सध्या महाराष्ट्रात, पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या विरोधात अनेक मराठी प्रेमी नी महाराष्ट्राचे हित चिंतनाऱ्या संघटना विरोधात उतरल्या आहेत!
-महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे का?
- उत्तर भारतीय फुगलेली लोकसंख्या महाराष्ट्रात आणून वसवण्यासाठी भाजप हे करतय का?
- २२ अधिकृत भाषांमधली एक भाषा हिंदी लादण्यामागे भाजपाचे कारस्थान काय?
- हिंदीचा नी महाराष्ट्राचा संबंध काय?
- हिंदी भाषकांच्या सोयीसाठी १ लितील कोवळ्या जीवाना हिंदी लादून त्रास द्यायचा का?
संघटनांच्या मागण्या:-
१. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती केवळ इतर भारतीय भाषांप्रमाणेच एक राज्यभाषा असून तिची सक्ती करणे अयोग्य आहे.
२. राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेवर आघात: महाराष्ट्राची ओळख ही स्वतंत्र मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व परंपरेशी निगडित आहे. अन्य राज्यातील भाषा लादणे हे सांस्कृतिक आक्रमणच म्हणावे लागेल.
३. शिक्षणाचे ओझे वाढवणारा निर्णय: पहिलीपासूनच तीन भाषा सक्तीने शिकविणे बालकांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी अयोग्य व अन्यायकारक ठरेल.
४. मराठीतील बोलीभाषांना सरकारकडून प्रोत्साहन नाही: मराठीच्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासन काहीही प्रयत्न करीत नाही, हे दुर्दैवी आहे.
५. स्थानिक विद्यार्थ्यांवर स्थलांतरितांचे भाषिक वर्चस्व लादले जात आहे, ज्यामुळे स्थानिक भाषिक विद्यार्थ्यांचा अधिकार आणि संधी हिरावली जाऊ शकते.
६. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राचा चुकीचा अर्थ: त्रिभाषा सूत्र हा प्रशासनापुरता मार्गदर्शक आहे; त्याची सक्ती शालेय शिक्षणात लादणे अन्यायकारक आहे.
७. भाषिक स्वायत्ततेचा संपूर्ण अभाव: प्रत्येक राज्याला त्याच्या भाषिक गरजेनुसार शिक्षण धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या दबावाखाली घेतलेला निर्णय हे राज्याच्या स्वायत्ततेचे उल्लंघन आहे.
त्यामुळे, आम्ही खालील मागण्या आपल्यास सादर करीत आहोत –
१. राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
२. या निर्णयाच्या रद्दबाबत तात्काळ शासन आदेश किंवा स्पष्ट परिपत्रक निर्गमित करावे.
३. सदर बाबीबाबत शालेय शिक्षण संचालनालय, शिक्षण आयुक्त, शिक्षण मंडळ, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्या यांना स्पष्ट सूचना द्याव्यात.
४. बालभारतीसह इतर सर्व पुस्तक छपाई केंद्रे व मुद्रण विभागांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी हिंदी सक्तीबाबत कोणतीही योजना राबवू नये, याबाबत स्पष्ट लेखी सूचना द्याव्यात.
५. यापुढील अभ्यासक्रम नियोजन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना तृतीय भाषा निवडीचा संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावा, कोणतीही सक्ती करू नये.
६. त्रिभाषा सूत्राचे पालन हे राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने व ऐच्छिक स्वरूपात मर्यादित ठेवावे.
७. राज्यातील मराठी बोलीभाषा, लोकपरंपरा व स्थानिक संस्कृती यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करून स्थानिकतेला प्राधान्य द्यावे.
८. सदर निर्णयामुळे निर्माण होणारा संभ्रम, असंतोष आणि प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी त्वरित ठोस कृती करण्यात यावी.
मराठी बोला असा आग्रह केला तर
मराठी बोला असा आग्रह केला तर इतर राज्यांतून आलेले लोक, विशेषतः हिंदी भाषक शिवसेना आणि मनसेच्या विरोधत जाऊन भाजप व महायुतीला मतं देतील.
पण हिंदीची सक्ती केली म्हणून मराठी लोक भाजप व महायुतीच्या विरोधात जातील असं नाही..
# मराठी भय्ये
तुम्ही हिंदी चित्रपट बघता,
तुम्ही हिंदी चित्रपट बघता, आमचे चित्रपट बघत नाही, हिंदी चित्रपटांमुळे आम्हांला चित्रपटगृहे मिळत नाहीत, म्हणून गळा काढणार्या मराठी चित्रपट कलावंतांपैकी किती जणांनी याबद्दल तोंड उस्कटलंय?
सराफ- दामलेंनी तर मुगाची
सराफ- दामलेंनी मुगाची खिचडी खाल्ली. भोसले आडनावाचा अभिमान सोयीस्कर मिरवणाऱ्या आशाबाईंनी तर एकदम कमालच करून टाकली. बाकी सगळे चिडी-चुप्प. 10% कोट्याकडे लक्ष ठेवावं लागतं ना
हिंदीची सक्ती नको शिवाय
हिंदीची सक्ती नको शिवाय प्राथमिक शाळेत तीन भाषा नकोतच ह्यावर ठाम राहायला हवं. उगाच हिंदी bashing करण्यात मूळ मुद्दा बाजूला राहतोय. हिंदी संस्कृतपेक्षा जुनी असती आणि संपूर्ण भारताला हिंदी येत असती तरी तीन भाषा शिकण्याचं समर्थन होऊ शकत नाही.
आता तरी स्पष्टच आहे की
आता तरी स्पष्टच आहे की मुलांचे क्रेडिट स्कोअर वगैरे यासाठी नाही तर राजकीय अजेंड्यासाठीच त्रिभाषा सूत्र आणि त्याआडून हिंदी सक्ती आणायची आहे यांना
हिंदी जुनी आहे का? विविध
हिंदी जुनी आहे का? विविध राज्यातील लोक हिंदी व्यवस्थित बोलतात का? हा मुद्दाच नाही. आज इंग्रजीचा वापर वाढत असला तरी बहुतांश भारतात जेव्हा वेगळ्या राज्यातील लोक भेटतात तेव्हा हिंदी वापरून संवाद साधतात. विविध लोकांना प्रवास करताना हा अनुभव आला असेल ह्याची खात्री आहे. सैन्य, विविध केंद्र सरकारचे उपक्रम ह्यात संवादासाठी हिंदीच वापरली जाते.
हिंदी उर्दू भाषा बोलणारे (मातृभाषा आणि नंतर शिकून) यांची जगभरातील संख्या प्रचंड आहे.
प्रत्येक राज्यात बोली भाषा वेगळ्या आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब सगळीकडे. पण ह्या सगळ्या बोलींच्या वर प्रमाण हिंदी आहे जी सर्व लोकांना समजते आणि वापरली जाते. म्हणजे रोजचे व्यवहार करण्याइतपत. साहित्य काव्य निर्माण करण्याच्या तोडीचे नाही.
हिंदीविषयी तिरस्कार असेल तर हिंदी ही भारताची स्ट्रीट लँग्वेज आहे असे म्हणा. आम्ही संवादाची भाषा म्हणू!
Time to unlearn Hindi
Time to unlearn Hindi completely.
दोन मुद्दे आहेत
१. शालेय शिक्षणात हिंदी सक्ती कशासाठी? आधी पाचवीपासून तिसरी भाषा हिंदी होती. आठवीपासून अन्य भाषा निवडायचा पर्याय होता. आता येनकेनप्रकारेण हिंदीच लादायची आहे . त्यासाठी खोटारडेपणा करायलाही तयार. ज्याला जी भाषा उपयुक्त वाटेल ती शिकायचं स्वातंत्र्य हवं . भारतीय भाषाच हवी म्हणे. का? वसुधैव कुटुंबकम् फक्त अदाणीबद्दल अमेरिकेत प्रश्न विचारला की आठवतं का?
२. आपण ज्या राज्यात स्थलांतर करतो, त्या राज्याची भाषा शिकावी आणि तिथे वापरावी.
या लोकांना मराठीचा इतका द्वेष का आहे? साधे मराठी - खरं तर देवनागरी नामफलक लावायच्या सरकारी आदेशाविरोधात हे लोक सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोचतात आणि इथले मराठी भय्ये यांचं समर्थन करतात.
अकारण हिंदीचा द्वेष करणे
अकारण हिंदीचा द्वेष करणे फारसे फायद्याचे नाही. ज्याना भारतात व्यवसाय करायचा आहे त्याकरता कच्चा पक्का माल खरेदी विक्री अन्य राज्यात होते (उदा कपडे, भांडी, उपकरणे) त्याना हिंदी न शिकणे परवडणारच नाही.
हिंदी ही नैसर्गिक रित्या ह्या स्थानी पोचलेली आहे. दडपशाहीने नाही.
परदेशात दुसर्या अनोळखी भारतीयाशी हिदीत बोलले की जास्त आपलेपण वाटते. इंग्रजी तर सगळेच बोलतात. पण हिंदीत एक भारतीयपण आहे आणि ती बहुतांश सर्व भारतीय लोकांना कळते. दक्षिणेतील लोकांना हिंदी नीट बोलता येत नाही, पूर्ण क़ळत नाही. पण हिंदीचा तिरस्कार करणारे राज्य म्हणजे तमिळनाडू. बाकी राज्यात हिंदीचा इतका तिरस्कार केला जात नाही असा माझा अनुभव आहे.
ज्याना भारतात महाराष्ट्रात
आधीच्या प्रतिसादातील मुद्दांना उत्तर नाही, त्यामुळे हिंदीद्वेषाचं तुणतुणं. हिंदी द्वेष नाही. हिंदी सक्तीला सक्त विरोध. मग तो सरकारकडून असो वा स्थलांतरितांकडून.
ज्याना
भारतातमहाराष्ट्रात व्यवसाय करायचा आहे त्याकरता कच्चा पक्का माल खरेदी विक्री अन्य राज्यात होते (उदा कपडे, भांडी, उपकरणे) त्यानाहिंदीमराठी न शिकणे परवडणारच नाही , अशी परिस्थिती आणणे ही काळाची गरज आहे.अमित शहांचं लॉजिक वापरून - या देशात इंग्रजी बोलणार्यांना लाज वाटेल अशी परिस्थिती येईल.
ज्याना भारतात व्यवसाय करायचा
ज्याना भारतात व्यवसाय करायचा आहे त्याकरता कच्चा पक्का माल खरेदी विक्री अन्य राज्यात होते (उदा कपडे, भांडी, उपकरणे) त्याना हिंदी न शिकणे परवडणारच नाही.>>जर मला माझ्या गरजेसाठी शिकायची आहे तर मी हिंदी ( किंवा इतर कोणतही भाषा ) शिकेन, जर इतरांना महाराष्ट्रात येऊन माझ्याकडून त्यांची कोणतीही गरज पुर्ण करुन घ्यायची आहे तर त्यांनी मराठी शिकावी. साधं सरळ गणित आहे.
प्रमाण हिंदी आहे जी सर्व लोकांना समजते आणि वापरली जाते. म्हणजे रोजचे व्यवहार करण्याइतपत. साहित्य काव्य निर्माण करण्याच्या तोडीचे नाही.>> ईथे नमूद केल्याप्रमाणे बहुतांश मराठी माणसाला त्याला स्वतःला गरज पडेल तेव्हा रोजच्या व्यवहारात कामास येईल ईतकी तोंडी लावण्यापुरती हिंदी येऊ शकेल यात काहीच अडचण वाटत नाहीं, तेव्हा धाग्याच्या शिर्षकाप्रमाणे १ल्या इयत्तेपासून मुलांना शिकवायचा अट्टाहास का?? (जर ते तसं नसतं तर दशकों दशके ईथे राहूनही यत्किंचितही मराठी शिकण्याचा प्रयत्न न करणारे बहुसंख्य हिंदीभाषिक आजवर महाराष्ट्रात त्या निर्ढावलेल्या अवस्थेत तग धरु शकलेच नसते.)
कुठे कुठे संवादासाठी कोण कोणती भाषा वापरली जाते, आणि परदेशात कोणतीतरी एक ठरावीक भाषा वापरल्याने अधिकचा आपलेपणा कसा वाटतो हा धाग्याचा ( आणि वादाचाही) मुद्दा नाहीच मुळी, आणि त्या गोष्टींसाठी महाराष्ट्रात १ ली पासून मुलांना हिंदी शिकण्यास भरीस घालावे हा बादरायण तर्क इतरांना पटवून देण्यासाठी वापरताना कुणी कितीही स्वतः च्या मनाची समजूत घालून घेतली तरीही कावेबाजपणाचा नसून आपण डोळे मिटून दूध प्याले तर आपण कोणास दिसणार नाही या मांजराच्या तर्काच्या तोडीचा मुर्खपणा दाखवणारा आहे.
हिंदी बेल्टमधले लोक अमेरिकेत
हिंदी बेल्टमधले लोक अमेरिकेत गेल्यावर पण मी हिंदीतच बोलणार असा पवित्रा घेतात का ?
काय विकृत असंबद्ध प्रश्न आहे!
काय विकृत असंबद्ध प्रश्न आहे!
हिंदी भाषा ही आवडो की नावडो एक लोकप्रिय, सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे. ती येत असेल तर त्याचा फायदा जास्त आणि तोटा कमी आहे हा मुद्दा आहे. आणि तो मराठी भाषिक लोकांनाही लागू आहे. त्याबद्दल बोला. उगाच फापटपसारा कशाला मांडता?
पालथ्या घड्यांसाठी नाही तो
पालथ्या घड्यांसाठी नाही तो प्रश्न
>>
>>
ईथे नमूद केल्याप्रमाणे बहुतांश मराठी माणसाला त्याला स्वतःला गरज पडेल तेव्हा रोजच्या व्यवहारात कामास येईल ईतकी तोंडी लावण्यापुरती हिंदी येऊ शकेल यात काहीच अडचण वाटत नाहीं, तेव्हा धाग्याच्या शिर्षकाप्रमाणे १ल्या इयत्तेपासून मुलांना शिकवायचा अट्टाहास का?? (जर ते तसं नसतं तर दशकों दशके ईथे राहूनही यत्किंचितही मराठी शिकण्याचा प्रयत्न न करणारे बहुसंख्य हिंदीभाषिक आजवर महाराष्ट्रात त्या निर्ढावलेल्या अवस्थेत तग धरु शकलेच नसते.)
<<
पहिलीपासून बोलली जाणारी हिंदी नीट शिकवली गेली तर त्याचा फायदाच आहे. अगदी रस्त्यावर शिकून घाणेरडे बंबईया हिंदी बोलण्याऐवजी चांगले प्रमाण हिंदी काय आहे ह्याची तोंडओळख असली तर ते चांगलेच आहे. योग्य/प्रमाण भाषा काय आहे हे शिकल्यानंतर त्या भाषेला हवी तशी वाकवून स्थानिक पद्धतीने बदल करणे हे जास्त उचित आहे. सगळेच रस्त्यावर शिका म्हणणे अती आहे.
लहान वयात नवी भाषा शिकणे सोपे असते असे सिद्ध झाले आहे. जर मूल अनेक भाषा ऐकत लहानाचे मोठे झाले तर त्या भाषा सहज अंगवळणी पडतात. उलट प्रौढ असताना नवी भाषा शिकणे अवघड असते.
हिंदीची सक्ती नाही असे सांगून सांगून सरकार दमले पण विरोधकांना ते ऐकायचेच नाही.
वस्तुस्थिती अशी आहे की हिंदी जास्त उपयुक्त आहे म्हणून महाराष्ट्रातले अनेक पालक तिसरी भाषा हिंदीच निवडतील म्हणून जळफळाट चालू आहे बहुतेक.
वस्तुस्थिती अशी आहे की हिंदी
वस्तुस्थिती अशी आहे की हिंदी जास्त उपयुक्त आहे म्हणून महाराष्ट्रातले अनेक पालक तिसरी भाषा हिंदीच निवडतील म्हणून जळफळाट चालू आहे बहुतेक>> हे अगदीच हास्यास्पद आहे आणि हिंदी पाठ्यपुस्तके न बघितल्याने फार मोठ्या अज्ञानातून आलेले आहे. प्रमाण हिंदी ही कठीण भाषा आहे शिकायला. Cbse च्या शाळांतून सहावीला मुले संस्कृत किंवा परदेशी भाषा निवडतात, हिंदीची कटकट पाचवी नंतर संपते. मुळात पहिली पासून तीन भाषा नकोच. कमी विषय पण त्यांचे सखोल आणि प्रॅक्टिकल द्न्यान द्या. संकल्पना घोटवून घ्या गणित आणि विज्ञानच्या भाषा कमी करून. कला शिकवा. गाणी शिकवा. खेळ शिकवा. सिव्हिक सेन्स असा विषय आणा दोनशे मार्क ना शंभर लेखी आणि शंभर कसे आचरणात आणता त्यासाठी.
लहान वयात नवी भाषा शिकणे सोपे
लहान वयात नवी भाषा शिकणे सोपे असते असे सिद्ध झाले आहे
>>> हे ऐकुन कान किटले अक्षरशः. याला अनेक तज्ज्ञांनी अनेक ठिकाणी अनेक वेळा बोलुनही तेच तुणतुणे आहे, याचा अर्थ दुसरा मुद्दाच सापडत नाही. पालथ्या घड्याचं सोंग घ्यायला अर्थातच कुठचंही कौशल्य लागत नाही. तुमचं इथलं अनेक वर्षांचं ट्रॅक रेकॉर्डही असंच सांगतं.
चांगले प्रमाण हिंदी काय आहे
>>>
चांगले प्रमाण मराठी काय आहे, याला काय उत्तर आहे? 'चांगले प्रमाण मराठी' किती व्यावसायिकांत (महाराष्ट्रात धंदा करणार्या) नीट माहिती आहे, आणि वापरतात?
या देशात इंग्रजी बोलणार्यांना लाज वाटेल
>>>
असं बोलणारे डोक्यावर बसलेत याची लाज आपल्याला खरं तर वाटली पाहिजे. या गृहस्थाला काही बेसिक आकलन तरी आहे का अशी शंका नेहेमीच येते. राजकारणासाठी हे सारे उद्योग चालतात- असं गृहित धरलं तरीही.
ही सारी राजकारणाची भुरटेगिरी आहे. यांच्या नेत्यांनी एक्झॅक्टली विरुद्ध निर्णय घेतले असते, तरी यांनी तिकडे समर्थन केलं असतं. कारण सोपं आहे- यांचं प्रोफाईल पिक्चर म्हणजे झुंडीचा फोटो आहे. अस्सल स्वतःचं असं काहीच नाही. ते शोधायचंही नाहीय, कारण काही सापडलंच, तर स्वतःलाच भिती वाटेल.
सिव्हिक सेन्स असा विषय आणा
सिव्हिक सेन्स असा विषय आणा दोनशे मार्क
>>>
हे सगळ्यात महत्वाचं आहे. कला बिला सुध्दा नंतर येतात. आपल्या मुलांना शाळा सुटल्यावर नीट रस्ता कसा ओलांडायचा तेही नीट शिकवलं जात नाही. आणि त्याहून भयानक म्हणजे ते पालकांनाही माहिती नसतं नसतं. खेडी आणि छोटी शहरं जाऊ द्या, मोठी शहरं आणि पुण्या-मुंबईसारखी मेट्रो म्हणवल्या जाणार्या शहरांत शाळा सुटायच्या वेळी फक्त बाहेर उभं राहुन बघा. अराजक अवस्था असते.
हिंदी 'नीट' शिकवलं, तर ही अराजक अवस्था आणखी टोकाला जाईल- असं म्हणायला नक्की जागा आहे. हिंदी भाषा छान चांगली शिकता शिकता हिंदी भाषिकांचा डीएनएही नीट शिकून घेतला तर काय, नाही का.
>>
>>
हिंदी 'नीट' शिकवलं, तर ही अराजक अवस्था आणखी टोकाला जाईल- असं म्हणायला नक्की जागा आहे. हिंदी भाषा छान चांगली शिकता शिकता हिंदी भाषिकांचा डीएनएही नीट शिकून घेतला तर काय, नाही का.
<<
असा घाऊक द्वेष करणे ह्याला रेसिज्म म्हणतात. समस्त हिंदी भाषिकांचा डी एन ए वगैरे काढून त्यावर शेरेबाजी ही हिटलरच्या ज्यू लोकांचे रक्त दूषित असण्याच्या तत्त्वज्ञानाशी जवळिक बाळगून आहे. असाच पूर्वग्रह असेल तर आनंद आहे!
>>
>>
चांगले प्रमाण मराठी काय आहे, याला काय उत्तर आहे? 'चांगले प्रमाण मराठी' किती व्यावसायिकांत (महाराष्ट्रात धंदा करणार्या) नीट माहिती आहे, आणि वापरतात?
<<
चांगले म्हणजे शिवीगाळ वगैरे नसलेले. तुलनेने शालीन असणारे. शाळेत शिकवले जाणारे असे असावे अशी अपेक्षा आहे.
प्रमाण म्हणजे काय? मुख्य प्रवाहातील टीव्हीवरील रेडियोवरील मराठी बातम्या ज्या भाषेत सांगितल्या जातात त्याला प्रमाण म्हणावे असे म्हणू शकतो.
शाळेत जी भाषा शिकवली जाते ती तशीच्या तशी रस्त्यावर, नातेवाईक, मित्र, शत्रू यांच्याशी बोलली जाईल ह्याची कधीच खात्री नसते. पण म्हणून वर्गात कुणी शिवीगाळ शिकवत नाही. आईवरून शिव्या १० मार्कासाठी, बहिणीवरून शिव्या १० मार्कांसाठी, असे मी तरी पाहिले नाही. रस्त्यावर विविध प्रसंगी अशा शिव्या ऐकू येतात.
विद्यार्थ्याला निदान प्रमाण भाषा काय आहे हे शिकवले गेले तर इंटरव्ह्यू, गिर्हाईकाशी बोलताना कसे बोलावे हे तरी तो/ती शिकेल. डायरेक्ट रस्त्यावर शिकला तर हे तारतम्य वेगळे शिकावे लागेल.
नागरिक शास्त्र ज्यात सामाजिक भान, सार्वजनिक शिस्त, वगैरे वर्गात शिकवायला काही हरकत नाही. पण तो भाषेपेक्षा वेगळा विषय आहे. हे आहे म्हणून ते नको हे काही पटणारे नाही.
बाय द वे, त्रिभाषा सूत्र लागू
बाय द वे, त्रिभाषा सूत्र लागू करणार म्हणजे वेगळे काय करणार? पाचवीपासून तीन भाषा गेली कित्येक वर्षे आहेत. ते त्रिभाषा सूत्रच की.
>>
>>
हे ऐकुन कान किटले अक्षरशः. याला अनेक तज्ज्ञांनी अनेक ठिकाणी अनेक वेळा बोलुनही तेच तुणतुणे आहे, याचा अर्थ दुसरा मुद्दाच सापडत नाही. पालथ्या घड्याचं सोंग घ्यायला अर्थातच कुठचंही कौशल्य लागत नाही. तुमचं इथलं अनेक वर्षांचं ट्रॅक रेकॉर्डही असंच सांगतं.
<<
नेहमीप्रमाणे मुद्दे सोडून वैयक्तिक हल्ले सुरू! छान. या निमित्ताने सिविक सेन्स या विषयात शिक्षण आवश्यक आहे हे अधोरेखित झाले! असो.
मानव जात ही लहान वयात भाषा शिकायला जास्त तयार असते. गुगलवर शोधून पहा माणूस कुठल्या वयात भाषा सहज शिकू शकतो? विविध चॅटबॉटना हा प्रश्न विचारून पहा आणि खात्री करा. मी माझ्या मनाने सांगत नाही.
मला मिळालेले उत्तर
Humans are generally best at learning a new language during childhood, especially before the age of 7.
केवळ तुमचे कान किटले म्हणून जीवशास्त्रीय सत्य बदलत नाही. मानवी मेंदू बदलत नाही.
बाय द वे, त्रिभाषा सूत्र लागू
बाय द वे, त्रिभाषा सूत्र लागू करणार म्हणजे वेगळे काय करणार? पाचवीपासून तीन भाषा गेली कित्येक वर्षे आहेत. ते त्रिभाषा सूत्रच की.<<<<
पहिलीपासून लागू करणार
त्या एका आयडीकडे लक्ष देऊ नये
त्या एका आयडीकडे लक्ष देऊ नये. इतरांना विकृत म्हणणे ही ऑफिशियली शिवी नसेल पण त्यातला भाव तोच आहे. विकृत, द्वेषबुद्धी, मूर्खपणा असे इतरांना हीनभाव आणणारे शब्द वापरण्यामागची मानसिकता शिवी देण्याच्या मानसिकतेशी साम्य ठेवते.
१४ जुलै २०२५ ला आज तक वाहिनीवरच्या बिझ तक कार्यक्रमात ए आय सी सी च्या रिपोर्टच्या हवाल्याने वृत्त दिलेय कि महानगरात राहणारे ६५% सॅलरीड एम्प्लॉयीज खूष नाहीत. वाढते घरभाडं, ईएमआय, शाळेची फीस आणि वैद्यकीय सेवा यामुळं जगणं शक्य होत चाललं आहे.
१४ डिसेंबर २०२२ च्या बीबीसीच्या रिपोर्ट मधे हेच म्हटलेलं आहे.
https://www.bbc.com/news/business-63821811
हा प्रादेशिक विकासाचा असमतोल आहेच, पण त्याचबरोबर रोजगाराच्या संधी मर्यादित ठिकाणी असल्याने तिथे येणारे लोंढे यामुळं हे घडतंय. असे लोंढे अशा ठिकाणी येतात जिथे राहणे सह्जशक्य आहे. दिल्ली सारख्या ठिकाणी उत्तर भारतातल्या सर्व राज्यातून लोक येतात. त्यामुळं दिल्लीत लोकसंख्येचा स्फोट होतोय. पण दिल्लीत मुंबई, पुणे, बंगलुरू सारखे लठ्ठ पगार टक्केवारीनुसार कमी आहेत. इथे येणार्यात सायकल रिक्षा चालवणारे पासून हातावर पोट भरणारे सुद्धा प्रचंड संख्येने असतात. त्यामुळं खालावलेलं राहणीमान दिल्लीत आहे.
मुंबई, बंगलुरू इथे उत्पन्नाची पातळी तुलनेने जास्त आहे. यामुळे या शहरांमधे घरभाडं वाढतच चाललं आहे. पुणे त्याच मार्गावर आहे. मुंबईतला मराठी माणूस केव्हांच बदलापूरला गेलाय. हायटेक जॉब्स आहेत. लोक जॉबबद्दल समाधानी आहेत पण पगार पुरत नाही ही तक्रार आहे. पगार तोच आहे पण दर वर्षी वाढत चाललेले खर्च यामुळं लोक आता ही शहरं सोडायचा विचार करत आहेत.
मुंबई किंवा बंगलुरू मधे हिंदी बोलली जाते. यामुळं या शहरातल्या उच्च उत्पन्नाच्या संधीत लोक येतात. हायटेक जॉब्स असल्याने भाडं आणि घराच्या किंमती वाढत गेल्या. त्यामुळं आता पूर्वी साधारण रोजगार असलेला भूमीपुत्र शहरातून परागंदा होताना दिसतोय. कारण घराच्या किंमती, भाडं आवाक्या बाहेर आहे. या शहरात सगळंच महागडं होत चाललंय.
हिंदी भाषिकांचे लोंढेच्या लोंढे या शहरात येतात, पण या हिंदी भाषिक राज्यात विकास नाही. त्यामुळं त्या राज्यात जे भूमीपुत्र आहेत त्यांनाच रोजगार नाही तर मुंबई, बंगलुरू राज्यातल्या युवकांना रोजगाराच्या काय संधी देणार ?
हिंदी द्वेषाचा मुद्दा मांडण्यापेक्षा ही राज्यं प्रगत राज्यांच्या जिवावर का जगताहेत याचा विचार केला पाहीजे. जर भूमीपुत्रांना त्या त्या राज्यात रोजगार मिळाला तर इतर शहरांत जाऊन बांडगुळासारखा फुगवटा येणार नाही.
उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या तर मराठी माणूस का स्वतःहून हिंदी शिकणार नाही ?
मध्य प्रदेशातून सुद्धा मोठ्या प्रमाणात लोक मुंबईत येतात. पण मध्य प्रदेशात पॉलिसी बनलीये, ज्यानुसार ४०% नोकर्या, रोजगाराच्या संधी स्थानिकांसाठी राखून ठेवण्यात येईल.
https://www.firstpost.com/india/madhya-pradesh-govt-jobs-exclusively-for...
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनीही ही घोषणा केली आहे.
https://www.indiatoday.in/india/story/up-govt-implements-reservations-fo...
https://www.livehindustan.com/uttar-pradesh/story-will-not-have-to-go-ou...
उत्तर प्रदेशात नुकताच एक नियम बनवला आहे. ज्यानुसार फक्त स्थानिकांना नोकर्या देण्यात येतील.
या पार्र्श्वभूमीवर ही राज्ये भारतात कुणीही कुठेही नोकरी करू शकतो, राहू शकतो याचा उच्चार करताना दिसतात. या डबल स्टँडर्डसचा असंतोष अन्य राज्यात दिसतो. आता या राज्यातल्या लोंढ्यांमुळे ते ज्या राज्यात जातील त्यांनी काय करायचं ? स्वतःच्या राज्यात भूमीपुत्रांना प्राधान्य आणि इतर राज्यात जाताना संविधानाचे हक्क ही डबल ढोलकी नाही का ?
हे सगळे हिंदी भाषिक आहेत हा योगायोग आहे. हा हिंदीचा द्वेष नसून बीमारू राज्यांच्या या डबल ढोलकीमुळे होणारा असंतोष आहे.
हे भाजपाचं माउथपीस
हे भाजपाचं माउथपीस शेंडेनक्शत्र आलं का इथे?
हे असले भिकारडे मराठी साईटवर मराठी बोलत काय करताहेत?
सिव्हिक सेन्स असा विषय आणा
सिव्हिक सेन्स असा विषय आणा दोनशे मार्क>>> +1000
उत्तर भारतीयांनी महाराष्ट्रातील लोकांना हिंदी शिकवून त्यांचा फायदा करुन द्यायचा हा जो काही जिवाच्या आकांताने खटाटोप चालवला आहे तोच मुळात अनाकलनीय आहे. इतकं तर सख्खा बाप देखील आपल्या मुलांसाठी करत नसेल.
आजपासून नव्हे आता पासूनच मी ट्रंप समर्थक होत आहे कारण त्यामुळे मला घाउक रेसीजम च्या विरोधात अधिकारवाणीने बोलण्याचा नैतीक अधिकार प्राप्त होणार आहे. ...आभार...............अरेरे,.... गल्ली चुकली वाटतं..
हिंदी द्वेषाचा मुद्दा
हिंदी द्वेषाचा मुद्दा मांडण्यापेक्षा ही राज्यं प्रगत राज्यांच्या जिवावर का जगताहेत याचा विचार केला पाहीजे. जर भूमीपुत्रांना त्या त्या राज्यात रोजगार मिळाला तर इतर शहरांत जाऊन बांडगुळासारखा फुगवटा येणार नाही.>>>> यावर अधिक प्रकाश खालील सांख्यिकी ने टाकता येऊ शकेल.
एकूण हिंदी भाषिक लोकसंख्येचा टक्का - ४३% ( estimated to go beyond 45% हा बहुसंख्य हिंदी बेल्ट मधे रहातो)
या पट्ट्यात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचे स्वरूप - more than ९०%people work in informal sector.
Less than 10% workforce in formal ( salaried ) jobs.
तुलनेत भारतात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचे स्वरूप - around 8०% - 85%people work in informal sector.
Around 15% - 20% workforce in formal ( salaried ) jobs.
महाराष्ट्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचे स्वरूप - around 7०%-75%people work in informal sector.
Around 25%-30% workforce in formal ( salaried ) jobs.
माझ्यामते इतकेच आकडे पुरेसे आहेत, यापुढे आणखी कामाचे तास आणि मिळणारा मोबदला या फरकामध्ये तर मी जातचं नाही. जेव्हा मोदी "पकौडे बनाना भी जॉब ही. है" असं ठणकावतात तेव्हा आपल्याकडे महाराष्ट्रात त्या बद्दल आश्चर्ययुक्त हेटाळणी होते, पण देशाच्या एका ठराविक भागात ते relevant असते, म्हणूनच ते तसे बोलले जाते हे आपण समजून घेणे जरुरीचे आहे.
तर लोकहो या सांख्यिकीकडे दुर्लक्ष करा, आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेसाठी हिंदी ही भाषा पुढे आणायची आहे, कारण ती भारतातील बहूसंख्य लोकांना ( ४५% लोकसंख्येला) देशाच्या इतर राज्यांत स्थलांतरित होऊन तिथे स्थिरस्थावर होण्याच्या कामात उपयुक्त ठरते म्हणजेच ती भारतीयांना आपापसात जोडून राष्ट्रीयत्वाची भावना जोपासण्यास हातभार लावते....... टाळ्या !!!!
उ प्र, बिहार मधे किती
उ प्र, बिहार मधे किती शाळांमधे मराठी शिकविले जाते ? महाराष्ट्राच्या बाहेर किती राज्यांमधे मराठी भाषा ऐच्छिक ( सक्तीची अपेक्षा नाही) म्हणून शिकविली जात आहे?
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करु नाही. मराठी लोकांनी मराठी आणि इंग्रजी शिक्षणावरच भर द्यावा. भाषांची आवड असेल तर इतर भाषा जरुर शिकाव्या मग तेलगू, मल्याळी, तमिळ, कानडी, हिंदी... अनेक पर्याय उपलब्द आहेत.
आजचा बालक उद्याचा देशाचा " जबाबदार " नागरिक आहे. विखार पसरवणार्या स्टार प्रचारकांना केवळ हिंदी भाषाच येते म्हणून भाषा सक्ती करण्याचे घाटत आहे. हे स्टार प्रचारक राज्यांत आल्यावर त्यांना श्रोते मिळायला हवेत ना. अनेक योजना तयार आहेत. या योजना तडीस नेण्यासाठी हिंदी जाणणारा तरुण हाताशी असायला हवा.
मला हिंदी भाषेबद्दल प्रेम आहे. पण काही छुपा अजेंडा ( एक देश, एक भाषा... ) समोरे ठेवून आणलेल्या भाषासक्तीने महाराष्ट्राचे हित नाही.
इंग्रजी भाषेला पायघड्या
इंग्रजी भाषेला पायघड्या घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा , हे सहन करणार - देवेंद्र फडणवीस.
तिसरी भाषा लागू होईलच, तेव्हा अधिकाधिक पालकांनी तमिळ, मल्याळम , कन्नड, तेलुगु, उर्दू , बांग्ला, पंजाबी या भाषा निवडाव्यात.
लहान वयात नवी भाषा शिकणे सोपे
लहान वयात नवी भाषा शिकणे सोपे असते असे सिद्ध झाले आहे. >>>
विखार पसरवणार्या स्टार प्रचारकांना केवळ हिंदी भाषाच येते म्हणून भाषा सक्ती करण्याचे घाटत आहे. हे स्टार प्रचारक राज्यांत आल्यावर त्यांना श्रोते मिळायला हवेत ना.>>>
हिंदीच्या माध्यमातून द्वेषाची भाषा??
आर आर एस चा बहुतांश केडर हा वयाच्या ६-१२ वयातच संघटनेशी संलग्न का झालेला असतो याचंही गणित पहा उलगडताय का ते यातून?
त्यावर शेरेबाजी ही हिटलरच्या
त्यावर शेरेबाजी ही हिटलरच्या ज्यू लोकांचे रक्त दूषित असण्याच्या तत्त्वज्ञानाशी जवळिक बाळगून आहे
>>>
तुमच्यासारखे लोक इतर धर्म आणि धर्मियांबद्दल जळीस्थळीकाष्ठीपाषाणी आणि झोपेतही गरळ ओकत असतात, घाऊक द्वेष करत आणि पसरवत असतात, ते या तत्त्वज्ञानाशी अतिशय घट्ट जवळिक बाळगून आहे.
Pages