वृत्तान्त - अमितव गटग -ठाणे -११ मे

Submitted by भरत. on 12 May, 2025 - 01:41

काल ११ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत कॅनडाहून भारत भेटीस आलेल्या अमितव यांचा मायबोलीकरांसोबतच्या भेटीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची काही छायाचित्रे सूत्रांकरवी प्राप्त झाली आहेत.
1.jpg2.jpg3.jpg4.jpg

ही छायाचित्रे पाहून मायबोलीकरांनी कार्यक्रमाबद्दल अंदाज बांधून इथे लिहायचे आहेत.

टीप १. अनुस्वाराच्या लेखनासंबंधी नियम -
काही शब्दांतील अल्पोच्चारित अनुस्वाराऐवजी अनुनासिक जोडले, तर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. जसे
१. देहांत - शरीरांत ------------- देहान्त - मरण
२ वृत्तांत - कवितेच्या वृत्तांत ----------- वृत्तान्त - बातमी
३ वेदांत - वेदांमध्ये ........... वेदान्त - उपनिषदांतील तत्त्वज्ञान

हा नियम समजत नसेल तर पुढल्या गटगस हजेरी लावावी लागेल. ज्यांना समजला असेल त्यांनी न समजलेल्यांना समजवण्यासाठी पुढचे गटग आयोजित करावे.

टीप २ - अजून ठरायची आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो, ना. मी तर आधीच भरत तरूण झाल्याची शंका घेऊन झाली. अगं -तूगं, अरे-तूरे काय, बिनधास्त बोलणं काय, विनोद काय, अमितची स्तुती काय, अमितने इतरांची स्तुती काय. काहीही नॉर्मल नाही. घोर कलियुग आहे म्हणते व गप बसते. Happy गटगची बाधा होते आहे, 'फाऊंटन ऑफ यूथ' झाले यांचे गटग.

हर्पा, फा आणि ऋतुराज Lol

गटग मधल्या खाद्यपदार्थांच्या चर्चेवरून ,,
शिकरणावरून व्याकरणावर आलात की मंडळी !
( कवी वरून काकवी वर आलात की च्या चालीवर... )

तुम्ही ड्यू आयडी आहात असे लक्षात आल्यावर तुमच्या LOL स्मायलीला मी "बरं Wink " अशी खोचक कॉमेंट दिली आहे बरं का.

सगळी मजा मजा चालली आहे इथे.
पण ह्या सगळ्या मंथनातून मला मिळालेले अमृतकण
१) देहान्त हा शब्द जरी डिस्टिंक्शन प्रतीचा असला तरी देहांत ही सेकंड क्लास प्रतीचा आहेच, अगदीच नापास नाही.
२) देहात हा शब्द एक वचनी देह सूचित करतो तर देहांत देह च अनेक वचन सूचित करतो. देहांत हा शब्द वाचताना अनेक वचनी देह की मृत्यू हे संदर्भाने घ्यायचे आहे. हे टाळायचे असेल तर देहातांच्या वाटेला न जाता सरळ देहान्त लिहा ...
आता यापुढे ऋतुराज म्हणालाय तसं ह्या अनुस्वाराला अनुल्लेखाने मारणे च इष्ट. जाऊ दे त्या आपापल्या वाटेने... Happy

सीमांत पूजन म्हणजे आपापल्या सीमांमध्ये राहुन केलेले पूजन. (सीमे जवळ गेलेच पाहिजे असे नाही.)

सीमान्त पूजन म्हणजे गावची सीमा संपते तिथे जाऊन केलेले पूजन.

मानव Proud
एखादा विषय पेटला की ज्वलंत आणि विझला की ज्वलन्त? Proud

अस्मिता, म्हणजे ऑप्शनल आहे तर! Proud

मापृ Happy आता सीमान्त/ सीमांत कळाले. मी जोक समजण्याच्या आत मला जे माहिती होते ते लिहून टाकले.

हो, ऑप्शनलच. उगाच बॅचलर्स पार्टीचा कीवर्ड समज. Wink

ही चर्चा सम्पवायची/ संपवायची ठरलं होतं ना Proud

एखाद्या भयंकर पापापासून / अपराधापासून/ चुकीपासून मुक्तता मिळविण्यासाठी केलेल्या प्रायश्चित्ताला देहांत/देहान्त प्रायश्चित्त का म्हणतात ते कळाले बहुतेक
Lol

एखादा विषय पेटला की ज्वलंत आणि विझला की ज्वलन्त? >> Lol नको देवराया अंत/ अन्त आता पाहू...

ही चर्चा सम्पवायची/ संपवायची ठरलं होतं ना >>> असे म्हणून माबोवरच्या चर्चा थांबल्या असत्या तर....
...तर वास्तविक मी लिहीणार नव्हतो असे म्हणून तरीही लिहीणार्‍यांनी तसे केले नसते. हेमाशेपो लिहीणारे नंतर परत लिहायला आले नसते. आता माबोवर कोणी हेमाशेपो म्हंटले की मला साधारण असे म्हणावेसे वाटते.

म्हणजे ऑप्शनल आहे तर! >>> काय? ब्रह्मचर्य? Happy

पुणे गटगमधून मधेच बाहेर जाउन अमित व भरत लकडी पुलाखाली दीवार गटग करत आहेत. तेथे ठाणे गटगमधली वाक्ये दाखवून पुढचा संवादः
"इसपे अनुच्चारित अनुस्वार देदो"
"मै पहले अनुच्चारित अनुस्वार नही दूँंगा. जाओ पहले उसको बोलो जिसने मेरे गटग बाफपे पहले ये व्याकरण निकाला. उसके बाद तुम जिस शब्द पे कहोगे मै उसपे अनुच्चारित अनुस्वार दे दूँगा"

... मग वृ वाचताना रमडचे स्वगतः हो पण त्यातील योग्य अक्षरावरच दे. नाहीतर अंशात चे पुन्हा अशांत व्हायचे.

Lol नटवरलाल आणि हेमाशेपो. अमिताभ आलाच शेवटी.
लकडी पुलाखाली दीवार गटग >>> Lol Lol

दीवारचे अजून एक माबोरूप -
मेरे पास ललित है, कविता है, कथा-कादंबरी है, दीडशे चाहते है, दंडवत है, मायबोलीवर येण्याचे सार्थक झाले भी है, वर चालू घडामोडीत पण मेरे जैसा फाडफाड कोई नहीं है. तुम्हारे पास क्या है ??

मेरे पास गटग है.

Happy Lol

शिकरणावरून व्याकरणावर >> नुसती घाण वाटणे म्हणजे शि-करण. घाण वाटून ओकारी येणे म्हणजे व्या-करण

रमडचे स्वगतः हो पण त्यातील योग्य अक्षरावरच दे >>> Rofl संवाद कहर आहे!

अस्मिताचे व्हर्जन पण जबराट Lol

काहीही नॉर्मल नाही. घोर कलियुग आहे >>> अगदी खरंय गं. मी पण भरतना कधी इतकं हसताना पाहिलं नाही Proud

शिकरणावरून व्याकरणावर >>> हर्पा Lol

मराठी शुद्धलेखन प्रदीप >>> यावरून 'झंपर चंद्रिका' आठवलं
(सॉरी, अगदीच राहवलं नाही)

एखादा विषय पेटला की ज्वलंत आणि विझला की ज्वलन्त? >>> एक नंबर! Biggrin

नवीन additions भारीच आहेत.
देहांताची शिक्षा , ज्वलंत शिकरण व्याकरण, सीमांत

वा! वा! परवाच्या पाठाची उजळणी मुलं अगदी मन लावून करताहेत.

मुलांनो, किमान पुणे गटग सुरू होईपर्यंत हा धागा धावता राहू द्या.

>>>>>>मुलांनो, किमान पुणे गटग सुरू होईपर्यंत हा धागा धावता राहू द्या.
का बरं नंतरही राहू द्या की सुरु Happy

भरत यांची प्रतिमा माझ्या मनात उग्र, रागिट व मिशीवाले, स्क्वेअर शोल्डर्स अशीच होती. पण प्रत्यक्षात ते मृदु व 'नॉर्मल' वाटतायत. Lol Lol . किंचित इन्ट्रोव्हर्ट व पटकन न खुलणारेही असावेत. म्हणजे टेक्स हिज ओन टाईम टु वॉर्म अप.

ललिताप्रीती मला वयाने बर्‍याच असतील असे वाटे. पण माझ्या कल्पनेपेक्षा, त्या खूपच लहान आणि हसमुख आहेत.

ममो मला माहीत होत्या. कश्या काय माहीत. बहुतेक फोटो पाहीला असणार.

सामो, बरोबर ओळखलंत. मला मोठ्या ग्रुप्स मध्ये फार ऑकवर्ड होतं. एकास एक किंवा फार तर ३-४ जणांत गप्पा मारायला जमतं.

मी स्वातीला म्हटलं होतं, अनुस्वारावर योग्य जागी चर्चा करू, तिनेच इथे सुरू केली आणि तीन पाने तोच विषय चालला. त्यातले माझे प्रतिसाद फक्त तीन आहेत.
# जुनी मायबोली राहिली नाही.

विवि गटग वृत्तान्त : ३ (अंतिम)
ऐन भरात आलेल्या गप्पांना आता विषयाचे असे काही बंधन नव्हते. तरी मायबोलीबाह्य गप्पा असल्याने त्या मायबोलीवर वळल्यावर मग काही परिचित धागे आणि आयडीबद्दल चर्चा झाली. ललिता प्रीति यांच्या आफ्रिकेवरचे लेख, इतर पुस्तकांवरील लेख, त्यातील लेखकांचे अनुभव यावर चर्चा झाली. विशेषतः निरंजन घाटे यांची "मी वाचत सुटलो त्याची गोष्ट" आणि "हटके भटके" या पुस्तकावरील लेखांवर जास्त चर्चा झाली. निरंजन घाटे यांच्याबद्दल बरीच रोचक माहिती मिळाली. तसेच अमितव यांनी आईस हॉकी पुस्तकावर ललिता प्रीती यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यात मी उत्स्फूर्तपणे फक्त बघ्याची भूमिका घेतली. एव्हाना सावली आल्या होत्या. त्या सुद्धा बालसंगोपन, प्रसाधन व्यवसाय याबाबद्दल माहिती देत होत्या. त्यांचं आणि माझेमन यांचं काहीतरी काहीतरी वेगळ्या विषयावर संभाषण चालू होतं ते मी हेरलं.
त्यानंतर निरुदा यांनी मायबोलीवर ते फोटो कसे टाकतात याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. ती पद्धत पाहून, मी तर असं काहीच करत नाही. किंबहुना प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धती वापरून फोटो अपलोड करतो हे लक्षात आले. शेवटी मायबोलीवर लेख लिहिणे जितके सोपे त्यापेक्षा लेखात फोटो टाकणे कैकपटीने अवघड यावर आम्ही सर्वानुमते शिक्कामोर्तब केले. निरुदा मधून मधून त्यांच्या "आरण्यक" चे फोटो दाखवत होते. मी ते निमंत्रण समजून लवकरच तिथे भेट देणार आहे किंवा त्यांनीच तिथे गटग आयोजित करावे. त्यांचे अनेक लेख लिहून तयार आहेत पण फोटोंच्या द्राविडी प्राणायमामुळे ते अजून प्रकाशित करू शकले नाही. कृपया त्यांनी ते लवकरात लवकर प्रकाशित करावेत. त्यांची लेखांची टिपणे अगदी सविस्तर आहेत त्यात कुठला फोटो कुठे, ते सुद्धा व्यवस्थित लिहिले आहे (बसलेला वाघ, पाठमोरा सिंह, हत्तीचा कळप , वाघ नं १, २ वैगरे ) हे पाहून मला त्यांच्या ऑर्गनाईज्ड पणाचा खूप हेवा वाटला.
हे सगळं चालू असताना ललिता प्रीति यांची ऑर्डर आली त्यांनी पारसी अकुरी/आकुरी (हे त्यांच्या प्रतिसादातून कॉपी पेस्ट केलं आहे ) ऑर्डर केलं होत साधारणतः बर्गरचा गोल पाव आणि भुर्जी असावी असे प्रत्यक्षदर्शी वाटले. खरं खोटं त्याच जाणो. मी आणि निरुदा यांनी Chicken Focaccia Sandwich (हे पण त्यांच्या प्रतिसादातून कॉपी पेस्ट केलं आहे) मला फक्त चिकन सँडविच आठवत होत पण ते Focaccia (फोकाचा- इटालियन उच्चार) आहे, ते मी विसरलो म्हणून मला ओल्या फोकाचा मार देण्यात येऊ नये.
बरं मागच्या भागात जे मी मंजूडी यांनी अमितवला एक पिशवी दिली याबद्दल सांगितले. तर, त्यात ववि २०२३ चा टीशर्ट होता जो त्यांनी आज घेतला. आणि मी तो मागवलाच नाही याबद्दल माझ्या मनात पुन्हा जळफळाट, नैराश्य, हेवा, असूया, असे अनेक संमिश्र भाव एकत्र दाटून आले. त्यामुळे #पापाचीटोचणी हा हॅशटॅग आत मलाही लागू पडावा. मधेच मी ममोताईंशी साताऱ्याच्या गप्पा मारल्या. निघायच्या आधी लघुशंकेसाठी मी आणि अमित पुरुष प्रसाधन शोधू लागलो तर तिथल्या पुरुष प्रसाधन लिहिलेल्या खोलीत शिरल्यावर आम्ही भुलभुलैय्या टाईप पुन्हा मेन रिसेप्शनला आलो. त्या प्रसाधनाचे काम चालू होते बहुतेक त्यामुळे मग आम्ही विचारून दुसऱ्या ठिकाणी गेलो. त्यामुळे लघुशंकेला दीर्घ वेळ गेला. गप्पा चालल्याच होत्या. वेळ खूप झाला तरी कुणालाही निघायची घाई नव्हती पण मग जड अंतःकरणाने आम्ही सव्वा दहाला टेबलावरून उठलो.
ममोताईंनी फणसाचे तळलेले गरे सुंदर पॅकिंग करून आणले होते, निरुदा यांनी केशराची कुपी तर अमितव यांनी चॉकलेट. या भेटीसाठी धन्यवाद.
ममोताईंना रिक्षा लगेच मिळाली त्यामुळे त्या लगेच गेल्या. सावली आणि ललिता प्रिती पण मग निघाल्या. निरुदा आणि अमित यांना टाटाबायबाय करून मी भरत आणि माझेमन कॅब मध्ये निघालो. रस्त्यात एक अपघात झाल्यामुळॆ जरा ट्राफिक होते पण नंतर फार ट्राफिक लागले नाही. वाटेत माझेमन यांचे शारदापीठ आणि काश्मीरबद्दल च्या धाग्यांवर चर्चा तसेच भरत यांच्या मंगेशकर हॉस्पिटल धागा व इतर चर्चा झाल्या. माझेमन याना सोडून, मी भरत यांना रिक्षात बसवून एका अविस्मरणीय अनुभवाची अनुभूती घेऊन घरी आलो.
सगळ्यांनाच पहिल्यांदा भेटलो असलो तरी तसे अजिबात वाटले नाही. प्रत्येकाकडून खूप काही घेण्यासारखं आहे. मायबोली हे खरंच एक कुटुंब आहे आणि आपण मायबोलीचा एक भाग आहोत याचा सार्थ अभिमान वाटला. हे जोडलेले ऋणानुबंध असेच राहो. लोभ आहेच तो वृद्धिंगत होत राहावा
II इति विवि गटग वृत्तान्त तृतीयोध्याय: समाप्त II

Pages