
तर हैदराबादकरहो,
पहिले वहिले हैदराबाद गटग करण्याचा योग आला आहे.
आपल्या भेटीसाठी येत आहेतः
डॉ. कुमार, ऋतुराज, सतीश आणि संजय भावे.
तेव्हा मुख्य गटग ०१ जून रविवार रोजी लंच गटग करण्याचे ठरले आहे.
स्थळ: पॅलेस हाईट्स, आठवा माळा, त्रिवेणी कॉम्प्लेक्स रोड, बोगुलकुंटा, ऍबिड्स, हैदराबाद.
https://maps.app.goo.gl/T1dKx9ZuHUV4vL9L9
भेटण्याची वेळ: दुपारी १२ वाजता.
कार्यक्रम: खादाडी व गप्पा.
तसेच मिनी गटग सुद्धा ३० मे ला होत आहे.
स्थळ: गोलकोंडा किल्ला
भेटण्याची वेळ: सायंकाळी ४:०० वाजता, तिकीट विक्री काउंटर समोर.
https://maps.app.goo.gl/ud8bDo93BCuEfnem8
कार्यक्रम: ४:०० ते ६:०० गोलकोंडा किल्ला भटकंती.
६:१५ ते ६:४५ अल्पोपहार.
गटगला यायचंच हं!
आता पर्यंत निश्चित झालेले गटगकर:
१) डॉ कुमार
२) ऋतुराज
३) सतीश मोरे
४) संजय भावे
५) मानव पृथ्वीकर
६) वामन देशमुख
७) मृनिश
८) श्रीगणेशा (रोमातले मायबोलीकर)
---------------------------------------------
०३ जून २०१५
वामन राव यांनी गटगचा लिहिलेला वृत्तान्त:
वृत्तांत: मायबोली हैदराबाद निवासी गटग २०२५
शुक्रवार, ३१ मे २०२५, दुपारी तीन वाजता, ॲबिड्स येथील ताजमहल हॉटेलपासून गटगची सुरूवात झाली. मानव, कुमार१, संजय भावे, वामन, ऋतुराज व सतीश हे माबोकर्स…
निवासी गटग चा पहिला फोटो
सर्वप्रथम पोहोचलो गोलकोंडा (मराठी गोवळकोंडा) किल्ला पाहायला. तिथेच भेटलेला एक अधिकृत गाईड सोबत घेतला. त्याने, (अर्थात त्याच्याच दृष्टिकोनाला साजेशी) किल्ल्याच्या इतिहासाची चांगली माहिती दिली. किल्ल्याचे इको पॉइंट, सीक्रेट बोगदे आणि त्या काळातील स्थापत्यशास्त्र – सर्व काही थक्क करणारं होतं.
एक मानव इतर मानवांना इतिहास समजावून सांगताना…
बरं ते ठीक आहे, माबोकरांना सोडा, मागचे स्थापत्य पहा!
माबोकर गोलकोंडा किल्ल्याची वैशिष्ट्ये समजून घेताना
सायंकाळी परतल्यावर ताजमहल हॉटेलात गप्पांची सुरस मैफल रंगली. पावणे दहाच्या सुमारास श्रीगणेशा यांचे आगमन झाले आणि गप्पा आणखी रंगल्या. पावणे अकराला रात्रीच्या जेवणासाठी आम्ही ॲबिड्सच्या ग्रँड हॉटेलला चालत गप्पा मारत निघालो. कुमार१ यांनी ताजमहालात तर श्रीगणेशा यांनी घरी आधीच जेवण उरकलं होतं. बाकीचे आम्ही हैद्राबादी दम की बिर्याणी वर तुटून पडलो. मग पान खाऊन हॉटेलात परत आलो आणि आमची परत गप्पांची मैफल रंगली.. गप्पांच्या ओघात वेळ कसा गेला कळलंच नाही.
शेवटी दीड-दोन वाजेपर्यंत सर्वजण हळूहळू पांगले.
जेवण झाल्यानंतर…
(डावीकडुन: ऋतुराज, संजय भावे, मानव पृथ्वीकर, श्रीगणेशा, वामन राव, कुमार१, सतीश)
दुसरा दिवस
शनिवार उजाडला आणि माबोपथक जुन्या हैद्राबादच्या भटकंतीला निघाले. आज वामन सोबत नव्हता. मानव सेकंड हाफला जॉईन झाले.
ताजमहालचा नाश्ता आटोपून पहिल्याप्रथम चारमिनारला गेलो. आजूबाजूचं शहर चारमिनारवरून एका दृष्टीक्षेपात बघता येतं.
फोटो-बिटो काढून चहापाणी करून सालारजंग म्युझिअमला आलो. प्रत्येक ठिकाणी इतकं काही पाहण्याजोगं होतं. एकीकडे तलवारी, दुसरीकडे मूर्ती तिसरीकडे एखादे चित्र!, कुठे पाहावं, कुठे थांबावं, असं वाटणाऱ्या, थक्क करणाऱ्या वस्तू!
कुमार एक यांनी रात्री हॉटेलवरच थोडे खाऊन विश्रांती घेणे पसंत केले. बाकीच्यांनी हॉटेल जवळील जगदीश मार्केट मध्ये काहीही खरेदी न करता भटकंती केली.
त्यानंतर, रात्रीची फानुस हॉटेलमधली खादाडी म्हणजे एक कहर अनुभव होता!
फानुस हॉटेलात काही माबोकर्स
प्रसिद्ध हैदराबादी हलीम, चिकन नहारी, शिरमल नावाचं ब्रेड-नानसदृश्य कार्बोहायड्रेट, तलावा गोश, चिकन बिर्याणी यांचा मंडळींनी आस्वाद घेतला.
हलीम, नहारी, शिरमल, तलावा गोश
रविवार १ जून २०२५ मुख्य गटग
बारा वाजता सगळो जमलो आणि ॲबिड्सच्या पॅलेस हाइट्समध्ये गेलो. येथील शांत वातावरण व राजेशाही इंटिरियर सर्वांनाच आवडलं.
स्वागताला टेबल तयार ठेवलं होतं…
आधी सगळ्यांनी आपल्या-आपल्या पसंतीचं सूप मागवलं आणि सूप येईपर्यंत फोटोशूट केलं.
सूप आलं
त्यानंतर, पुढच्या खादाडीला सुरुवात करण्यापूर्वी कुमार१ यांनी त्यांच्या “असे देश, अशी नावे!” या लेखाचं प्रभावी अभिवाचन केले, ते सर्वांनाच आवडले.
कुमार१ यांचे अभिवाचन
यानंतर स्टार्टर्स ची ऑर्डर गेली - वेज बुलेट्स, चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश! आणि ती सर्व्ह केल्यावर त्यातील क्वांटिटी पाहुन सगळे थक्क झाले आणि त्यावर सर्वचजण तुटून पडले.
वेज बुलेट्स १
चिकन मॅजेस्टिक आणि अपोलो फिश
नंतर पुन्हा एकदा दम की बिर्याणी आली आणि खादाडीचा शेवट गोड करण्यासाठी शाही तुकडा आणि खुबानी का मीठा आला.
दम की बिर्याणी
शाही तुकडा आणि खुबानी का मीठा
लॉबीमध्ये एक फोटो काढला
पान खाऊन हॉटेलवर साडेचारला परत आलो. आता निरोपाची वेळ आली होती.
ऋतुराज विमानतळावर व संजय भावे रामोजी फिल्म सिटीला निघाले. मानव-वामन आपापल्या घरी निघाले. कुमार१-सतीशने खोलीत विश्रांती घेतली.
पुढचे गटग नेपाळ, भूतान, कंबोडिया, श्रीलंका, नागपूर, नांदेड असे कुठेतरी व्हावे आणि तेही निवासी व्हावे असे ठरवून तीन दिवसीय निवासी गटगची सांगता झाली.
**सचित्र हौर दख्खनीमें
**सचित्र हौर दख्खनीमें वृत्तांत 'देवा' खुषजुबान लोगां !!!
>>> वा ! एकदम कडक हो
धन्यवाद !
हैदराबादेतील नामांकित
हैदराबादेतील नामांकित रेस्टॉरंट्स दरवर्षी रमजानच्या वेळी महिनाभर हलीम विकतात >>> वरचा हलीमचा फोटो पण रमजानच्या वेळचाच. इथे चारमिनार नामक रेस्टॉरंट आहे तिथे मिळाला त्या दरम्यान. याच रेस्टॉरंट मधे आम्ही बिर्याणी चापायला जातो
पण तुम्ही OG ठिकाणी जाऊन OG बिर्याणी खाऊन या आणि खाताना आमची आठवण काढायला विसरू नका 
हलीम आता वर्षभर मिळतं काही
हलीम आता वर्षभर मिळतं काही ठिकाणी. ते रमजानला मिळतं तेवढंच चांगलं असतं का माहीत नाही.
रमझान मध्ये सगळ्या इराणी चहा हॉटेलमध्ये आणि शिवाय अजुन बरेच स्टॉल लागतात सबर्ब्स मध्येही, गेल्या १० वर्षांपासून.
हलीम ....आहा !!!!!
हलीम ....आहा !!!!!
सहा तास...... /\/\/\
मस्त! हैदराबादेत गटग .
मस्त! हैदराबादेत गटग . वातावरण छान तयार होतय. मजा येणार आहे हे आत्ताच दिसतंय. सगळ्यांना शुभेच्छा.
आजच्या मटा-संवाद पुरवणीतील
आजच्या मटा-संवाद पुरवणीतील भानू काळे यांचा ‘हैदराबादच्या मुस्लिम पाऊलखुणा’ हा लेख वाचनीय. त्यातील निजामाचे वर्णन करण्याचा मोह होतोय :
“. . . सलग 37 वर्षे राज्य केलेल्या निजामावर 1937मध्ये ‘टाईम’ने मुखपृष्ठ कथा केली होती आणि त्यात त्याचे वर्णन ‘या ग्रहावरील सर्वात श्रीमंत माणूस’ असे केले होते. पण तरीही तो एखाद्या गरीब इसमाप्रमाणे जगला, आयुष्यभर त्याने जुने कपडे रफू करून वापरले, साध्या लोखंडी पलंगावर झोपला आणि राजवाड्यात रोल्स रॉईसचा ताफा असतानाही त्याने कायम खटारा गाडीतून प्रवास केला..“
त्याच्या अंत्ययात्रेचे हृद्य वर्णन देखील वाचण्यासारखे आहे.
हैदराबादकर, वाचताय ना हा
हैदराबादकर, वाचताय ना हा धागा?
आपली उपस्थिती लौकरात लौकर नोंदवा.
उद्या गटग-स्थळ उद्या निश्चित करून इथे जाहीर केले जाईल.
एन्जॉय करा लोकहो! पाहुणे चार
एन्जॉय करा लोकहो! पाहुणे चार आणि लोकल तीन - बहुत नाइन्साफी है ये
तेव्हा उपस्थिती लौकर नोंदवा.
कुमारसर ते निजामाचे वाचलं
कुमारसर ते निजामाचे वाचलं होतं कुठेतरी, आठवत नाहीये आता.
* पाहुणे चार आणि लोकल तीन
* पाहुणे चार आणि लोकल तीन
>>>> म्हणजे परप्रांतीयांचे वर्चस्व !
असो . . .
ऋतुराज या गटगला पण हजर असणार
ऋतुराज या गटगला पण हजर असणार आहेत??? जादूगार? टेलिपोर्ट मशीन? करणी? भानामती? चौथ्या पाचव्या मितीचं नॉलेज की आणखी काही?
जाऊ दे काहीही असू दे पण या गटग निमित्ताने आपल्या मानवमामांना पाहायची ईच्छा पूर्ण होणार.
हैदराबादकर,
हैदराबादकर,
गटगस्थळ हेडरमध्ये दिले आहे, तसेच ३० मे च्या मिनी गटगचे तपशीलसुद्धा दिले आहेत.
तेव्हा भेटूचयात!
आपल्या प्रतीक्षेत ~ यादीतील सर्व गटगकर.
निजाम पण येणार आहेत का?
कसला भारी स्पॉट निवडलाय मानव सरांनी.
खरोखरीच पॅलेस आहे.
मानव सर हे तर शाही गटग झाले.
निजाम सर पण येणार आहेत का?
@ मा-वा,
@ मा-वा,
तयारी एकदम जोरदार झालेली आहे ! 👌
आम्ही येण्यास उत्सुकच आहोतच. 😍
सध्या पश्चिम महाराष्ट्रातील पाऊस पडू लागला की भयावह स्वरूप धारण करतोय. त्याने प्रवासाचे वेळापत्रक बिघडवू नये हीच इच्छा 😚
काळजी करू नका, हैदराबादचा
काळजी करू नका, हैदराबादचा पाऊस इथल्या लोकांसारखाच प्रेमळ असतो. शक्यतो रात्रीच पडतो!
हैदराबाद में जित्ते बी
हैदराबाद में जित्ते बी माबोकर्स लोआं र्हैतें, वो सऽप कू बोलरुं, इतवार के दिन सुब्बै उठ के अबिड्स् पे पक्का आना, सुनें? बाद में नक्को बोलो, बोले नै कर के. पुणे से, बाम्बे से बडे-बडे लोआं आरें, थोडा सोच के करो, अपनी इज्जत का सवाल है, सुनें?
चलो, मिलतुं.
गटग संघातील आठवा खेळाडू
गटग संघातील आठवा खेळाडू हैदराबादकर श्रीगणेशा यांचे स्वागत आहे !
गटगच्या तीन दिवसात ते त्यांच्या सोयीनुसार आपल्यात सामील होतील.
सुस्वागतम श्रीगणेशा.
सुस्वागतम श्रीगणेशा.
आता तुम्हीही इथे सक्रिय होऊन कंसातील (रोमातले मायबोलीकर (म्हणजे Read Only Mode मधले)) ही टिप्पणी काढायला लावा.
धन्यवाद कुमार सर, मानव
धन्यवाद कुमार सर, मानव पृथ्वीकर, आणि इतरही मायबोलीकर, मला बोलाविल्याबद्दल.
गेले १४ वर्षे मी हैदराबादमध्ये राहत आहे, पण इथे मराठी भाषाप्रेमींना भेटण्याचा योग पहिल्यांदाच!
आज वाचला धागा. भारी होणार
आज वाचला धागा. भारी होणार गटग. वृत्तान्त पण भारी असणार.
फोटो टाकालच
आज वाचला धागा. भारी होणार
.
.
.
धन्यवाद asp.
धन्यवाद asp.
पळस, येताय ना गटगला?
आमच्याकडे पावसाने विश्रांती
आमच्याकडे पावसाने विश्रांती घेतल्याने बरे वाटते आहे.
तिकडे काय परिस्थिती आहे मानव मान्सूनची?
इथे मॉन्सून सूरु झालाय. १
इथे मॉन्सून सूरु झालाय. १ तारखे पर्यंत पूर्ण राज्यात पसरेल म्हटले आहे.
आज ढगाळ वातावरण आहे. अधुन मधून बारीक पाऊस.
चला, तापमान तर कमी झाले
चला, तापमान तर कमी झाले असणार !
तपमान खाली आलंय.
तपमान खाली आलंय.
छान पाऊस झाला तर गारवा जाणवतो, नाहीतर आर्द्रता वाढल्याने जरा उकडतं.
पण सुसह्य आहे आता फार. अन्यथा या वेळी तपमान आणि आर्द्रता दोन्ही वाढून फार उकाडा असतो.
इथे (न्यु यॉर्क) पाऊस लागून
इथे (न्यु यॉर्क) पाऊस लागून राहीलाय. थंड हवा आहे. मला आवडते ढगाळ हवा. एकदम मस्त होतो मूड. लेख शोधते. एक आहे या हवेतील मूडवरचा लेख.
चला, म्हमईवाले,
चला, म्हमईवाले,
तेलंगणात शिरले का न्हाय ?
मी सुटेन तासाभरात. भेटूच ताजवरती . . .
तेलंगणा गटग चे पाहुणे येत
तेलंगाणा गटग चे सदस्य येत आहेत...
मुंबईचे निघाले आहेत, पुण्याचे निघत आहेत, हैद्राबादचे निघण्याची तयारी करत आहेत!
Pages