भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या माझी आई आली आहे इकडे आणि तिला सॅमीची होतेय हळूहळू सवय. आधी घाबरायची. आता दोघी धीट झाल्या आहेत. एकमेकींना घाबरत नाहीत. सॅमी आईच्या बेडवर, बॅगवर वगैरे सारखी जाऊन बसते. आज आईला काही कारणाने उठायला उशीर झाला रोजच्या वेळेपेक्षा. तर सॅमी तिच्या चेहेर्‍याजवळ जाऊन वास घेत होती. मग आई ऊठली म्हणते अशी काय करत होती सॅमी म्हटलं ती चेक करते उठली का नाहीस अजून रोजची वेळ होऊन गेली. आईला मजा, प्रेम, आश्चर्य सगळंच वाटलं.
माझ्या मुलीला पण रोज ६ वाजता उठायची सवय आहे कधी उशीर झाला तर लगेच सॅमी तिच्या तोंडाजवळ जाते, अंगावर बसते. जसं काही ऊठवते.
कॅट ओ क्लॉक Lol

सॅमी आणि मिनी कुंभ मेळ्यात हरवलेल्या बहिणी आहेत का काय? मिनी पण ५.३० का माझे घोटे हळूच चावून उठवत असते मला. नाहीतर तिचे गार गार नाक माझ्या नाकाला लावून... किंवा वेणी चे रबर बँड ओढून काढून...
काय बिशाद आहे माझी न उठण्याची...

घोटे हळूच चावून >>> Happy

हाहा काय गोड अलार्म क्लॉक आहेत. >>>
माझ्या बहिणीची माऊ जोरात कानात ओरडते झोपेतून उठवायला Lol त्यामुळे माझी बहिण गोड या शब्दाला नक्की हरकत घेईल.

मांजरी फारच सोज्वळ दिसतायत सकाळी ऊठवण्याच्या बाबत …
आमच ध्यान डायरेक्ट धाडकन ऊडी ठोकतं बेडवर आणी चेहरा चाटायला सुरूवात करतो. एकतर ९० पाऊंडाचे वजन आणी त्यात प्रयत्न ईतका जोरदार असतो कि झोपलेला काय एखादा कोमातला पण जागा होईल

अरे बापरे Lol त्यांना स्वतःला बिचार्‍यांना माहित नसेल की त्यांचं वजन एवढं आहे ते स्वतःला कायमच बेबी समजतात Lol

सिंबा Lol
माउई आधी पोलाइटली एकदाच हाताला चाटतो. मग हळू हळू हातावर पंजाने टॅप टॅप करायला सुरुवात आणि तरी नाही उठले तर डायरेक्ट उरावर बसतो येऊन Happy

>>>>>>>>तरी नाही उठले तर डायरेक्ट उरावर बसतो येऊन Happy
हाहाहा Happy
>>>>>कोमातला पण जागा होईल
लोल Happy

सिंबा चे तत्व "एक बार मैने कमिटमेंट कर डी तो मैं अपने आप की भी नहीं सुनता " असे दिसतेय..

माऊइ उरावर बसला तर फार जड नाही वाटणार... गोड Soft toy आहे तो...

हो आम्ही बसलोय आणि माउई जवळपास असला ( असतोच तो) की जे कोणी तेव्हा रूम्म्मधे असतील ते सगळे " इथे इथे बस रे मोरा " टाइप मांडीवर थापा मारत त्याला ये रे ये रे करत साद घालायला लागतात Lol तो मग शिष्टपणे बघत आढे वेढे घेत एक तर भलतीकडे निघून जातो नाहीतर कोणा एकावर ( बहुतेक वेळा माझ्यावर) अनुग्रह करतो आणि हळुच मांडीवर चढतो Happy मग असा अनुग्रह झाला की काय विचारता! बाथरूम ब्रेक साठी पण हलायचं नाही त्याची डुलकी होई पर्यन्त.

>>>>मग असा अनुग्रह झाला की काय विचारता!
हाहाहा
>>>>>>तो मग शिष्टपणे बघत आढे वेढे घेत एक तर भलतीकडे निघून जातो नाहीतर कोणा एकावर ( बहुतेक वेळा माझ्यावर) अनुग्रह करतो
Happy

सिम्बाचे फोटो आणि स्टाईल भारी आहे!

तो मग शिष्टपणे बघत आढे वेढे घेत एक तर भलतीकडे निघून जातो नाहीतर कोणा एकावर ( बहुतेक वेळा माझ्यावर) अनुग्रह करतो आणि हळुच मांडीवर चढतो >>>> हाहा ! ज्योई त्याबाबत अत्यंत पुणेरी शिष्ठ आहे. तो आम्ही असतो त्या खोलीतच असतो पण फार जवळ बिवळ येत नाही. कधी मी त्याला बेड वर येऊ दिलच तरी पायापाशी पण न चिकटता झोपतो. सकाळी त्याला फारच आवळलं चिवळलं तरी थोड्यावेळाने निघून जातो आणि दुसरीकडे जाऊन झोपतो.

सध्या उन पडतं, त्यामुळे रोज सकाळी हे असं ढु शेकत बसणं सुरू असतं. Happy
Joey.png

ढु शेकत बसणं>>smiley36.gif
छान आलाय फोटो ज्योइचा..
अनुग्रह>>> smiley36.gif

90e9ee0d-0419-49cc-a4cb-a0eda2f16dfb.jpeg

मावत नसलो तरी माझ्या डेस्क खालीच झोपायचे असते. मी पाय पण खाली ठेवायचा नाही, कारण पाय लागला कि लगेच एक लूक मिळतो “कळत नाही का, मी खाली झोपलोय“ अश्या भावाचा

सिम्बा Lol
कोकोनटही सोफ्याच्या खाली पायाजवळ, डायनिंग टेबलच्या खूर्चीजवळ झोपतो. पाय अलगद ठेवून पायाशी मऊसूत लागले की कळते. अठरा तास वेगवेगळ्या जागी झोपणं मोठं कष्टाचं काम आहे. Happy

>>>>>>अठरा तास वेगवेगळ्या जागी झोपणं मोठं कष्टाचं काम आहे
Happy हाहाहा
'समर्थाघरचे श्वान' हा वाक्प्रचार आठवला. त्याचा अर्थ मात्र नीट माहीत नाही पण लाडावलेले श्वान असा मी घेतला.

❝समर्थाघरचे श्वान❞

याचा संदर्भ देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्रात आहे. १७ व्या श्लोक असा आहे.

समर्थाचिये घरीचे श्र्वान । त्यासी सर्वही देती मान ।
तैसा तुज म्हणवितों दीन । हा अपमान कवणाचा ॥ १७ ॥

आणखी एका म्हणीचा उगमही ह्याच स्तोत्रात आहे.

अन्नासाठी दाही दिशा । आम्हा फिरविसी जगदिशा ।
कृपाळुवा परमपुरुषा । करुणा कैसी तुज न ये ॥ २२ ॥

✤ या धाग्यावर हे अवांतर आहे खरं तर...
माऊ भुभु नाही घेणार फारसं मनावर !

🐈 🐕

हाहा सिंबा किती क्यूट!

आमच्याकडे सॅमी अजिबात काम / अभ्यास करू देत नाही. बरोबर स्क्रीनसमोर येऊनच स्ट्रेच करणे, माऊसवर जाऊन बसणे (कामाचा .. खायचा नाही Lol ) कीबोर्ड वर, वह्या पुस्तकांवर ठिय्या मारून बसणे हे तिचे आवडते छंद आहेत. सगळ्याचे पुरावे आहेत Lol

unnamed (1)_1.jpgunnamed (3)_5.jpgunnamed (4).jpgunnamed (5)_1.jpgunnamed (6)_0.jpg

Pages