वृत्तान्त - अमितव गटग -ठाणे -११ मे

Submitted by भरत. on 12 May, 2025 - 01:41

काल ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत कॅनडाहून भारत भेटीस आलेल्या अमितव यांचा मायबोलीकरांसोबतच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे सूत्रांकरवी प्राप्त झाली आहेत.
1.jpg2.jpg3.jpg4.jpg

ही छायाचित्रे पाहून मायबोलीकरांनी कार्यक्रमाबद्दल अंदाज बांधून इथे लिहायचे आहेत.

टीप १. अनुस्वाराच्या लेखनासंबंधी नियम -
काही शब्दांतील अल्पोच्चारित अनुस्वाराऐवजी अनुनासिक जोडले, तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. जसे
१. देहांत - शरीरांत ------------- देहान्त - मरण
२ वृत्तांत - कवितेच्या वृत्तांत ----------- वृत्तान्त - बातमी
३ वेदांत - वेदांमध्ये ........... वेदान्त - उपनिषदांतील तत्त्वज्ञान

हा नियम समजत नसेल तर पुढल्या गटगस हजेरी लावावी लागेल. ज्यांना समजला असेल त्यांनी न समजलेल्यांना समजवण्यासाठी पुढचे गटग आयोजित करावे.

टीप २ - अजून ठरायची आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाषा प्रवाही आहे हे पूर्णपणे मान्य असल्याने इतरांच्या चुका काढत नाही, तेवढा अभ्यासही नाही. पण माझं लेखन मात्र मला जास्तीत जास्त निर्दोष हवं आहे. आपापलं बघते, जगाशी काही देणंघेणं नाही. जास्त सर्वसामायिक धोरण प्रत्येक गोष्टीत आणलं की आपलं हमखास बिघडतं. Happy

वृत्तांत/ वृत्तान्त ठरवा एकदाचे. लोकमान्य टिळकांनी जसा 'संत' शब्द तीन प्रकारे लिहिला तसं गटगच्या शीर्षकात करेन की काय वाटतेय. 'गंगाराम आणि गाढव' गोष्ट कुठपर्यंत आली? Happy

इतरांच्या चुका काढत नाही, ... आपापलं बघते, जगाशी काही देणंघेणं नाही.
अशानेच मराठी माणूस मागे पडतो. Proud

वादे वादे जायते तत्त्वबोध:! तेव्हा वाद घालणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. Proud

'मराठी भाषा आणि वाद घालणे' या दोन्हीचाही गंडा बांधून शिष्या करून घे. लोक म्हणायला हवेत "एक स्वाती काही कमी होती का त्यात अजून.... " Happy

नैतिक जबाबदारीचे बुमरॅंग Proud

जसे दीन आणि दिन.
मन आणि मण दोन्हीचे अर्थ खूप वेगळे आहेत पण कोणी मनाला मण लिहिले तर त्याला म्हणायचं काय आहे ते समजून घेईन आणि पुढे जाईन. कारण त्याच्या दृष्टीने मनाला मण म्हणणं हेच बरोबर आहे. असो.
मुळात गाव - गावात, मन - मनात लिहिताना वा वर, ना वर कुठे देतो अनुस्वार ? देहात ( देहामध्ये) लिहिताना हा वर अनुस्वार का द्यायचा ? देहात लिहिलं की देहामध्ये देहांत लिहिलं की मृत्यू.

इंग्रजीत असे कितीतरी शब्द आहेत ज्याचे आपण वापरतो ते अर्थ पार वेगळे काही ठिकाणी १८० अशांत अंशात वेगळे आहेत. का त न!
>>>

लिटरली

अस्मिता Lol

>>> त्याच्या दृष्टीने मनाला मण म्हणणं हेच बरोबर आहे.
मला वाटतं इथे शुद्ध व्हर्सेस अशुद्ध लेखन आणि प्रमाणभाषा व्हर्सेस बोली संभाषण यांत गल्लत होते आहे. Happy
भरतचा मुद्दा लेखनाबद्दल होता. Happy

तेही नियम बदलत असतात, अर्थात. कित्येक अनुच्चारित अनुस्वार (उदा.. दंव) आता लिहिले जात नाहीत असं पाहिलंय - नियम बदलला असेल तर माहीत नाही.
पूर्वी नांव (नाम) आणि नाव (होडी) वाचून निराळे समजत असत, आता दोन्ही शब्द 'नाव' असेच लिहितो आपण.
नुक्त्यावरून (नुक्तीच Proud ) चर्चा झाली होती. असो.

धागा काय, आपण बोलतोय काय! Proud
ते 'वाहनांमागची वाक्ये'वाले कोण ते येतील बरं का. Lol

मन आणि मण दोन्हीचे अर्थ खूप वेगळे आहेत पण कोणी मनाला मण लिहिले तर त्याला म्हणायचं काय आहे ते समजून घेईन आणि पुढे जाईन. कारण त्याच्या दृष्टीने मनाला मण म्हणणं हेच बरोबर आहे. >>>> ह्याला नक्की लिमिट काय ? असं समजून घेऊन पुढे जायचं असेल अर मग कुठले नियम ठरवायलाच नको.

एक उदाहरण आठवलं. मीना प्रभुंनी त्यांच्या कुठल्यातरी पुस्तकात "तिथल्या चौकात खलबल मचली होती" असं काहितरी लिहिलं म्हणून इथे बरीच चर्चा झाली होती. आता हे शब्द वाचून त्या चौकात नक्की काय घडत असेल हे आपल्या समजू शकतं. डोळ्यासमोर येऊही शकतं. म्हणून हे योग्य मराठी समजायचं का ?

(इथे बर्‍याच पोस्टी होत्या, सगळ्या वाचल्या नाहीत.. शेवटच्या पानावर ही चर्चा दिसली म्हणून नाक घातलं!)

मी एकदा चुकून मुलं दाव्याला लागतात लिहीलेले म्हणजे बच्चे दांव पे लग जाते है .... खरडपट्टीत्मक माइल्ड निषेधात्मक टोमण्यासम, प्रतिक्रिया आलेल्या होत्या. Happy

परागने परभाषेतल्या शब्दांचा आणखी एक नवीन मुद्दा आणलेला आहे या ठिकाणी. >>>> म्हणून तर विचारतो आहे की लिमिट काय ? कुठपर्यंत "समजून घेतलेलं" चालतं ? Happy

मन - मण - जर सांख्यिक टक्केवारी बरीच असेल. असेच वळण अनेकांच्या जीभेस असेल तर चालून जावे. अर्थात समजून घ्यावे.

तिथल्या चौकात खलबल मचली होती - या अशा प्रकारच्या सरमिसळीची टक्केवारी किती? अगदी कमी. मग चालवुन घेउ नये. म्हणजे टिका करणे ठिकच. त्यात लेखकांवर जास्त जबाबदारी असते.

बाकी लोकांना खायला काय मागवलं यात जास्त रस..
मिष्टान्नम् इतरे जना:! >>> Lol परफेक्ट. हपा इथे येत असेल तर तो बरोब्बर त्या सुभाषिताचे विडंबन करेल (गटग मधे प्रमुख पाहुणे काय बघतात, उपस्थित माबोकर काय बघतात, उपस्थित नॉन-माबोकर काय बघतात हे, आणि इतरांना मिष्टांन्नात इंटरेस्ट हे मूळ सुभाषितातील वाक्य तेच). त्याने तसा विडा उचलावा. खुद्द गटगमधे कोणी कसलाच विडा उचलला का अजून बाहेर आलेले नाही. लिटरल वा मेटॅफोरिकल विडा.

"तेरी सारी हरकते मैं तो नोट करूं तुझे थाने में लेजाके मैं रिपोर्ट करूं" >>> Lol

अशांत अर्थ Lol इकडे लोक अनुच्चारित अनुस्वार, वापरातून गेलेले अनुस्वार वगैरे सखोल घुसलेत आणि तिकडे अमित "शब्दात कोठेतरी अनुस्वार आला ना, मग झाले तर" मोड मधे Happy

'मराठी भाषा आणि वाद घालणे' या दोन्हीचाही गंडा बांधून शिष्या करून घे. लोक म्हणायला हवेत "एक स्वाती काही कमी होती का त्यात अजून >>> Lol

भरत बॉस आहे त्यामुळे तो सांगेल त्याबद्दल नापसंती दर्शवायची असं ठरलं. >>> Lol

बॉस झाल्यानंतरचे परिणाम पाहून पस्तावलेलेला भरत, आणि समजूत घालताना स्वाती. "बॉस मॅन भरत"

अरे काय! Lol पुढचं गटग जवळ आलं, तरी धावतोय हा धागा अजून...

मायबोली रॉक्स! (इथे रॉक्सचा योग्य तो अर्थ घ्यालच..)

मैञीपुर्ण वातावरणात झालेली च्रचा वाचून बरे वाटले.

शुद्ध - अशुद्ध, प्रमाण - बोली याबद्दल स्वातीने लिहिलं आहेच.

मुद्दा लेखन नियमांचा आहे.

मनीमोहोर , मी तुमचं जे काही लेखन मी वाचलं आहे. त्यात मला कधी शुद्धलेखनाच्या किंवा व्याकरणाच्या चुका दिसल्याचे आठवत नाही. ( अशा चुका दिसल्या तरी दाखवणे मी कधीचेच सोडले आहे.) म्हणजे तुम्ही लहानपणी जे नियम शिकलात , त्यांत रुळलात. तसंच तुम्ही टाइप करतानाही शुद्धलेखनाच्या चुका होणार नाहीत, याबद्दल सजग असता. तुमचं पुस्तक काढताना त्यात लेखनाच्या चुका नसतील, याची काळजी तुम्ही घेतली असेलच ना? हाच मुद्दा आहे.

आता मी हेडरमध्ये लिहिलेला नियम कोणाच्या फार लक्षात नसावा. चिनूक्सने मायबोलीवर जी नियमावली दिली आहे , त्यातही हा नियम नाही. पण त्यात उपान्त्य, अकारान्त, दीर्घान्त असे शब्द आहेत. उपांत्य, अकारांत, दीर्घांत असे नाहीत.

माझ्याकडच्या व्याकरणाच्या पुस्तकात हा नियम आहे. आवृत्ती १९८२ ची आहे. देहान्त , वृत्तान्त, वेदान्त यांजप्रमाणेच व्यंजनान्त, प्राणान्त, शालान्त ही उदाहरणेही दिली आहेत. नियमात शब्दाचा अर्थ बदलतो असे स्पष्ट म्हटले आहे. आता संदर्भावरून अर्थ कळतोच म्हटले की कोणतेच नियम पाळायची गरज नाही , हा मुद्दा वर आलाच आहे.

<मुळात गाव - गावात, मन - मनात लिहिताना वा वर, ना वर कुठे देतो अनुस्वार ? देहात ( देहामध्ये) लिहिताना हा वर अनुस्वार का द्यायचा ? > गावांत, मनांत, देहांत ही अनेकवचनी रूपे आहेत.

भाषा प्रवाही आहे, हे मान्य आहे. पण आपण लिहिताना तरी आपल्याला जे नियम माहीत आहेत, त्यानुसार लिहावं असा माझा प्रयत्न आहे. इथे वृत्तान्ताची सुरुवात करताना काही तरी ट्विस्ट म्हणून ते लिहिलं. त्यावर चर्चा झाली हे चांगलंच झालं.

मी पहिल्या वाक्यात लिहिलेली मराठी पुढेमागे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांवर आदळणार आहेच.

--
शब्दकोशात वेदांत असाच शब्द आहे. याचा अर्थ हा नियम कठोरपणे पाळला जात नसावा. अस्मिता, तू आलटून पालटून वृत्तांत आणि वृत्तान्त असे लिहीत जा.

@ अश्विनी: हो न.
स्वतः शीर्षकात "गटग" असले विचित्र लघुरूप वापरतात आणि मग व्याकरणाच्या टिपा देतात. Light 1

मला सुरुवातीला प्रमाण भाषा नाही वापरली तर विचित्र वाटायचं. पण प्रमाणभाषा ही बोली भाषा नसलेल्या लोकांना हिणवण्याच्या काही केसेस पाहिल्यावर (माबोवर नव्हे इतरत्र) राग यायला लागला. कुणाला कॉम्प्लेक्स देण्याइतपत जर आपण आग्रही असू तर संवादाचे पूल आपण नष्ट करतो असं मला वाटतं.
खूप जवळचा माणूस नसेल तर मी व्याकरणशुद्ध मराठी (कोणतीच भाषा) सांगायला जात नाही. त्यामुळे तारतम्य वापरणे याबद्दल ममोंना पाठिंबा.

गटगचा धागा व्याकरण चर्चेकडे वळवण्यात माझेही दोन पैसे.

खूप जवळचा माणूस नसेल तर मी व्याकरणशुद्ध मराठी (कोणतीच भाषा) सांगायला जात नाही. <<
पण भरत आपल्या सगळ्यांना खूप जवळचे समजूनच सांगतायत.. Lol

भरत माझ्याकडे आता मो. रा. वाळंबेंची २०१२ सुधारित आवृत्ती आहे. त्यात संधी, लेखन विषयी नियमावली यात अनुस्वारांचे नियम बघितले आता. त्यात हा नियम दिसला नाही.
परंतु त्यांनी सुद्धा शेवटी अन्त या शब्दाने होणाऱ्या संधी अनुस्वार न देता न्त अशा लिहिल्या आहेत पुस्तकात.

इथे या धाग्यावर #कुणाचंकायतरकुणाचंकाय चालू आहे. पण मला ते आवडतं आहे. Happy

इथे या धाग्यावर #कुणाचंकायतरकुणाचंकाय चालू आहे. पण मला ते आवडतं आहे. Happy <<
ते संपूर्ण गटगच 'कुणाचंकायतरकुणाचंकाय' चालू होतं.

मानव, मराठी शुद्धलेखन प्रदीप ना?
त्यात अनुस्वारावरील पाठात ड विभाग - पर - सवर्णाने दाखविले जाणारे - यात शेवटी पहा.
अनुस्वार दिल्यामुळे अर्थभेद तसाच उच्चारभेद यांमुळे घोटाळा होण्याचा संभव असेल तर तो अनुस्वार पर-सवर्णाने दाखविणे अधिक बरे ; असे म्हटले आहे .
उदाहरणे तीच आहेत.

अधिक बरे म्हटले आहे, दाखवावा किंवा अनुस्वार देऊ नये असे म्हटलेले नाही ; म्हणजे हा अगदी काटेकोरपणे पाळायचा नियम नाही.
हेडरमधला मजकूर मी माझ्याकडच्या मराठी व्याकरणाच्या पुस्तकातून घेतला आहे. त्यातही अर्थ बदलतो, असे म्हटले आहे.

ते संपूर्ण गटगच 'कुणाचंकायतरकुणाचंकाय' चालू होतं.>>>>> अगदी अगदी.

त्या अनुस्वाराला अनुल्लेखाने मारा कुणीतरी आता...

Pages