वृत्तान्त - अमितव गटग -ठाणे -११ मे

Submitted by भरत. on 12 May, 2025 - 01:41

काल ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत कॅनडाहून भारत भेटीस आलेल्या अमितव यांचा मायबोलीकरांसोबतच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे सूत्रांकरवी प्राप्त झाली आहेत.
1.jpg2.jpg3.jpg4.jpg

ही छायाचित्रे पाहून मायबोलीकरांनी कार्यक्रमाबद्दल अंदाज बांधून इथे लिहायचे आहेत.

टीप १. अनुस्वाराच्या लेखनासंबंधी नियम -
काही शब्दांतील अल्पोच्चारित अनुस्वाराऐवजी अनुनासिक जोडले, तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. जसे
१. देहांत - शरीरांत ------------- देहान्त - मरण
२ वृत्तांत - कवितेच्या वृत्तांत ----------- वृत्तान्त - बातमी
३ वेदांत - वेदांमध्ये ........... वेदान्त - उपनिषदांतील तत्त्वज्ञान

हा नियम समजत नसेल तर पुढल्या गटगस हजेरी लावावी लागेल. ज्यांना समजला असेल त्यांनी न समजलेल्यांना समजवण्यासाठी पुढचे गटग आयोजित करावे.

टीप २ - अजून ठरायची आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललिता प्रीतीने निरंजन घाटेंचा किस्सा सांगितला. त्यांचं 'मी वाचत सुटलो त्याची गोष्ट' हे पुस्तक तिने संपादित केलं आहे. त्याबद्दल वाचू आनंदे मध्ये माझ्यासह कोणी ना कोणी लिहिलं असेलच. तर त्या निमित्त ती घाटेंच्या घरी जायची. आणि त्या घरात जिथे नजर जाईल तिथे पुस्तकेच पुस्तके.
तिने घाटेंच्या स्मरणशक्तीचा अफाट किस्सा सांगितला. गप्पांमध्ये काहीतरी विषय निघाला. त्याचा संदर्भ द्यायला घाट्यांनी तिला या कपाटातल्या तिसर्‍या खणातलं डावीकडून चौथं पुस्तक काढ असं सांगितलं. ते काढून आणल्यावर त्यातलं अमुक क्रमांकाचं पान उघड असं सांगितलं. त्या पानावरच्या मजकुरात तो संदर्भ होता.
अ फा ट!

सुधीर फडके फ्लायओव्हरच्या बाजूचं मुरलीधर का? >>
नाही.
त्याची दुसरी शाखा आनंद नगरला माझ्या घराशेजारी आहे.
या दोनच शाखा आहेत.
काजूकतली, गुलाब पाक, मँगो बर्फी, श्रीखंड, बासुंदी, पेढे व काही नमकीन छान असतात.
बाकी त्याच्याकडे असंख्य मिठाया, नमकीन, फरसाण आयटम असतात.
गुणवत्ता चांगली आहे पदार्थांची.
Eat less eat best हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे.
आमच्याकडच्या ९५% लोकांना त्याची काजूकतली आवडते.
मला गोड पदार्थ फारसे आवडत नाहीत पण त्यांच्याकडची मँगो बर्फी, गुलाब पाक आवडतो.
पुढील गटग ला ते आणेन.

संसारात सार आहे, आरामात राम आहे. आणि गटग म्हणजे आराम.>>>>> हे माहीत करून दिल्याबद्दल धन्यवाद.

ललिता प्रीतीने निरंजन घाटेंचा किस्सा सांगितला. त्यांचं 'मी वाचत सुटलो त्याची गोष्ट' हे पुस्तक तिने संपादित केलं आहे. >>>> पुस्तक तर मस्तच आहे. पण त्यांचे किस्से अफाट.

नवीन प्रतिसाद ही खूप मस्त
हार्पेन लगेच पुस्तक कुठे मिळेल ह्याची लिंक दिलीत खूप छान वाटलं. आणि तुम्ही आणि ऋतुराज ह्यांनी सही हवी आहे पुस्तकावर लिहिलंत ते वाचून तर मी कोण आहे फार मोठी आहे असं वाटलं. अर्धा सेकंद वास्तवातून एकदम वेगळ्याच जगात गेले मी ... त्याबद्दल खूप thanku.. असे क्षण क्वचित येतात आयुष्यात म्हणून ते अनमोल असतात.
माधुरी नाही म्हणू शकणार राम नाही संसारात ही महान होत. आणि त्या अनुषंगाने आलेल्या पोस्ट सगळ्या पोस्ट्स ही.
भरत, ललिताने सांगितलेली निरंजन घाटे यांची आठवण फारच ग्रेट.. इथे लिहून ठेवलीत म्हणून कायम राहिल ती धाग्यावर...
काजू कतली न आवडणारा माणूस विरळाच. आणि होती ही मस्त. आता पुढच्या वेळी गुलाब पाक ही आण ऋतुराज . गुलाब पाक म्हणजे गुलकंद बर्फी वगैरे असते का ?

मला लोक थोडं घाबरतात. त्यामुळे मी आयोजित करू शकत नाही. Wink
मी येतो म्हटलं तर रद्द होईल इतकंही घाबरत नसावेत अशी आशा आहे. Lol

जाई, भरत,
पुढच गटग वेस्टर्नलाच करू आपण.

ऋतुराजचा दुसरा अध्याय पण धमाल आहे Happy मधले काही प्रतिसाद हुकले असतील. पुन्हा एकदा चेक करायला पाहिजे.

ग्लास ग्लास पपईच्या पानाचा रस प्यायल्याने येणाऱ्या ढेकरांमुळे आजूबाजूच्या हवेतील डास नष्ट झाले >>> Lol महाराष्ट्रातील रस्त्यारस्त्यांवर "पाणी गाळा नारू टाळा" व "गप्पी मासे पाळा हिवताप टाळा" प्रमाणे "पपईचा रस (ग्लास ग्लास) प्या व डेंग्यू टाळा" हा सुविचार लिहायला पाहिजे.

पाच नसबंदीचे उमेदवार आणा >>> असे सगळे करत गेले तर नंतरच्यांना नवीन उमेदवार मिळणार कसे? Wink

गंगौघ कानातून वाहून गेल्यास तुम्ही आधुनिक जुह्नु ऋषींचे अवतार म्हणायचे >>> Happy याचा संदर्भ काय आहे? जनरल अंदाज लावता येतो पण तरीही विचारतोय Happy

"असेन मी नसेन मी" नाटकाला चाललोय भेटायला जमेल का >>> याचा प्रयोग गटगच्या बाबतीत कोणी केला का?>>>>> एकाने केलाय.. ओळखा पाहू. >>> कविन? Happy

त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती होती >>>
त्यांच्याबद्दल एक स्नेहयुक्त भीती होती >>> एकूण बर्‍याच लोकांबद्दल तुला मिश्र भीती आहे (किमान होती) असे दिसते Happy इतके "युक्त" मी एरव्ही फक्त श्रीखंडाबद्दल वाचले आहे.

पबिक अजूनही खाण्याबद्दल डिटेल बोलायला तयार नाही. पोस्टमंथनातून अजूनपर्यंत फक्त एक कॉफी, व्हॅनिला आईसक्रीम व आव्हाकाडो सॅण्डविच आले आहे. (माझ्या पोस्ट्समधला "दही" उल्लेख हा खाण्याबद्दल नाही).

>>> अजूनही खाण्याबद्दल डिटेल बोलायला तयार नाही. पोस्टमंथनातून अजूनपर्यंत फक्त एक कॉफी, व्हॅनिला आईसक्रीम व आव्हाकाडो सॅण्डविच आले आहे
हो! आणि कुणा मुरलीधराकडच्या न खाल्लेल्या मिठायांची वर्णनं!
शोनाहो ठाणेकर! Proud

बाकी धड मुंबईत नाही, धड बाहेर नाही अशा ठाण्यात हिरण्यकश्यपूसारखं गाठलं एकूण अमितला यांनी! (जुह्नु ऋषींना आपला एक पौराणिक झब्बू! Proud )

जुह्नु- याचा संदर्भ काय आहे?>>>>>>>
भागीरथाने पृथ्वीवर आणलेल्या गंगेचा आवेग प्रचंड होता. त्यामुळे जुह्नु ऋषींचा आश्रम, यज्ञ शाळा त्यात वाहून गेली म्हणून रागाने त्यांनी ती गंगा पिऊन टाकली. पुढे भगीरथ आणि सर्व देवांनी विनंती केल्यावर जुह्नु ऋषींनी त्यांच्या कानातून गंगेचा प्रवाह सोडला. त्यामुळे जुह्नु ऋषींची कन्या म्हणून जाह्नवी असे गंगेचे नामकरण झाले.
गंगौघ - कान असा संदर्भ (चू भू द्या घ्या)

इतके "युक्त" मी एरव्ही फक्त श्रीखंडाबद्दल वाचले आहे.>>>> Lol
असे सगळे करत गेले तर नंतरच्यांना नवीन उमेदवार मिळणार कसे?>>>> Lol
पौराणिक झब्बू>>>> Lol

अजूनही खाण्याबद्दल डिटेल बोलायला तयार नाही. पोस्टमंथनातून अजूनपर्यंत फक्त एक कॉफी, व्हॅनिला आईसक्रीम व आव्हाकाडो सॅण्डविच आले आहे>>> त्यातही आव्हाकाडो सॅण्डविच अनिरुद्ध सरानी सकाळी घेतल होत.

बाकी धड मुंबईत नाही, धड बाहेर नाही अशा ठाण्यात हिरण्यकश्यपूसारखं गाठलं एकूण अमितला यांनी! <<
आता अमितव उंबरठ्यावरच रहातात त्याला आम्ही काय करणार ?
पर इसकी खुशी है की, जगह उनकी, वक्त उनका बताया हुआ फिरभी उनके इलाकेमे जा के उनसे मिले..

भरतनी आयडी बदलून भॉरत घ्यायला हवा >>>
इतके "युक्त" मी एरव्ही फक्त श्रीखंडाबद्दल वाचले आहे >>>
पौराणिक झब्बू >>>
Biggrin

मी आधी लिहिलं तसं, मला भूक लागली होती त्यामुळे इतर कुणी येणारे, नाही येणारे, वगैरे न बघता मी माझी ऑर्डर दिली.
ते क्यू आर कोड स्कॅन करून फोनच्या टीचभर स्क्रीनवर मेनू ब्राऊज करायचा (एका वाक्यात किती इंग्रजी शब्द) म्हणजे मलाही फार बोअर होतं. अ‍ॅट अ ग्लान्स मेनू बघता येत नाही (ए वा कि इं श) त्यामुळे पहिला त्यातल्या त्यात समजलेला पदार्थ मी ऑर्डर केला (पारसी अकुरी/आकुरी). इराणी कॅफेत आधी एकदा खाल्ला होता, त्यामुळे ओळख होती.
आणि आइस्ड कॉफी. हा प्रकार म्हणजे बर्‍यापैकी फसगत असते असं आता माझं मत बनलं आहे. पण 'कोल्ड कॉफी' खूप हेवी होते, त्यापेक्षा हे बरं.

अमित, भरत आणि मी - सुरुवातीला काहीवेळ बाहेरच्या आवारात उभे होतो तेवढ्या वेळात ऑडिओ बुक्स वि. छापिल बुक्स असा एक छोटा परिसंवाद पार पडला.
पुस्तक वाचताना प्रत्येक वाचकाला स्वत:च्या मनात चित्र उभं करण्याचं स्वातंत्र्य असतं, ते ऑडिओ बुक्समुळे हिरावून घेतलं जातं, आपल्या वाचनाच्या वेगाशी ऑडिओचा वेग जुळला नाही तर कंटाळा येऊ शकतो, असं माझं आणि भरतचं मत पडलं.
हे मत आम्ही व्यक्त करण्यापूर्वी अमितने तो बरेचदा ऑडिओ बुक्स ऐकतो, ड्राइव्ह करताना वगैरे, असं उत्साहाने सांगितलं होतं.
त्याने कुठलंतरी एक पुस्तक (नाव विसरले, बहुतेक बेअरटाऊन?) आधी थोडं ऐकलं आणि आवडल्यावर प्रिंट कॉपी आणून वाचली, असं सांगितलं. ही प्रोसेस मला इंटरेस्टिंग वाटली. पण त्याबद्दल पुढे फार बोलणं झालं नाही.

क्यु आर कोड आणि पदार्थांची अगम्य नावं वाचून ये अपने बस की बात नही असं वाटलं. एवढा सुरेख नजारा बघून जावंसं वाटलं तरी कठीण आहे माझ्यासाठी. अशा हाय फाय ठीकाणी धडकी भरते, ममव .

Pages