डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टॅको ट्रेड! टॅको प्रेसिडंट! म्हणून तात्याला इतिहास लक्षात ठेवणार. Lol
TACO.jpg
आज कोर्टाने पण टॅकोला एक लाथ मारली. आता गर्दभ दुगाण्या झाडायला... का चिकन डांस करायला परत चालू करेल!

ट्रंप ऑल्वेज चिकन्स आऊट! TACO Wink

सर्व युद्धांमधे नेहेमी आक्रमणच करायचे असे नसते. कधी कधी माघार घेणे हे पण योग्य असते, त्याला strategic retreat असे म्हणतात!

आम्ही चिकन आऊट म्हणतो. मजा येते म्हणायला. Biggrin तुम्ही पण ट्राय करा. चिकन चिडतं पण लगेच की हेडलेस डांस शो फ्री मध्ये बघायला मिळतो. काल मिळाला ना बघायला.

प्लीज ट्रंप ला असे चिडवू नये. तो वेडसर आहे.
एखादा वेडसर माणूस हातात जळती मशाल घेऊन आपल्या घराला आग लावू का ? असे विचारत असेल तर त्याच्याशी गोड बोलून हातातली मशाल काढून घेणे योग्य आहे. 'तुझ्यात ती हिंमत नाही' असे चिडवल्यास तो नक्कीच आग लावेल.

मी जे वर लिहिले त्याचे कारण त्रंप्याचे येथिल नेहेमीचे चमचे लिहिताना दिसत नाहीत, म्हणून ते काय म्हणतील असा विचार करून लिहिले.
नाहीतर मला त्यातले काय कळते?
विजय कुलकर्णी, अनुमोदन.
मूर्ख, हट्टी, खोटारडा, निर्लज्ज असा प्रत्यक्ष सैतानच आपल्या नशिबी या अमेरिकन लोकांनी मारला आहे. तेंव्हा जरा गोड बोलून, तुझेच बरोबर असे म्हणून कळ काढायची.

तुम्ही तर टाको समर्थक आणि मतदार ना? आता एकदम दुर्जन झाला का तात्या? देर से आए!
शेंडे उडाले, राज सगळीकडे येऊन इथे समर्थन करायला येत नाही, विकु आणि तुम्ही पण चिकन आऊट केलं. कोणी राहिलंय का आता इथे ल्युनेटिक समर्थक?
बाकी लवकरात लवकर घर जाळून घ्यावं. की नवं बांधणे शक्य होईल. हा अब्युज सहन करत राहू नये.

अमित, तात्या म्हणतायेत कॅनडा इज़ कन्सिडरिंग Proud
त्यामुळे तुम्हीही लवकरच ह्या जळणाऱ्या घराचाच हिस्सा होणार आहात Wink

Wink Lol
त्याला त्याच्याच व्हाईट हाऊस मध्ये येऊन नेव्हर नेव्हर नेव्हर नेव्हर ..... असं तोंडावर... हो आम्रविकेच्या पोटसच्या तोंडावर ... हसं करुन .. .जोक करुन सांगितलेलं. तरी डिल्युजनल असल्याने तो असं म्हणतो बापडा.
बाकी अमेरिकेची न्युसन्स व्हॅल्यू! Rofl अमेरिका इज अ जोक! न्युसन्स व्हॅल्यू म्हणे! Rofl

शेंडे, राज यायला पहिजेत. दुसरी बाजू काय हे तरी ऐकता येइल.
टॅरिफ चीन आणि युरोपिअन देश देतील असे ते सांगतील! ते कसे असे विचाराल तर बायडेनला शिव्या.

“ शेंडे उडाले” - अरेच्चा! हे कधी झालं? >> अमितला पहाटे पडलेलं स्वप्न आहे ते Wink

मस्क उडाला ऐवजी शेंडे उडाले लिहिलं असेल

>>शेंडे, राज यायला पहिजेत. दुसरी बाजू काय हे तरी ऐकता येइल.<<
दुसरी बाजु सांगायला शेंडे/राज कशाला हवेत, तुम्हि बातम्या वाचत्/ऐकत नाहि? का फिल्टर लावला आहे? असो..

शेंडेनक्षत्र कसे उडाले? त्यांच्याशी मतभेद असु शकतात पण त्यांनी मांडलेले मुद्दे वाजवी/वास्तविक असायचे. अगदि पटणारे आणि रेलवंट, अन्लेस युआर लिविंग अंडर ए रॉक..

टॅरिफचा गुंता एव्हढ्यात सुटणार नाहि. काहि मंडळीं कोर्टाचा निर्णय वाचुन विक्टरी परेड काढण्याच्या तयारीत आहे. त्यांना एव्हढंच सांगीन - रुको, जरा सबर करो..

बाय्दवे, इन्फ्लेशन रेट जो गेल्या वर्षात ३च्या आसपास घुटमळत होता तो पांच महिन्यातच २.१ वर आलेला आहे. आहे कि नाहि गंम्मत..

आणि हो (वन मोर थिंग), वर उत्तरेला कॅनडामधे भगदाड पडण्याची शक्यता आहे. इट्स ए लाँग शॉट, बट इफ अँड व्हेन दॅट हॅपन्स टृम्प माइट से - भागते भूत कि लंगोटि हि सहि...

अल्बर्टा सेपरेटिस्ट ह्या लाँग शॉटवर बेस्ड आर्ग्युमेंट आता चिकन आऊटचे सपोर्टर्स करू लागले ! Rofl देवा!!! Rofl
नाईव्ह म्हणायचं का स्टुपिड का काहीच आपल्या मनासारखं होत नाही याचं फ्रस्ट्रेशन आल्याने असं बोलत असतील? का आता बाकी काहीच बोलण्यासारखं नाही, त्यामुळे बुडत्याला हीच एक काडी दिसली. वेदना समजू शकतो.
तात्याच्या कृपेने कॅनडा कधी न्हवे इतका एकत्र येत आहे. त्यात आमचा पंतप्रधान फिस्कली कॉन्झर्वेटिव्ह असा लिबरल आहे. श्रूड आहे.

<< बाय्दवे, इन्फ्लेशन रेट जो गेल्या वर्षात ३च्या आसपास घुटमळत होता तो पांच महिन्यातच २.१ वर आलेला आहे. आहे कि नाहि गंम्मत..>>

फारच मजेशीर लिहिता बॉ तुम्ही. बायडेन आणि इन जनरल डेमोक्रॅटस काही फार चांगले एकोनॉमिस्ट आहेत असं आजीबातच म्हणणं नाही पण, टॅकोने पहिल्या टर्म मधे हागून ठेवलेल्या इकॉनॉमिला जरा स्वच्छ करुन इंफ्लेशन रेट २०२२ च्या मध्यापासूनच खाली येतोय. त्या डाउनवर्ड स्लोपवर खाली येणाऱ्या बोलचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न कल्ट ला शोभणारा असला तरी फार केविलवाणा आणि हास्यास्पद आहे.
तरी बरं, त्याच आर्टिकल मधे आणि इंफ्लेशन संदर्भातील सर्व आर्टिकल्स मधे टॅको च्या टेरिफ मुळे खाली येत असलेला रेट वरती जाण्याचीच भिती व्यक्त केली जातेय पण एकदा डोळ्याला झापड बांधलं की नागड्या राजाचंही कौतुकच करावं लागतं
IMG_5053.jpeg

आणि डाउनवर्ड स्पेल २.९ वरुन २.३ झाला ही गंमत लेव्हलची बिगेस्ट अचीवमेंट सांगायला लागण्याची गरज पडू लागली आहे यातच काय ते समजा! बरं हे सगळं चिकन आऊट केल्यावर हो! म्हणजे पॉलिसी बदल सगळे चिकन्ड आऊट केले किंवा करायला लावले. मग हा तब्बल शून्य पूर्णांक पाच ते शून्य पूर्णांक सहा दशांशचा फरक पडला तो कशाने? सूज्ञांना कळलंच असेल. Wink

बाकी, आता हेल्थकेअर हा मुद्दा राहिलाच नाही का हो? गेल्या चार महिन्यांत माझ्यातरी वाचनात अमेरिकन लोकांना ज्याची सर्वाधिक गरज आहे त्या हेल्थ पॉलिसीचा ब्र ही कोणी उच्चारलेला मला आठवत नाही.

कशाला लागते हेल्थकेअर? वॅक्सिन्स बंद केले की आपोआप MAHAहेल्दी होणार आहेत लोक, बघालच तुम्ही!

वॅक्सिन्स बंद केले की आपोआप MAHAहेल्दी होणार आहेत लोक >> Lol आमच्याकडे दर दोन दिवसांआड काऊंटीकडून अलार्म येतोय कि अमक्या अमक्या ठिकाणी मीसल एक्स्पोसर झाले होते वगैरे. Sad

ती MAHA रिपोर्टची गम्मत वाचली का ? जे सोर्सेस कोट केले आहेत त्यांनी आमचे हे कंक्लूजन नव्हते असे सरळ सरळ डिक्लेअर केले आहे. सोर्सेस उचलायचे ते सुद्धा व्हॅलिडेट करायची अक्कल नाहील्नि देश चालवायला निघाले आहेत, असे नग भरले आहेत.

फेमा बंद करायला निघाले नि हरीकेन सीझन जवळ आला तसा एकदम साक्षात्कार झाला कि फेमाची गरज लागणार ! खरच काय लावून येतात हे लोक ?

अल्बर्टा सेपरेट झालं की तुमचे प्रश्न आपोआप सुटणारेत. वाचलंत ना वर!

बाकी जनरेटिव्ह एआय वापरुन तुमचा देश चालतो. Lol आमची कंपनी (तरी अमेरिकनच आहे) उगाच जनरेटिव्ह एआय वापरायच्या आधी हे करा आणि ते करा आम्हाला शिकवत बसते.
इतके स्लॉपी रेफरंसेस आणि लिंक असत्या तर आमच्या मास्तरनी डेझर्टेशन वाचलं पण नसतं, सरळ फेकुनच दिलं असतं. Lol

इंफ्लेशन रेट बद्दल -
२०२१ ७
२०२२ ६.५
२०२३ ३.४
२०२४ २.९
२०२५ २.३
जाने २०, २०२१- जाने २०, २०२५ ही बायडेन ची टर्म होती. ट्रंप कडून मिळालेला ७ टक्क दर हा टर्म संपेपर्यंत २.९ वर थोडक्यात सांगायचे तर निम्म्यापेक्षा जास्त खाली आला.

Pages