Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो सायो, लिंकन लॉयर मध्येच ते
हो सायो, लिंकन लॉयर मध्येच ते घर. मोठ्या मोठ्या खिडक्या वगैरे.
YOU चा S5 आलायं . Psycho
YOU चा S5 आलायं . Psycho behaviour n violence बघवत असेल तर बघा.
बरेच दिवसांनी काही संदर्भ लागेनात म्हणून S4 last episode पासून सुरुवात केलीयं.
माझा बघून झाला YOU चा S5.
माझा बघून झाला YOU चा S5. मस्त होता हा सीझन. यावेळी केट, नादिया, मेरीअॅन आणि रेजी सारख्या टफ बाया भेटल्या जो ला. केट माझी फेवरीट झाली ! ब्रॉन्ते फार इरिटेटिंग वाटली समहाऊ. तिचा ट्रॅक शॉर्ट करून जो चे कॉन्सिक्वेन्सेस जास्त डीटेल मधे दाखवता आले असते. तरी पण एन्डिंग माझ्या मते ओके होतं.
सध्या White Lotus (HBO) बघत आहे. इन्टरेस्टींग आणि बरीच चर्चा झालेली सीरीज. ३ सीझन्स आहेत. प्रत्येक सीझन मधे १ वीक चा टाइम स्पॅन, एक कोणता तरी सुंदर व्हेकेशन स्पॉट , तिथले अल्ट्रा लक्झरी रिसोर्ट असे सेटिंग असते. तिथे आलेल्या मोस्टली सुपर रिच व्हाइट फॅमिलीज, त्यांची मेस्ड अप रिलेशन्स , पैसा, पॉवर वापरून इतरांचे एक्सप्लॉइटेशन हा नॉर्म, दुसरीकडे रिसोर्ट स्टाफ, इतर काही वर्किंग क्लास लोक , या सर्वांचे रीलेशनशिप चे बदलते डायनॅमिक्स याबद्दल ४-५ पॅरलल ट्रेक्स असतात. आणि या सर्वात दर सीझन ला एक ट्रॅजेडी/ डेथ घडते!!
फास्ट , भर्र्कन काहीही घडत नाही. ( मला सुरुवातीला "काय चाललंय ,काहीच होत नाहीये की!" असे फीलिंग आले होते) सर्व प्लॉट हळू हळू पुढे जातो , जसे काही आपण पण ७ दिवसांच्या व्हेकेशन मधे तिथे आहोत असे. यात डायरेक्टली सांगितलेल्या कहाणी पेक्षा न सांगितलेले डीटेल्स, रुपकं जास्त असतात. हे या सीरीज चे वैशिष्ट्य आहे. मला कन्सेप्ट इन्टरेस्टिंग वाटली. सगळ्यांना आवडेलच याची गॅरेन्टी नाही!
माझा बघून झाला YOU चा S5.
माझा बघून झाला YOU चा S5. मस्त होता हा सीझन >>>> recap बघून झाला की सुरू करते
यु पहायची अजुन हिंमत नाही
यु पहायची अजुन हिंमत नाही झाली. फार थंड क्रौर्य आहे त्यात ज्याने अंगावर काटा येतो. जरा खंबीरपणा परत आला की पहावं झालं.
मी सध्या नेटफ्लिक्सवर ‘यंगर’ पहात आहे आणि मला खूप आवडली आहे.
सध्या White Lotus (HBO) बघत
सध्या White Lotus (HBO) बघत आहे. >>> मी पाहिली आहे थोडी. पहिल्या सीझनचे काही भाग आणि दुसर्या सीझनचा पहिला. पण इतकी कधी एंगेजिंग वाटली नाही की बाकी स्ट्रिमिंग आकर्षणांमधून ही बघावी. मै - तुझ्या वर्णनावरून "नेटाने बघा आणि मग पाहा कसे खिळून जाल" कॅटेगरीतीलही दिसत नाही
"Meh!" कॅटेगरी? 
शेवटी चिखलातले सीन सूचक बिचक
शेवटी चिखलातले सीन सूचक बिचक असले तरी फार कळण्यासारखे नाहीत>>>>>>> हाहा खरंच. केहेना क्या चाहते हो भाई असंच झालं.
पण त्या मधुचं काम फार आवडलं मला. एकदम जबरदस्त!
खौफ बघून झाली. ओव्हरॉल
खौफ बघून झाली. ओव्हरॉल एन्गेजिंग आहे. मात्र शेवट मलाही कळला नाही.
एकूण दिल्लीबद्दल माझं मत काही फारसं चांगलं नव्हतं आणि ही सिरीज पाहून ते अजूनच खराब झालं आहे.
मी ही सिरीज ट्रॅडिशनल सुपरनॅचरल हॉरर आहे असं समजून बघायला घेतली होती. त्याबाबतीत माझी निराशा झाली. मात्र यात दाखवलेलं पुरूषी स्वभावातलं, वर्चस्वातलं हॉरर कैकपटीने भयानक आहे. स्त्री ने कायम दबूनच रहावं असं मानणारी कितीतरी माणसं असतील आणि कितीतरी स्त्रिया त्यांच्या अश्या इगोला दररोज बळी पडत असतील याची जाणीव झाली. ते दाखवण्यात ही सिरीज यशस्वी झाली आहे असं मला वाटतं. खौफ हे शीर्षक त्या भुतासाठी नसून प्रत्येक स्त्रीच्या मनातल्या आदिम भीतीसाठी आहे आणि वेगवेगळ्या प्रसंगांमधून असे असंख्य नमुने दाखवले गेले आहेत.
मला आवडली ही सिरीज.
बाकी ते चिखल वगैरे ती त्या डार्कनेस मधे अडकून पडली आहे हे दाखवण्यासाठी असावं. प्रतिकात्मक मे बी.
--------स्पॉयलर अलर्ट!!------
-------------------------------------------------
जीवा तिला स्वतःबरोबर नेण्याच्या प्रयत्नात का असतो ते समजलं नाही.
आणि शेवटी भूत मेलं(?) की नाही? का आता तिने कंट्रोल केलं आहे भुताला आणि स्वत: स्ट्राँग झाली आहे? तिचा बदला असा परस्पर कसा घेतला जातो? का नकुलचा गिल्टच त्याला स्वतःला मारतो असं दाखवायचा प्रयत्न आहे?
हो ती डार्कनेस मधून बाहेर
हो ती डार्कनेस मधून बाहेर यावी हे कळलं पण ते भूतही स्त्रियांना काही चांगलं लेखणारं नव्हतं, इव्हन त्या मुलींना हऱ्यास अब्युज करणारच असतं तर जिच्यावर अत्याचार झालाय तिचा संघर्ष बदला व त्याचा बदला एकसारखा कसा असू शकतो. मेलेल्या मुलाचं कॅरेक्टर निगेटिव्ह होतं.थोडक्यात कथा गंडलीय.
एकंदर दिल्लीतली परिस्थिती फार स्त्रियांसाठी सेफ नाही हेच वाटतं हि सिरिज बघून याला अनुमोदन. अगदी तो बसमधाला प्रसंगही जितका साधारण नेहमीचा वाटत असला त्यातल्या स्त्रियांसाठी त्यानंतर पाठलाग करणारा माणूस हाही सीन कुठल्याही स्त्री साठी खौफ दायी असेल.
पंचायत पुढचा सिझन येतोय, जुलै
पंचायत पुढचा सिझन येतोय, जुलै फर्स्ट विकमध्ये, 2 का 3 ला. तारीख विसरले.
हो हो मी पण टिझर पाहिला आजच..
हो हो मी पण टिझर पाहिला आजच...या सिझनला निवडणूकाची धामधुम दिसतेय.
हो हो. 2 जुलै रिलीज होणार.
हो हो. 2 जुलैला रिलीज होणार.
यावेळी स्वानंद किरकिरे मोठ्या रोलमध्ये असावा.
Britain and The Blitz
Britain and The Blitz
नेटप्लिक्स वर ही डॉक्युमेंट्री नक्की बघा. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडमधली युद्ध परिस्थिती विशद केली आहे. रिअल लाईफ स्टोरिज आहेत. काही मूळ फुटेजेस आहेत.
(डॉक्युमेंट्रिजचा धागा न मिळाल्याने इथे पोस्ट केलय)
आणि शेवटी भूत मेलं(?) की नाही
आणि शेवटी भूत मेलं(?) की नाही? >>>>>>>>> जीवा नंतर त्या हकीममधे शिरतो. मी असं समजले की मधुने त्याला मारलं म्हणजे त्याच्यासोबत जीवा पण मेला.
नकुलचा गिल्टच त्याला स्वतःला मारतो>>>> असंच असावं. कारण ती तेव्हा अरूण सोबत दाखवलीये ना हॉस्पिटलमधे.
पण तरी गंडलंय काहीतरी असं वाटत राहिलं. त्या ३-४ मुलींचा बदला जीवाला घ्यायचा असतो ना? मग मधुत शिरून ती /तो बाकीच्यांनाच मारत सुटते ज्यांनी तिला अॅब्युज केलंय. मधु जास्त पॉवरफुल होते का जिवापेक्षा? त्या मुली तिला कायतरी ते हकिम ने दिलेलं प्यायला देत असतात ते कशासाठी?
मधुत शिरून ती /तो
मधुत शिरून ती /तो बाकीच्यांनाच मारत सुटते ज्यांनी तिला अॅब्युज केलंय >>> मला हे समजलं ते असं - ती मुलं जेव्हा तिला जीवे मारायला लागतात तेव्हा जीवा अॅक्टिव्हेट होतो आणि त्यांना मारतो. शिवाय जीवा शेवटी म्हणतो तसं त्याला समजतं की मधू सुद्धा बदल्याच्या आगीत जळते आहे त्यामुळे तिला तो मदत करत असावा. अर्थात मला हे पटलं असं नाही पण सगळ्या सिक्वेन्सचा अर्थ तरी तसाच लागतो आहे.
मुली तिला ते का प्यायला देत असतात ते मात्र मलाही नाही समजलं. तिला व्हल्नरेबल करण्यासाठी? म्हणजे मग ती लवकर झपाटली जाईल असं काहीतरी?
एकूणच हॉरर पेक्षा सोशल मेसेजला जास्त फुटेज दिल्यामुळे सिरीज काहीशी गंडली किंवा काही लूज धागे राहिले असं वाटतं.
मी पण पाहिली खौफ. मला आवडली,
मी पण पाहिली खौफ. मला आवडली, सगळ्यांची कामं तर अफाट. पार्श्वसंगीत साजेसे वाटले. वर उल्लेखलेल्या कच्च्या दुव्यांसकट आवडली. शेवटी दिल्ली असो की छोटं शहर किंवा खेडं, मुली कुठेही सुरक्षित नाहीत...
You s5 बघून संपवली.
You s5 बघून संपवली.
Bronte ने खरच irritate केलं.
I m in love with Katie . जो ला कोणीतरी भेटली खमकी and She is so graceful .
मलाही शेवट आवडला.
My be the problem isn't me , may be its You
रॉयल्स म्हणुन सीरीज आली आहे
रॉयल्स म्हणुन सीरीज आली आहे नेफ्लि वर. १ च भाग पाहिला. ईशान खट्टर ८०% वेळ उघडा आहे
पहिल्याच भागात बेस्ट सीईओ की तशा च टाइप एक अवार्ड सेरेमनी
एकूण भंपक दिसतेय सीरीज. पिसं काढण्याचं भरपूर मटेरियल दिसते आहे. 
घशाखाली घास उतरत नाही तसा
घशाखाली घास उतरत नाही तसा रॉयलचा पहिला भाग माझ्याच्याने संपता संपत नव्हता. तरी त्यात मला आवडणारे लोक आहेत. भुमी प्रचंड बारीक व चेहराच बारीक व उभा झालाय, एआयनी केले आहे की काय असे वाटण्याइतपत. तिची हिंदी बोलण्याची स्टाईल मला अगदीच नाही आवडली. साक्षी तंवर प्यायलेलीच वाटली. झीनत इथेही कधीच गॉगल काढत नाही. खट्टर गोड आहे पण रोलच कमकुवत. त्यामुळे एका भागावर बंद केली आहे. तरी इथे पब्लिकने वाहवा केली तर पुढील भाग पाहीन.
घशाखाली घास उतरत नाही तसा
घशाखाली घास उतरत नाही तसा रॉयलचा पहिला भाग माझ्याच्याने संपता संपत नव्हता>>> अगदी ग!
भुमी पेड्णेकरने स्वतःच काहितरी वेगळच करुन घेतलय..एवढि गोड चेहर्याची मुलगी आणी तिच्याकडे बघवत पण नाहि आता.
टिव्हिएफने अगदी सेम पन्चायत
टिव्हिएफने अगदी सेम पन्चायत प्लॉटवरच आधारित "ग्राम चिकित्सालय" आणलीये प्राइमवर..बघायला सुरवात केलिये पण अजुन तरी पन्चायत दुरच राहिल पण दुपैया इतकाही अपिल नाही हेच जाणवतय..
दुपहिया बघितली. आवडली. मध्ये
दुपहिया बघितली. आवडली. मध्ये मध्ये काही ठिकाणी जरा स्लो झाली. जागोजागी आणखी क्रिस्प असायला हवी होती. पण तरी मजा आली बघायला. (फक्त ते स्त्रीवेषातलं गाणं मी पुढे पळवलं)
स्पर्श श्रीवास्तव भारी काम करतो. इतर कलाकारही सगळे छानच.
कुबेर, लोन देणारा टिपूचा बाप, इन्स्पेक्टरची बायको (तिला तर एकच सीन आहे), अमावसची वहिनी, हे सुद्धा.
रेणुका शहाणेचे बिहारी संवाद रट्टा मार के केलेले वाटले. सहज येत नव्हते. पण हरकत नाही.
सीझन-२ बघणार.
सुरुवातीला आणि शेवटी दिलेल्या कवितेच्या ओळी खूप आवडल्या - अभी गांव पहुंची हो तुम सडक, जब सारा गांव शहर चला गया - अशा टाईप काहीतरी आहेत.
*** स्पॉयलर ***
फक्त एकच गोष्ट जरा पटली नाही. बाइकचा चोर कोण हे कळल्यावर ताबडतोब क्रेनने ती बाईक हस्तगत केली जाते. ती सुद्धा विहिरीतून. ग्रूप ग्रामपंचायतचा भाग असलेल्या रिमोट खेड्यात इतकी शक्तीशाली क्रेन वगैरे तातडीने कशी काय मिळते?
वाढलेलं अन्न वाया घालवायचं
वाढलेलं अन्न वाया घालवायचं नाही या शिस्तीमुळे पहिला भाग बघितला. उगाचच म्हणून आणखी दोन भाग बघितले.
इशान खट्टर बराच बरा वाटतो. निदान राजघराण्यातला वाटतो तरी. भूमी जबरदस्त boring आहे. एकतर ती अजिबात best CEO वगैरे वाटत नाही. नुसतं power dressing ने होतं नसतं. तिचं मोरपूरमधलं deal pitch इतकं बेकार आहे . काहीतरी विचित्र झोपाळू एकसुरी बोलते ती.
तिचे आणि इशानचे banter पण कॉलेजमधल्या मुलांसारखे आहेत.
Male actors सगळे मस्त आहेत. Females तितक्याच boring.
त्या Romeo Juliet ball नंतर बघण्यात काही राम उरला नाही.
BTW , पहिल्या भागातला कॉफी आणि नंतरचा कॉफी वेगळा आहे.
वाढलेलं अन्न वाया घालवायचं
वाढलेलं अन्न वाया घालवायचं नाही >>> हे आवडलं
अभी गांव पहुंची हो तुम सडक,
अभी गांव पहुंची हो तुम सडक, जब सारा गांव शहर चला गया -
या ओळींवरून आपल्या माबोवरील तिलकधारींची साधारण याच आशयाची गझल आठवली.
शहरात पोचताना गेला बुजून रस्ता
आला असेल बहुधा गावाकडून रस्ता
https://www.maayboli.com/node/41989
खौफ बद्दल कल्की ला +१११.
खौफ बद्दल कल्की ला +१११.
स्पोइलरः
आधी तिचा बदला अमलात येत असता आणि त्या ट्रेन सबवे लेन मधे त्या मुला वर राग काढताना, ती अॅक्सीडेंट मधे मेलेली मुलगीच बदला घेतेय असं वाटलं. मग अचानक जिवाचं भूत असल्याचं कळलं, मग तो का तिला स्ट्राँग बनवेल? त्याचा बायकांवर राग असतो..
त्या जिवाने खूप छान अभिनय केलाय, अगदी चीड येते त्याची. मेन हिरोईन जमतारावाली ने पण खूप चांगलं काम केलय.
भुमी पेडणेकर ने ओझेंपीक का
भुमी पेडणेकर ने ओझेंपीक का काय ते केलय. ज्याने १ महिन्यात बारीक होते पण स्कीन लूज पडते, नॅचरल चार्म जातो. ते सेम करण जोहर ने पण केलय.
तरीच इतकी वेगळी वाटते.
तरीच इतकी वेगळी वाटते.
खौंफमधे त्या मुलाची व मुलींची मारामारी फार परिणामकारक झाली आहे. भिती वाटते.
करण जोहरने ओमॅड केले ना? वन
करण जोहरने ओमॅड केले ना? वन मील अ डे..
लांबलचक नावे ठेवण्यात
लांबलचक नावे ठेवण्यात बॉलिवूड्लाही कुठच्या कुठे मागे टाकेल असे नाव असलेली एक murder mystery वेबसिरीज नेटफ्लीक्सवर पाहिली.
The Woman in the House Across the Street from the Girl in the Window
हुश्श्य.
नसती पाहिली तरी चालली असती. पहिले काही एपिसोड्समध्ये संशयाची सुई इथून तिथे फिरते अणि त्यामुळे उत्कंठा वाढते खरी पण शेवट अगदीच फुस्स, न पटण्यासारखा गुन्हेगार निघाल्यामुळे उगाच वेळ वाया घालवला असं वाटलं.
Pages