डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीय आणि इतर आशियाई लोकांना नोकर्^या देऊ नका..... गूगल, मायक्रोसॉफ्ट इ. दिग्गजांना तात्यासाहेबांची चेतावनी
५६ इंच अन मागा भाई भाई

बिच्चारे शेंडेनक्षत्र! बेकायदेशीर घुसखोरांना हाकलले या पलीकडे त्यांना एकहि चांगली गोष्ट आठवत नाही ट्रंपची.
अहो त्रंप द्वेष्टा कशाला असायला पाहिजे? हजरो लोकांचे मेडिकेड काढले, टेरिफ च्या धरसोड धोरणामुळे उद्योगधंद्यांत आलेली अस्वस्थता, श्रीमंतांचा कर कमी करून देशावरचे कर्ज वाढवले. या गोष्टींबद्दल काहीच लिहीत नाहीत.
शंभर वेळा विचारले की देशावरचे कर्ज वाढवून श्रीमंतांचे कर कमी करणे हे चांगले कसे याचे उत्तर नाहीच, सगळ्या त्रंपने नेमलेल्या लोकांची इज्जत काढतात रोज काँग्रेसमधे, त्याबद्दल का बोलत नाहीत?

<<<भारतीय आणि इतर आशियाई लोकांना नोकर्^या देऊ नका..... गूगल, मायक्रोसॉफ्ट इ. दिग्गजांना तात्यासाहेबांची चेतावनी
५६ इंच अन मागा भाई भाई>>

गेले खड्ड्यात गूगल नि मायक्रोसॉफ्ट. जगात इतर अनेक देश नि हुषार लोक आहेत. गूगल नि मायक्रोसॉफ्ट ऐवजी काहीतरी दुसरे करतील. भारतीय लोकांना नोकर्‍या दिल्या नाहीत तर या सगळ्या मोठ्या कंपन्या तून मिळणारा पैसा बंद होईल नि मग अमेरिकेत यायची गरज नाही! भरतातच आजकाल तंत्रज्ञान सुधारते आहे.

कोण म्हणतय एशिअन लोकांना नोकर्‍या देऊ नका? आमचा अर्धा पाय गेला मसणात. आमच्या मुलांना तरी या देशात सुखाने जगू द्या Sad

गल्ली चुकली - क्षमस्व.
सांगा ना - श्रीमंतावरील कर कमी करून देशावरचे कर्ज वाढवायचे नि अधिकाधिक लोकांना गरीब करायचे? अशासाठी का सरकार असते?

अलिगेटर अलकात्राज बद्दल अभिमानाने बोलणारे इथे कोणी असेल असं वाटलं नव्हतं.
भयंकर आहे जे चाललं आहे ते.
मी पाहिलेला देश हाच का? का आपलं ह्या देशाबद्दलच आणि जगाबद्दलच आकलन कमी असल्यानं आपल्याला तेव्हा फक्त चांगली बाजू दिसलेली हा प्रश्न पडतो.
(अर्थात वरवरच जगणं , जगण्याचे स्टिरिओटाईप ,कॉर्पोरेट्सचा जगण्यावरचा कंट्रोल तेव्हाही जाणवलेला होता)

खरच स्मार्टफोनन जगाची वाट लावून ठेवली आहे. माकडाच्या हातात कोलीत. ते नसते तर पोलरायजेशन इतकं झालं नसतं जगभरात असं वाटतं.

अलिगेटर अल्कट्राझ हा तुरुंग कायदा मोडणार्या घुसखोरांसाठी आहे. त्याचे मला कौतुक आहे. का? कारण अमेरिकेत कुठलेही कागदपत्र न दाखवता बिनदिक्कत घुसणे, अमेरिकन करदात्यांचा पाहुणचार झोडणे, न्यू यॉर्क सारख्या महागड्या शहरात उत्तम हॉटेलात रहाणे, खाणे याची फुकट सोय, नंतर सवड मिळाली चोर्या मार्या करणे, जास्त इच्छा झाली तर बलात्कार आणि खून करणे (आठवा लेकन रायली) असे कार्यक्रम बिनबोभाट चालू होते. आता असे खपवून घेतले जाणार नाही आणि आपल्याला खास तुरुंगात डांबले जाईल असा संदेश गेल्यामुळे बेकायदा घुसखोरी तितकीशी लोकप्रिय रहाणार नाही! आमच्या सारखे समस्त कायदे पाळून, अनेक वर्षे रांगेत उभे राहून (आलंकारिक अर्थाने), विविध कागदपत्रे, बोटाचे ठसे, मुलाखती वगैरे सोपस्कार करून ग्रीन कार्ड, नागरिकत्व मिळवतात त्यांना तरी अशा घुसखोरांवर एक जालीम उपाय आहे ह्याचे समाधान आहे.

ट्रंपने भारतीयांना घेऊ नका असा आक्रोश फक्त आणि फक्त भारतीय माध्यमे गळा काढून करत आहेत. बाकी कुठल्या माध्यमात अशी हेडलाईन नाही.
ट्रंप म्हणाला जेव्हा नोकरी द्यायची असेल तेव्हा अमेरिकन लोकांना प्राधान्य द्या. भारतीय आणि अन्य लोकांना देऊ नका.
ट्रंपला कोणी निवडून दिले? अमेरिकन लोकांनी. ट्रंप कोणाचे भले करण्याचे आश्वासन देत सत्तेवर आला अमेरिकन लोकांचे.
अशा सूचनेमुळे कुणाचे भले होणार आहे? अमेरिकन लोकांचे.
तेव्हा एक अमेरिकन अध्यक्ष या नात्याने तो योग्य बोलला आहे.
पाव्हण्याशी कितीही मैत्री असली तरी घरच्या लोकांना उपासमार घडवून पाहुण्याला पंचपक्वान्नेयुक्त मेजवानी देणे अयोग्य आहे.

ट्रंपने फक्त घुसखोरी थांबवली असे आजिबात नाही. अनेक चांगली कामे करत आहे. केली आहेत.

अनेक निरर्थक खर्च करणारे सरकारी विभाग बंद केले आणि अनेकांच्या खर्चाला चाप लावला आहे. कुठल्याशा गाझा शहरातील लोकांच्या कंडोमसाठी लक्षावधी डॉलर उधळणे, कुठल्यातरी देशात ट्रान्स लोकांच्या नाटक बसवण्याकरता लक्षावधी डॉल्रर ओतणे वगैरे प्रकार बंद केले.

LGBTQA+/*!@#$%^&*() अशा कुठल्याशा आद्याक्षरांच्या नावाखाली समाजात एक विकृत खूळ बळावत चालले होते त्याला ट्रंपने आटोक्यात आणले. कुणीही पुरुष लिपस्टिक लावून, स्कर्ट नेसून बाई बनतो आणि बायकांच्या खेळात घुसून अनेक पदके मिळवतो . बॉक्सिंग वगैरे हाणामारीच्या क्षेत्रात खरोखरच्या बायकांना पार चेंदामेंदा होईतो मारतो आणि सगळे जग ह्याचे लैंगिक स्वातंत्र्याचा आविष्कार म्हणून टाळ्या पिटून कौतुक करतात.
हा आचरटपणा ट्रंपने बंद केला आहे. सत्तेवर येताच आमचे हे धोरण आहे की फक्त दोन लिंगे मानली जातील. स्त्री आणि पुरुष, बस्स!

इराणला धडा शिकवला आहे.

डीपस्टेट ह्या पडद्याआडून धोरणे ठरवण्याचा भयंकर प्रकार काही प्रमाणात कमी केला आहे.

रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास युद्ध थांबवायचे प्रयत्न केले आणि त्यात अद्याप यश आलेले नाही.

पण तरी बरीच मिळकत आहे.

<रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास युद्ध थांबवायचे प्रयत्न केले आणि त्यात अद्याप यश आलेले नाही.>

भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं , ते राहिलं बघा.

श्रीमंत लोकांना सवलती देणे म्हणजे वाईट असा एक समज आहे. श्रीमंत लोक हे आपला पैसा परसात खड्डा खणून पुरुन ठेवत नाहीत किंवा गादी उसवून त्यात नोटा भरून साठवत नाहीत. ते एक तर स्वतः उद्योग चालवत असतात किंवा स्टॉक आणि अन्य उद्योगात ते आपला पैसा गुंतवतात. अशा प्रकारे त्यांचे कर कमी करून त्यांना दिलेला जास्तीचा पैसा हा अर्थव्यवस्थेत येऊन उद्योग वाढतील, सामान्य लोकांना रोजगार मिळेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विचार आहे.
डेमोक्रॅट मंडळी निरर्थक युद्धावर अब्जावधी डॉलर खर्च करत होते, बेकायदा घुसखोरांना पाहुणचारासाठी पैसे ओतत होते, त्या नावाखाली अनेक भ्रष्ट डेमोक्रॅट आपले उखळ पांढरे करत होते. रॉबिन हूड सारखे श्रीमंत लोकांना अफाट कर लावून लुटणे आणि ते पैसे (वरकरणी) गरीबांना वाटणे यातून समाजाची भरभराट होते असा डेमोक्रॅट, सोशलिस्ट लोकांचा विचार आहे.
तात्पर्य: ज्याला जो विचार योग्य वाटतो त्या पद्धतीने ते सरकारी पैसे वापरतात.

>>
भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं , ते राहिलं बघा.
<<
अरे हो. ते राहिलेच. थॅक्यू!

झक्की वाईट पेटलेत.

नशीब, ते त्यांच्या मूळ देशातील राजकारणावर फारसे काही म्हणत नाहीत

Proud

<<<कायदे पाळून, अनेक वर्षे रांगेत उभे राहून (आलंकारिक अर्थाने), विविध कागदपत्रे, बोटाचे ठसे, मुलाखती वगैरे सोपस्कार करून ग्रीन कार्ड, नागरिकत्व मिळवतात त्यांना तरी अशा घुसखोरांवर एक जालीम उपाय आहे ह्याचे समाधान आहे.>>>
अहो तुम्ही या बेकायदेशीरपणे घुसलेल्या लोकांसारखे खूप खूप कमी पैशात जास्त प्रमाणिकपणे कामे करत नाही.
त्या बेकायदेशीरपणे घुसलेल्या लोकांचा फायदा सर्वसामान्य नागरिकांपासून मोठमोठ्या शेतकर्‍यांना, गुरांचा कत्तलखाना चालविणारे यांना होतो, म्हणून बरेच लोक त्यांच्या बाजूने बोलतात.
नाहीतर बेकायदेशीरपणे घुसणारे लोक कुणाला आवडतील?
वरंवार मोठमोठे शेतकरी सांगताहेत की अमरिकन तरुण नागरिक शेतात एव्हढे कष्ट करायलाच तयार नाहीत. त्या ऐवजी ते अंमली पदार्थ घेऊन त्रंपच्या सभांना जातात नि संसदगृहावर हला करतात! म्हणून मग इथल्याच लोकांना ते बेकायदेशीरपणे घुसलेले लोक चालतात. तसेहि नागरिक असलेले काळे नि गोरे काय कमी गुन्हे करतात?
ओक्लाहोमात अल्फ्रेड मरे बिल्डिंगवर बॉम्ब टाकणारा टिमोथि मॅक्व्हे, उनबाँबर, एप्स्टाईन हे काय बेकायदेशीरपणे घुसलेले लोक होते का? उगीच काहीतरी. ढोंगीपणा नुसता.
त्रंप हुषार. काहीतरी निमित्त काढून लोकांना भडकावयाचे. लोक तर मूर्खच. नि हे आत्ताच नाही १९६० सालापासून. म्हणून तर भारतीयांचे येणे इथे वाढले, कारण काही झाले तरी धंदा चालवायला अक्कलवान लोकच लागतात - तिथे नुसते white supremacist असून पुरत नाही!

<<<उद्योगात ते आपला पैसा गुंतवतात. अशा प्रकारे त्यांचे कर कमी करून त्यांना दिलेला जास्तीचा पैसा हा अर्थव्यवस्थेत येऊन उद्योग वाढतील, सामान्य लोकांना रोजगार मिळेल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा विचार आहे.>>
थेअरीमध्ये खरे आहे हे. पण प्रत्यक्षात ग्लोबलायझेशन झाले नि सगळे वाचवलेले कर इतर देशात गुंतवुन अमेरिकन लोकांच्या नोकर्‍या घालवल्या.
पैसे वाचवायचे म्हणून Y2K साठी भारतातून प्रोग्रामर्स आणले. अमेरिकेत नव्हते का? पण तसले खालच्या दर्जाचे काम करायला अमेरिकन लोकांना पगार देणे महाग पडले असते.

<>
हे चांगलेच केले,
<<<
रॉबिन हूड सारखे श्रीमंत लोकांना अफाट कर लावून लुटणे आणि ते पैसे (वरकरणी) गरीबांना वाटणे यातून समाजाची भरभराट होते असा डेमोक्रॅट, सोशलिस्ट लोकांचा विचार आहे.>>>
असे कुणि सांगितले? तो पैसा शिक्षण, हेल्थकेअर यासाठी वापरायचा असे आहे.
पण ते सर्व प्रगत समाजांत - अमेरिकेत नाही. इथे अजून जंगली लोक आहेत - हाणा मारा, मी, मला द्या, नाहीतर तुला मारून मी घेईन असे चालते इथे. त्याला अमेरिकन individualism, capitalist system , असे म्हणायचे.
कर्ज वाढवून त्यांचे कर कमी कशाला? जर सगळे लोक सुखवस्तू असते, शिक्षण, हेल्थकेअर व्यवस्थित असते, देशावर कर्ज नसते तर मग सगळ्यांचेच कर कमी करा! पण तसे नाहीये म्हणून लोक बोंबलतात. फुक्कट व्याजापोटी जे पैसे जातात, त्या पैशाचा उपयोग इतरत्र करता आला असता.

अमेरिकन काम करत नाहीत म्हणून नाईलाजाने बेकायदा घुसखोर आणावे लागतात ही एक लंगडी आणि खोटारडी सबब आहे. मुळात कोट्यावधी घुसखोर आणावेत इतके प्रचंड शेतीचे उत्पन्न नाही. दरवर्षी लाखाने बेकायदेशीर घुसखोर आयात करावे लागतील इतके बंपर पीक येते याला काहीही पुरावा नाही.
वेठबिगार बनून स्वस्तात काम करणारे मजूर हवेत म्हणून बेकायदा घुसखोरी चांगली ह्यात आणि काळे गुलाम स्वस्त पडतात म्हणून अफ्रिकेतून ते आयात करावेत यात तत्त्वतः काही फरक नाही. दोन्ही विचार निंदनीय आहेत.

>>
ओक्लाहोमात अल्फ्रेड मरे बिल्डिंगवर बॉम्ब टाकणारा टिमोथि मॅक्व्हे, उनबाँबर, एप्स्टाईन हे काय बेकायदेशीरपणे घुसलेले लोक होते का? उगीच काहीतरी. ढोंगीपणा नुसता.
<<
टिमथी मॅक्वे वगैरे अस्सल अमेरिकन गुन्हेगार विविध पापे करत आहेत म्हणून कोट्यावधी बेकायदा घुसखोर इमिग्रेशन कायदे धाब्यावर बसवून अमेरिकेत घुसले तरी काही बिघडत नाही यामागची विद्वत्तापूर्ण, अभ्यासू मांडणी जरा विस्ताराने मांडलीत तर बरे होईल.
माझा हिशेब असा आहे की इतके गुन्हेगार अमेरिकेत असतील तर आणखी गुन्हेगार आयात का करायचे?
कारचे एक टायर फुटले आहे तर मग विंडशील्डही फुटले तर काय बिघडले, घरात मायक्रोवेव्ह बिघडला आहे मग डिशवॉशर बिघडला तर काय हरकत आहे ? अशा प्रकारची मांडणी वाटते आहे.
यामागे काहीतरी सखोल, प्रगल्भ, गहन विचार आहे यात शंकाच नाही. पण जरा उलगडून सांगा आजोबा!

<<<ट्रंप म्हणाला जेव्हा नोकरी द्यायची असेल तेव्हा अमेरिकन लोकांना प्राधान्य द्या. भारतीय आणि अन्य लोकांना देऊ नका.
ट्रंपला कोणी निवडून दिले? अमेरिकन लोकांनी. ट्रंप कोणाचे भले करण्याचे आश्वासन देत सत्तेवर आला अमेरिकन लोकांचे.
अशा सूचनेमुळे कुणाचे भले होणार आहे? अमेरिकन लोकांचे.>>
अगदी खरे.
दुर्दैवाने तितकी अक्कलवंत माणसे इथे नाहीत. औषधांचे भाव १००० टक्क्याने कमी करीन, नकाशावर रेघ मारली की इकडचे वादळ तिकडे जाईल असे समजणारी ही माणसे.
काही अमेरिकनांची कीव करू नका. अमेरिकेने जगाला भरपूर लुटले आहे, आता अमेरिकेला लोक लुटणारच - कारण मूर्ख लोक राज्य करतात इथे!

अहो बृहस्पती आजोबा, समस्त अमेरिकाला मूर्ख ठरवून आपण स्वतः बुद्धीमत्तेची सगळी मक्तेदारी घेतलीत ते छान केलेत. परंतु लोकशाहीत एका नागरिकाचे एक मत असते. आणि अशी मते जास्त संख्येने मिळवणारा अध्यक्ष बनतो. आपणासारख्या महा विद्वान मनुष्याचे मत लाख मतांइतके असावे असे आम्हालाही वाटते पण दुर्दैवाने अमेरिकन कायद्यात तशी तरतूद नाही. जर हे पटत नसेल तर आपण अन्य कुठल्या देशात प्रस्थान करा जिथे आपल्यासारखे प्रकांडपंडित मोठ्या प्रमाणात आहेत.
बायडन होता तेव्हा अमेरिकेची कीव येत होती . पण ट्रंप आल्यामुळे तशी वाटत नाही.

<<<नशीब, ते त्यांच्या मूळ देशातील राजकारणावर फारसे काही म्हणत नाहीत>
सखेदपूर्वक कबूल करतो, की मूळ देशाचे सध्याचे राष्ट्रपति कोण आहेत, सध्या भारतात किती राज्ये आहेत? राहुल गांधी नि मोदी सोडून बाकीचे लोक आज कुठल्या पक्षात आहेत यातले मला काहीहि माहित नाही.
मी शेंडेनक्षत्र असतो तर भाजपने पहा कसा पटेलांचा भव्य पुतळा स्थापन केला, कित्ती चांगले मोदी! असे त्यांचे गुणगान करत बसलो असतो.

>>
मी शेंडेनक्षत्र असतो तर भाजपने पहा कसा पटेलांचा भव्य पुतळा स्थापन केला, कित्ती चांगले मोदी! असे त्यांचे गुणगान करत बसलो असतो.
<<
मी भाग्यवान आहे की आपण शेंडेनक्षत्र नाही आहात. ईश्वराचे आभार!
जाता जाता, मला पटेलांच्या पुतळ्याचे फारसे कौतुक नाही. इतर अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी मोदी आवडतात आणि अशाही गोष्टी आहेत ज्यासाठी मोदी नापसंत आहेत. पण पटेलांचा पुतळा ह्या कुठल्याही गोष्टीत येत नाही. ना जमा ना उणे. क्षमस्व!

<<दुर्दैवाने अमेरिकन कायद्यात तशी तरतूद नाही. जर हे पटत नसेल तर आपण अन्य कुठल्या देशात प्रस्थान करा >>
अहो असे एकदम देशाबाहेर का हाकलता?
आपापले मत मांडणे अजून शक्य आहे ना अमेरिकेत? का तुमच्या अमेरिकेत नाही? आमच्या अमेरिकेत सध्या तरी आहे .
अजून चार वर्षात काय काय होईल सांगता येत नाही.
तेव्हढी काँग्रेस बरखास्त करा, नाहीतरी त्यांचा काहीच उपयोग नाही त्रंपला. - खूप पैसे वाचतील.

नशीब, एल साल्वाडोरला पाठवत नाही आहात!
आता मला कायम भीति की एक दिवस तुम्ही मास्क लावून मला उचलून न्याल. तसे काही कुणाचे बिघडणार नाही, पण तुम्हाला शिव्या द्यायला एक जण कमी.

>>
आपापले मत मांडणे अजून शक्य आहे ना अमेरिकेत? का तुमच्या अमेरिकेत नाही? आमच्या अमेरिकेत सध्या तरी आहे .
अजून चार वर्षात काय काय होईल सांगता येत नाही.
<<
इतका कांगावा कशाला करता? तुम्ही असे मत मांडले आहे की समस्त अमेरिकन मूर्ख आहेत तुम्हीच तेवढे विद्वान, प्रकांडपंडित त्यावर मी माझे मत मांडले बरं का. की अशा मूर्खाच्या नंदनवनात आपणासारखे महा विद्वान का बरे राहत आहेत ? अन्य कुठल्या देशी जिथे आपल्या सारख्या कुशाग्र बृहस्पतींची वर्दळ आहे अशा जागी प्रस्थान करा. ह्याला सूचना म्हणतात, किंवा आधुनिक मराठीत सजेशन! हा सरकारी आदेश वगैरे काही नाही आजोबा!
मी काँग्रेस बरखास्त करू शकतो, मी कुठल्याही लोकांना एल् साल्वादोरला पाठवू शकतो असे आपणास का वाटते आहे?
बरं ते, टिमथी मॅक्वेने १९९५ की कधीतरी बाँब फोडून लोक मारले म्हणून आता कोट्यावधी घुसखोरांनी अमेरिकेत शिरकाव करून हवे तितके गुन्हे केले तरी काही बिघडत नाही हे विधान जरा तपशीलात जाऊन उलगडून सांगणार ना?

ग्रॉस रेसिझमचे सारे हक्क राखीव आहेत बरंं.....All rights reserved!! का बरं सारखी सारखी लोकं विसरतात?? Rofl

साउथ पार्कला स्यु करणार का? एफयु मनी मिळेल का अजुन? एफसीसीने अप्रुव्ह केलेलं मर्जर मागे घेता येतं का? Rofl
मज्जा मज्जा आहे.
करा नाहो प्लीज स्यु साउथ पार्कला! Rofl
मॅट स्टोन, ट्रे पार्कर आणि स्टिव्हन कोलबेअर! _/\_ Lol

ओरिजिनल ग्रिन कार्ड घेऊन फिरा लोकहो (असेल तर). नाहीतर जे काही वीसाचे लीगल प्रूफ असेल ते…माझ्या एका मित्राच्या फॅमिलीला न्यू मेक्सिको मधे एका नेशनल पार्क जवळ विचित्र अनुभव आला.

सॉफ्ट कॉपी दाखवून सुद्धा ओरिजिनल जवळ न बाळगल्यामुळे त्यांना अर्धा पाऊण तास डिटेन केलं होतं. ३० दिवस रिमांड देण्याची धमकी पण दिली.

त्याच वेळी व्हाईट लोकांना नुसतं हात वेव करून जाऊ देत होते… पण ते असो. रेशियल प्रोफायलिंग असण्याची शक्यता अजिबातच नाही. ते फक्त वरुन आलेले आदेश फॉलो करत होते. Proud

एक पेपर घेऊन जाणं का जड आहे विनायक तुला! कोट्यावधी घुसखोर रोज येत होते, त्यांना आळा घातला त्याचं काहीच नाही.
आता बॉर्न अमेरिकन आर्मी व्हेटरन गेला तीन दिवस तुमच्याच राज्याच्या आईस तुरुंगात. सिटिझन आहे सांगितलं तरी तीन दिवस ब्रश न करता, कपडे न बदलता, लीगल रिप्रेझेंटशन, फोन कॉल न करता त्याला रहाता येऊ नये? शेवटी काहीही चार्ज न लावता सोडुन दिलाच ना! मग? आर्मी व्हेटरन होऊन काय फायदा काय? ऑ?

अवांतर -
अनंत अनुभवांती हे हिस्पॅनिक्स गरीब जनता आहे असे लक्षात आलेले आहे. मात्र अमेरिकेतील चीनी लोक माजुर्डे वाटले. त्यांचा भारतियांबरोबर वागण्याचा अविर्भाव फार आगावपणाचा वाटला. आणि बरेचसे व्हाईट तर मुजोर आहेतच. काळे भयानक गुन्हेगारी वृत्तीचे वाटलेले आहेत. नाही म्हटले तरी हे अनुभव डोक्यात जाउन फिट्ट बसतातच. घाऊकमध्ये तिरस्कार करु नका हे थिअरीत ठिक आहे. मेंदूची उत्क्रांती दूधाने तोंड भाजले तरी ताक फुंकुन पिण्याचीच अजुनही आहे.

Pages