दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>सामो >> खास काजवे पहायला भारतातून न्यू जर्सीला जावे का हा विचार करूनच डोळ्यापुढे काजवे चमकायचे. Lol
नोबिता Lol
मी लहानपणी आई-बाबांबरोबर, कोणा एकांच्या पुण्याजवळच्या, फार्महाऊसवरती गेलेले. पहील्यांदा काजवे पाहीले. किती मस्त वाटलेलं. पुण्याजवळ फार्म हाऊसवगैरे मध्ये दिसतात की. आणि लक्ष-लक्ष दिसतात.

>>>>>>फार रील्सबघून एक प्रश्न कधीपासून विचारेन म्हणतेय
अगदी हाच प्रश्न मलाही पडलाय. त्या आईवडीलांनाच सरप्राईझ असतं. मला वाटतं आईची बहीण वगैरे डॉक्टरांकडून माहीती घेउन प्लॅन आखत असावेत.

मला वाटतं किंवा माझ्या तोकड्या अनुभवाने सांगायचं तर दोन तीन महिनेही पुरेसे नाहीत. देश खूप मोठा आहे. दोन स्टेट्सम्ध्ये अंतरही बरंच आहे. कदाचित एक दोन साईड्स कव्हर करु शकाल.>>

मग आता खर्च किती येईल त्यावर ठरवावं लागेल.

सलग तीन चार महिने येणे तर शक्य नाही.

दोन महिने येऊ शकतो.

मला खर्चाचा अंदाज येत नाहीये.

अतरंगी,
- एअरबीएनबी घ्या आणि झटपट पण पौष्टीक जेवण घरी बनवा (सॅलड/ पास्ता/ ऑमलेट-ब्रेड/ फ्रोझन पोळ्या वगैरे) अन्यथा रेस्टॉरंटस मधे खूप खर्च होइल जो की टाळता येउ शकतो.

खूपच उत्तम संकल्प आहे. आपल्याला शुभेच्छा. पहाण्यासारखा देश आहे.

अतरगी
प्लॅन असेल तर लगेच व्हिसाला अप्लाय करा किमान १+ वर्षाच वेटिन्ग आहे.. भावाने मागच्या वर्शी नोव्हेबर अप्लाय केलय त्याला फेब्रुवारी २६ ची तारिख मिळाली आहे.

आमच्या एका family friend नी त्याच्या मित्रासाठी gender reveal party plan केली होती जवळपास २ वर्षांपूर्वी. त्या मित्राने व त्याच्या गरोदर बायकोने डॉक्टर ना request केली होती बाळाचं gender sonography च्या वेळेस (अर्भकाच्या आईबाबांना न सांगता) त्या आमच्या फॅमिली फ्रेन ना सांगण्यासाठी. त्यानुसार पार्टी होती. तशीच ठेवत असावेत ही रीळ बनवण्यासाठी आजकाल असे मला वाटते, मलाही तेव्हा अशी रीळ यायची आमचा तो family friend बराच राबला होता पार्टीसाठी म्हणून माझ्या लक्षात आहे.
तळटीप: हा किस्सा भारतात घडलेला नाही ,भारतात गर्भलिंगनिदान कायद्याने गुन्हा आहे.

चारचाकीने एक एक स्टेट व्हिलाक्रांत करत अख्खा उसगाव पालथा घातल्याचा धागा इथेच वाचल्याचे स्मरते.

अतरंगी, तू सिरिअसली विचारला होतास का प्रश्न? Happy
सगळी अमेरिका फिरायची तर खर्च भरपूर होईल. अंदाज मलाही नाही. आमच्या गावाला आलास तर मात्र घरी रहायला ये.

ये रे, खरंच ये Happy
तुला खरं वाटणार नाही पण आमच्याकडे मित्र रहायला येतात Proud

अतरंगी कुठली ठिकाणे, किती दिवस/महिने हे तर झालंच पण ऋतुंचाही विचार नक्की करा.
स्प्रिंगमधले फुलं उमलल्यानंतरचे ब्लॉसम्स, फॉलमधली रंगीबेरंगी पानगळ, बर्फाळ ठिकाणांतील व्हाईट क्रिसमस हे सर्व तितकेच सुंदर आहे आणि यात मलातरी सर्वात जास्त काय आवडते हे सांगणे कठीण जाते.

एकएक प्रदेश घेऊन त्यात काय बघण्यासारखं/ बघायचं आहे अशी यादी करत सगळा बेत आखावा लागेल. एक रिसर्च प्रोजेक्ट होईल पण करायला जाम मजा येईल. मी कुठे जातो तेव्हा विविध ठिकाणची माहिती गोळा करत गूगल मॅप्स वर वॉन्ट टू गो प्लेसेस टाकत जातो. मग शेवटी त्यातलं जमेल तसं भेटी देतो.
खर्चाच्या दृष्टीने दोन महिने असेल तर आरव्ही घेतलीस तर रहाणे आणि काही प्रमाणात/ उत्साह असेल तसे खाणे पिणे हा खर्च पूर्ण वाचेल. अशी कुटुंबाची आरव्ही ट्रिप हे माझ्याही बकेट लिस्ट वर आहे. सगळीकडे आरव्ही पार्क्स असतात/ दिसतात ... यु ही चला चल राही, कितनी हसीन है ये दुनिया. .. Happy

अतरंगी कुठली ठिकाणे, किती दिवस/महिने हे तर झालंच पण ऋतुंचाही विचार नक्की करा.>>>>>> Wow.
मला पण घेऊन जाताय अतरंगी. तुमच्या सारखा देवमाणूस मी आजवर पाहिला नाही Lol

आरव्ही म्हणजे काय?

Recreational vehicles= RV . वर ते स्वदेसचे गाणे आले आहे ना त्यात शाहरुख वापरतो ती.
अतरंगी तुम्हाला शुभेच्छा. मुलांना व तुम्हाला काय बघायचे ते ठरवून एक यादी करा. मुलांची वय व आवडीनुसार. संपूर्ण अमेरिका बघणं एका जन्मात शक्य नाही. एक महिना पूर्वेकडे व एक महिना पश्मिमेकडची राज्यं- तिथली ठिकाणं बघता येतील. उसगावकरांपेक्षा भारतातून टूरिस्ट म्हणून बघून गेलेली लोक जास्त चांगले सांगू शकतील. आम्ही टूरिस्ट म्हणता येणार नाहीत आता. एकदम overwhelming सांगितले जाईल. तुम्हाला नीट नियोजन करावे लागेल.

मला दोन महिने रहायला व फिरायला साधारण किती खर्च येईल याचा साधारण अंदाज हवा होता.

वरच्या पोस्ट वाचून तो मिळणे अवघड आहे असे दिसत आहे.

अमित RV चा विचार केला आहे. त्याला लायसन्स कोणते लागते वगैरे माहिती काढेन. चालवण्याचा सराव कसा करायचा हा प्रश्न आहे. ते बघेन.

अतरंगी कुठली ठिकाणे, किती दिवस/महिने हे तर झालंच पण ऋतुंचाही विचार नक्की करा.>>>>
मी मागे गुगल केले होते त्यात जुन जुलै बरा असे लिहिले होते. मी तेव्हाच यायचा विचार करत होतो.

अतरंगी, आम्ही 2023 chya जून मधे मुलाकडे डेनवर la गेलो होतो तेव्हा 3 जून ते 11 जून म्हणजे शनिवार रविवार, मग 1 आठवडा मधे आणि पुढचा शनी रवी अशी 9 दिवसांची रोड ट्रिप केली होती. मुलाला एक आठवडे सुटी मिळाल्यामुळे असा प्लॅन केला होता.
डेनवर, ग्लेनवूड स्प्रिंग, grand junction, moab, arches National park in Utah, flagstaff in Arizona, Grand canyan, four square monument, Cortez, mesaverde national park, durango, सिल्वर्टन, ourray (switzerland of usa) , gunnison , salida and back to Denver अशी trip केली होती. 8 रात्री 9 दिवस, 5 मोठी माणसे , एक 3 वर्षाची मुलगी असे मोठ्या ford गाडीतून फिरलो. हॉटेल आणि Airbnb दोन्ही पर्याय वापरले गरजेप्रमाणे. साधारण खर्च 5000 ते 5500 डॉलर्स आला.

दोन क्वीन बेडची ब्रेकफास्ट इन्कलुडेड ' इन' टाइप हॉटेल मध्ये एका रात्रीला १५० टाइप खोली मिळावी. जेवणखाण तुम्ही कराल तसं. एकावेळेला १००/ १२० मध्ये चौघांचे होईल. गाडी रेंट केलीस तर ५० मध्ये दिवसाचा गॅस होईल. रेंटल अगदी १०० मध्ये आठवडा असं की मिळालेलं आहे आणि दिवसाचे ५० / ६० असं ही घेतलेलं आहे.
मग बाकी तुम्ही फिराल तशी तिकिटं इत्यादी.
जून जुलै पेक्षा शाळा चालू झाल्यावर ऑगस्ट/ सप्टेंबर मध्ये आलास तर गर्दी कमी असेल. बऱ्याच ठिकाणांचा सीझन सप्टेंबर पर्यंत असतो. मग विंटरला बंद होतात. शाळाही पश्चिम किनाऱ्यावर ऑगस्टलाच चालू होतात तर इकडे पूर्वेला लेबर डे नंतर. ( अंदाजे)

आठ वर्षानी पुन्हा एकदा अमेरिकेत फिरण्यासाठी आणी आराम करण्यासाठी मुलीकडे लॅड झालो आहे. महिनाभर आहे. गाडी आठवडा डॉलर १७५ ला मिळाली. महिन्यासाठी $७०० होता. (म्हणुन उरलेले ३ आठवडे पब्लिक ट्रासंपोर्ट वापरणार आहे ) यात गाडी एका ठिकाणी घेउन दुसर्या ठिकाणी द्यायची सोय आहे. मला रहायला फुकट असल्याने तो सोडुन महिन्याभराचा खर्च सांगिन. मागच्या आठ वर्षात महागाई भरपुर वाढली आहे खास करुन रेस्टॉरंट मध्ये. ईग्रो घेउन घरी काही केल्यास स्वस्तात होईल. .
सगळ्यात आधी विसा साठी अर्ज करणे सध्या एक मुलाखती साठी एक वर्षा चा वेटिंग आहे. दहा वर्षाचा विसा मिळतो . त्यामुळे एका विसा मध्ये दोन किंवा तीन ट्रिप करु शकतो. एकदा लँड झाल्यावर ६ महिन्याचा स्टे मिळतो त्यामुळे जर एका दमात सगळी अमेरिका पालथी घालायची असल्यास तेही शक्य आहे. जुन ते ऑगस्ट सगळ्यात चांगले. या काळात तिकिटे पण स्वस्त असतात.

>>म्हणजे साधारण आकडा ५५० ते ६०० पर डे असाच येतो आहे.<<
आकडा जास्त आहे. अर्थात, तुम्हाला जीवाची अमेरिका करायची असेल तर एंडलेस अपर्चुनिटीज आहेत... Wink

साहिल,
विसाच्या अटी वाचल्या आहेत. यावर्षी किंवा पुढच्या वर्षी अर्ज करेन.

राज,
जिवाची अमेरिका करणार नाही. बजेट ट्रिप करणार आहे. शक्यतो airbnb, hostel असे राहणार आहे.

सानपाडा, नवी मुंबईमध्ये एका माणसापुरता घरगुती जेवणाचा डबा घरी पोहोचवणरं कुणी माहिती आहे का? प्लीज सांगा.

मला या दोन चार वर्षात अमेरिका वारी करायची आहे.

सगळा देश एकाच ट्रिप मधे बघावा की दोन तीन वेगवेगळ्या ट्रिप कराव्या? सगळा देश बघायला किती दिवस लागतील?

पूर्ण देश बघायला चार माणसांचा जायचा यायचा, फिरायचा, रहायचा, खायचा साधारण खर्च किती होईल? >>

सगळा देश बघायचा म्हटलं तर एक जन्म पुरायचा नाही Happy

नॅशनल पार्क सर्व्हिसने मॅनेज केलेलेच ४०० च्या वर पार्क्स आहेत . स्टेट पार्क्स, म्युझीयम , झू, अक्वेरियम, बॉटॅनिकल गार्डन्स, गॉल्फ कोर्सेस, फूटबॉल / बेसबॉल स्टेडियम, टेनिस स्टेडियम, थिएटर्स आणि ऑपेरा हाउसेस हे वेगळेच. युनिव्हर्सिटी बघायची हौस ( strike>खोड) असेल तर अजून भर !

त्यामुळे तुमच्या इंटरेस्टची ठिकाणे आणि तिथे किती वेळ घालवायचा आहे तिथली माहिती वाचून ठरवा.

उदा. व्हॅली फोर्ज नॅशनल पार्क हे आमच्या घराच्या अगदी जवळ आहे . आमच्याकडे भारतातून येणार्‍या बहुतांश पाहुण्यांना त्याची माहिती नसते आणि अर्धा / पाऊण तासाची धावती भेट त्यांना पुरेशी वाटते. अमेरिकेत जन्मलेल्या, अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाची माहिती असलेल्या किंवा त्यात इटंटरेस्ट असलेल्यांना तिथे एक पूर्ण दिवसदेखील कमीच वाटेल.

येलोस्टोन किंवा ग्रॅण्ड कॅन्यन पण तसेच. चार- सहा तासच वेळ असेल तरी थोडे फार पाहू शकता. ४-६ दिवस तिथे घालवले तरी बरंच काही पहायचं राहून जाईल.

शक्य असेल तर दोनेक महिन्यांची ट्रिप प्लॅन करुन त्यात काय काय ठिकाणं पाहता येतील ते ठरवा.

बॉस्ट्न ( बॉस्टन शहरातील ठिकाणं, सेलम, मेन आणि र्‍होड आयलंड इथली ठिकाणं ) , न्यू यॉर्क सिटी ( ब्रुकलीन, लॉंग आयलंड , मॅनहॅटन ) , फिलाडेल्फिया, बॉल्टिमोर ( अनॅपोलिस , चेसापीक बे एरिया) आणि डी सी ही चार शहरं आणि त्याच्या आसपासची ठिकाणं अशी एक ३-४ आठवड्यांची ट्रिप आणि नंतर सीअ‍ॅटल पासून पश्चिम किनारपट्टीवर ३-४ आठवडे असं करू शकता.

Pages