निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.
शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!
एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.
सिग्नलगेट २.० मुळे हेगसेथ
सिग्नलगेट २.० मुळे हेगसेथ यांच्या अडचणीत वाढ.
सिग्नलचॅटमध्ये कुटुंबातील सदस्य?
फॉक्स अँकरचा वकुब तो काय! दोन
फॉक्स अँकरचा वकुब तो काय! दोन चार सैनिकांनी जीव गमवल्याशिवाय राजाला अक्कल येणार नाहीच. पेटगॉन मधले लीक्स आणि अंदाधुंद फायरिंग किती वेळ चालू रहातय आणि त्यात किती लोकांचा बळी जातोय ह्याची फक्त गम्मत बघायची.
जे जे गेले ते अर्थात डीईआय असणार यात शंकाच नाही.
होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरीची
होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरीची पर्स रेस्टॉरंट मध्ये जेवायला गेलेलं असताना चोरीला गेली. बरोबर किमान दोन सिक्रेट सर्विस एजंट होते. पर्स मध्ये ३००० कॅश ... हो कॅश... पासपोर्ट, क्रेडिट कार्ड, अॅक्सेस कार्ड इ. होतं.
डीईआय रे डीईआय... अरे पण ते तर केव्हाचेच फायर झाले ना? आता हे कोण बसवलेत?
आणि ३००० कॅश कोण घेऊन फिरतं! 
होम लँड सिक्युरिटी सेक्रेटरी...कॅबिनेट सेक्रेटरी...
होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरीची
जर्मन टीन्सना हवाईला फिरायला आलेले असताना हॉटेल बुकिंग न्हवतं म्हणून हिरवे जंप सूट, हातकड्या घालून रात्रभर क्रिमिनल्स सोबत तुरुंगात टाकून मग डीपोर्ट केलं.
परवा दोन अमेरिकन नागरिकांना असंच व्हरमाँटला अडकवुन ठेवलेलं, मग तुरुंगात टाकलेलं वाचलं.
अहो जर्मन टीन्स चं काय एवढं,
अहो जर्मन टीन्स चं काय एवढं, इथं एका यूएस बॉर्न सिटीझन टिनेजरला तो फक्त “अमेरिकन” दिसत नाही , त्याचं इंग्लिश तेवढं चांगलं नसल्यामुळे विकेंड जेल मधे काढावा लागला, बर्थ सर्टिफिकेट दाखवून सुद्धा!!
अमेरिकन बॉर्न यूएस सिटीझन किड!!!
अर्थात तात्याचे समर्थक म्हणतीलच की सुक्याबरोबर ओलं जळणारच, वगैरे. आणि मागे शेंडे म्हणलेलेच ना कि सतत कागदपत्र बरोबर बाळगायला काहीच हरकत नाही, जर तुम्ही “अमेरिकन” दिसत नसाल तर… अर्थात ह्या मुलाच्या बाबतीत कागदपत्र दाखवून पण काही उपयोग झाला नाही म्हणा.…
<<<<एका यूएस बॉर्न सिटीझन
<<<<एका यूएस बॉर्न सिटीझन टिनेजरला तो फक्त “अमेरिकन” दिसत नाही , त्याचं इंग्लिश तेवढं चांगलं नसल्यामुळे विकेंड जेल मधे काढावा लागला, बर्थ सर्टिफिकेट दाखवून सुद्धा!!>>>>
फार हताश वाटले वाचुन.
विनायक, हे तर ट्रॅफिक स्टॉपला
विनायक, हे तर ट्रॅफिक स्टॉपला झालेलं दिसतंय की!
म्हणजे बॉर्डर बिरडर काही नाही. दिवसा ढवळ्या जॉर्जिया मध्ये! गमतीदार आहे हे. 
>>> विकेंड जेल मधे काढावा
>>> विकेंड जेल मधे काढावा लागला, बर्थ सर्टिफिकेट दाखवून सुद्धा
याचा अर्थ एकटा राजा माथेफिरू नाही, त्याचे ग्राउंड सोल्जर्सही तेवढेच माथेफिरू आहेत . THAT is the scary part!
सत्तेचा गैरवापर करण्यास
सत्तेचा गैरवापर करण्यास चिथावलं/ करणाऱ्यांना मोकळं सोडलं की आपण खरं कुठे आहोत हे कळतं.
दिसण्यावरुन/ पोषाखावरुन बीफ
दिसण्यावरुन/ पोषाखावरुन बीफ असल्याची खात्री, मॉब लिंचिंग, जनेतेच्या दरबारात त्वरित न्याय असे प्रकार भारतात अजिबातच नवीन नाहीत. अमेरिकेत कोर्टाचे ऐकायचे नाही, अगदी सुकोचे ही ऐकायचे नाही आता लोकांच्या गळी उतरलंच आहे. आता कोर्टाची गरज तरी काय.. आपणच निवाडा करुन टाकू प्रकारची केस व्हायला अजुन किती दिवस जावे लागतील? पहिला बळी लॅटिनो असेल, ब्लॅक असेल, ब्राउन स्किन असेल, अरब असेल का ज्यू? अजुन १०० दिवसही झाले नाहीत तो ही तर्हा. अमेरिका ग्रेट म्हणजे स्लेवरी टाईम इतकी ग्रेट होणार दिसतंय.
हो - राजा स्वतःच व्हाइट
हो - राजा स्वतःच व्हाइट हाऊसमध्ये दुसर्या देशाच्या प्रेसिडेन्टशेजारी बसून आपल्याच सुप्रीम कोर्टाचं हसं करतो. शेम!
गैरसमजाचे आणखी एक प्रकरण,
गैरसमजाचे आणखी एक प्रकरण, निष्पाप ?? मनुष्य अपहरणाच्या आरोपाखाली आता दोन आठवड्यांपासून तुरुंगात.
https://youtu.be/slKPTcT_1fM?si=2b1gIvSTv1dLb2lW
ओहो तिकडेही वेगळं दिसण्यावरून
ओहो तिकडेही वेगळं दिसण्यावरून जेल चालु झाले का..
आता बुलडोजर समर्थक हात वर करा.. कारण लवकरच ट्रम्प ही आयडीयाही चोरणार हे नक्की.
>>मनुष्य अपहरणाच्या आरोपाखाली
>>मनुष्य अपहरणाच्या आरोपाखाली आता दोन आठवड्यांपासून तुरुंगात.<<
थोडा पेशंस ठेवा. पटेलच्या अॅटर्नीने पब्लिश केलेला विडियो एडिटेड आहे, पुलिसांच्या मते. लेट द पुलिस कंप्लीट देर इन्वेस्टिगेशन. ट्रुथ विल कम आउट इन ड्यु कोर्स..
आणि मनुष्य अपहरण नाहि, माय्नरच्या अपहरणाचा चार्ज लावला आहे. व्हेन माय्नर अॅब्डक्शन इज चार्ज्ड इन अमेरिका, इट कॅनॉट बि रिवर्स्ड बाय लोकल ऑथारिटिज अंटिल ए ट्रायल इन कोर्ट. फेडरल लॉ आहे..
फियरमाँगरिंग प्लीज थांबवा...
>>> फियरमाँगरिंग प्लीज थांबवा
>>> फियरमाँगरिंग प्लीज थांबवा
गरजच उरलेली नाही त्याची! तुमचा राजा ते पुरेसं करतो आहे!
१८ मार्च रोजी वॉलमार्ट ( Cobb
१८ मार्च रोजी वॉलमार्ट ( Cobb county, Acwarth, Georgia ) मधे घड्लेली घटना आहे. महिलेने लहानग्याच्या अपहरणाची तक्रार केल्यानंतर ३ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर पोलीसांनी आरोपीला शिताफीने अटक केली. तपासकार्यात पोलीसांनी अत्याधुनिक FLOCK ( आणि सर्विलन्स ) कॅमेराचा आधार घेतला.
https://www.11alive.com/article/news/crime/man-accused-trying-to-snatch-...
अशीच बातमी fox5atlanta वर बघायला मिळते.
https://www.fox5atlanta.com/news/kidnapping-attempt-thwarted-acworth-wal...
अटक करायला तब्बल तिन दिवस का लागले ?
महेंद्र पटेल दोषी असतील तर
महेंद्र पटेल दोषी असतील तर कारवाई करायलाच हवी. नवा व्हिडिओ जो आता बाहेर आलेला आहे तो पोलीसांना आधी मिळाला नव्हता का? ५६ वर्षाचे महेंद्र पटेल वरिल व्हिडीओ मधे पळून जातांना दिसत नाही.
https://youtu.be/YtXaMxZ4Lrw?si=6FAJiMDJ-tA_iG-G
>>महेंद्र पटेल दोषी असतील तर
>>महेंद्र पटेल दोषी असतील तर कारवाई करायलाच हवी.<<
मला वाटतंय कि पटेल यांचा किड्नॅपिंगचा उद्देश न्हवता/नसावा. पण देसी लोकांच्या बाबतीत बर्याचदा असं होतं कि नकळत लाइन क्रॉस केली जाते, विशेषतः एफओबीज कडुन. या घटनेत त्या बाईने (केरलाय्न मिलर) अतिशयोक्ती केल्याची शक्यताहि नाकारता येत नाहि. परंतु कायदा तिच्या बाजुने असल्याने पटेलकाका काउंटि जेलमधे अजुन आहेत..
साधारण अशाच प्रकारची एक घटना काहि वर्षांपुर्वि अॅलबामा मधे घडली होती. त्यावर इथे एक धागा होता असं आठवतंय. असो...
रेअर अर्थ मॅग्नेट्स कमी
रेअर अर्थ मॅग्नेट्स कमी पडतायत टेस्लाला! अय्या! आता हो?!
आमची गरज नाही तुम्हाला तेव्हा
आमची गरज नाही तुम्हाला तेव्हा इकडे बघूच नका. खोदा पहाड आता....
आमच्याकडे ते आहे.
कॅनडाकडे ते आहे- हे अगदी गुप्त ठेवा. सर्वांना सांगू नका, please.
काखेत कळसा गावाला वळसा.
फॉक्स न्यूज अॅंकरला पेंटॅगॉन
फॉक्स न्यूज अॅंकरला पेंटॅगॉन मध्ये बसवलं की तो तिकडे टॅक्सपेअर्सच्या पैशातून मेकप स्टुडिओ बनवतो. टीव्ही अपिअरंसेस साठी.
इथे कोणीतरी उषःकाल झाला
इथे कोणीतरी उषःकाल झाला म्हणाल्याचं आठवतं. माझे तर बॉ डोळे दिपलेत ऑलरेडी!
सो मच विनिंग! सो क्विकली अॅन्ड बिगली!
मेकिंग ऑफ अ बनाना रिपब्लिक:
मेकिंग ऑफ अ बनाना रिपब्लिक:
इमिग्रेशन अजेंडा फॉलो केला नाही, म्हणून ट्रंपने काय करावं? मिल्वाकी जजलाच कोर्टरुम मध्ये अरेस्ट केलं.
तात्या आमच्या देशातल्या
तात्या आमच्या देशातल्या घटनेबद्दल बोलताहेत, म्हणून इथे विचारायला आलो हो.
याचा अर्थ कोणी समजावून सांगेल का?
हजार वर्षांपूर्वी पाकिस्तान
हजार वर्षांपूर्वी पाकिस्तान होते कुठे? अजून शंभर वर्षे पण नाही झाली पाकिस्तान अस्तित्वात येऊन!
भारतीयांनी पाष्चिमात्य देशातल्या कुणाच्याहि बोलण्याकडे लक्ष देऊ नये. अत्यंत मूर्ख लोक, त्यांना भारताबद्दल काहीहि माहित नाही, उगाच शहाणपणा दाखवायला जातात.
विशेषतः चीन नि भारत दोन्ही देशांनी एव्हढी प्रगति केली आहे त्यामुळे पाष्चिमात्य जळतात. म्हणून काहीतरी वाइट बोलायचे त्यांच्याबद्दल.
आता भारतात मुस्लिमांच्या विरुद्ध काही झाले तर हा त्रंप्या काय म्हणेल?
मेकिंग ऑफ अ बनाना रिपब्लिक:
मेकिंग ऑफ अ बनाना रिपब्लिक:
ओक्लाहोमा मध्ये आईसने घरावर रेड टाकली. वॉरंट घेऊन वीस आईस एजंट्स घरात घुसले. घरात आई आणि तिच्या मुली होत्या. सगळे अमेरिकन नागरिक आहेत. आईसकडे घरावरचा वॉरंट होता. गन पॉईंटवर मायनर मुलींना अंतरवस्त्रांत घराबाहेर काढलं. बाहेर पाऊस पडत होता. त्यांचे फोन्स, लॅपटॉप्स, लाईफ सेविंग्स, जवळची सगळी कॅश सगळं घेऊन गेले. त्या बाईकडे मुलांना खायला द्यायला, कार मध्ये गॅस भरायला ही काही साधन ठेवलं नाही. ती नुकतीच मेरिलँडवरुन ओक्लाहोमाला मूव्ह झाली होती. कदाचित पूर्वी जो अपार्टमेंट मध्ये रहात असेल त्याच्या नावावर वॉरंट असेल. ती वारंवार सांगत होती की हे आम्ही नाही, आम्ही सिटिझन आहोत. मायनर मुलींना अंडरवेअर वर घराबाहेर काढताहेत तर हे किडनॅपर तर नाहीत असे प्रश्न तिला पडले. तिच्याकडे गन असती तर काय झालं असतं विचारही करवत नाही.
तिचा नवरा मेरिलॅंड मधली सारवासारव करुन या वीकेंडला येणार होता. काय ट्रॉमटाईज्ड असतील!
इतकं होऊन आईस म्हणतं आम्हाला काही माहित नाही, आमचे एजंट गेलेच न्हवते.
घृणास्पद आहे अमेरिका आणि तिकडचे नियम किंवा नसलेले नियम!
अमितव
अमितव
तुमच्याकडे माहौल कसा आहे?
बाप रे!
बाप रे!
बातमी वाचून मला खरंच शंका आली की आइसच्या नावाखाली कोणी चोर येऊन गेले की काय! एविडन्स म्हणून कॅश कशाला नेतील?
आमच्याकडे ट्रंप कृपेने
आमच्याकडे ट्रंप कृपेने कॉन्झर्वेटिव्ह निवडून न येता लिबरल सरकार आलं आहे. पुढची चार वर्षे तरी ल्युनटिक लोक वाताहात करू शकणार नाहीत. सध्यातरी अमेरिका आणि अमेरिकन मालावर बहिष्कार असं उत्तम चालू आहे.
Pages