वृत्तान्त - अमितव गटग -ठाणे -११ मे

Submitted by भरत. on 12 May, 2025 - 01:41

काल ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत कॅनडाहून भारत भेटीस आलेल्या अमितव यांचा मायबोलीकरांसोबतच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे सूत्रांकरवी प्राप्त झाली आहेत.
1.jpg2.jpg3.jpg4.jpg

ही छायाचित्रे पाहून मायबोलीकरांनी कार्यक्रमाबद्दल अंदाज बांधून इथे लिहायचे आहेत.

टीप १. अनुस्वाराच्या लेखनासंबंधी नियम -
काही शब्दांतील अल्पोच्चारित अनुस्वाराऐवजी अनुनासिक जोडले, तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. जसे
१. देहांत - शरीरांत ------------- देहान्त - मरण
२ वृत्तांत - कवितेच्या वृत्तांत ----------- वृत्तान्त - बातमी
३ वेदांत - वेदांमध्ये ........... वेदान्त - उपनिषदांतील तत्त्वज्ञान

हा नियम समजत नसेल तर पुढल्या गटगस हजेरी लावावी लागेल. ज्यांना समजला असेल त्यांनी न समजलेल्यांना समजवण्यासाठी पुढचे गटग आयोजित करावे.

टीप २ - अजून ठरायची आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रच्याकने - अन्जूताई टोरांटोचा उच्चार 'ट्रॉन्टो' असा होतो. >>> अरे बापरे, जाऊदे . जुनाच उच्चार बरा. इथले नातेवाईक समजून घेतील उच्चार, नवीन पिढीला विचित्र वाटेल, हाहाहा.

कॅलगरीतले लिटील सिंगर रीयाचे व्लॉग बघ अस्मिता. तिचे बाबा डोंबिवली, आई धुळे आणि ती कॅलगरी आहे. ती लहान असतानाच्या तिच्या गाण्याचे शॉर्टस आवडायचे मला. मी तिची अ‍ॅड करत नाहीये, तिला मी पर्सनली ओळखत नाही, हाहाहा.

मी तर भर प्रेझेंटेशन मधे supply ला सुपली म्हणालो होतो. >>> हाहाहा.

ऑटवायचा प्रयत्न करतेय >>> Lol

टोरांटो (उच्चार कसा माहीती नाही) >> Happy "ताकही फुंकून"? Happy

मी तर भर प्रेझेंटेशन मधे supply ला सुपली म्हणालो होतो >>> Lol

यावरुन Yosemite आठ्वण झाली त्याचे योसेमाइट्,योसमाइट ,योसेमिटि ते.... यशोमती असे असख्य देशी व्हर्जन एकलेत.

Yosemite
>>> हो हो, मी योसेमाइट् योसेमिटि ऐकलेत. नक्कीच उच्चार सांगा बघू कोणीतरी. अस्मिता तू गेली होतीस ना?

Happy हो, मी गेलेली आहे योजेमिटीला. ज आणि स च्या मधला उच्चार बरोबर वाटतो. शब्द नेटिव्ह अमेरिकन आहे. इथे तसे खूप जण असतील तेथे जाऊन आलेले. Happy

मी आलो तर दारात ललिताप्रीती उभी होती. मला ती प्रीती असणार असच वाटलं, पण तिने मेसेज मध्ये काळया रंगाचा ड्रेस लिहिलय वाटून मी जुजबी अनोळखीचं ( फा म्हणतो तसं फाईडिंगि निमो मध्ये.. तो ओठ दाबूनी निज अधरावर हसतो तसा) हसून आत गेलो. ( क्लिप फा देईलच) >>>

४-५ पानांपूर्वी अमितने लिहीलेले हे तेव्हा वाचले होते पण लिंक द्यायची राहून गेली. या सीनमधे "डोरी" आहे तिला शॉर्ट टर्म मेमरी लॉस असतो. ती विचार करता करता आपण कोणाशी बोलतोय, तो कोण आहे हे विसरून जाते व मग वळून पुन्हा तो मार्लिन दिसल्यावर ते "जुजबी अनोळखी" पोलाइट हसते तो हा सीन. ते बघितल्यावर अमित ललिता-प्रीतिकडे बघून कसा हसला ते एक्झॅक्टली लक्षात येईल.

Pages