Submitted by sonalisl on 7 July, 2023 - 08:11
तुम्हाला कोणती मालिका आवडली, नाही आवडली, कुठे पाहिली, पाहता येईल त्यावर चर्चा करूया.
आधीच्या (https://www.maayboli.com/node/79167 ) धाग्यावरील प्रतिसाद संख्या २०००+ झाल्यामुळे हा नवीन धागा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कामापुरता मामा, ताकापुरती आजी
कामापुरता मामा, ताकापुरती आजी
श्र _/\_
जोवर पुरवू हट्ट तोवरी पत्नी असते राजी >>>
डब्बा कारटेल मध्ये डब्बाच नाही, नुसते लोणचे >>>
ते मोडेला मोडेला सारखं ऐकून
ते मोडेला मोडेला सारखं ऐकून मी विचार करत होते की च्यामारी मी कोविड वॅक्सिन याच काहीतरी सेम नावाची घेतली इथे. नंतर आठवलं ते मॉडर्ना
जोवर पुरवू हट्ट तोवरी पत्नी
जोवर पुरवू हट्ट तोवरी पत्नी असते राजी >>
गुड वन
त्या डब्बा कारटेल मध्ये डब्बाच नाही, नुसते लोणचे भरले आहे >>>
हे आक्षेप बरोबर आहेतच पण बघताना मला बोअर नाही झाली सिरीज.
केट हडसन मात्र एकदम खूप वय झाल्यासारखी वाटली >>> टोटली.
मॉडेला/मॉडर्ना >>>
श्र सहीच
श्र सहीच
तरूणपणीही उत्फुल्ल वगैरे
तरूणपणीही उत्फुल्ल वगैरे वाटली नाही.
तिची पडद्यावरची बॉडी लँग्वेज नेहमी आता नवर्याला डायव्होर्स देउ की नको विचार करत असल्यासारखी आहे.
>>> अगदी अगदी.
स्मिता 'नमक हलाल' सारख्या रोल मधे होती तेव्हा पंजाबी ग्लॅमर नसला तरी तिचा वावर खटकला नाही.
>>> स्मिता वारीससारख्या (टुकार) पंजाबीपटांत राज बब्बर, अमृता सिंग सारख्या बॉर्न पंजाब्यांपुढे अजिबात कमअस्सल वाटली नाही. अर्थमध्येही ती मॉडेलच होती की. शबाना नाही मी इमॅजिन करू शकत.
अमर अकबर ॲंथनीमध्ये विनोद खन्ना ‘तेरे संग जीवन की डोर बंधी है’ मुकेशच्या आवाजात का गातो हे आत्ता समजलं. अमिताभसाठी परवीन, ऋषीसाठी नीतू आणि विनोद खन्नासारख्या डॅशिंग माणसाला एक तर ती बावळट मिशी आणि वरून शबाना...
आजकाल तर शबाना चेहऱ्याने बोजड (जया भादूरीसारखी) वाटते.
रत्ना पाठक शहा वगैरे चटपटीत वाटतात शबानापेक्षा, ईव्हन सुप्रियातही (किंवा नीना गुप्तातही) गोडवा आहे. >>> या सगळ्यांचं कॉमिक टायमिंगही जबरदस्त आहे.
रत्ना पाठक शहा वगैरे चटपटीत
रत्ना पाठक शहा वगैरे चटपटीत वाटतात शबानापेक्षा, ईव्हन सुप्रियातही (किंवा नीना गुप्तातही) गोडवा आहे. >>> या सगळ्यांचं कॉमिक टायमिंगही जबरदस्त आहे. पूर्ण पोस्टच >>> +1
वर शबानाबद्दल कुणीतरी बोललंय.
वर शबानाबद्दल कुणीतरी बोललंय. ती दिसते सुस्त आणि सुजलेली. पण तिच्या त्या थंडपणामुळेच मला ह्या रोलमध्ये ती खटकली नाही. रत्ना पाठक आणि नीना गुप्तानेही चांगलाच केला असता रोल पण त्या चटपटीत वाटल्या असत्या.
Hotstar वर Paradise पाहिलीत
Hotstar वर Paradise पाहिलीत का कोणी? छान आहे.
प्राइम वर दुपहिया आली आहे.
प्राइम वर दुपहिया आली आहे. ओळखीच्या चेहऱ्यात गजराज राव आणि रेणुका शहाणे दिसले. २४ वर्षांपासून बिहारमधील एका अपराधमुक्त गावातून हुंड्याकरता आणलेल्या बुलेटच्या चोरीची गोष्ट आहे, पहिले २ भाग थोडे संथ वाटले, पण पुढे रंगत यावी. पहिल्या भागातील लग्न ठरवण्याचा प्रसंग तर वेगळ्याच लेवलचा आहे.
दुपहिया छान आहे! सगळे चांगले
दुपहिया छान आहे! सगळे चांगले कलाकार आणि बिहारी खेड्यातलं अस्सल वातावरण. कॉमन शहरी/ इन्ग्रजी शब्दांना गावाकडचे हिंदी शब्द किंवा त्याच शब्दांचे बिहारी उच्चार ( पिलंबर, बाइकाट, फालोवर वगैरे!) ऐकायला मज्जा येते . सेट अप मुळे बघताना पंचायत ची आठवण येते जरा, पण वेगळा विषय आहे. ज्या गावात २४ वर्षात एक पण गुन्हा दाखल झाला नाही तिथे एका मुलीच्या लग्नाच्या हुंड्यासाठी आणलेली मोटर सायकल लग्नाच्या ७ दिवस आधी चोरीला जाते आणि मग तिची शोधाशोध, अतरंगी उपाय अशी साधीच गोष्ट आहे. अधून मधून जरा स्लो डाउन होते खरी पण एकंदर हलके फुलके विनोदी बघायचे असेल तर नक्की बघा. काही सीन्स एकदम हहपुवा आहेत.
मै, आवडेल असे वाटतेय. कुठे
मै, आवडेल असे वाटतेय. कुठे आहे ही सिरीज?
नरेन यांची पोस्ट वाचली. प्राईम वर आहे हे कळाले. धन्यवाद दोघांनाही.
डब्बा कार्टेल बघत होते. २ एपि
डब्बा कार्टेल बघत होते. २ एपि झाले. ठीक आहे. सई ला जर मेनस्ट्रीम रोल मधे बघून चांगले वाटले.
मला ही तसेच वाटले.
राजीच्या नवऱ्यात जरा गोऱ्या दिसायला बऱ्या विजय वर्माचा भास होत होता.>>> ह्या आणि निखिल बने दोन्ही कोमेंटींना +१००
शबाना बद्दल मम! अस्मिता +१००. मला ती कायम कंटाळलेली वाटते स्क्रीन वर. बॅग भरून तयार
रॉकी रानी मधे ही कॉमिक टाईमींग फारसा जमला नाहीये..
दुपहिया बघत आहे, तो मुलगी बघताना भलत्यालाच सिलेक्ट करण्याचा प्रसंग हहपुवा आहे, वर मोठ्या भावालाच कपल & इतरांचा फोटो काढायला सांगतात
सहसा असे मुलगा करतो, भलतीच (जरा जास्त सुंदर वगैरे) मुलगी पसंत करणे वगैरे, रोजा सारखे. ह्यात समानता दाखवली.
दोन्ही सिरीज मधे गजराज आहे अगदी कंविंसींग रोल करतो. तो मान अडकल्याचा अभिनय इतका खरा वाटतो, की बघणारे पण (मी
) पण तसं करून बघत होते 
दुपहिया धमाल आहे. बरेच प्रसंग
दुपहिया धमाल आहे.पाहिले दोन भाग तर
आहेत बरेच प्रसंग विनोदाच्या अंगाने जाणारे आहेत .जेव्हा हिरोईन गाण्यावर नाचत असते .तिच्या भावाचे काही प्रसंग
आहेत .ऍक्टर्स सगळे मस्त घेतलेत बघताना पंचायत चा भास होतो पण कथा पंचायत पेक्षाही गुंतवून ठेवते स्पेशली पुढे काय होणार हे कल्पना असूनही बघायला मजा येते नेहमीचे गाव शहर ,हुंडा विषय आहेत पण अस्सल विनोद पाहायला मिळतो यात अभिनयाचा आणि अभिनेत्यांच्या जास्त हात आहे गजराज राव, रेणुला शहाणे लापता लेडीज चा हिरो ,मेड इन हेवन वाली हिरोईन जस्सी म्हणजे शिवानी रघुवंशी तिची आई,सावळी शिक्षिका मुलगी ,हिरॉईनचा आशिक, भावाचा मित्र,नवरा मुलगा त्याचा भाऊ ,पोलीस ,पत्रकार गावातले लोक सगळेच धमाल आणतात मस्त फील गुड वेबसिरीज बघायची असेल आवर्जून बघा . एका दुपहिया साठीची फक्त स्टोरी नाहीये तर अनेक विषय विनोदी आणि अप्रचारकी भाषेत मांडले आहेत खासकरून मोबाईल टेक्नोलॉजि चा गावातला शिरकाव ,गावाचं राजकारण, विकास,काळं गोरं असण्याचा भेद आणि रंगाचा अजूनही गावात आणि लग्नाच्या बाजारात असणारा पगडा.शेवटचा भाग आत्मनिर्भर सगळ्यावर कडी आहे हल्लीच्या वेबसीरीज आणि चित्रपटामध्ये असे शेवट येतायत ही चांगली गोष्ट आहे. शेवट खूप आवडला.
आशु - हो, आणि मुलगी जास्त
आशु - हो, आणि मुलगी जास्त लाडकी असते
गजराज म्हणतो इसके बाद हमने नसबंदी क्यू नही करवायी!!
( धाकट्या मुलाचे ते रील , डान्स वगैरे शौक बघून)
मला पण शेवट फार आवडला. टिपिकल मार्गाने नाही केला.
शबानापेक्षा, ईव्हन
शबानापेक्षा, ईव्हन सुप्रियातही (किंवा नीना गुप्तातही) गोडवा आहे.
आचारी बा नावाचा नीना गुप्ताचा पिक्चर येतोय हॉटस्टार वर. बा च्या रोल मधे ती कशी दिसतेय ते तुला आता लवकरच पहायला मिळेल बघ.
>>>
अस्मिता, आखिर भगवानने तुम्हारी सुन ली
बोनस म्हणून कबीर बेदी पण आहे त्यात
दुपाहिया आवडली काही काही
दुपाहिया आवडली काही काही विनोद खरच जमलेत....डॉलरचा बर्थडे वैगरे बघुन...विजयराजचा बोकड आणी त्याचा मेकप आठवला..
बाकी पन्चायत मधली गाव देहातची मडळी,त्याची वेशभुषा जास्त अस्सल वाटते..यातली थोडी जास्त पॉलिश्ड वाटली...बाकी मुलाच नाव भुगोल कोण ठेवत?? त्याच काम फार भारी झालय... सगळ्याचच काम छान आहे..तरी एवढ मोठ घर आणी अन्गण असताना शाळेत कशाला नेवुन ठेवायची गाडी? मस्त अन्गणातच ठेवायची की.
अगं प्राजक्ता सेम हियर, भुगोल
अगं प्राजक्ता सेम हियर, भुगोल तर भुगोल. अमावस कोण ठेवतं मुलाचं नाव
निखळ आहे सिरीज. सर्वांनी बघा.
तो अमावस हॉट आहे!
बोनस म्हणून कबीर बेदी पण आहे
बोनस म्हणून कबीर बेदी पण आहे त्यात>> हा पण आवडतो का काय लोकांना? मला पहिल्या पासून आवडत नाही, लंपट लूक एकदम.
पात्रांची नावे धमालच आहेत -
@ दुपाहिया
पात्रांची नावे धमालच आहेत - अमावसची girlfriend रौशनी, तिचा भाऊ भूगोल, उल्लू डॉलर भैया, दुसरा तो परमाणु भैया
आणि बोलतांना “वो लप्पूझन्ना तो बेकार आदमी है”
त्या रोशनीच्या आईच्या जागी,
त्या रोशनीच्या आईच्या जागी, ती आपली नेहमीचीच शिबा चढ्ढा असायला हवी होती असे सारखे वाटते.
माझी अजून पूर्ण व्हायची आहे पाहून सिरीज.
दुपहिया बघितली. अगदीच सुमार
दुपहिया बघितली. अगदीच सुमार वाटली.
मालिकेला नक्की कशी ट्रीटमेंट द्यायची याबाबत दिग्दर्शक गोंधळलेला वाटला. बहुदा त्याला फार्सिकल मालिका बनवायची होती पण फार्सकरता आवश्यक तो वेग आणि धमाल काही तो गाठू शकला नाही. मध्येच त्याला पंचायतच्या वाटेने जायचा मोह झाला असावा - पण कोमल आणि अमावस वगळता एकही पात्र ठाशीव झालेलं नाही. पंचायतची सर येणे तर दूरच.
अमावसच्या एंट्रीलाच मालिकेचा शेवट काय होणार ते लक्षात येते आणि त्यापेक्षा वेगळा शेवट काही होत नाही. चोरीच्या निमीत्ताने केलेला फार्स कंटाळवाणा वाटला. तो नाचाचा प्रसंग तर खूप हिडीस वाटला. चोराने चेहर्यावर फडके बांधले असले तरी आवाजावरून तो सहज ओळखता येतो त्यामुळे ससपेन्स एलिमेंटही नाही उरत.
दुपहिया ऐवजी 'रोशनी की शादी' हे नावही शोभावं इतकं रोशनीचं कॅरेक्टर मध्यवर्ती आहे आणि ते सपशेल गंडलेलं वाटलं. पहिल्याच प्रसंगात बघायला आलेल्या मुलासमोर त्याच्या भावाला लग्नाबाबत विचारते तेंव्हा ती खूप थिल्लर वाटते. (महिलावर्गाने रोशनीच्या जागी रोशन कल्पून बघा, थिल्लरपणा लगेच कळेल
) बरं, त्या मुलाचे एक जाऊदे. ती मुंबैला जायच्या हट्टापायी स्वतःच्या वडिलांनाच डबघाईला आणते. त्या कॅरेक्टरमध्ये एकही चांगला गुण घालायला लेखक आणि दिग्दर्शक दोघेही विसरले आहेत. त्यामुळे अशा टिनपाट रोशनीला ऐदी, लोभी कुबेर जेंव्हा सुनावतो तेंव्हा तोच बरोबर वाटतो (हुंड्याचा मुद्दा वगळता). आणि त्या नंतरच्या रोशनीच्या मी यंव करेन, मी त्यंव करेन याला काही अर्थ उरत नाही.
गजराज रावचा मान आखडू अभिनय आता एकसुरी वाटायला लागला आहे. रेणुका शहाणेला पंचीणीचं कॅरेक्टर पेलवलं नाही असं वाटलं - त्या करता अभिप्रेत असलेला करारीपणा ती ना अभिनयातून दाखवू शकली ना आवाजातून. नीना गुप्ता हवी होती तिच्या जागी.
कुठल्याच पात्रांमधली केमिस्ट्री खुलवता आलेली नाहीये. प्रत्येक पात्र आपापल्या विश्वातच मश्गूल आहे. त्यामुळे मालिका अजूनच कोरडी होते.
कोमल आणि अमावस ही कॅरेक्टर्स आणि ती सादर करणारे अभिनेते मात्र जबरी आवडले.
मला झेपली नाही मालिका
छान लिहिले आहे सिमरन आणि माधव
छान लिहिले आहे सिमरन आणि माधव.
मीही सुरु केली आहे. दोन अडीच एपिसोड पाहिले. रेणुका शहाणे बद्दल मम माधव. तिला नाही जमली बिहारी निमशहरी सरपंच. तिला फक्त शहरी भूमिकाच जमतात बहुतेक. रोशनी थिल्लर नाही वाटली, स्वप्नाळू, काहीशी लाडावलेली अल्लड वाटतेय सध्यातरी. मला तर 'सैंया का चुम्मा बडा मीठा लगे' गाणं व नाच बघूनही हसू आलं.
रेणुका शहाणेच्या मुलीचं काम आवडलं, गोड दिसते ती. रंगावरून किती हिणवतात तिला. भूगोल खरंच विचित्र नाव आहे पण वडील शिक्षक म्हणून ठेवले असावे. त्याचे काम आवडले. गजराज रावचे व त्याच्या बायकोचेही आवडलेच. नसबंदी सीनला मीही हसले पण हे आधी इंग्रजी सिरीज मधे पाहिले आहे कुठेतरी. सध्यातरी आवडली आहे. इथला रेको घेऊन सुरू केली होती नाही तर प्राईम धड सजेस्टही करत नाहीत.
आचारी बा नावाचा नीना गुप्ताचा पिक्चर येतोय हॉटस्टार वर.
>>> हो, का.
आशु
पण रोशनी कॅरेक्टर कसंही असो
पण रोशनी कॅरेक्टर कसंही असो तीला शहरात का जायचे असते तो हा डायलॉग(कारण) पटला "एक बार सिनेमा का नाईट शो देखने का मन किया तो सब लोग बोले 'चार लोग क्या कहेंगे..
शादी नहीं हुवा तो चार लोग क्या कहेंगे..
बच्चा नहीं हुवा तो चार लोग क्या कहेंगे ..
सिटी में ये चार लोग कुछ नहीं केहेते."
या सीन नंतर वडील फक्त तुम खुश हो ना असं हसून म्हणतात आणि बॅग बंद करताना बॅगेतील फोटो तडकतो त्यावर ती नाराज होऊन म्हणते "इ हम चार लोंगो का फोटो था"
असे सूचक पण विनोदी प्रसंग आहेत.
इव्हन भूगोल ला जरी बहिणीच्या भावजीच्या जीवावर मुंबईत जायचे असते त्याचं कारणही तेच गावात स्वप्न पूर्ण होणार नाहीत हुशार तो नसतोच आणि त्याचं जे टॅलेंट आहे ते गावात राहूनपुढे जाणार नसतं पण बहीण शेवटी जो निर्णय घेते त्याने त्याच्या नजरेतही स्वतःच्या जीवावर जाण्याचा ठाम विश्वास दिसतो. आणि हे सगळं ही वडिलांच्या नजरेत आपणही यावोत यासाठीच असतं म्हणूनच तर गाडी साठी तो काय काय करतो.
रोशनीची शहरात जायची कारणं
रोशनीची शहरात जायची कारणं आपल्याला उथळ वाटू शकतात, पण शेवटी ती खेडेगावातली, कमी शिक्षण झालेली मुलगी आणि तो भुगोल पण तसाच , मोबाइल वर रील करण्याच्या फॅड ला बळी पडलेला टीनेजर. मला हे प्रातिनिधिक वाटले. बरोबर / चूक चा प्रश्न गैरलागू आहे इथे.
पण म्हणूनच या बॅकग्राउंड वर रोशनीला शेवटी आयुष्यात काही ध्येय सापडणे हा साक्षात्कार स्तुत्य वाटला.
Downton Abbey चा नवा सीझन येऊ
Downton Abbey चा नवा सीझन येऊ घातलेला आहे लोकहो.
Downton Abbey चा नवा सीझन येऊ
Downton Abbey चा नवा सीझन येऊ घातलेला आहे लोकहो.>> मॅगी स्मिथ ला मिस करणार. प्राइमला आता Downton Abbey पेड आहे.
Netflix वर Adolescence बघायला
Netflix वर Adolescence बघायला सुरू केली आहे. पहिले दोन भाग बघून झाले. खूप उत्कंठावर्धक वाटतेय. थ्रिलर प्रकारातली ही सिरिज सुरुवाती पासूनच खिळवून ठेवते. सकाळी सहाच्या सुमारास एका तेरा वर्षाच्या मुलाला खुनाच्या गुन्ह्यातील प्रमुख संशयित म्हणून अक्षरशः अंथरुणातून उठवून पकडून नेण्यापासून गोष्टीची सुरुवात होते.
अजून कोणी ही सिरिज बघतय का?
मी पहिली पूर्ण. मला आवडली.
मी पाहिली पूर्ण. मला आवडली. बाबाचे काम करणार actor जबरदस्त आहे. बर्याच सीरिज मध्ये पाहिलाय आधी.
Adolescence >>>>>>> बघणारे मी
Adolescence >>>>>>> बघणारे मी.
सध्या दुपहिया च चालू आहे अजून. आवडली. पण संथ आहे जरा.
मी ही बघायचा विचार करतेय .
मी ही बघायचा विचार करतेय .
Pages