वृत्तान्त - अमितव गटग -ठाणे -११ मे

Submitted by भरत. on 12 May, 2025 - 01:41

काल ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत कॅनडाहून भारत भेटीस आलेल्या अमितव यांचा मायबोलीकरांसोबतच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे सूत्रांकरवी प्राप्त झाली आहेत.
1.jpg2.jpg3.jpg4.jpg

ही छायाचित्रे पाहून मायबोलीकरांनी कार्यक्रमाबद्दल अंदाज बांधून इथे लिहायचे आहेत.

टीप १. अनुस्वाराच्या लेखनासंबंधी नियम -
काही शब्दांतील अल्पोच्चारित अनुस्वाराऐवजी अनुनासिक जोडले, तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. जसे
१. देहांत - शरीरांत ------------- देहान्त - मरण
२ वृत्तांत - कवितेच्या वृत्तांत ----------- वृत्तान्त - बातमी
३ वेदांत - वेदांमध्ये ........... वेदान्त - उपनिषदांतील तत्त्वज्ञान

हा नियम समजत नसेल तर पुढल्या गटगस हजेरी लावावी लागेल. ज्यांना समजला असेल त्यांनी न समजलेल्यांना समजवण्यासाठी पुढचे गटग आयोजित करावे.

टीप २ - अजून ठरायची आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललिता प्रीतीच्या मुद्द्याला जोडून - फक्त वेग नाही. वाचनाची पद्धतही.

मी ज्या लेखक कवींचे आवाज ऐकले आहेत , काही वेळा त्यांचं लेखन वाचताना त्यांच्या आवाजात मनात वाजतं. (हे तिथे बोललो नव्हतो , आता लिहितोय). मग दुसर्‍या कोणाच्या आवाजात आणि पद्धतीत ऐकताना आधीची रिळं ब्लँक करावी लागतात, ते जमत नाही ( वय झालं. शरीराबरोबर मेंदूची लवचिकता कमी झाली.)
इतर केसेसमध्ये पुस्तक माझ्या आवाजात (तुम्हांला ऐकू येतो त्यापेक्षा माझा आवाज मला वेगळा ऐकू येतो) आणि पद्धतीत वाचलं जातं. वाचणार्‍या चे पॉझेस आणि शब्दांवर जोर देणं वेगळं असलं की खडखडाट होतो. शब्द आणि आशयापेक्षा आवाज आणि वाचनावर फोकस जातो.

अर्थात या गोष्टी शिक ण्यासारख्या आहेत आणि शिकायला हव्यात. आकाशवाणीवर काही पुस्तकांचं अभिवाचन ऐकताना असं जाणवलं नव्हतं. कदाचित अभिवाचन रुचलं असेल किंवा फुकट असल्याने आणि चॉइस नसल्याने खटकलं नसेल.

मी त्यातल्या त्यात लक्षात राहायला सोपं म्हणून चिकन रॅप आणि मॅंगो पायनॅपल लेमनेड मागवले होते. पण रॅप मधेमधे भयंकर तिखट लागत होता. मग तो संपवल्यावर मी अजून एक काजू कतली मटकावली.

काही शब्दांतील अल्पोच्चारित अनुस्वाराऐवजी अनुनासिक जोडले, तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. जसे
१. देहांत - शरीरांत
२ वृत्तांत - कवितेच्या वृत्तांत
३ वेदांत - वेदांमध्ये
यात एक भर..
हा अल्पोच्चारित अनुस्वार अनेकवचन निर्देशित करतो.
एका देहात.. आणि अनेक देहांत..

>>> ऑडिओ बुक्स वि. छापिल बुक्स असा एक छोटा परिसंवाद पार पडला.
माझंही आताशा वाचन जवळपास बंदच झालं आहे - श्रवणच होतं. पुस्तकंच नाही, पॉडकास्ट्स इत्यादीही.
काहींना ऐकताना 'झोन आऊट' व्हायला होतं, विशेषत: एकसुरी वाचलं गेलं असेल तर - माझा सहसा फोकस टिकतो.
काही जाडजूड पुस्तकं तर केवळ ऑडिओ फॉर्मॅटमध्ये होती म्हणून पदरी पडली माझ्या.
यात चांगलं वाईट असं ठरवता येणार नाही मला - कन्व्हीनियन्स, इतकंच बहुधा.

>>> दुसर्‍या कोणाच्या आवाजात आणि पद्धतीत ऐकताना आधीची रिळं ब्लँक करावी लागतात,
हो, असंही होतं एकेकदा.
अगदी नुकतंच 'आहे मनोहर तरी' ऐकायचा प्रयत्न केला स्टोरीटेलवर. ते अरुणा ढेर्‍यांनी वाचलंय. मला त्यांच्या आवाजात आणि (प्रेमळ, काहीशा गोग्गोड) उच्चारपद्धतीत रुचलंच नाही ते!
ते सुनीताबाईंच्याच (भरत म्हणाला तसं प्रथम वाचताना माझ्या मनात ऐकलेल्या) रोखठोक आवाजात आवडलं असतं ऐकायला, कारण मजकुरात तसा रोखठोकपणा आहे.

तसंच क्रिश अशोकचं 'मसाला लॅब' पुस्तक खरंतर त्यानेच वाचायला हवं होतं!

हा अल्पोच्चारित अनुस्वार अनेकवचन निर्देशित करतो.>>> बापरे, अभ्यासाला सुरुवात केली की काय?

बाकी लोकांना खायला काय मागवलं यात जास्त रस... Lol
पुढच्या गटग ला लक्षात ठेवतो.
शेवटचा अध्याय बाकी आहे.

स्वाती ताई, मसाला लॅब पुस्तकाची इथे आठवण काढल्याबद्दल धन्यवाद.
मला हे वाचायचे आहे.

बापरे, अभ्यासाला सुरुवात केली की काय? <<
छे.. छे..
ही आमच्या मातोश्रींची कृपा..
आज भेटायला गेलो होतो तर हा विषय निघाला. म्हणजे मी काढला.

मानव Lol

>>> हा विषय निघाला. म्हणजे मी काढला.
सच ऑनेस्टी! Proud

हो! Lol

धमाल चालली आहे. Lol कुणी काय खाल्ले हे रीतसर फोटोसहित द्या. आमचा फक्त फोटोंवर विश्वास आहे.

अमित रालेच्या गटगला अव्हेरून ठाण्याला गेला वर आता पुण्याच्या गटगलाही जाणार आहे. जस्टिन बीबरची आठवण यावी असे सेलेब स्टेटस मिरवत आहे. "तेरी सारी हरकते मैं तो नोट करूं तुझे थाने में लेजाके मैं रिपोर्ट करूं" या सुविचाराचे पालन करत त्याची पापाचा पायली 'भरत' आल्याची नोंद करत आहे. लिहिता लिहिता कोटी झाल्याने अवतरण चिन्हात भरत आले आहेत. शिवाय "तुम्हारा गटग हमारे गटगसे सफेद कैसा" कारण माझेमन खरोखरच पांढरा शुभ्र शर्ट घालून आली आहे व मला एका प्रसिद्ध गायनॅक टाईपच वाटली. एकतर तू ट्रूडोला मत दिल्याने मी येथे लंकेत येऊन पडले आहे, ते कमी होते म्हणून वर हे.... Wink Proud पापाची पायली काऊंटींग !

मस्त पोस्ट्स सगळ्या.
इथे लिहिलं म्हणून कळलं तरी , नाहीतर कोणी काय कळल हे ह्या कानाचं त्या कानाला कळलं नव्हतं . मी वेटरलाच हाताशी धरल्याने मी काय घेतलं ते सगळ्यांना कळलं होत तिथेच. असो.
व्याकरण , शब्दोच्चार हे शास्त्र आहे, त्याचे नियम आहेत हे मान्य आहे पण ही थोड्या तारतम्याने ही घ्यायची ही गोष्ट आहे . मुळात शुद्ध भाषा हीच संकल्पना मला फार पटत नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने शुद्ध भाषाच बोलत असतो. पानी, मण, सॅलरी भेटली, केसं वैगेरे शब्द ही मला फार बोचत नाहीत तर हे वृत्तांत / वृत्तान्त वगैरे फारच दूर... लावण्या हा शब्द सौंदर्य / लावण्य , ह्यासाठी आणि तमाश्यातल्या लावण्या ह्यासाठी एकच तऱ्हेने आपण लिहितो ना पण उच्चार संदर्भ बघून खूप वेगळा करतोच की नाही ?

मी पण! smiley36_0.gif
ममो ना मोदक द्यायला आले तर अर्धी पोस्ट गायब

हाहाहा... खोडलं पण. म्हटलं आपलं फारच अल्प ज्ञान आहे, तू वाचल आहेसच तर माहित असेल तुला तर मला वि पू मध्ये सांग

Lol

ऋतुराज Lol
तरी ह्या दोघीतल्या RMD आल्यावर देखील gtg झालेलं
अस्मिता आली की तेव्हाही होईल

Lol मी पण. झकासराव, आता काय मी पाहुणचार सोडणारे वाटते की काय. त्यांच्यापेक्षाही जास्त मज्जा करू, प्रत्येक क्षणाचा/ घासाचा फोटो काढून येथे देऊ. Wink

अरे काय लिहिलेलं? आम्हाला पण सांगा की! Lol
व्याकरण ठीक आहे, पण अर्थ बदलत असेल तर योग्य शब्द वापरावा.. जसे दीन आणि दिन.
स्वाती आणि भरत यांच्यात चर्चा झाली का? काय ठरलं?

ममो, तारतम्य हवं याला अनुमोदन. Happy
फक्त तारतम्याची एकच सर्वमान्य फूटपट्टी नाही हा प्रॉब्लेम आहे. Proud
'अर्थाचा अनर्थ होऊ नये' असं म्हणताना 'अर्थ पोचला ना, मग झालं तर!' ही त्याच नाण्याची पाठची बाजू झेपत नाही मला स्वतःलासुद्धा. पेचच आहे हा! Happy

स्वाती +१. पण त्याच प्रमाणे भाषा ही बहुसंख्यांचा हातात असते. उद्या बरेच लोक जे बोलू लागतील तेच टिकणार.
इंग्रजीत असे कितीतरी शब्द आहेत ज्याचे आपण वापरतो ते अर्थ पार वेगळे काही ठिकाणी १८० अशांत अंशात वेगळे आहेत. का त न!

Pages