठी एक बोली भाषा म्हणून ओळख रहाणारच नाही. ना मुलांना ना कोणाला.
आता ईंग्लिश शिकवतोच ना आपण आपल्या मुलांना मग मराठी सुद्धा बोलावं घरात…
>>>>> कोई तुमसे गुजराती,
>>>>> कोई तुमसे गुजराती, बंगाली, मलयालम पढ़कर साहित्य रचना करने नही कह रहा। लेकिन जहां गए हो, जहां का नमक खा रहे हो, जहां के पानी से बने हो, वहां शक्कर की तरह घुल मिल जाओ, मिठास बढ़ाओ।
जीवन संवारने के अवसर जहाँ मिला है,
वहां की भूमि भाषा सीखो।
उनके ट्रेडिशन्स, कल्चर लैंग्वेज की इज्ज़त करो। ज्यादा नही, 10-20 शब्द, 5-10 वाक्य सीख लो। "केम छो" सतश्री अकाल" 'ओर्र ग्लास वेल्लम पा" बोलो।
अगर लंबे समय से जमे हो, वहां व्यापार, दुकान, मकान बनाकर निवासी हो गए हो, तो लोकल्स के त्योहारों में शरीक होना तुम्हारी सदाशयता/महानता नही, कर्तव्य है।
जिम्मेदारी है।
बी ए रोमन, वेन इन रोम!!!<<<<<<
अगदी हेच म्हणायचं आहे.
पण हे बाहेरून आलेले लोकं दडपशही करायचा प्रयत्न करताहेत आणि काही ढोंगी आम्ही कसे पुढारलेले आहोत दाखवून हिंदीला पुढे करताहेत.
मला कुठल्याच भाषेविषयी राग नाही पण मराठी हि “बोली” भाषा म्हणून तिच्या मातीत( महाराष्ट्रात) तरी जिवंत राहिली पाहीजे.
बाकी, नागपुरच्या एक सौ मंत्री ताई अगाध मराठी बोलतात..
उलट मलाही तीन भाषा होत्या
उलट मलाही तीन भाषा होत्या त्यावेळी. ईंग्रजी माध्यमात असल्याने ह्या क्रमाने ईंग्लिश, हिंदी व मराठी ( हिला पर्याय होता). मी पाचवीनंतर फ्रेंच घेतलं( मराठीएवजी) त्यावेळी गंमत म्हणून.
घरी मराठी, गुजराती आणि ईंदोरी मराठी असं बोललं जायचं. सगळं काही घरावर अवलंबून असतं. पालक काय व कसे शिकवतात.
मुलं स्वतःहून शिकतातच इतर भाषा बाहेर गेल्यावर.
मी तर तामिळ, बंगाली, गुजराती, मराठी उत्तम बोलु शकते त्यामुळे. ईंग्लिश तर आहेच हिंदी आधी बोलायचे उत्तम पण आता काम चलाउ पण नक्कीच मेरेको, तेरेको असलं फालतु बोलत नाही.
पण मला हिंदीत कविता व काही खास लेखकांच्या गोष्टी आवडायच्या. प्रेमचंद मला अजुनही आवडतात.
बाकी मला इतकं काहीच आवडलं नाही नंतर. तरी कंटाळा न्हवता.हिंदी लिखाण सोपं नाहिये. त्यामुळे काही मुलांना तो भार वाटेल. त्यामुळे सक्तीच नको.
इथे एक जोक आठवतो. नदिकिनारे एक घंटावर निबंध लिखिये वर, काहींनी त्याचा अर्थ घंटा म्हणजे बेल( ईंग्लिश) असा घेवून काहीच्या काही लिहिलं.
सांगायचा मुद्दा आहे की, वरती बरेच प्रतिसाद वाचले की ह्यांव भाषा शिकली , त्यांव केलं की संधी मिळतात वगैरे. पण शेवटी आपल्यावरच आहे संधी कशा मिळवायच्या.
आजकाल भारतात सुद्धा घरी कोणीच मराठी बोलत नाहीत.
शोना, स्कूलला जायचय ना? गेट अप नॉउ.
असलं मराठी बोलतात.
एकच उपाय , आपणच सगळीकडे( महाराष्ट्रात असताना) मराठीतच बोलावे.
आणि , पालकांनी, शाळेत सक्तीने हिंदी नकोच हा हेका धरावा.
हिंदी भाषा ही कायदेशीर
हिंदी भाषा ही कायदेशीर व्याख्येनुसार एकमेव राष्ट्रभाषा नसेल. पण ती भाषा विशेष आहे हे नक्की. अपवाद वगळून सगळा भारत हिंदी एक दळणवळणाची भाषा म्हणून वापरतो. गुजराथी माणूस बंगालमधे गेला की पत्ता विचारायचा असेल तर हिंदीत विचारेल. तीच गोष्ट एखादा मराठी पंजाब किंवा काश्मीरमधे गेला तर रस्त्यावर हिंदीतच बोलेल.
पण हिंदी भाषा केवळ राष्ट्रीय बोली भाषा आहे. हिंदी लेखन आणि वाचन ह्याची बिगर हिंदी मंडळींना फारशी गरज नाही.
बॉलिवूड आणि टीव्ही सीरियल वगैरे बोली हिंदी शिकायला मदत करतातच. शाळेत ह्याच दृष्टीने हिंदी शिकवले तर उपयोगी आहे. पण पुस्तकी हिंदी, साहित्य ह्याचा काही उपयोग होणार नाही. शिवाय रस्त्यावर बोलले जाणारे हिंदी हे शुद्ध हिंदी नसून उर्दू मिश्रित असते.
मुझे कोई आपत्ती नही ऐवजी मुझे कोई ऐतराज नही/ मुझे कोई शिकायत नही असे म्हणू शकतात. पुस्तक न म्हणता किताब म्हणू शकतात.
मित्र ऐवजी दोस्त किंवा यार म्हणतात. मै यात्रा करने जा रहा हू न म्हणता मै सफर पे जा रहा हू. अशी अनेक उदाहरणे आहेत.
बंगाल मधे अनेकांना हिंदी येत
बंगाल मधे अनेकांना हिंदी येत नाही.
हिंदी ही भाषा जुनी नाही असं मी ऐकून आहे. राजस्थान मधे हिंदी प्रथम भाषा आहे म्हणून ते हिंदी भाषी राज्य म्हणतात. प्रत्यक्षात तिथल्या जनतेची ही बोली भाषा नाही. आपण समजतो तसं उत्तर प्रदेशात सुद्धा हिंदी ही सर्वांची भाषा नाही. तिथल्या अनेक बोलींची हिंदीमुळे पीछेहाट झाली आहे.
मैथिली, अवधी, मगधी इ. भोजपुरी भाषा जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी सिनेमे बनवायला सुरूवात केली. त्यामुळं भोजपुरीचा प्रसार झाला.
हिंदीचा प्रसार बॉलीवूडमुळं झाला,
बरेच दिवस या विषयापासून दूर
बरेच दिवस या विषयापासून दूर राहिल्यावर आता लिहायला हरकत नाही.
राजकारणाचा विषय संपला असेल तर आता हिंदी शिकण्याचा महाराष्ट्राला काय फायदा झाला किंवा तोटा झाला याचा आढावा घ्यायला पाहिजे.
महाराष्ट्रात बॉलीवूड आहे. त्यामुळं सिनेमा हा विषय जिव्हाळ्याचा.
२०२४ साली या इंडस्ट्रीपैकी ४०% रेव्हेन्यू हिंदी भाषेचा होता. २०% तेलगू. तमिळ १५%, मल्याळम १०% आणि कन्नड ५%.
हिंदी बेल्टमधली लोकसंख्या सर्वाधिक आहे. पण महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशच्या खालोखाल सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य आहे. या रेव्हेन्यूत मराठीचं स्थान नगण्य आहे. कधी काळी हिंदी सिनेमाचा रेव्हेन्यू ७०% असताना बंगाली आणि मराठी भाषिक सिनेमांचं उत्पन्न लगोलग असायचं.
महाराष्ट्रात हिंदी तिसरी भाषा म्हणुन शिकवली जाते. सीबीएसई / आयसीएसई शाळेत इंग्रजी आणि हिंदी शिकवल्या जातात. मराठी शिकवत नाहीत. महाराष्ट्रात तोडकं मोडकं का होईना हिंदी बोललं जातं. त्यामुळं हिंदी बेल्टमधून कुणीही इथे येऊन सेटल होऊ शकतं. हिंदी बेल्ट मधे महाराष्ट्राला हिंदी फ्रेंडली राज्य म्हणतात.
दक्षिणेत हिंदी जास्त प्रमाणात बोललं जात नाही. तमिळनाडूचा हिंदी विरोध तर सर्वांना माहितीच आहे. इतर राज्यात हिंदीला एव्हढा कट्टर विरोध नाही पण भाषिक अस्मिता टोकदार आहेत.
तेलगू, तमिळ आणि मल्याळम सिनेमा अगदी बाल्यावस्थेत किंवा हास्यास्पद असतानाही तिथल्या जनतेने त्यांच्या भाषेतल्या सिनेमाला प्रेम दिलं. याचा परिणाम म्हणून या भाषेत व्यवसाय होतो म्हणून स्पर्धा वाढली. स्पर्धेमुळं बजेट आलं. बजेटमुळं तिथला सिनेमा आधी हिंदीशी आणि आता जागतिक स्तरावर स्पर्धा करू लागला.
महाराष्ट्रातला प्रेक्षक बहुआयामी असल्याने त्याला दर्जा लागतो. तो मराठी सिनेमाला आंधळं प्रेम देऊ शकत नाही. त्यातच मराठीला हिंदीची स्पर्धा आहे. काही काही गाजलेल्या हिंदी सिनेमापैकी एकूण धंद्यांचा ८०% धंदा हा महाराष्ट्रत्याणि त्यातही मुंबईत झालेला आहे. महाराष्ट्रात मराठीला स्क्रीन मिळत नाही. तमाशा आणि विनोदी या लाटेतून बाहेर पडून विविध विषयांवर मराठी सिनेमा बनायला सुरूवात झाली तरीही मराठीला प्रेक्षक नाहीत. जर स्क्रीनच मिळत नसेल तर प्रेक्षक कुठून येणार ? वाईटांचं सोडून द्या. चांगले सिनेमे पण मागे पडलेत. स्क्रीन मिळाली तरी अडचणीचे शोज असतात. प्राईम टाईम मिळणारे मराठी सिनेमे भाग्यवानच.
जर महाराष्ट्रात हिंदी सिनेमाला आश्रय नसता तर मराठी सिनेमांना स्क्रीन मिळाली असती. यातले सगळेच वाईट असतील असं नाही. चांगल्या सिनेमांना प्रेक्षक मिळाला असता तर धंदा झाला असता. धंदा झाला तर बजेट वाढलं असतं. लोकांनी पैसे गुंतवले असते. १२ कोटी लोकसंख्या आहे. तमिळ, तेलगू या दोन्ही राज्यात एव्हढी लोकसंख्या नसून तिथे आता हजार कोटी रूपये गुंतवले जातात. सिनेमा चांगला कि वाईट हा प्रश्न वेगळा.
मराठी माणूस अन्य राज्यात जाण्याचं प्रमाण इतर राज्यातून महाराष्ट्रात येणार्यांपेक्षा खूप कमी आहे.
महाराष्ट्रात जास्तीची भाषा न शिकता सेटल होता येतं. यामुळे बिहार, उत्तर प्रदेशातून पोटासाठी लोक येतात. हरियाणा, पंजाब मधून येतात.
महाराष्ट्रातली ऑटोमोबाईल्सची सर्व दुकानं पंजाब्यांची आहेत. किराणा मालाची, इलेक्ट्रिकल, हार्डवेअरची दुकानं राजस्थानी, मारवाडी लोकांची आहेत. टायर पंक्चरची दुकानं मल्याळी माणसाची आहेत. हॉटेल मधे पंजाबी आणि उडुपी लोक आहेत. बिल्डर लॉबी मधे पूर्वी पंजाबी, गुजराती होते. आता मराठी लोकांचा शिरकाव झाला आहे.
यांचा स्टाफही त्या त्या राज्यातून आलेला असतो.
दक्षिणेची राज्ये हिथे हिंदी बोलली जात नाही ते ही महाराष्ट्रात येऊन तोडकं मोडकं हिंदी , इंग्रजी बोलून इथे सेटल होऊ शकतात. पण तेच मराठी मुलं तमिळनाडू मधे जातात तेव्हां रेल्वे भरतीच्या वेळी हिंदीत कुणीही त्यांना उत्तर देत नाहीत असा अनुभव आहे.
जास्तीत जास्त भाषा शिकायला पाहीजेत हे योग्यच आहे.
मग उत्तर प्रदेशात मराठी, तमिळ, तेलगू का शिकवत नाहीत ?
तिथे मराठी माणूस जाऊन मराठीत बोलू शकत नाही हे चित्र बदललं पाहीजे. हिंदी भाषिक माणसाला एकच भाषा आली तरी तो संपूर्ण भारतात (तमिळनाडु सोडून) कुठेही संवाद साधू शकतो. पण मराठी माणसाला एक भाषा जास्तीची शिकल्याशिवाय हिंदी बेल्ट मधे संवाद साधता येत नाही.
पंजाबात सुद्धा अनेकांना नीट हिंदी येत नाही. ते हिंदीतला प्रश्न समजून घेऊन गुरूमुखीतच उत्तर देतात. हरियाणवी माणूस काय बोलतो हे सुरूवातीला समजत नाही. बंगाल मधे हिंदी बोलणार्यांचं प्रमाण कमी आहे.
भाषेला विरोध नको. पण त्यामुळे निर्माण होणारे प्रश्न टाळता आले तर बरं होईल.
बिहार, उत्तर प्रदेशातून जास्तीत जास्त लोक अन्य राज्यात जातात. मग त्यांना त्या राज्याची भाषा शिकवायला काय अडचण आहे ?
महाराष्ट्रात कुठलीही सक्ती नसताना फ्रेंच, जर्मन, कोरियन आणि आता तर चिनी भाषा पण शिकतात लोक. कारण जिथे रोजगार मिळण्याची शक्यता आहे तिथली भाषा शिकली पाहीजे हा साधा विचार आहे.
हिंदी राष्ट्रभाषा आहे हा अपप्रचार आहे. सरकारी सोयीसाठी हिंदी ही राज्यसकारभाराची भाषा आहे. पण तिची सक्ती नाही. केंद्र सरकारच्या कार्यालयात हिंदी बरोबर इंग्रजी सुद्धा चालते. कारण हिंदीची सक्ती करता येत नाही. ज्यांना हिंदी येत नाही त्यांना हिंदी शिकवण्यासाठी हिंदी विभाग आहे. त्याचं नाव पूर्वी राष्ट्रभाषा विभाग होतं, पण नंतर राजभाषा विभाग केलं आहे.
कारण भारताची एक अशी राष्ट्रभाषा नाही. घटनेच्या अठराव्या शेड्युलप्रमाणे २२ भाषांना राजभाषा म्हणून मान्यता दिली आहे त्यात हिंदी एक आहे. संसदेत या २२ भाषांपैकी कोणत्याही भाषेत बोललं तरी चालतं. त्याचा अनुवाद केल जातो.
जिथे पब्लिक रिलेशन्सचा प्रश्न असतो अशा पोस्ट्सवर असणार्या अधिकार्यांना आणि कर्मचार्यांना स्थानिक भाषा शिकण्याचा नियम आहे. स्थानिकांशी त्यांच्या भाषेतून संवाद साधला पाहीजे हे शासनदरबारी मान्य आहे. एका माणसासाठी त्या त्या राज्याने त्या अधिकार्याला येणारी भाषा शिकणे हे व्यवहार्य नाही.
ब्रिटीश सुद्धा भारतात येऊन इथल्या भाषा शिकले होते.
त्रिभाषा सूत्र लागू करणारच
त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी गर्जना फडणवीस यांनी केली आहे. एवढा विरोध होऊन पण माघे हटायला तयार नाहीत. समितीला पुढे करून आपला निर्णय रेटतील असं वाटतंय. आजच्या लोकसत्तातील ही बातमी.
Pages