निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.
शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!
एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.
ए पिक्चर इज वर्थ ए थाउजंड
ए पिक्चर इज वर्थ ए थाउजंड वर्ड्स. डोळ्यांवर कातडं ओढुन घेतलं किंवा पिवळा चष्मा घातला कि फक्त आपल्या स्वप्नातलंच जग बहुदा दिसत असावं..
बट नंबर्स डोंट लाय. बाय्डन साहेबांनी कार्यभार २०२१ला हातात घेतला. सुरुवातीचे तीन महिने, गेला बाजार संपुर्ण २०२०चा अॅवरेज रेट बघा; १.२ आहे. अशी वस्तुस्थिती असुनहि २०२१, २२, २३, आणि २४च्या वाढलेल्या इन्फ्लेशन्चं खापर ट्रंपवर फोडणार्यां विषयी आता काय बोलणार? त्यांना कोपरा पासुन नमस्कार...
ट्रंप त्या डिडीला माफी देणारे
ट्रंप त्या डिडीला माफी देणारे?
अपेक्षेप्रमाणे, हनिमून वेळ
अपेक्षेप्रमाणे, हनिमून काळ संपला आहे. तूने मेरी दोस्ती देखी, .अब दुश्मनी देख
मस्क ने B3 वर कठोर टिप्पणी केली. तिकडे टेस्ला शेअर १५% ने घसरला
त्या जोकराचे शेअर्स मी घेतच
त्या जोकराचे शेअर्स मी घेतच नाही. त्याला बोलायची पाचपोच अजिबात नाही. बालिश मनुष्य आहे
पोटस आणि त्याचा सगळ्यात मोठा
पोटस आणि त्याचा सगळ्यात मोठा सपोर्टर, ज्याच्यामुळे तो परत पोटस बनला यांच्यातील चिखलफेक रिअल टाईम बघणं फार मजेदार आहे. मेड माय डे. किती वाईट थराला येऊन प्रेसिडंट आणि सर्वांत श्रीमंत माणूस वचावचा भांडतात!
मस्कला काय वाटलेलं होईल?
चिकन आऊट प्रेसिडंट कडून दुसरं काय होणार!
अमेरिकेची लक्तरं निघत आहेत हा बोनस!
आता स्पेंडिंग बिल, त्याला सपोर्ट करणार्या रिप्सना मिडटर्म मध्ये भोगिलेजे दु:ख त्याला सुख म्हणावे लागले... इकडे आड तिकडे विहीर. परत चिकन आऊट कोण करतंय.. का वचावचाच चालू रहातंय! आपल्याला दोन्हीकडून तितकीच मजा!
बाकी जीडीपी, अनएम्प्लॉयमेंटचे नंबर काय म्हणताहेत. लो जीडीपी, हाय अनएम्पलॉयमेंट आणि लो इंटरेस्ट रेट (चेरिश्ड बाय राज) ला काय शब्द आहे माहित आहे का? बघुया काय येताहेत आकडे.
आता इलॉन म्हणतोय... मला नवा
आता इलॉन म्हणतोय... मला नवा पक्ष काढायचाय.
बिग ब्युटीफूल ब्रेकअप!
बिग ब्युटीफूल ब्रेकअप!
अमित, संभाळून हर्षवायू
अमित, संभाळून हर्षवायू व्हायचा
मस्क ट्रंप डिव्होर्स होणारच होता. किती महिन्यात हे बघायचं होतं. सहा महिन्यात झाला. दोन बुलीज एकत्र कसे राहू शकतील. मस्कने वाट लावून ठेवली आहे, ती निस्तरायला किती वेळ आणि पैसा जाईल याची गणितं मांडायला लागा.
मस्कने वाट लावलेली नाही. वाट
मस्कने वाट लावलेली नाही. वाट ट्रम्पने लावलेली आहे! प्रेसिडेंट ट्रम्प होता आणि आहे!
मस्कने टेस्ला आणि त्याच्या ब्रँड ची वाट लावली आहे, पण ते होणारच होतं.
वाट दोघांनी मिळून लावली आहे.
वाट दोघांनी मिळून लावली आहे. भोगतेय सगळं जग.
अमेरिका स्पेस प्रोग्रॅम मधून
अमेरिका स्पेस प्रोग्रॅम मधून ड्रॅगन स्पेस क्राफ्ट मस्क डी-कमिशन करतोय. .. वर ट्रम्प इम्पीचमेंट ला सपोर्ट करतोय.
अरे हो... एपस्टीन फाईल्स मध्ये तात्या आहे ही आणखी एक पुडी सोडली आहेच..
तर ट्रंपला आता एक्स ( ट्विटर)
तर ट्रंपला आता एक्स वरून एक्स करणार का?
तात्या आता 'हाय रे मेरा एक्स'
तात्या आता 'हाय रे मेरा एक्स' म्हणुन उसासे सोडणार का?
>>च्च! खापर ट्रंपवर फोडणार्
>>च्च! खापर ट्रंपवर फोडणार्यां विषयी आता काय बोलणार? त्यांना कोपरा पासुन नमस्कार...>>
मी फक्त एक ट्रंप स्टाईलने कॉमेंट केली. आपल्या निर्णयामुळे काही वाईट झाले की जबाबदारी आधीच्या अॅडमिनवर (बायडन) ढकलायची आणि जेव्हा आधीच्या अॅडमिनमुळे( ओबामा) चांगली इकॉनॉमी मिळाली तेव्हा त्याचे श्रेय स्वतःला घ्यायला धावायचे ही खास ट्रंप स्टाईल.
आता फॅक्ट्स - वाढलेली डिमांड, तुटलेल्या सप्लाय चेन्स आणि रशिया वॉरमुळे वाढलेल्या इंधन किमती या सगळ्याचाच परीणाम इंफ्लेशन वाढण्यावर झाला. मात्र २०२२ च्या मध्यावर ९ पर्यंत गेलेले इंफ्लेशन २०२४ च्या मध्यावर २.९ पर्यंत खाली आले. यात ट्रंपचे काहीही कर्तृत्व नाही.
ट्रंपनी कारभार हातात घेतल्यावर अवघ्या सहा महिन्यात अमेरीकेची पत खाली आणली. आता त्याबद्दल बोलणे अडचणीचे तेव्हा फोकस लगेच काही दशांशाने खाली आलेल्या नंबर्सवर.
अवांतर - मी स्वतंत्र मतदार आहे. लोकशाही योग्य मार्गाने जाते, प्रेसिडेंटची कारकीर्द यशस्वी होते तेव्हा माझ्यासारख्या सामान्य नागरीकांचे भले होते एवढे मला कळते. त्यामुळे व्यक्ती म्हणून एखादा प्रेसिडेंट आवडो न आवडत, तो अयशस्वी होवो असे मलातरी कधीच वाटणार नाहे.
२०२४ च्या कामाबद्दल सॅक्शन झालेले आमचे $१००० डॉज कृपेने अजूनही अडकून पडलेत. असो.
युएस मरीन्स ग्रीनलँड, पनामा,
युएस मरीन्स ग्रीनलँड, पनामा, कॅनडाला पाठवू सांगणे हा गुंगारा होता तर. मेन लॅन्ड वरच मरीन्स पाठवायची वेळ आली आहे! दुसऱ्या देशांत फूट पडायची वाट बघताहेत, आणि तुमच्या देशाच्या रस्त्यावर आर्मी उतरते आहे! हो, देशाच्या आत आर्मी! वाईट वाटतं,चार महिन्यांत इतकी कायदा सुव्यवस्थेची वाट लागलेली बघून. चालायचंच!
insurrection act trending on
insurrection act trending on twitter
शांतपणे सुरु असलेल्या
शांतपणे सुरु असलेल्या विरोधाला गालबोट लावण्याचे काम काही समाजकंटक करत आहे.
LA मधली परिस्थिती चिघळत चालली आहे. राज्याच्या संमती शिवाय नॅशनल गार्ड्स तैनात करणे, गव्हर्नर गाविनला अटक करण्याच्या वल्गना हे सगळे धक्कादायक वाटते.
>>शांतपणे सुरु असलेल्या
>>शांतपणे सुरु असलेल्या विरोधाला गालबोट लावण्याचे काम काही समाजकंटक करत आहे.<<
समाजकंटक कोण आहेत याचा जरा खोलात जाउन विचार करा. कॅलिफोर्नियाची वोकस्टेट मार्गे फेल्ड स्टेटकडे वाटचाल सुरु आहे. बहुतेक या प्रकाराला तुम्हि पीसफुल प्रोटेस्ट म्हणत आहात. लगे हाथ हा घटनाक्रम पण डोळ्याखालुन घाला...
>>शांतपणे सुरु असलेल्या
डपो.
गेले काहि दिवस सातत्याने पोस्ट केलेला प्रतिसाद डुप्लिकेट होत आहे. समथिंग राँग विथ माबो सर्वर्स.. नेटवर्क स्पीड एट्सेट्रा...
Sensitive keyboard?
Sensitive keyboard?
सर्व्हर स्लो असेल तर इतरांनाही डपोचा अनुभव यायला हवा.
Slow होतोय intermittently.
Slow होतोय intermittently. Takes a while to load page
>>>>>गेले काहि दिवस सातत्याने
>>>>>गेले काहि दिवस सातत्याने पोस्ट केलेला प्रतिसाद डुप्लिकेट होत आहे.
राज तुमचे की इतरांचे. डबल पोस्टस मी तरी नोटिस केले नाही.
परत परत तेच तेच लिहिले की ते
परत परत तेच तेच लिहिले की ते खरे वाटू लागते - जसे २०२० च्या निवडणूका खोट्या होत्या. असे सतत चार ते पाच वर्षे बोलले की लोक विश्वास ठेवतात. असे लोक या अमेरिकेत आहेत म्हणून सुमारा बुद्धीचे इतर देशातील लोक इथे येऊन मजेत जगतात!
राजाच्या वाढदिवसाच्या
राजाच्या वाढदिवसाच्या मिरवणूकीची तयारी झाली का लोकहो??
राजाने त्याच्या सारख्या सगळ्या एक हाती अंमल असणार्या सगळ्या मित्रांना मिरवणूकीला बोलवलंय, ज्यात एक नाव आसीम मुनीर पण आहे......
एलएला रस्त्यावर आर्मी आहेच.
एलएला रस्त्यावर आर्मी आहेच. तिकडेच उरकून टाका राजाची बारात. बारातीसमोर बेड्या घातलेला सिनेटर आणता येईल का हो?
बाकी काही प्रश्न बिश्न विचारू नका, नाहीतर बेड्या पडतील हो हातात!
(No subject)
इराणवर हल्ला केला. अमेरिका
इराणवर हल्ला केला. अमेरिका युद्धात उतरली.
ट्रंप नेहमीच पळ काढतो? समजा
ट्रंप नेहमीच पळ काढतो? समजा इराणने एखाद्या यूएस नौकेची वाट लावली तर?
TACO झालं खरं का काय?
TACO झालं खरं का काय?
आज काय तर इराण- इजरायल
आज काय तर इराण- इजरायल युद्धविराम झाला हे ट्रंपने परस्पर जाहीर केले. ??
Pages