डॉनल्ड ट्रंप दुसरे पर्व!

Submitted by shendenaxatra on 16 January, 2025 - 23:08

निवडणुकीत खणखणीत विजय मिळवून ट्रंपसाहेब लवकरच अध्यक्षपदाची शपथ घेतील आणि राज्यकारभार सुरू करतील.
त्यांच्या मंत्रीमंडळातील अनेक नेमणूका प्रस्थापितांच्या पचनी न पडणार्‍या आहेत त्यामुळे किती लोकांना सिनेट मान्यता देते ते बघणे रोचक असेल.

शपथविधीला कोण जाणार, कोण आवर्जून टाळणार वगैरे अनेक गोष्टी मोठ्या बातम्या बनत आहे.
पदभार स्वीकारायच्या आधीच अनेक लोकांनी आपले अती पुरोगामी कार्यक्रम रद्द करून आपण नव्या राजाची पालखी उचलायला सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे. उदा. मेटाचा प्रमुख मार्क झुकरबर्ग.
हमासचे अतिरेकीही म्हणे ओलिस ठेवलेले ज्यू लोक सोडून द्यायला तयार झालेत. खरोखर तसे झाले तरच ते खरे मानावे लागेल. आता हे म्हातार्याच्या कुशल नेतृत्वाचा परिणाम की ट्रंपच्या सणसणीत धमकीला घाबरून हे होते आहे ह्यावरून अनेक रणकंदने होत आहेत.
कॅनडा, ग्रीनलंड, पनामा कालवा वगैरे अनेक नवनवीन तोंडीलावणी ट्रंपने उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यावरूनही कौतुक, टिंगल, टवाळी, टीका, आगपाखड वगैरे होत आहे.
एफ बी आयने डी ई आय विभाग टाळे लावून बंद केल्याचे घोषित केले आहे.
आमच्या कॅलिफोर्नियात लॉस अ‍ॅंजेलिस मधील अग्नितांडवावरून राजकारण, डी ई आय, वगैरे अनेक विषय चर्चेत येत आहेत.
लॉस अंजेलिसची महापौर बाई त्या आगी भडकायच्या वेळेस अफ्रिकेतील घाना नामक दूर कुठेतरी जाऊन बसली होती. अमेरिकन शहराच्या महापौराला अफ्रिकेत काय काम असते आणि करदात्यांच्या पैशाने ही बाई तिकडे का कडमडायला गेली होती हे अनाकलनीय आहे! तशात तुफान वारे येणार आहेत वगैरे पूर्वसूचना असताना त्याकडे दुर्लक्ष करून बाई घान्याला गेल्या. ट्रंप आणि त्याच्या सहकार्‍यांनी त्यावरही जोरदार ताशेरे ओढले आणि एक नवे रणकंदन सुरू जाहले!

एकंदरीत जोरदार सुरवात होत आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thank God!

>>Submitted by अमितव on 30 April, 2025 - 11:08>>
या आधी सिटीझन असलेल्या लोकांना 'चुकून' देश सोडा म्हणून सांगितले गेले ,
https://www.youtube.com/watch?v=zbSMcIDwdmg
आता ही पुढली पायरी (त्या पेक्षाही खालची पातळी?)
कायद्यानुसार खरे तर वॉरंटची कॉपी द्यावी लागते आणि काय घेवून गेले त्याची रिसीटही द्यावी लागते. पण बातमीनुसार असे काही झालेले दिसत नाही. https://www.youtube.com/watch?v=DUMJqz53YW0

मार्च महिन्यांत, अमेरिका भेट देणार्‍यांची ( US tourism) संख्या १०% ने रोडावली आहे. आता एप्रिल मधले आकडे लवकरच दिसतील. अमेरिकन अर्थव्यावस्था एव्हढी मजबूत आहे कि अशा चार दोन बिलियन डॉलर्सच्या नुकसानीने खरचटणारही नाही.
https://www.cnbc.com/2025/04/23/international-tourists-domestic-american...

सोयाबीन चे काय झाले ? चीनने परत पाठविले . १४ बिलियन $ चा व्यावहार आहे.
https://www.wsj.com/finance/commodities-futures/u-s-farmers-face-steep-d...

कॅनडामधे नॉन अमेरिकन वस्तू विकत घेण्याकडे कल वाढत आहे. अमेरिकेत $$ गुंतवणूक करण्यापेक्षा युरोप / जपान / चीन/ भारत मधे जास्त स्वारस्य दाखवित आहे.

चीनच्या अध्यक्षाने टेरिफ लादल्यानंतर साधा फोनही केलेला नाही. ट्रम्प म्हणतो रोजच टेरिफवर चीनसोबत चर्चा होते, शी जिनपिंग ने फोन केला म्हणे.... "सर्व काही ट्रम्पच्या मनातला खेळ आहे... " ( चीनची मार्मिक प्रतिक्रिया ) .

स्कॉट बेसंट ( ट्रेझरी ) खाजगीमधे टेरिफ unsustainable आहे हे मान्य करत आहे. होम डेपो, वॉल्मार्ट, टारगेट च्या CEO लोकांनी शेल्फ रिकामे रहातील एव्हढ्या कडक भाषेत वस्तूस्थिती मांडली आहे. राजहट्टापुढे शहाणपण टिकत नाही.

बेझोस ने टेरिफ ची कॉस्ट वेगळी दाखवू म्हटलं तर तात्याची तंतरली Proud लगेच लहान मुला सारखा आरडा ओरडा करून बंद करायला लावलं. कुलेड पायलेल्या मूर्ख समर्थकांसमोर टेरिफचं पितळ उघडं पडलं असतं.
बनाना रिपब्लिकची पुढची पायरी- प्रायव्हेट कंपन्यांना दमदाटी करून लोकांसमोर सत्य येऊ न देणे.

आता एनपीआर आणि पीबीएसचं फंडिंग जाणार.
अमेरिकेतील काय आवडायचं मध्ये पब्लिक रेडीओ, नॅशनल पार्क्स, लायब्ररी सिस्टिम, पब्लिक एज्युकेशन, विद्यापीठे, चेक्स अँड बॅलन्सेस आणि जर्नलिस्टिक आणि एकुणच फ्रिडम ऑफ स्पीच सगळंच १०० दिवसात गेलं की! आता काय राहिलंय आणखी जायचं?

नवीन Submitted by अमितव on 2 May, 2025 - 09:48 >> हेच मनात आले. पण हे होणारच होते. एनी वे, मागा लोकांना यातल्या कुठल्याच गोष्टीचे प्रेम नाही, किंमत नाही. त्यांच्या मते कित्ती उधळपट्टी थांबवली असेच आहे. ही मंडळी म्हणजे कल्टच अर्थात चेक- बॅलन्सचे वावडे गृहित धरायचे.
तात्या सगळ्यांना मिनिमलीस्ट करणार , २० बाहूल्यांऐवजी दोन बाहूल्या! Proud

वरच्या दोन पोस्टकर्त्यांना "स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे" यावर व्याख्यान ऐकवावे अशी मी संबंधितांना विनंती करतो.

बेझोस ने टेरिफ ची कॉस्ट वेगळी दाखवू म्हटलं तर तात्याची तंतरली Proud लगेच लहान मुला सारखा आरडा ओरडा करून बंद करायला लावलं.
Proud

<< तात्या सगळ्यांना मिनिमलीस्ट करणार , २० बाहूल्यांऐवजी दोन बाहूल्या! >>

----- लहानग्यांच्या बाहुल्या, तसेच मोठ्यांच्या गाड्या कमी होणे या गोष्टी पर्यावरणासाठी चांगल्याच आहेत. नाहीतर सर्वसाधारण अमेरिकन व्यक्ती (इतर देशांच्या तुलनेत ) २५ - ३० पटीने रिसोर्सेस वापरतात.

बिचारा मार्को रुबियो थकलेला दिसत आहे, हास्य नाहीच. आता तर acting NSA म्हणून पण काम बघावे लागणार आहे.

उदय, बरोबर आहे.
आता संत तुकारामासारखे रहायला शिका.
सोनेचांदी आम्हा मृत्तिकेसमान, पोटापुरता पसा पाहिजे, नको मिळाया पोळी.
कपडे तरी कशाला. लंगोट लाऊन रहायचे समर्थ रामदास स्वामींसारखे.
पुष्कळ लोकांवर आता तशीच वेळ येणार आहे म्हणा. आत्तापसून सराव करायला लागा.
हे सर्व पर्यावरणासाठी चांगले आहे.
तुम्ही कुठे रहाता हो? अमेरिकेत की तिबेटमध्ये?

'संत तुकाराम' पिच्चर बघितला नसेल तर बघुन घ्या लवकर. आता हॉलीवुडोत्तर पिक्चर डबल किमतीला बघायला लागणारेत तुम्हाला.
फारिन पिच्चर आहे हे ह्या पोप(टा) ला कसे समजणार? म्हणजे फक्त दोन सीन फारिनचे, पोस्ट प्रॉडक्शन फारिनचं, ते फारिनचाच मूव्ही. यात आता नक्की टेरिफ कोण कुठे कसा लावणार. असले प्रश्न विचारायचेच नाहीत. आता 'ट्रेन टू बुसान' ट्रेन टू शिकागो म्हणून बघुन टाकायचा.
आणि नेटफ्लिक्स आणि एचबीओचं काय? स्क्विड गेम्स, क्राऊन, मनी हाईस्ट, डाउनटन गेला बाजार आपली पंचायत ही तुमच्या नेफ्लि/ प्राईम वरुन उडेलच. अर्थात यातलं काहीच होणार नाही. कारण ही पोस्ट लिहिताना जितका विचार केलाय तितकाही ह्या निवर्तलेल्या पोपच्या कपड्यातील बुजगावण्याने केला नसेल. Proud मग लोकांनी प्रश्न विचारले की अचानक व्हाहाला (चीनने जसा फोन केलाच नाही तसेच) ७५ स्टुडिओ फोन करतील (म्हणजे करणारच नाहीत). आणि मग ३ महिन्यांसाठी सगळं बासनात जाईल. Lol

अहो मैत्रेयी,
तो असे म्हणतो म्हणजे त्याचा सध्याच्या constitution वर विश्वास नाही. त्यात due process, काळ्या माणसांची गुलामी नष्ट करा, वगैरे त्याच्या मार्गात अडथळे आणणारे अनेक प्रकार आहेत. त्याला स्वतःची वेगळी constitution करायची आहे, ज्यात अमेरिकेत फक्त गोर्‍या लोकांना रहायची परवानगी आहे. इतरांना यायचे असेल तर ५-१० मिलियन त्रंपला द्यायचे, त्रंपला नि त्याच्या वशंजांना तहाहयात राजा म्हणून नेमावे असे सगळे प्रकार हवे आहेत. त्याचे मागा वाले लोक याला तयार आहेत.
लगान सिनेमात पाहिले ना, भ्रिटिश लोक भारतीयांच्यावर थुंकतात, अन्याय करतात तरी भारतीय आपले ब्रिटिशांचे गुलाम होऊन रहातात. तसे हे सगळे मागा वाले भिकेला लागतील पण त्रंपला मते देतील.
ही त्याची ग्रेट अमेरिकेची व्यख्या आहे.

<<इथे कोणीतरी उषःकाल झाला म्हणाल्याचं आठवतं. माझे तर बॉ डोळे दिपलेत ऑलरेडी!
सो मच विनिंग! सो क्विकली अ‍ॅन्ड बिगली!??

उघडा डोळे.
अहो उष:काल होत होत काळरात्र झाली
अरे पुनः आयुष्याच्या पेतवा मशाली!

भारत - पाकिस्तान या दोन अण्वस्त्रधारी राष्ट्रांमधे अमेरिकेच्या पुढाकाराने युद्धविरामाची घोषणा झाली. युद्धविराम किती काळ टिकेल याबाबत साशंकता आहे. प्रामाणिक प्रयत्न होत असतील तर चांगली गोष्ट आहे. Thanks Trump. He deserves my respect.

अमेरिका ग्रेट झालेली दिसतेय, इथे एकदम शांतता आहे म्हणजे.
अमितव तुम्ही भारतात गेलेले दिसताय. कसं वाटतंय, कॅनडा आणि भारतातल्या लोकशाही चा तुलनात्मक अभ्यास चालू आहे का डोक्यात?

इकडे अमेरिकेत तर बुवा देशाला धुवून पुसून सफेद(!) करण्याचं काम जोरदार चालू आहे. सुप्रीम कोर्टा ला दुर्लक्षित केलं जातंय. जजेस ना अटक होतायेत. दिवसा ढवळ्या तात्या आणि त्याची फॅमिली मेम्ब्र ४०० मिलियन ब्राइब सॉरी गिफ्ट एक्सेप्ट करतायेत. ब्राऊन कातडी वाल्यांना बाहेर ढकललं जातंय आणि पांढऱ्यांना रेड कार्पेट अंथरून बोलावलं जातंय. विद्यापीठांचे ग्रँट्स आणि फॉरिन स्टुडेंट्स घेण्याचे अधिकार काढून घेतले जातायेत.
तात्या पाकी डिफेन्स मिनिस्टर सारखा सो मि चा सहारा घेऊन खोट्या गोष्टी खऱ्या ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करून स्वतःचं हसं करून घेतोय Proud
हया सगळ्यावर कडी म्हणजे मधे तात्याने पाकिस्तानचं कौतूक करून शेंडे आणि त्याच्या इथल्या इतर पिल्लावळी वर ऑलमोस्ट पाकड्याचं कौतूक करायची वेळ आणली होती. Proud

एकूण लोकशाही मजेत चालू आहे.

पिल्लावळी?
चालू द्यात तुमचं विनायक. दे मार शिव्या द्या आता. आपलाच फोरम आहे.

आणि दुसऱ्या बाजूला, डेमोक्रॅटस ना नेहमी प्रमाणे काहीच सुधरत नाहीये. डोकी छाटल्याप्रमाणे ते नुसतीच दिशाहीन बडबड करण्यात आणि बायडेन चे अगदी वेळेवर झालेले डायग्नोसिस डिफेंड करण्यात बिज़ी आहेत.
ते सत्तेत असताना सुद्धा निष्प्रभ होते आणि विरोधीपक्षात तर त्याना कुत्रं विचारीत नाहीये. त्यामुळे तात्याची मज्जा चालू आहे.

<<
दे मार शिव्या द्या आता.>>
का? तुम्हीही द्या की, आणि देताच की.
उलट आम्हीच घाबरलं पाहिजे. उद्या कुठलं जुनं अनपेड पार्कींग तिकीट उकरून सिटिझनशिप वार गदा आणतिल! राजाला आणि त्याच्या पिल्लावळीला घाबरून रहावं लागतं बाबा!!

काहो, आता भारतात लिहून आणलेल्या सॉफ्टवेअर वर पण टॅरिफ लावणार का?
बर्‍याच कंपन्या अमेरिकेतील लोकांना नोकरी देण्या ऐवजी भारतातल्या कंपनीकडून सॉफ्टवेअर लिहून आणतात. म्हणजे माल इंपोर्ट करण्यासारखेच झाले. शिवाय एखाद्या भारतीय कंपनीने एच वन व्हिसावर माणसे पाठ्वली तर त्यावरहि टॅरिफ लावायला पाहिजे ना?

<< हार्वर्डवरती फार डूख धरलाय त्या ट्रंपने. टोटल रिटॅलिएटरी मुव्ह. अधिकाधिक खालच्या थराला चाललाय तो>>

हो ना. सगळ्या सो कॉल्ड इलाईट विद्यापीठांचा डाव्या विचारांना असलेला (ज्यात अगदी अतिरेकी ही आले) असलेला पाठींबा ही कितीही चिंताजनक बाब असली तरी त्या वर चालू असलेला इलाज ही सुद्धा खूपच चिंतनीय गोष्ट झालीये. रोगा पेक्षा इलाज भयंकर अशी अवस्था आहे.

आजच्या घडीला जवळ जवळ २५% विद्यार्थ्यांना आऊट ऑफ स्टेटस होण्याची किंवा दुसऱ्या विद्यापीठात ट्रान्सफर घेण्याची वेळ आलिये.

हुकूमशाहीकडे जोरदार वाटचाल चालू आहे. असो, तात्याचे समर्थक ह्यालाही somehow जस्टिफाय करतीलच.

कतारने विकायला काढलेले प्लेन तात्यानी स्वतःसाठी गिफ्ट करवुन घेतल...हा ट्विस्ट फार रोचक आहे.
४ वर्शानी ते प्लेन नविन प्रेसिडेन्टला मिळणार की तात्या "मार लागो" ला नेणार?

झक्की, सामोंनी हार्वर्डवर लिहिले ते तुम्ही चुकून हार्डवेअरवर तर नाही ना वाचले?
काहो ... अशी सुरवात करून सॉफ्टवेअर बद्दल तुम्ही विचारले म्हणुन शंका आली एवढंच.

---
ते विमान एअर फोर्स १ मध्ये घेणार.
एअर फोर्स १ मध्ये कन्व्हर्ट करायला २-३ वर्षे आणि १ बिलियन डॉलर्स लागणार असे वाचले.

अमेरिकन टॅक्स पेअर्सना काही पडलेली नाही तर बिलियन फुंकले तर मला काही देणंघेणं नाही.
तेच अमेरिकन विद्यापीठांचे. अमेरिकन लोकांना शिक्षणाचे, संशोधनाचे, डायव्हर्सिटी चे महत्त्व वाटत नसेल तर जाऊद्या! बहुसंख्य लोकांनी त्याला निवडलेला आहे. तो कसा आहे, काय करेल हे स्पष्ट शब्दांत दिग्गजांनी सांगूनही त्याला निवडलेला आहे. थोडक्यात अमेरिकेचा या सगळ्याला पाठिंबा आहे आणि त्यांना हेच हवं आहे. तर होऊन जाऊद्या!

अमितव, बरोबर आहे तुझे म्हणणे.
माझ्या मते हा सगळा मूर्खपणा आहे. पण मी काही जास्त दिवस जगणार नाहीये, नि माझे कुणि ऐकणार नाहीये.

मी पूर्वी पासूनच सांगत होतो, आपापले पैसे संभाळून ठेवा. अमेरिकेत पैसा लागतो. इथे आपण नेहेमीच परके, त्यातून आता तर रेसिझम फारच वाढला आहे, आपल्याला कुणीहि मदत करणार नाही.

Pages