भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती ३

Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

bhubhumau.jpg

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील

२. https://www.maayboli.com/node/82073

१. https://www.maayboli.com/node/77227

==================================================================

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कोकोनट ला तुम्ही जिथं जंगलात फिरायला नेता ते बघून जाम हेवा वाटतो
कसलं सुंदर आहे एकदम सिनिक
इथं आम्हाला गाड्या माणसं यांच्या गर्दीतुन न्यावं लागतं

मैत्रेयि, कोलाज छान केले आहे . सगळे भुभू गोंडस आहेत.

सध्या ghibli ट्रेंड आहे तर वरच्या मजल्यावर राहण्याऱ्या शेजाऱ्यांच्या मुलाने हॅरी चा फोटो काढून त्या ट्रेंडला फॉलो केले . हॅरी ला दाखवले तर त्याने मी समोर असताना फोटो काय पाठवतात म्हणून येडे आहेत असा लुक दिला Biggrin

d345e25a-1b31-4320-be83-5d083ae5afa4.jpeg

कोलाज मस्त आहे .
मी समोर असताना फोटो काय पाठवतात म्हणून येडे आहेत असा लुक दिला . Lol
पण घिबली फोटो मस्त आलाय.

कोलाज मस्त आहे
कोकोनट तर काय राजबिंडा, handsone, हिरो मटेरियल आहेच.
घिबली फोटो छान आहे हॅरी

आशूचँप,
तुम्हाला वेळ झाला की तो फोटो कोलाज हेडर मधे टाकाल का. त्यासाठी म्हणुन तर केलाय तो Happy
सॉरी, भुणभुण करण्याचा हेतू नव्हता Proud सावकाश करा.

हेडरमध्ये बदल केला आहे.>>>

धन्यवाद अडमीन
मी आज करतच होतो
सध्या कामाचा लोड असल्याने फार कमी वेळ येणे होतं माबोवर

घिबली मी टाकले नव्हते आधी म्हणलं आधीच नैतिक मुद्द्यांवर वादविवाद सुरू आहेत त्यात माबो चे धोरण काय आहे माहिती नाही

प्रॉब्लेम येणार असेल तर उडवून टाकतो

Our version Happy

IMG-20250411-WA0010.jpg

कसले क्युट आलेत वरचे घिबली आणि त्यातली गोजिरवाणी भुभु बाळं.
IMG_20250412_081913.jpg
बंडलू चा घिबली . Happy पण यात नसलेला छोटा बंडू आलाय . (Ai गंडल्याने )पण माझ्या कडे छोटा बंडू उर्फ गुलाब ही आहे आहे .ज्याचे फोटोही धाग्यावर दिसतील.

गेल्या जुलै महिन्यात एक छोटेसे माऊ चे पिल्लू पार्कींग मधे सापडले. खूपच बारीक आणि छोटे होते. १५० ग्रॅम वजन. पोट क्रिकेट च्या चेंडू एवढे , हात पाय काडी एवढे आणि शेपूट सुतळी एवढी. एकदम उंदीर दिसत होते, मग तिचे नाव ठेवले मिनी... मिनी माऊस मधली मिनी, आणि मिनी मायक्रो मधली मिनी. खूप आजारी होते, ताप होता, पोट खराब, खूप जंत होते, तिच्या डोळ्यातून पाणी गळत होते, नुसती हाडे दिसत होती. डॉक्टर कडे बऱ्याच फेऱ्या टाकल्या, ती stray kitten आहे हे कळल्यावर डॉक्टर नी फी पण एकदम कमी घेतली. मी सुट्टी घेतली, नंतर घरून काम केले, सिरिंज ने ताक, औषधे पाजली. मुलाने पण खूप मदत केली ......

कविन ने पण खूप moral support दिला. ती animal communicator आहे ना.

१ महिन्यात मिनीने छान सुधारणा दाखवली. आता बाईसाहेब घरातील सगळ्यात उत्साही सदस्य आहेत:)
आधीची स्नोई आहेच, आता मिनी पण आहे.
स्नोइ ने पण हळू हळू तिच्या पटवून घेतलेय. आता दोघी एकमेकांना सोबत असतात.
मिनी आलेली तेव्हा डॉक्टर ना खात्री नव्हती की ती वाचेल. पण ती खूप जिद्दी निघाली, ,she is a born fighter...
I am very happy that she chose my home... आता CDS, cat distribution system वर विश्वास बसलाय माझा Happy Happy

इतके दिवस लिहू की नको असे वाटत होते...

Pages