दैनंदिन जीवनात पडणारे किरकोळ प्रश्न आणि उत्तरे

Submitted by वेलांटी on 16 September, 2022 - 01:12

रोजच्या दैनंदिन जीवनात नेहमी किरकोळ प्रश्न पडत असतात, ज्याची उत्तरे पटकन मिळाली तर बरे असे वाटते. कधी काही महत्वाची पण तातडीने माहिती हवी असते. अशा प्रश्नांसाठी हा धागा काढत आहे. जेणेकरून अनेक प्रश्न आणि उत्तरे एकाच धाग्यावर मिळतील आणि त्याचा फायदा अनेकांना होईल.
विषयाचे बंधन नाही. तुम्हाला पडणारे किरकोळ प्रश्न इथे विचारा, ज्यांना माहित आहेत त्यांनी उत्तरे द्या.
सुरूवातीला मला पडलेला प्रश्न विचारते, रोज जेवणानंतर बडिशेप खायची सवय असेल तर भाजलेली बडिशेपच खाल्ली पाहिजे का? कच्चीच बडिशेप खाल्ली तर काही दुष्परिणाम होतो का?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा प्रश्न किरकोळ नाही पण कुठे विचारावा हे समजत नाहीये म्हणून इथेच विचारते!

मला वय वर्ष ९-१२ या गटातील मुलींसाठी रोजच्या वापराचे कपडे घ्यायचे आहेत. ५०. नाशिकः येथे
रास्त दरात, लवकरात लवकर कुठे मिळतील? मायबोलीवर कोणाचा असा व्यवसाय आहे का,?

माझ्या नवीन दोरीच्या चाॅपर ची दोरी अडकून बसली आहे, फार वापर नाही केला आहे, पण घेऊन ७_८ महिने झालेत, घरी दुरुस्त करता येतो का?

युके ट्रान्झिट विसाबद्दल जरा गोंधळ होतो आहे. भारतातुन अमेरिकेत येताना लंडनला विमान बदलायचे तर ट्रांझिट विसा लागेल असं दाखवतायेत >>

हो. इलेक्टॉनिक ट्रॅव्हल अथोरायझेशन लागेल. हे नवे नियम आहेत. कुणाच्या अनुभवाने फरक पडणार नाही कारण हे ८ जानेवारी पासून बदलणार आहेत.
युकेचा व्हिसा स्टॅप्ड असेल किंवा युके/ आयर्लंडचा पासपोर्ट असेल तर आणि तरच फक्त लागणार नाही. बाकी सर्वांना, ट्रांझिट करणार्‍यांनाही इटीए लागेल. जे १० पौंडाला ३ दिवसांत मिळेल. https://www.gov.uk/guidance/apply-for-an-electronic-travel-authorisation... >>....

ETA भारतिय नागरिकासाठी नाही.
भारतिय नागरिक युके विसा नसताना युके ट्रान्झिट ( एअर पोर्ट वरुन बाहेर न पडता ) १४ डिसेंबर २०२४ ला वापरले होते आणि १४ जानेवारीला परत वापरणार आहे. वापरल्यावर काही issue अला तर सांगेन .

मराठी माध्यमात शिकणाऱ्या दुसरीतील मुलाला स्मॉल b आणि d मध्ये गोंधळ होत असेल तर तो गोंधळ कसा दूर करावा?

हिंदी शिकण्यास नसल्याने दाये आणि बाये हि सुप्रसिद्ध हिंदी ट्रिक आमच्याकडे उपयोगी पडत नाहीये.

हाताच्या साईने ने? जसं थंब्सपची खूण आहे. उजवा हात - स्मॉल डी शेप
डावा हात - स्मॉल बी

दोन्ही आयडिया छान आहेत.
अंजली यांनी सांगितलेल्या युक्तीत "सुंदर" ही हाताची खूण सुद्धा वापरता येईल.

स्मॉल सी नन्तर स्मॉल डी येतो ना, म्हणून आधी सी काढून त्याला उभी रेष जोडली की झाला स्मॉल डी.
आणि असं ज्याला नाही तो स्मॉल बी.

छल्ला आणि स्वस्ति मस्त टिप्स.

अंजली ची टीप आणि सुंदर ची खूण यात गडबड अशी आहे की कोणता हात कोणत्या अल्फाबेट साठी हे लक्षात ठेवावं लागेल तेच लक्षात राहत नाहीये.

हो हो केश्वी. मी अजीबात फोर्स करत नाहीये.
सहज काही ट्रिक मिळाली तर बघतेय.

अजून तरी मराठी अक्षरे सुद्धा उलटी लिहितो. ते सोडून देते.
जसे की ज, न, १ वगैरेचा पुढचा भाग (आडवी रेष आणि वाटी/ गोल) उभ्या रेषेच्या डावीकडे न लिहिता उजवीकडे लिहितो.

<< पियू, थोड्या दिवसात आपोआप b व d मधला गोंधळ दूर होईल त्याचा त्यालाच. ही एक फेज आहे. तोवर चुकू द्या >>

----- एक फेज असते बद्दल सहमत. माझ्या मुलीचा असाच गोंधळ व्हायचा, कालांतराने तो गेला. मधून मधून दुरुस्त करत रहायचे.

अशाच प्रकारचा गोंधळ 6, 9 मधे होण्याची शक्यता असते.

उडी = उजवा डी >> हा हा. पण त्यासाठी कुठली बाजू उजवी ते लक्षात ठेवायला लागेल. मी अजूनही कधीकधी डावा हात दाखवून "इथे राईट घ्या" असं सांगतो.

हपा Lol

रच्याकने: लोकहो, कालांतराने मुले बरोबर ओळखायला शिकतात हे सत्य आहे आणि ते त्यांनाही माहीतच असणार. त्या फक्त काही ट्रिक आहे का विचारत आहेत.

हपा.. जगातल्या ९९% बायका असं करतात.

माझे लग्न झाले तेव्हा सासूबाई माझा उजव्या डाव्याचा गोंधळ कमी व्हावा आणि माझ्या डोक्यात बाजू पक्क्या व्हाव्यात म्हणून मुद्दाम मुद्दाम उजवीकडून तिसरा डबा आण, वरच्या रॅक मध्ये डावीकडचा गठ्ठा अश्या सूचना द्यायच्या.

आता माझ्या मुलाचाही गोंधळ होतो. Lol

माझे NRE/NRO खाते SBI मधे आहे, दर दोन वर्षांनी KYC अपडेट करायला सांगतात. पत्ता, व्हिसा, नोकरी इत्यादी माहिती मधे काडीचाही बदल झालेला नसतो मग पुन्हा पुन्हा तेच ते address/ OCI/ passport च्या प्रती का मागवतात ( आणि द्यायच्या)?

NRI लोक DigiLocker ( किंवा इतर सुविधा) वापरु शकतात का?

घरातल्या एका जवळच्या व्यक्तीचा ५० वा वाढदिवस जवळ येतोय, काही प्रसंगोचित games त्या party साठी सुचवु शकाल काॽ

मला नाटकाचा धागा सापडेना म्हणुन इथे विचारत आहे. “जरतरची गोष्ट“ नाटक कसं आहे? उमेश कामत व प्रिया बापट आनेत.

- बायकोच्या (स्वतःच्याच) किंवा आईच्या केसात स्ट्रॉ खोचणे. जो जास्त स्ट्रॉ खोचेल तो विनर.
- अमुक एक रंग डिक्लेअर करून त्या रंगाच्या वस्तू आजूबाजूच्या माणसांकडून गोळा करणे. जो जास्तीत जास्त वस्तू गोळा करेल तो विनर.
- 4-5 टीम्स पाडून अंताक्षरी. त्यासाठी काऊंटडाउन, रंगीत दिवे वगैरे सामान लागेल. अन्ताक्षरीमध्ये फक्त मराठी गाणी, फक्त कविता, फक्त श्लोक असे विविध प्रकार घेता येतील. म्युझिक पीस ऐकवून गाणं ओळखणं, गाण्याच्या ओळी गद्यात ऐकवून गाणं ओळखणं वगैरे राऊंड करता येतील.

Google translate केलेली मराठी गाणी ओळखणे. गेल्या वर्षीच्या वविला हा खेळ होता. एकदम भारी.

हल्लीचा ट्रेंडींग गेम .. गाण्यात जे शब्द येतील त्या वस्तू टेबलावर ठेवून टीम मेंबर्सना गाणं ओळखायला लावणे. मराठी गाणी लावून करता येईल पण तशी गाणी शोद्यायला हवी.

#धार्मिक प्रश्न अलर्ट
#ज्योतिष प्रश्न अलर्ट
#कर्मकांड प्रश्न अलर्ट

*ज्यांचा यावर विश्वास नाही त्यांनी उलट सुलट उत्तरे देऊन खिल्ली उडवू नये ही नम्र विनंती*

मंगळ ग्रहाची शांती ही राहत्या घरी करता येते का?
माझ्या माहितीप्रमाणे ही अमळनेर किंवा उज्जैन येथे जे मंगळाचे मंदिर आहे तिथे जाऊन करावी लागते. सासूबाईंच्या साठीशांती सोबत हेही करून घ्या म्हणून गुरुजी म्हणाले. पण ते मंगळ शांती आपण घरीच करू. मलाच पैसे द्या असेही म्हणाले. त्यामुळे बुचकळ्यात पडलो आहोत.

परळ , लालबाग भागात लहान मुलीला सांभाळणारी विश्वासार्ह डे केअर किंवा नॅनीची माहिती मिळू शकेल का ? आजी आजोबांना सांभाळणे शक्य होत नसल्याने हा पर्याय स्वीकारावा लागत आहे .

Pages