क्रिकेट - ९

Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37

२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया Happy

क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटतं कि गिल कॅप्टन होईल. ओपनिंग साठी राहूल, इश्वरन (रिझर्व्ह) आणि जैस्वाल असतील. पाचव्या नंबरवर सर्फराझ/नितिश खेळेल.

सर्फराजला एक तरी सामना बाहेर खेळून किमान फेल व्ह्यायची संधी तरी द्या रे , त्यावर खेळता येत नाही हा शिक्का मारण्याआधी
+1

काढून टाका कोहलीला. मला काही आक्षेप नाही.
>>
निवड समितीला असेल

असं कसं म्हणता सर?
निवडसमिती मायबोली एक्सपर्ट काय म्हणताहेत हे बघूनच निर्णय घेणार आहे. तेव्हा बिनधास्त व्यक्त होऊया.

पाचव्या नंबरवर सर्फराझ/नितिश खेळेल. >> जुरेल ला आणाले तरी आश्चर्य वाटणार नाही. अ संघाच्या सामन्यांवर ठरवले तर बरे होईल उगाच प्रीकंसिव्ड नोशनमधे जाण्यापेक्षा.

एक मॅच डाउन अंडर खेळला नि फेल गेला होता. त्याच मॅच मधे जुरेल नि पड्डीकल चांगले खेळले नि त्यांची पहिल्या नि शेवटच्या टेस्ट मधे वर्णी लागली. सर्फराज पहिल्या १५ मधे होता त्यामूळे एका सराव सामन्याच्या जोरावर काट मारणे हा ट्रेंड अनफेअर वाटतो.

एका सामन्यावरून काट मारूच नये.
किंबहुना परदेशात कसे खेळायचे हे लोक अनुभवाने सुद्धा शिकतात. सगळेच सचिन नसतात.
फक्त पोटेन्शियल दिसायला हवे. ते ज्याला ओळखता येते अशीच लोकं निवड समितीत असतील अशी अपेक्षा.
पण अर्थात त्यांना वाटले की नाही यात ते पोटेन्शियलचा नाही तर ते एका सामन्यावरून सुद्धा किंवा नेट मधील खेळ बघून सुद्धा काट मारू शकतात. स्पेशली मागे खूप लाईन असल्यास.. पण कसोटीत ती लाईन लागली नाहीये म्हणून डोमेस्टिक गाजवणाऱ्या खेळाडूला पुरेसे चान्स मिळावे असे मलाही वाटते.

"अ संघाच्या सामन्यांवर ठरवले तर बरे होईल उगाच प्रीकंसिव्ड नोशनमधे जाण्यापेक्षा." - अ संघाचे सामने आहेत का इंग्लंडमधे? तसं असेल तर बरं होईल.

अ संघाचे सामने आहेत का इंग्लंडमधे? तसं असेल तर बरं होईल. >> हो. आधीच्या बातम्यांप्रमाणे अ संघ आधी जाणार होते. त्या सामन्यांमधे बरेचसे सिनियर - विशेषतः कोहली नि रोहित पण खेळणार असे होते.

पण अर्थात त्यांना वाटले की नाही यात ते पोटेन्शियलचा नाही तर ते एका सामन्यावरून सुद्धा किंवा नेट मधील खेळ बघून सुद्धा काट मारू शकतात. >> ते बरोबरही आहे पण आहे फक्त हे ज्ञान त्यांना त्याला पहिल्या १५ मधे निवडताना कसे नव्हते असा प्रश्न उभा राहतो. काहीतरी पोटेंशियल वाटल्याशिवाय त्याला १५ मधे न्यायलाच नको होते. एक जागा कशाला अडवायची ना. सर्फराजच कशाला ईश्वरन ची केस तर अजून जास्त काळासाठी झालेली आहे.

आता बरेच ऑप्शन आहेत निवड समितीकडे!
>>
आतापर्यंतच्या अनुभवावरून ते सर्वात obvious निवड करणार...
प्रिन्स गिल होणार कप्तान

टेस्ट क्रिकेट परत एकदा डायनॅमिक बनवल्याबद्दल कोहली ला खूप धन्यवाद...
कोव्हिड ब्रेक नंतर जर फॉर्म डिप आला नसता तर अजून भरपूर रेकॉर्ड मोडली असती... आकडे आत्तचेही चांगलेच आहेत, पण त्यात २०२० पर्यंतची झळाळी नाही...
वन डे फॉरमॅट साठी शुभेच्छा...

दोघांनी दोन्ही निर्णय योग्य वेळी घेतले.
20-20 निवृत्ती विश्वचषक जिंकून आणि कसोटी निवृत्ती टेस्ट चॅम्पियनशिपचे नवीन सायकल सुरू होण्यापूर्वी.
कोहली 2027 वन डे वर्ल्डकप खेळायचे चान्सेस बरेपैकी आहेत. रोहित शर्माचे अवघड वाटत आहे. पण दोघांनी जमवावे आणि 2027 विश्वचषक जिंकून निवृत्त व्हावे अशी इच्छा आहे. कारण ट्वेंटी पेक्षा वन डे ला जास्त महत्व असणाऱ्या जनरेशनचे हे शेवटचे दोन लिजेंड आहेत.

पण कोहलीबाबत फॉर्म नाही तर तंत्रात दोष निर्माण झाले होते. ते दुरुस्त न होणे जरा अनाकलनीय होते कारण त्याचे इतके वय झाले नव्हते की या मागे रिफ्लेक्स प्रॉब्लेम असावेत. त्याची त्याआधीची कसोटी कारकीर्द सचिन द्रविडच्याच पंक्तीत बसणारी होती. इंग्लंड ऑस्ट्रेलिया आफ्रिकेत खोऱ्याने धावा करून झाल्या होत्या. म्हणजे मुळातच तंत्रात दोष होता अशातला भाग नव्हता. तसेच कोहलीला कसोटी धावांची भूक नव्हती हे सुद्धा मान्य करणे अवघड. कारण त्याच्यासारख्या ऑलटाइम ग्रेट फलंदाजाला या फॉरमॅटमध्ये स्वतःला पुन्हा सिद्ध करायची गरज नक्कीच वाटत असावी. पण निवृत्ती घेतली म्हणजे त्याने आता सुधारणा होत नाही हे स्विकारले असे दिसते. आणि पाच वर्षांचा काळ पाहता योग्यच निर्णय घेतला असे वाटते.

टेस्ट क्रिकेट परत एकदा डायनॅमिक बनवल्याबद्दल कोहली ला खूप धन्यवाद... >> +१. फिटनेस, पेसर्स ना बॅक करणे, देशाबाहेर सातत्याने जिंकण्याची हाव निर्माण करणे ह्यात त्याला तोड नाही. आजच्या 'अरे' ला 'कारे' म्हणणार्‍या भारताचे यथार्थ रिप्रेसेंटेशन ! भारतात नि पर्यायाने जगात टेस्ट क्रिकेटला परत ग्लॅमर मिळवून दिल्याबद्दल धन्यावाद ! क्रिकैंफो ने त्याच्या वर जी आकडेवारी दिली आहे ती अबब करणारी आहे. एव्हढ्या अपेक्षांचे ओझे घेऊन, सगळ्या फॉर्‍अमॅट मधे सातत्याने कामगिरी करणे ह्यात सचिन नंतर किंवा सचिनबरोबर कोहलीचे नाव घ्यावे लागणार आहे. शिवाय ग्रेग चॅपेलचा लेख वाचाच. कोहलीला जबरदस्त कॅप्चर केले आहे.

बुमराहने स्वतःच अंग काढून घेतले आहे.
राहुलचा विचार होणार नाहीये.
गिल आणि पंत मध्ये विचार चालू आहे.
गिल कर्णधार आणि पंत उपकर्णधार असे होण्याची शक्यता आहे.

Shubman Gill is reportedly set to captain the Indian cricket team in the upcoming five-match Test series in England, marking their start in the World Test Championship 2025-27. Rishabh Pant is expected to be his vice-captain, while Jasprit Bumrah will reportedly not hold a leadership role.

क्रिकैंफो ने त्याच्या वर जी आकडेवारी दिली आहे ती अबब करणारी आहे. >> मला आकडेवारीचा प्रॉब्लेम नाही तर "तुझ्या ती न समजता येण्याचा" प्रॉब्लेम आहे. करायचे होते तर अबब हा भाग करायला हवा होता. अर्थात तुला हे समजेल नि उमगेल ह्याची अपेक्षा नाहीच.

मी आकडेवारी वरून खेळाडू जोखत असतो तर रोहीत शर्मा आणि ऋषभ पंत यांनी त्यांना डिफाईन करणारे आकडे तयार करायच्या आधीपासूनच त्यांचा फॅन क्लब काढून मोकळा झालो नसतो. असो. आकडेवारी प्रत्येकालाच रोचक वाटते. कबूल करा किंवा करू नका Happy

थोडेसे रोचक आकडे.

IMG-20250510-WA0051.jpg
.
IMG-20250511-WA0037(1).jpg

या आकड्यावरून रोहीत शर्माला ग्रेट कसोटी खेळाडू घोषित करायचे नाहीये. पण रोहीत खेळतो तेव्हा त्याचा इम्पॅक्ट वेगळा असतो हे या आकड्यात सुद्धा दिसते Happy
पण एखाद्याला यामागचा हा विचार नाही समजला तर त्याला हे आकडे निरर्थक सुद्धा वाटू शकतात.

आकडेवारी प्रत्येकालाच रोचक वाटते. कबूल करा किंवा करू नका >> मला "आकडेवारी रोचक वाटते किंवा नाही ह्याने" तुला नेमका काय फरक पडला ?

मी रोहित इंपॅक्टफुल खेळाडू नाही हे कधी म्हटले होते हे दाखवतोस ? मी कोहलीबद्दल दोन चांगले शब्द बोलल्यावर तुझा तडफडाट का व्हावा हे मला कळत नाही. मी तुझ्या कुठल्या पोस्टबद्दल आक्षेप घेतला होता हे शोधलेस तर तुला तुझ्या आकडेवारी पॉर्न मधला फोलपणा जाणवेल. (ह्यात हे वरचे आकडे नव्हते.) त्याच पोस्ट वरून तू इथे चार जणांशी भांडला होतास सो शोधायला सोपे जाईल.

बाय द वे, कोहलीच्या रीटायरच्या वेळी नेहमीचेच मी नि माझे फेव्ह रोहितच्या पराक्रमाचे आकडे टाकणे ह्यासारखा करंटेपणा तू करावास ह्यातच सगळे आले. किमान ज्याचा फॅन आहे असा (खोटा) दावा करतोस त्याच्याकडून काही तरी डिग्निटी घ्यायचीस.

हा हा.. हे कोहली विरुद्ध रोहीत विरुद्ध धोनी वगैरे तुम्हालाच लखलाभ
शुभेच्छा आणि शुभरात्री

हा हा.. हे कोहली विरुद्ध रोहीत विरुद्ध धोनी वगैरे तुम्हालाच लखलाभ >> डोळे मिटून दूध पिणारा बोका आठवला Lol माझ्या संपूर्ण पोस्टमधले तू एक वाक्य उचललेस. त्या लेखाबद्दल किंवा चॅपेल्च्या लेखाबद्दल एक अवाक्षरही नाही पण मागे कधी तरी झालेल्या वादाला (तोही माझ्यापेक्षा फोर्स बरोबर झाला होता अधिक) फोडणी देता येईल असा एक शब्द दिसल्यावर तो हायलाईट करून जे केलेस त्यात सगळे स्पष्ट दिसते सर.

पुजारा टेस्ट बृएकेट्मधून बाहेर गेल्यापासून स्पष्ट वक्ता झालाय. त्याचे रिसेंट लेख, मुलाखत गेल्या १० वर्षांमधल्या भारतीय क्रिकेटमधल्या घटनांवर इनसाईट देतात. त्याने कोहलीबद्दल केलेले चॅट वाचनीय आहे. चुकवू नका.

https://www.espncricinfo.com/story/cheteshwar-pujara-for-virat-kohli-tes...

कोहली आणि शर्मा दोघेही मस्त खेळाडू होते. त्यांच्या रिटायरमेंटने थोडी पोकळी नक्कीच जाणवेल.

टेस्ट चे महत्त्व हळू हळू कमी होत गेलेले आहे. पण त्यात जे तंत्रशुद्ध क्रिकेट दिसते ते वेगळेच असते. द्रविडचे संयत खेळणे, McGrath ची एका रेषेतली बॉलिंग. हे सगळे टेस्ट मध्येच दिसायचे.

Gideon Haigh चे सब्स्क्रिप्शन घेतले होते मधे वाचायला. याचे काही फुकट पण मिळतात. कोहलीबद्दलचा लेख जबरदस्त पॉईंट्स कव्हर करतो. हे टीडबिट्स पहा.

Above all, Kohli represented a cricket that sought to leave nothing to chance anywhere. Tendulkar, Dhoni, Dravid, Kumble: these were standard setters to be sure, but mainly for themselves. Kohli raised the general minimum in pursuit of an empowering maximum: he was not a Federer, all outward serenity, but a Djokovic, with a fiery self-mastery.

Kohli, furthermore, was dedicated to Test cricket in a way that dignified them both: Test matches grew in significance by Kohli’s presence; Kohli stood taller for the five-day pedestal.

It is banal to call him a great batter. He was that rarer phenomenon, a dramatic batter.

नि हे खास भाऊ नि स्वरुपसाठी Happy

Like everyone who grapples with fame, Kohli has found it occasionally confounding and inhibiting. But unlike Tendulkar, with his fetish for privacy, and Dhoni, with his suit-yourself insouciance, Kohli has always appeared to be loving every minute of his life, doing what he was put on earth to do with a lipsmacking relish.

पूर्ण लेख वाचता येईल का नाही सर्वांना माहित नाही पण लिंक ही आहे.

You get the sense that some of Kohli’s ambition died when India dropped from contention in the World Test Championship; seeing history in sweeps rather than steps, he understood another two-year cycle to be beyond him. In a way, too, his retirement is a compliment to the five-day format.
https://www.cricketetal.com/p/gone?img=https%3A%2F%2Fsubstack-post-media...

कोहली आणि शर्मा दोघेही मस्त खेळाडू होते. त्यांच्या रिटायरमेंटने थोडी पोकळी नक्कीच जाणवेल. >> I have to quote this here Happy They can not be replaced but need to be succeeded.

काल एका व्हाट्सअप ग्रूपवर कोणीतरी म्हटलेले की असेही कसोटी क्रिकेट आता तितके ग्रेट राहिले नाही त्यावरची माझी पोस्ट …

मला उलट वाटते. सद्य काळात व्हाईट बॉल क्रिकेट इतके फलंदाज धार्जिणे झाले आहे की फलंदाजीचे खरे टॅलेंट कसोटीतच टेस्ट होत असल्याने हा स्कॉलर विद्यार्थी वेगळे करणारा फॉरमॅट झाला आहे.

कसोटी आवडणाऱ्या क्रिकेटप्रेमी जनतेचे क्रिकेट नॉलेज आणि आयपीएल ट्वेंटी 20 मधून जो नवीन उत्सवप्रेमी क्राउड क्रिकेटकडे आकर्षित केला जात आहे त्यांचे क्रिकेट नॉलेज आणि क्रिकेटप्रती passion पाहिले तर दोघात फरक जाणवेल.

उलट येत्या काळात पैश्याचे गणित साधत व्हाईटबॉल क्रिकेट कमर्शीअल आणि उथळ होत जाईल. पण कसोटी क्रिकेटच या खेळाला त्याच्या ओरिजनल फॉर्ममध्ये वाचवून ठेवेल. या फॉरमॅटचा ग्रेटनेस कायम राहील. भले येत्या काळात लोकप्रियता उथळ प्रकारांना जास्त मिळेल, पण तो काही ग्रेटनेसचा निकष नाही.

...

नंतर एक पोल काढलेला,
सेना देशात आपला दौरा आहे. तर कोणता सामना बघायची उत्सुकता तुम्हाला सर्वात जास्त असते.. कसोटी, वन डे, ट्वेंटी... झाडून सगळ्यांनी कसोटी सामना हेच उत्तर दिले आणि ते उत्तर प्रामाणिकच होते.. असावे.. आताही इंग्लड दौरा म्हटले की सर्वप्रथम कसोटी सामनेच डोळ्यासमोर येतात. कसोटीला मरण नाही असे मला वाटते.

Pages