मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. लेखक, दिग्दर्शक ही आहेत ते विशेषत: एकांकिका वगैरे जास्त लिहिल्या आहेत.

योगेश सोमण आवडता कलाकार. पार पुरुषोत्तम, फिरोदिया मधे वगैरे नाटकं बसवायचे तेव्हापासून माहिती आहेत. >>> पुण्यातले जास्त ओळखतात त्यांना तेव्हापासून, मी नव्हते फार ओळखत. भाची गरवारेला होती, नाटकात काम वगैरे करायची तेव्हा मी नाव ऐकलं.

Submitted by अन्जू on 20 April, 2025 - 04:29 >> भारीये Happy

फिरोदिया, पुरूषोत्तम काय आठवण निघाली.
एसएनडीटी, एसपी, फर्गसन आणि इंजिनिअरिंग कॉलेजचे परफॉर्मन्स चुकवले नाहीत.

आज टीव्हीवर (प्रवाह पिक्चरवर) 'पंचक' बघितला. ठीक आहे.
अनंतराव खोत (दिलीप प्रभावळकर) यांचा मृत्यू ज्या वेळी होतो, त्या वेळच्या ग्रहस्थितीनुसार 'पंचक लागलं' म्हणजे कुटुंबातली किंवा जवळची पाच माणसं वर्षभरात मरणार, असं भविष्य गावातला भटजी (विद्याधर जोशी) सांगतो. स्वतः अनंतराव आणि त्यांचा धाकटा मुलगा माधव (आदिनाथ कोठारे) हे अंधश्रद्धेला ठाम विरोध करणारे असतात. अनंतरावांनी देहदानाचा फॉर्म भरून ठेवलेला असतो त्यामुळे अंत्यविधीही होत नाहीत आणि माधवच्या ठामपणामुळे पंचकशांतीही होत नाही. त्याची आत्या (भारती आचरेकर) ही जुन्या मतांची असते. घरातले काही सदस्य कुंपणावर असतात, तर काही पंचकशांती करायला हवी, अशा मताचे असतात. काही घटना घडल्यामुळे शेवटी पंचकशांती केली जाते. त्यानंतर आत्याचाही झोपेत मृत्यू होतो. या सगळ्या घटना फार गंभीरपणे न दाखवता लाईट मूडमध्ये दाखवल्या आहेत. माधवच्या मोठ्या भावाची (आनंद इंगळे) बायको (नंदिता धुरी) हिला अनेक वर्षांनी दिवस गेलेले असतात आणि ती पंचकशांती आणि एकंदरीत कर्मकांडांच्या बाबतीत आग्रही असते. तिच्या समाधानासाठी माधव काही युक्त्या/नाटकं करतो. शेवट गोड होतो.
सतीश आळेकर, सागर तळाशीकर, संपदा कुलकर्णी, तेजश्री प्रधान आणि बाकीचेही सगळे चांगले कलाकार आहेत. आदिनाथ कोठारेच्या जागी सुदैवाने सिद्धार्थ चांदेकर नाही Proud
पण अजून बराच चांगला करता आला असता सिनेमा. बालिशपणा कमी करायला हवा होता.
एकंदरीत एकदा बघायला ठीक आहे.

काल प्राईमवर ‘लाईक आणि सबस्क्राईब‘ बघितला. आवडला. ट्विस्ट्स छान आहेत. काही लूपहोल्स आहेत. पण ठीक आहे. माझ्या अपेक्षा माफक असतात, त्यामुळे मला आवडला.

फेफ - मस्त आहे तो पिक्चर. इथे काही पाने आधी चर्चा आहे.

या वीकेण्डला पाहिला "फसक्लास दाभाडे" आणि आवडला. रिकॅप करायला इथल्या आधीच्या पोस्ट्स पुन्हा वाचल्या. स्वाती आणि अमितने काढलेल्या चुका असल्या, तरी एकूण आवडण्यासारख्या गोष्टी जास्त आहेत. लिहीतो अजून.

स्वाती Lol

बघताना पहिली जाणवलेली गोष्ट म्हणजे समोर चाललेली कथा आपल्याला एंगेज करत आहे. मराठी पिक्चरला पहिले हे बॅरियर ओलांडावे लागते. नाहीतर दहा-पंधरा मिनिटांत अटेन्शन स्पॅन सहसा संपतो. दुसरे म्हणजे सर्वांचीच कामे मस्त आहेत - अपवाद फक्त राजसी भावे च्या मैत्रिणीचा. मला ती डोक्यात गेली. त्यामुळे सिद्धार्थ चांदेकरची तिच्याकडे बघण्याची प्रतिक्रिया अगदी रिलेट झाली. ती फ्री बर्ड/बोल्ड असण्यात काही प्रॉब्लेम नाही. पण त्या व्यक्तिरेखेचे सादरीकरण पूर्वी तमाशापटातील फ्लर्टी बायका बोलत व हावभाव करत तसे आहे. ते सतत खटकत होते. त्या अभिनेत्रीबद्दल काही प्रॉब्लेम नाही, तिच्या व्यक्तिरेखेच्या सादरीकरणाबद्दल आहे.

याउलट राजसी भावे - तिने काम चांगले केले आहे पण ती या सेट अप मधे पूर्णपणे मिसकास्ट वाटली. तिची अर्बन पर्सनॅलिटी यात अजिबात सूट होत नाही. ती मला लाइक आणि सबस्र्काईब मधे खूप आवडली होती. पण यात बघताना तो क्रश फॅक्टर ओसरला.

बाकी सगळे फिट्ट आहेत. अमेय वाघ इतर पिक्चर्स मधे आवडला तितका यात नाही. पण त्यात त्याची व्यक्तिरेखाच तशी आहे हे कारण असावे. सिद्धार्थ चांदेकर कॉलेज मधे फिट आणि हॅण्डसम दिसणारा मित्र नंतर नोकरी, लग्न झाल्यावर बीयर गाल लुक मधे दिसतो तसा वाटला. पण त्याचे काम चांगले आहे. सर्वात आवडली ती कामे निवेदिता सराफ व क्षिती जोगची. दोघींत कोण सरस ठरवणे अवघड आहे. मला पिक्चर पाहताना निवेदिताचे काम जास्त भारी वाटले, विशेषतः ८०ज मधल्या रोल्स मधे ज्यांनी तिला पाहिले आहे त्यांना हा बदल जास्त जाणवेल, पण घरातील सर्वांना सांभाळून घेणार्‍या "आई" चे बेअरिंग तिने परफेक्ट घेतले आहे. पण आता वरच्या पोस्ट्स रिकॅप केल्यावर वाटते कदाचित क्षिती जोग काकणभर सरस आहे. कारण निवेदिताचा रोल तसा एकाच डायमेन्शन मधे आहे. मला क्षिती जोगचा रोल सरप्राइज पॅकेज वाटला. मी तिला त्या लंडनवाल्या पिक्चर मधे पाहिले आहे आणि अजून एक - बहुधा बाईपण भारी देवा मधे - दोन्हीत तिचा रोल एकदम वेगळा होता. त्यामुळे तिच्याबद्दल एक स्टीरीओटाइप माझ्या डोक्यात बसला होता. त्यापेक्षा हा एकदम वेगळा रोल वाटला आणि आवडला.

अजून एक - गाणी श्रवणीय कितपत आहेत कल्पना नाही कारण पिक्चरमधेच पहिल्यांदा ऐकली आहेत. पण अतिशय मस्त लिहीली आहेत. गीतकार कोण आहे बघायला हवे. एकही गाणे अस्थानी नाही व फॉरवर्ड करावेसे वाटले नाही. गाण्यात कथाही पुढे सरकत असल्याने असेल पण जरा लक्ष दिले तेव्हा जाणवले की शब्दरचना चांगल्या, अर्थपूर्ण आहेत. अगदी सुरूवातीलाच काहीतरी "यलो यलो बघून शॉक लागणार" म्हंटल्यावर आधी इम्पल्सिव्ह प्रतिक्रिया "कोण ही गाणी लिहीतो व ऐकतो" अशी झाली पण कडव्यातील ओळी धमाल आहेत. गाणे संपेपर्यंत माझे मत १८० डिग्रीज मधे बदलले होते. इतरही चांगली आहेत.

बाकी बापाचे बळंच सिक्रेट हे सिरीयल्सच्या लेव्हलचे आहे. सिरीयल्स मधे असली अनावश्यक सिक्रेट्स असतात. केवळ प्रेक्षकांना एक धक्का द्यायचा म्हणून कथेत उगाच लपवलेली. स्वाती व अमितने लिहीलेले बरोबर आहे - प्रश्नांची उकल फार सुलभ पद्धतीने झाली. तेथे जरा चांगले कथालेखन हवे होते. अशा वेळेस सहज येणार्‍या प्रसंगातून काहीतरी असे घडते की यांचे मूळ प्रेम आपोआप पुन्हा बाहेर येते किंवा एखाद्याला आपली चूक समजते - चांगल्या पटकथांमधे हे फार चपखल घेतलेले असते. तसे यात दिसले नाही.

पण तरीही चांगल्या गोष्टी खूप आहेत. बरेच सीन्स व विनोद जमले आहेत. मराठीत विनोद म्हणजे विनोदी कलाकारांनी काहीतरी अ‍ॅण्टिक्स करायचे असा प्रघात आजकाल झाला आहे. कथेतील पात्रांच्या स्वाभाविक वागण्यातून व संवादांतून निर्माण होणारे विनोद कमीच. ते यात आहेत, आणि नक्कीच हसवतात.

स्वाती,
मोगॅम्बो खुश हुआ Proud .

मीही क्षिती जोगच्या कामाची स्तुती केली होती फा, मला तिचेच सर्वात जास्त आवडले. कारण ती अभिनय करतेय असं वाटलंच नाही. निवेदिता जोशीला निमशहरी बोलणं तितके सहजपणे जमले नाही, ती तितकी रिलॅक्स वाटली नाही. शहरीच पण प्रेमळ आई वाटत होती अधुनमधून. राजसी भावेही पुणेरीच वाटते , तिची अनॉयिंग मैत्रीण मात्र निमशहरी वाटते. सिद्धार्थ चांदेकर जसा आहे तसा सूट झाला आहे. बाकी सगळी जिथल्या तिथे. उषा नाडकर्णी सोबतचे काही संवाद धमाल आहेत. "जाते मी माझ्या घरी म्हणते" तेव्हा 'बॅग कुठं मग आत्या'. ट्रकवाला " आज्जी, कुठं तमाशा दाखवायला निघाला" असे संवाद हसवून गेलेत. बकरा हरवतो तेव्हा तिघे बहिण भाऊ पेप्सी खात बसतात दगडावर तो सीन. राजसी भावे सासऱ्यांना मला अजून पुढे शिकायचे आहे म्हणून पाणी विचारते - देते तो सीन. टाईमिंग जमलेत एकंदरीत.

>>> मोगॅम्बो Lol
तुम्ही नॉट-सो-छुपे ममविस्ट आहात. Proud

परवा 'अशी ही जमवा जमवी' पाहिला. खूपच संथ आणि रटाळ वाटला. कथा काय असणार हे माहित होतच पण तरी सुद्धा काहीतरी नवीन दाखवतील असं वाटत होतं. खूपदा थिएटरमध्ये प्रत्यक्ष पाहताना सिनेमे इतके कंटाळवाणे वाटत नाहीत, पण हा खूपच बोर झाला. ह्यात जो काही थोडाफार सो कॉल्ड फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम्सचा संघर्ष होता तो अगदी प्रत्येक सीननंतर सुटत जातो . अशोक सराफचे वयही आता खूपच जाणवते पण त्याच्या जीवावर सिनेमा खेचला आहे. बाकी सर्व कलाकार अगदी गोड गोड. सुलेखा तळवलकर आहे म्हणजे ओळखलच असेल.

दोन तरुण कलाकार आहेत . पण त्यांना पाहून निराशाच झाली. मराठीत काही सिनेमे व कलाकार प्रभात रोड, कोथरूड याच्या पुढे कधी जाणार .काय माहीत.

तुम्ही नॉट-सो-छुपे ममविस्ट आहात >>> Lol

निवेदिताला ग्रामीण हेल/लहेजा जमला आहे असे मला वाटले. पण I am no ग्रामीण expert. राजसी भावे व माझ्यात शहरीपणाची रेस लागली तर मीच जिंकेन. एकूण भाषा मला मंचर परिसरातली वाटली नाही. "टिंग्या" मधली वाटली होती. मंचर-जुन्नर-नारायणगाव-ओझर भागातली. यातली भाषा जेनेरिक ग्रामीण वाटते पश्चिम महाराष्ट्रातली.

पण "नारायणगावच्या डॉक्टरकडे न्या" हे त्या परिससरात अगदी चपखल वाटते. कारण डॉक्टरकडे स्पेसिफिकली नाही पण जवळच्या मोठ्या गावासारखा नारायणगावचा उल्लेख लहानपणी मंचरजवळ कायम ऐकला आहे. नारायणगाव पुणे-नाशिक मार्गावर आहे. तेथे ओझर, नगर कडे जाणारे रस्ते व जुन्नर/माळशेज घाट/कल्याण कडे जाणारा फाटाही आहे, त्यामुळे त्या परिसरात ते मोठे गाव निदान तेव्हा समजले जायचे. मी लहानपणीतर तेथे स्मगलिंगचा माल विकायला येतो असे ऐकले होते Happy

मला सर्वात आवडलेल्या सीन्स मधे तो पेप्सीवाला आहे. एक मजेदार टच आला आहे त्या पेप्सी मुळे. राजसी भावे व राजन भिसे यांचा तो एकमेव संवाद, नुकतेच भांडल्यावरही कुटुंबातील/नातेवाईकांच्या परिचित वागण्यावर दोघे भाऊ एकमेकांकडे बघून हसतात ते प्रसंग, उषा नाडकर्णीने ताई अजून किती दिवस राहणार आहे हे विचारणे (ती स्वतः एक्झॅक्टली तशाच रोल मधे तशीच ठाण मांडून बसलेली असताना), राजन भिसेचा "...आणि काही राहिले तर मी सांगेन" हे Happy

मिताली मयेकरचे बोलणे सडेतोड वगैरे आहे. पण तिच्यात व सिद्धार्थ चांदेकर मधे प्राचीन काळी काही प्रेम बिम होते (याबद्दल संवाद स्पष्ट असले तरी) याचा आपल्याला त्यांच्या एक्स्प्रेशन्स मधून अजिबात पत्ता लागत नाही. ती ऑलरेडी मूव्ह ऑन झालेली दाखवली आहे हे खरे पण समहाऊ आधीही कधी केमिस्ट्री असावी असे वाटले नाही.

मला ती मैत्रिण निमशहरी असल्यामुळे खटकली असे नाही. त्या वातावरणात ती आउट ऑफ प्लेस आहे - काहीतरी तिच्या बोलण्यात व हावभावात आहे जे खटकले.

तुम्ही नॉट-सो-छुपे ममविस्ट आहात. >>> Lol फा ममविस्टांचा 'फ्लॅग बेअरर' आहे. मी मोगॅम्बोच आहे, जिकडे खूष होता येते तिकडे जाते. अमलताशच्यावेळीचे आठव. Happy

राजसी भावे व माझ्यात शहरीपणाची रेस लागली तर मीच जिंकेन. >>> Lol अनुमोदन.
मी लहानपणीतर तेथे स्मगलिंगचा माल विकायला येतो असे ऐकले होते >>> बापरे.

निवेदिताचे बेअरिंग अधूनमधून सुटते. ती फार चकचकीत वाटते, देहबोली आणि दिसणं सुद्धा - यात केस, साड्या, चेहरा मेकप- सगळंच पॅकेज.

>>> यात बघताना तो क्रश फॅक्टर ओसरला.
प्रथमदर्शनी प्रेमावर द्वितीय दर्शन हाच उपाय असल्याचं पुलंनी म्हटलंय ना कुठेसं? Proud

>>> जिकडे खूष होता येते तिकडे जाते
हे म्हणजे 'हम सायन्स की तरफ से हैं'सारखं झालं. Proud

>>> ती फार चकचकीत वाटते, देहबोली आणि दिसणं सुद्धा
हांगाश्शी! Proud
ते अंगात येणं वगैरेही जमलेलं नाही त्यामुळे.

Lol
Happy अंगात आल्यावर क्लिनिक प्लसच्या जाहिरातीप्रमाणे कुठे 'बाल होगये दमके दमके' म्हणतेय वाटले. सुळसुळीत, सरळ, चमकदार...केस.

मला सर्वात आवडलेल्या सीन्स मधे तो पेप्सीवाला आहे. एक मजेदार टच आला आहे त्या पेप्सी मुळे. राजसी भावे व राजन भिसे यांचा तो एकमेव संवाद, नुकतेच भांडल्यावरही कुटुंबातील/नातेवाईकांच्या परिचित वागण्यावर दोघे भाऊ एकमेकांकडे बघून हसतात ते प्रसंग, उषा नाडकर्णीने ताई अजून किती दिवस राहणार आहे हे विचारणे (ती स्वतः एक्झॅक्टली तशाच रोल मधे तशीच ठाण मांडून बसलेली असताना), राजन भिसेचा "...आणि काही राहिले तर मी सांगेन" हे
>>> १०००++
आणि काही राहिले तर >>>
नंतरची सगळ्यांची रिॲक्शन पण आवडली. सिद्धार्थ चांदेकर पटला त्या रोलमध्ये.
निवेदिता जोशीचा शहरी चकचकीतपणा पण पटला कारण नात्यागोत्यांत अशा बायका बघितल्या आहेत की शहरांत वाढल्या, शिकल्या, क्वचित प्रसंगी लग्नापूर्वी नोकरीही केली. पण घरातले सांगतील तिथे निमशहरी, मोठं खेडं अशा ठिकाणी स्थळ/घर चांगलं आहे म्हणून लग्न करून गेल्या व तिकडच्याच झाल्या. अशा बायकांवरचा थोडासा शहरी छाप नेहमी दिसत राहतो. नातलगांतही ही शहरातली, जरा वेगळी असा सुक्ष्म फरक जाणवत राहतो.

नणंद भावजय हा पिक्चर कालपर्यंत युट्यूबवर होता.
थोडा वेळ पाहिला. हिरो देवेन वर्मासारखा दिसायला. रविराज नाव आहे.
अमिताभ बच्चन बुलेटवर गाणं म्हणतो, शशी कपूर अशाच कुठल्याशा बाईक वर गाणं म्हणतो. ऋषी कपूर स्पोर्ट्स कार मधे गाणं म्हणतो.
यातला रविराज अँबॅसिडर कार मधून गाणं म्हणत येत असतो. त्या गाण्याचे बोल ऐकूनच हसू आलं.
माझी ताई अशी, माझी ताई तशी !
शहरातून गावाला असा काही येत असतो जसा काही विलायतेतून बालिष्टर बनून परततोय. त्या काळीही लोक गोरी मॅडम घेऊन यायचे.
पण मराठीपणा कि काय माहिती नाही, आमचा हिरो ताई सोडून दुसर्‍या मुलीचा विचारही करू शकत नाही.
हा पिक्चर पुढे कसा असेल म्हणून बघायच होता, पण एका खतरनाक डायलॉग नंतर हिंमत नाही झाली.
इथे नियमित लिहीणार्‍यांइतके विनोदी जमणार नाही म्हणून सजेस्ट करायचा तर युट्यूब वर आता दिसत नाही.
ओटीटी वर पण नाही...

तिच्या भूमिकेतला तोरा, ठसका भुरळ पाडणारा आहे. जिचा नवरा असा देवाधर्माच्या नादी लागलेला असेल तिची तगमग जिवंत केलीये. तिचा राग येण्या ऐवजी सहानुभूती वाटते, हसू पण येतं.
शेवटी मात्र तिचा अभिनय डोळ्यात पाणी आणतो.
>>>
संगीत देवबाभळी नाटकातही ही गोष्ट नेमकी पकडली आहे.
या नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरू झाले आहेत. ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी नक्की बघा.
अवांतराबद्दल सॉरी.

संगीत देवबाभळी >> परेश रावल या नाटकाबद्दल आणि एकूणच मराठी नाट्यसृष्टीबद्दल काय सुंदर बोललेत. लल्लनटॉपने त्यांची मुलाखत घेतली होती.

परवा "सुशीला सुजीत" बघितला (मुख्य कलाकार: सोनाली कुलकर्णी , स्वप्नील जोशी). सोनालीच्या घरी बाथरूममध्ये शॉवर दुरुस्त करायला सिनियर टेक्निशियन (इंजिनीयर) स्वप्नील जोशी येतो आणि ते दोघे एकत्र बेडरूममध्ये अडकून पडतात आणि दोघांचे फोन बाहेर दुसऱ्या खोलीत असतात, अशी स्टोरी आहे. आचरटपणाचा कळस. कुणी फुकट दाखवला आणि वर पैसे दिले तरी बघू नका.

त्यावेळी "देवमाणूस" सिनेमाचे ट्रेलर बघून काल तो सिनेमा बघितला. दीडशे रुपयात फुल टाईमपास झाला. मसाला मुव्ही आहे, एकदा बघायला मस्त. (शेवटच्या श्रेयनामावळीत लिहिले आहे की "वध" सिनेमावर आधारित आहे.)

तुम्ही नॉट-सो-छुपे ममविस्ट आहात.
>> ममविस्ट म्हणजे काय?
सगळ्याना असे शॉर्ट फॉर्म कसे कळतात. भारीच हुषार आहेत सर्व.

ममविस्ट नवीन आहे पण ममव आता माबोवर सगळीकडे प्रचलित आहे. मराठी मध्यमवर्गीय Happy ममविस्ट हा नवीन शब्द आहे पण माझा अंदाज आहे की ममवपणाशी जवळीक असलेले असे काहीतरी असेल Happy मी त्याच अर्थाने घेतले. संघ -> संघी, तसे ममव -> ममविस्ट

ओह! माझा समज होता +1 देणाऱ्याला उद्देशून असेल हे. ( मम म्हणणे)
धन्यवाद फारएण्ड.

यातला रविराज अँबॅसिडर कार मधून गाणं म्हणत येत असतो. त्या गाण्याचे बोल ऐकूनच हसू आलं.
माझी ताई अशी, माझी ताई तशी ! >>> Lol हा पिक्चर मी कधीतरी पाहिला आहे. तेव्हाही हसलो होतो ते आठवले. "मायेची साऊली, आनंदी बाहुली, आहे गुणाची, मोठ्या मनाची, जाई जशी माझी ताई" असे काहीतरी लक्षातही आहे Happy Happy

हा एक सीन तसाच अनुभव देतो. मराठीतील नाही. हिमालयात पहिल्यांदा आलेल्या तरूणाला तिथले सौंदर्य पाहून काय आठवावे?
https://www.youtube.com/watch?v=E5nWm7Q35CM&t=1360s

दादी मां >> लोल Lol

https://youtu.be/DB9OVzi0904?t=69
इथे शेजारी बसलेल्याची रिअ‍ॅक्शन बघण्यासारखी आहे.
आपला मित्र अशी गाणी म्हणतो हे नॉर्मल आहे, त्याला अशी दाद देणे ही पद्धतच आहे असे हावभाव आहेत.
रच्यकने या कडव्याची चाल एका गाजलेल्या अल्बमची आठवण करून देते का ?

गाडी समोर बघुन चालव असे सांगावेसे वाटले.

मी श्रीपाद रेडिओ ऐकते त्यावर हे गाणे आठवड्यातुन दोनदा तरी वाजते.

Pages