भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

8febaace-6621-4519-a12c-090d5d81a23b.jpege413715d-8149-4501-93ef-bf37fefcfedc.jpeg

आता ऊन्हाळ्याचे फिरायला गेल्यावर नदीत ऊतरणे हे शास्त्र असते बरं का Rofl
पाण्यात ऊतरला की जणू कानात वारं शिरल्याप्रमाणे ऊधळतो सिंबा

maitreyee — तो काही पोहतं वगैरे नाही, नुसताच धुडगूस आणी मस्ती … पण पाण्यात खेळायला आवडते त्याला

https://www.instagram.com/reel/DIra4LFSOUA/?igsh=MWJlY29oMTExenR4MQ==

झकासराव — पुर्ण सहमत, आताच भारतातून परतलो कडक ऊन्हाचा अनूभव घेऊन

ऑष्कुसाठी केलेल्या होममेड ट्रिट स्टिक्स , फार मस्तं क्रिस्पी आणि पोकळ झाल्या .. ऑष्कु खातो तेंव्हा अगदी चकली/कडबोळी खाल्ल्या सारखा आवाज येतो !
दिवाळीत बेक्ड चकल्यांचा आकार द्याव्या म्हणते Happy
सिंपल ३ इन्ग्रेडियन्ट रेसिपी :
सर्वात आधी ओव्हन ३५० डिग्री फॅरेनहाइट वर प्रिहिट करत ठेवला
ओट्सची पावडर करून घेतली त्यात बसेल इतकी पमकीन प्युरी आणि थोडं पिनट बटर घालून कणीक एकदम घट्ट मळून घेतली (पोळीपेक्षा बरीच घट्टं) , मग स्टिक्स सारखा आकार दिला, दिसायला फॅन्सी दिसाव्यात म्हणून कोरड्या ओट्स मधे बुडवल्या , २० मिनिटं बेक केली, मधे मधे मॉनिटर केल्या, स्टिक्स तयार!
छोटे आकार देणार असाल तर लवकर बेक होतात अजुन आणि पटकन करपतात.

.IMG_2673.jpeg

दिसायला फॅन्सी दिसाव्यात म्हणून कोरड्या ओट्स मधे बुडवल्या , ...... Lol
किती बाळासारखा विचार केला जातो.आहेच म्हणा बाळ.

धनवन्ती- तुला आणि तुझ्या मुलाला हॅट्स ऑफ! सोपं काम नाहीये आजारी मांजराची एवढी सेवा करून जगवणे. तुमच्यासाठीच आली आहे मिनी!
स्नोई चं लपणं.. सेम सॅमीसारखं शेपूट बाहेर ठेऊन Lol फनी कॅट्स!

माऊई, सिंबा, फिओना ... किती गोड !

काल सॅमीला असंच मजा म्हणून मांजरांचे रील्स दाखवत होते. तर पठ्ठी दुसरीकडे तोंड फिरवून बसली ! खडूस गोंडस!

हे एक डोअरमॅट आहे आमच्याकडे ! ज्यावर लिहिलेलं खरंच आहे Lol

IMG_2631.jpg

सॅमीताईंची आवडती जागा... बेडरूमची खिडकी.

IMG_0850.jpg

धन्यवाद अंजली...
Doormat खूपच छान आहे. मंकी आणि सॅमी चे expressions खूपच गोड आहेत.

सिंबाचे प्रोटेक्शन म्हणजे काय हे कळले … कालचा किस्सा

मी विकऐंडला सिंबाच्या आवडत्या पार्कमधे जातो. तिथे मोठा ट्रेल, नदी आणी मोठा डॅाग पार्कपण आहे. तिथे काही मंडळी नेहमी येणारी आता ओळखिची झाली आहेत.
तिथे एक अमेरिकनपण येतो त्याच्या पिटबूल टेरीअर मिक्सला घेऊन. त्याचे कुत्रे एकदम ॲग्र्रेसीव आहे, त्यामुळे तो कधी त्याला पार्कमधे आणत नाही, पण बाहेरून बोलतो त्यामुळे ओळख झाली आहे. काल ट्रेलला जास्त गर्दी नव्हती, रूल प्रमाणे सिंबाला लीश लावली होती आणी आम्ही मजेत रमत गमत चाललो होतो. एका वळणावर जिथे पुढचे दिसत नव्हते तिथे काहीतरी पळत येणाचा आवाज आला, काही कळायच्याआत त्या अमेरीकनचे काळे धुड (कुत्रा) दात काढून माझ्याकडे धावत येतांना दिसले. आमच्यामधले अंतर फारच कमी होतं, तो त्याला स्टाॅप स्टाप म्हणून ओरडत होता पण ते कुत्र काही ऐकण्याच्या मनस्थीत नव्हते. आज ते चांगलाच लचका तोडणार असं मला वाटले, पण सिंबाने एकदम रूद्रावतारच धारण करून माझ्या आणी त्या कुत्र्यामधे आला. फुल शॅकल वरती करून, दात बाहेर काढून ईतका जोरदार भूंकला की ते कुत्र पार शेपूट घालून मालकाच्या दोन पायात लपले.
सिंबाला मी या आधी कधीही या अवतारात पाहिले नव्हते, त्याचे या प्रकारे जोरदार भूकंणेपण ऐकले नव्हते. पण केवळ मला काही होऊ नये म्हणून त्या काळ्या धुडाला त्याने अंगावर घेतले आणी पळवून लावले.

अमेरीकन सॅारी सॅारी म्हणत त्याला लीश लावून निघून गेला.
सिंबाला कुरवाळले तर भाऊचे भाव “ मी आहे बाबा, तु काही काळजी करू नकोस”, “अपून है ना“ असे होते.

त्याला जवळ घेऊन थॅक्यू म्हटंले, तर चाटून चला नदीकडे चला म्हणून ओढू लागला.

बाप रे स्केअरी किस्सा! सिंबा ब्रेव बॉय Happy !! पिटबुल फार अनप्रेडिक्टेबल असतात. बिथरले तर ओळखीच्या माणसावर सुद्धा हल्ला करू शकतात .

वरचं कोलाज आज पाहिलं. मस्त आहे. Happy

परवा एक मजा झाली. आमच्या गल्लीत एक बाई रहाते. तिच्याकडे डॅशहाऊंड आहे, त्याचं नावं पर्सी. आम्हांला बाहेर गावी जायचे असेल तर ती कधी कधी ज्योईला संभाळते पण. त्यामुळे ज्योई आणि पर्सी एकमेकांना चांगले ओळखतात. परवा मी ज्योईला फिरवून आणलं आणि त्याला आत ठेऊन बाहेर झाडांना पाणी घालत होतो. पर्सीने आम्हांला पाहिलं होतं बहूतेक. म्हणून त्याने मागे लागून लागून बाहेर आणायला लावलं. तो बर्‍याचदा ऑफ लिश फिरतो. त्यामुळे घरा बाहेर आल्या आल्या तो पळत आमच्या ड्राईव्ह वे वर आला आणि मुलं एकमेकांना हाक मारतात तसं ज्योईला
भुंकून भुंकून हाका मारायला लागला. ज्योईपण खिडकीत येऊन नेहमी सारखं न भुंकता काहीतरी वेगळच भुंकत होता. मी त्याला बाहेर सोडलं. १५-२० निमिटं दोघे लॉनवर तुफान खेळले आणि मग दमून एका जागी बसले. एकंदरीत पर्सीने येऊन ज्योईला हाका मारणं आणि खेळायला बोलावलं फारच भारी होतं. Happy

कसलं क्यूट! Happy अगदी लहान पोरांसारखंच. माउई पण समोरच्या घरात त्याची लाडकी मैत्रिण लूना बाहेर असेल तर वेगळेच कुई कुई भुंकतो. त्याच्या त्या आवाजावरूनच आम्हाला समजतं लुना आहे वाटते बाहेर! मग सोडावं लागतं खेळायला तिच्यासोबत.

सिंबाचा किस्सा मस्त. जर्मन शेफर्डचं ते असं छातीतून गुरगुरणं धडकी भरवणारं असतं. नवल नाही पिटबुलसुद्धा घाबरला.

पर्सीने येऊन ज्योईला हाका मारणं आणि खेळायला बोलावलं >>> अगदी गल्लीत खेळायला बोलावणार्‍या मित्रासारखंच की हे! Happy

पर्सीने येऊन ज्योईला हाका मारणं आणि खेळायला बोलावलं >>> अगदी गल्लीत खेळायला बोलावणार्‍या मित्रासारखंच की हे!>>> +१

Pages