सध्या महाराष्ट्रात, पहिलीपासून हिंदीची सक्ती करण्याचा भाजप सरकारने निर्णय घेतला आहे, ह्या विरोधात अनेक मराठी प्रेमी नी महाराष्ट्राचे हित चिंतनाऱ्या संघटना विरोधात उतरल्या आहेत!
-महाराष्ट्राचे हिंदीकरण करण्याचा भाजपचा डाव आहे का?
- उत्तर भारतीय फुगलेली लोकसंख्या महाराष्ट्रात आणून वसवण्यासाठी भाजप हे करतय का?
- २२ अधिकृत भाषांमधली एक भाषा हिंदी लादण्यामागे भाजपाचे कारस्थान काय?
- हिंदीचा नी महाराष्ट्राचा संबंध काय?
- हिंदी भाषकांच्या सोयीसाठी १ लितील कोवळ्या जीवाना हिंदी लादून त्रास द्यायचा का?
संघटनांच्या मागण्या:-
१. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती केवळ इतर भारतीय भाषांप्रमाणेच एक राज्यभाषा असून तिची सक्ती करणे अयोग्य आहे.
२. राज्याच्या सांस्कृतिक अस्मितेवर आघात: महाराष्ट्राची ओळख ही स्वतंत्र मराठी भाषा, साहित्य, संस्कृती व परंपरेशी निगडित आहे. अन्य राज्यातील भाषा लादणे हे सांस्कृतिक आक्रमणच म्हणावे लागेल.
३. शिक्षणाचे ओझे वाढवणारा निर्णय: पहिलीपासूनच तीन भाषा सक्तीने शिकविणे बालकांच्या बौद्धिक व मानसिक विकासासाठी अयोग्य व अन्यायकारक ठरेल.
४. मराठीतील बोलीभाषांना सरकारकडून प्रोत्साहन नाही: मराठीच्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनासाठी शासन काहीही प्रयत्न करीत नाही, हे दुर्दैवी आहे.
५. स्थानिक विद्यार्थ्यांवर स्थलांतरितांचे भाषिक वर्चस्व लादले जात आहे, ज्यामुळे स्थानिक भाषिक विद्यार्थ्यांचा अधिकार आणि संधी हिरावली जाऊ शकते.
६. केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राचा चुकीचा अर्थ: त्रिभाषा सूत्र हा प्रशासनापुरता मार्गदर्शक आहे; त्याची सक्ती शालेय शिक्षणात लादणे अन्यायकारक आहे.
७. भाषिक स्वायत्ततेचा संपूर्ण अभाव: प्रत्येक राज्याला त्याच्या भाषिक गरजेनुसार शिक्षण धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. केंद्राच्या दबावाखाली घेतलेला निर्णय हे राज्याच्या स्वायत्ततेचे उल्लंघन आहे.
त्यामुळे, आम्ही खालील मागण्या आपल्यास सादर करीत आहोत –
१. राज्य शासनाने इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीने शिकविण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
२. या निर्णयाच्या रद्दबाबत तात्काळ शासन आदेश किंवा स्पष्ट परिपत्रक निर्गमित करावे.
३. सदर बाबीबाबत शालेय शिक्षण संचालनालय, शिक्षण आयुक्त, शिक्षण मंडळ, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समित्या यांना स्पष्ट सूचना द्याव्यात.
४. बालभारतीसह इतर सर्व पुस्तक छपाई केंद्रे व मुद्रण विभागांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी हिंदी सक्तीबाबत कोणतीही योजना राबवू नये, याबाबत स्पष्ट लेखी सूचना द्याव्यात.
५. यापुढील अभ्यासक्रम नियोजन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना तृतीय भाषा निवडीचा संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात यावा, कोणतीही सक्ती करू नये.
६. त्रिभाषा सूत्राचे पालन हे राज्याच्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने व ऐच्छिक स्वरूपात मर्यादित ठेवावे.
७. राज्यातील मराठी बोलीभाषा, लोकपरंपरा व स्थानिक संस्कृती यांचा अभ्यासक्रमात अंतर्भाव करून स्थानिकतेला प्राधान्य द्यावे.
८. सदर निर्णयामुळे निर्माण होणारा संभ्रम, असंतोष आणि प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी त्वरित ठोस कृती करण्यात यावी.
मला चिन्मयी ह्यांची भुमिका
मला चिन्मयी ह्यांची भुमिका आवडली ह्या बाबतीत.
https://youtu.be/xgLn06EqKes?si=H75XZJQ9LbR0LU74
१००% मताशी सहनत आहे. एकही मुद्दा चुकीचा नाही त्यांचा.
राज ठाकरेंच्या भाषणात कुणी
राज ठाकरेंच्या भाषणात कुणी तरी घोडा आणला.
राज ठाकरे म्हणाले " अरे तो घोडा कुणी आणलाय ? मी काय बोलतो हे माणसांना समजत नाही, त्याला बिचार्याला काय समजणार ?"
शाब्बास!
शाब्बास!
मराठी भैय्ये खासदार लांबून मजा बघत होते.
हा निशिकांत दुबे महिला लोकप्रतिनिधींबद्दल बोलताना वैशाली की नगरवधू यासारखे शब्द वापरतो आणि इथले मराठी भैय्ये अशा माणसाचंही समर्थन करतात.
---
विधिमंडळाचं अधिवेशन सुरू व्हायचं होतं म्हणून सरकारी आदेश मागे घेतला. अधिवेशन संपताच तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवणारच असं कुटिल कारस्थानी फडणवीस वदले.
>>
>>
तुमच्यासारखे लोक इतर धर्म आणि धर्मियांबद्दल जळीस्थळीकाष्ठीपाषाणी आणि झोपेतही गरळ ओकत असतात, घाऊक द्वेष करत आणि पसरवत असतात, ते या तत्त्वज्ञानाशी अतिशय घट्ट जवळिक बाळगून आहे
<<
जिथे जो विषय चालू आहे तिथे त्या विषयावर बोलावे एवढा तरी सिविक सेन्स ठेवा.
हिंन्दी भाषिक लोकांचा डी एन ए वाईट आहे हे अ त्यंत वर्णद्वेष्टे रेसिस्ट विधान .
दुसर्या कुठल्या तरी चुकीकडे बोट दाखवून ही चूक योग्य ठरत नाही. जरा भान ठेवा.
माझ्यावर वैयक्तिक गलिच्छ शिवीगाळ करून ह्या वर्णद्वेष्ट्या विधानाचे उचित ठरवणे विकृत मानसिकता दर्शवते. असो.
>>
>>
हे भाजपाचं माउथपीस शेंडेनक्शत्र आलं का इथे?
हे असले भिकारडे मराठी साईटवर मराठी बोलत काय करताहेत?]
<<
मी भाजपचा माउथपीस कसा काय बुवा? तुम्ही त्या गणपत पाटील वाल्या शिवसेनेचे मुखस्तंभ आहात का? की त्या शून्य सीट वाल्या मारकुट्या , नकलाकार राजू पेंटरचे मुखस्तंभ आहात?
ह्या भिकारड्या साईटवर मराठी बोलायला बंदी आहे का? आणि हिंदी भाषेची बाजू घेणार्यांना मराठी बोलायला बंदी घालणारे गणपत पाटील आणि राजू पेंटर कोण लागून गेले? मराठी ही कुणाच्या तीर्थरुपाच्या मालकीची भाषा नाही की बोलायला त्यांची परवानगी लागावी.
उगाच उचलले बोट आणि बडवला कीबोर्ड असे न करता थोडे डोके वापरा.
ह्या विषयावरील शेंडेनक्षत्र
ह्या विषयावरील शेंडेनक्षत्र ह्यांचे मत हे त्यांच्या "मुखस्तंभ" शब्दाच्या वापराइतकेच बरोबर आहे असे नोंदवतो आणि माझा पुढचा मुद्दा मांडतो.
महाराष्ट्रात मराठीत सेवा देणे बंधनकारक करण्याबद्दल कायदा करावा किंवा आधीच अस्तित्त्वात असलेले कायदे कुठले आणि त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी कुणीच करताना दिसत नाही. मराठीत दुकानांच्या नावाच्या पाट्या असाव्यात असा कायदा आहे, आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी मनसेने प्रयत्न केले होते. त्याच धर्तीवर मराठीत सेवा मिळवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जर सेवा मिळत नसेल तर तक्रार करून सरकारकडून punitive action घेण्यासाठी पाठपुरावा केला पाहिजे.
मराठीत सेवा दिली नाही तर तक्रार होऊन त्या त्या खात्याचं नसतं झेंगट मागे लागतं, तक्रार दाबण्यासाठी चहा पाणी द्यावं लागतं इतकी जरी nuisance value ह्या मुद्द्याची असेल तरी बरेच लोक मराठी बोलायला लागतील.
@Admin-team कृपया खालील
@Admin-team कृपया खालील स्क्रीनशॉटमधे पिवळ्या रंगात ठळक केलेल्या, विधानाची दखलवजा नोंद घ्यावी.

हाच मजकूर मराठीतून थोडक्यात
.
From the National Education
From the National Education Policy
Multilingualism and the power of language
4.11.
It is well understood that young children learn and grasp nontrivial concepts more quickly in their home language/mother tongue. Home language is usually the same language as the mother tongue or that which is spoken by local communities. However, at times in multi-lingual families, there can be a home language spoken by other family members which may sometimes be different from mother tongue or local language. Wherever possible, the medium of instruction until at least Grade 5, but preferably till Grade 8 and beyond, will be the home language/mother tongue/local language/regional language. Thereafter, the home/local language shall continue to be taught as a language wherever possible.
As research clearly shows that children pick up languages extremely quickly between the ages of 2 and 8 and that multilingualism has great cognitive benefits to young students, children will be exposed to different languages early on (but with a particular emphasis on the mother tongue), starting from the Foundational Stage onwards. All languages will be taught in an enjoyable and interactive style, with plenty of interactive conversation, and with early reading and subsequently writing in the mother tongue in the early years, and with skills developed for reading and writing in other languages in Grade 3 and beyond. There will be a major effort from both the Central and State governments to invest in large numbers of language teachers in all regional languages around the country, and, in particular, for all languages mentioned in the Eighth Schedule of the Constitution of India. States, especially States from different regions of India, may enter into bilateral agreements to hire teachers in large numbers from each other, to satisfy the three-language formula in their
respective States, and also to encourage the study of Indian languages across the country.
The three-language formula will continue to be implemented while keeping in mind the Constitutional provisions, aspirations of the people, regions, and the Union, and the need to promote multilingualism as well as promote national unity. However, there will be a greater flexibility in the three-language formula, and no language will be imposed on any State. The three languages learned by children will be the choices of States, regions, and of course the students themselves, so long as at least two of the three languages are native to India. In particular, students who wish to change one or more of the three languages they are studying may do so in Grade 6 or 7, as long as they are able to demonstrate basic proficiency in three languages (including one language of India at the literature level) by the end of secondary school.
From National Curriculam Framework for school education
Section 2.4
Learning Standards
Learning three languages
Students will learn at least three languages in their school years, denoted R1, R2, and R3 in this document.
R1: This is the language used as medium of instruction (MoI), and in which literacy is first attained. Preferably it should be the most familiar language of the students, which is usually the mother tongue/home language. With India’s linguistic diversity, even within a class room, it may not be possible to have the home language as the R1 for all students; in such circumstances a language which is familiar to the students should be chosen as R1 -- which is often the most commonly used local language.
R2: This could be any other language, including English.
R3: This is any other language that is not R1 or R2.
The state or the relevant bodies need to decide upon R1, R2, or R3
The aim is to be an independent reader and writer in R1 by age 8 (Grade 3). A student will demonstrate similar level of literacy in R2 by age 11 (Grade 6), and in R3 by age 14 (Grade 9). Schools will develop in students the capacity for basic communication for social purposes and linguistic proficiency for academic use in the classrooms in R1 and R2, and only the capacity for basic communication for social purposes in R3.
हाच मजकूर मराठीतून थोडक्यात
राष्ट्रीय शिक्षण नीती -
मुले मातृभाषा / गृहभाषा (घरी बोलली जाणारी भाषा) चटकन शिकतात. त्यामुळे पाचव्या आणि शक्यतो आठव्या इयत्तेपर्यंत शिक्षणाचे माध्यम मातृभाषा / गृहभाषा किंवा प्रादेशिक भाषा असावे. त्यानंतर ही भाषा एक भाषा म्हणून शिकवली जावी.
मुले २ ते ८ या वयात भाषा चटकन शिकत असल्याने आणि बहुभाषक असण्याचे अनेक फायदे असल्याने मुलांना प्राथमिक पातळीपासूनच विविध भाषांचा परिचय होऊ द्यावा, यात मातृभाषेच्या शिक्षणावर जोर असावा. आरंभीच्या वर्षांत मातृभाषा आणि तिसर्या इयत्तेपासून अन्य भाषांचे लेखन व वाचन कौशल्य शिकवावे.
केंद्र आणि राज्य सरकारे विविध प्रादेशिक भाषांचे शिक्षक तयार करण्यासाठी गुंतवणूक करतील. वेगवेगळ्या भागांतील राज्यांनी त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी करण्यासाठी एकमेकांच्या भाषांच्या शिक्षकांची नियुक्ती करण्यासाठी द्विपक्षीय करार करावेत.
घटनेतील तरतुदी, लोक - राज्ये आणि केंद्र यांच्या आकांक्षा , बहुभाषकत्व आणि राष्ट्रीय एकात्मता यांना उत्तेजन देण्यासाठी त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी सुरू राहील. मात्र हे धोरण लवचिक असेल आणि यात कोणत्याही भाषेची सक्ती नसेल. कोणत्या तीन भाषा शिकायचा हे राज्य आणि अर्थात विद्यार्थ्यांनी ठरवायचे आहे. फक्त किमान दोन भाषा भारतीय असाव्यात.
शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाच्या राष्ट्रीय आराखड्यातून
मुले शालेय जीवनात किमान तीन भाषा शिकतील.
पहिली भाषा ही शिक्षणाचे माध्यम असेल. ही शक्यतो मातृभाषा / गृहभाषा किंवा स्थानिक भाषा असेल. दुसरी भाषा इंग्रजी वा अन्य कोणतीही भाषा असेल.
मुलांना तिसर्या इयत्तेपर्यंत पहिली भाषा , सहाव्या इयत्तेपर्यंत दुसरी भाषा आणि नवव्या इयत्तेपर्यंत तिसरी भाषा वाचता व लिहिता यावी, मुलांमध्ये पहिल्या दोन भाषांमध्ये संवाद साधणे आणि शिक्षण घेण्याची क्षमता विकसित करावी. तिसर्या भाषेत संवाद साधण्याची क्षमता विकसित करावी.
शिक्षण नीतीमध्ये पुढे अभिजात भाषा आणि विदेशी भाषांच्या शिक्षणाचाही उल्लेख आहे.
१. फडणवीस राष्ट्रीय शिक्षण
१. फडणवीस राष्ट्रीय शिक्षण नीतीचा हवाला देतात. त्यांनी आणि आधीच्या ठाकरे सरकारने मातृभाषा / गृहभाषा / स्थानिक भाषा ही शिक्षणाचे माध्यम असावे या निर्देशाकडे दुर्लक्ष केले की तिथे तेवढी लवचिकता आणि विद्यार्थ्यांची इच्छा प्रमाण मानली?
२. कुठेही पहिलीपासून तीन भाषा शिकवा असे म्हटलेले नाही. दुसरी भाषाही तिसर्या इयत्तेपासून शिकवायची आहे.
३ आता पहिलीपासून हिंदी शिकवायची होती, त्यासाठी हिंदी शिक्षकच काय पाठ्यपुस्तकेही तयार नव्हती. त्याबद्दलही बरेच लिहिण्यासारखे आहे.
४. अन्य राज्यांत मराठी शिकवली जावी आणि तिथे मराठी शिक्षकांच्या नियुक्त्या व्हाव्यात यासाठी काय केले?
दोन देशांत जसे व्यापार करार होतात, तसे भाषा करार होणे ही फार चांगली गोष्ट आहे. हिंदी भाषक राज्यांनी अन्य राज्यांची भाषा शिकवण्यासाठी प्रयत्न करावेत - आम्हीही तुमच्या भाषा शिकवण्यासाठी तेवढेच प्रयत्न करू अशी भूमिका उत्तम आहे.
दोन देशांत जसे व्यापार करार
दोन देशांत जसे व्यापार करार होतात, तसे भाषा करार होणे ही फार चांगली गोष्ट आहे. हिंदी भाषक राज्यांनी अन्य राज्यांची भाषा शिकवण्यासाठी प्रयत्न करावेत - आम्हीही तुमच्या भाषा शिकवण्यासाठी तेवढेच प्रयत्न करू अशी भूमिका उत्तम आहे.>>>>+१००० तसेच अशा राज्यांतील मराठी भाषा उत्तम प्रकारे शिकलेल्या नागरीकांना महाराष्ट्र राज्यातील नागरीकांच्या खालोखाल प्राधान्यक्रमाने नोकऱ्या देणाऱ्या प्रोत्साहनपर योजना जाहीर करु शकतात.
हे सांस्कृतिक आक्रमण आणि
हे सांस्कृतिक आक्रमण आणि हिंदीकरण
कावड यात्रेसाठी उच्च न्यायालयाचे आदेश धुडकावले? परवानगी नसताना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात भक्तांचा प्रवेश
https://x.com/INCMaharashtra
https://x.com/INCMaharashtra/status/1952633011779854701
एकीकडे म्हणायचं "निशिकांत दुबे यांच्या बोलण्याचा संदर्भ संघटनेबद्दल होता, सरसकट मराठी माणसाला ते म्हणाले नाहीत"
दुसरीकडे म्हणायचं "मी पूर्ण व्हिडिओ पाहिला नाही
१६ ऑक्टोबर २०२२. इंग्रजी
१६ ऑक्टोबर २०२२. इंग्रजी बोलणार्यांना लाज वाटेल अशी स्थिती येईल फेम अमित शहा यांनी भोपाळ इथे MBBS च्या हिंदी पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन केले.
ऑगस्ट २०२५. या पुस्तकांवर १० करोड रुपये खर्च झाल्यानंतर एकही विद्यार्थी हिंदीतून परीक्षा द्यायला आलेला नाही.
तांत्रिक माहिती असलेले विषय इंग्रजीतून शिकायलाच सोपे पडतात. मी अर्थशास्त्राच्या परीक्षा देताना प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत असे. मराठीतल्या संज्ञांचा अर्थ पटकन कळत नसे.
याबद्दलचा एक निबंध
मी अर्थशास्त्राच्या परीक्षा
मी अर्थशास्त्राच्या परीक्षा देताना प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांत असे. मराठीतल्या संज्ञांचा अर्थ पटकन कळत नसे. >> आम्हाला एक foundation course नावाचा विषय बी. एस्सी पहिल्या वर्षाला होता. मी पहिल्या सहामाहीला मराठीतुन पेपर द्ययचे ठरवले. आणि अशी फाफलली ना!
Assam Chief Minister Himanta
Assam Chief Minister Himanta Biswa Sarma on Sunday greeted people on Hindi Diwas and said the language has played a key role in uniting the country. He said that Hindi is attaining global prominence, which is a testimony of the country's strength. Heartfelt greetings on Hindi Diwas! The... इत्यादि ओवाळणी
घ्या. हिंदी शिका.
Pages