Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो डॉगी हेमंत ढोमेचा स्वतः चा
तो डॉगी हेमंत ढोमेचा स्वतः चा आहे .
नाहीतर 'puppy दे जयुला' हे बरोबर ठरले असते.
<<<<< होना, घरचा असल्याने तो वयाने मोठा असूनही त्यालाच रोल मिळाला. (नेपो किड..)
आणि तो बकरा?? इतका सुस्वरुप
आणि तो बकरा?? इतका सुस्वरुप बकरा पहिल्यांदा बघितला…
मावशी, तमाशा कुठे लावलाय?? फुटलेच या प्रश्नाला.
सलतात रेशीमगाठी -आत्ज्या
सलतात रेशीमगाठी -आत्ज्या दिवशी तुम्हाला तुमचे केस घरीच बसल्या बसल्या उपटावासे वाटतील तेव्हा नक्की बघा.
म. मां ह्यांचे डोकं सध्या चालत नाही. फक्त त्याच त्याच एका विषयावर व लोकेशनवर (म्हणजेच कोकण) हे असतं.
दाभाडे बघायचा आहे, त्यामुळे
दाभाडे बघायचा आहे, त्यामुळे वरच्या पोस्टी न वाचता स्क्रोल करावं लागलं आणि सगळा टीपी मिस करावा लागला याचं वाईट वाटतंय
>>>>...बहिण जरा जास्तच
>>>>...बहिण जरा जास्तच ढवळाढवळ करते माहेरी पण अशा बहिणी असतात. त्याचा राग खरेतर स्वतःवरच असतो पण तो डिनायल मधेही आहे आणि जबाबदारी घेऊन आयुष्य सावरण्यापेक्षा दोष देणं सोपं वाटतंय त्याला. मी खूश नाहीतर मी माधुरीसकट इतरांनाही सुखाने राहू देणार नाही. मी तिरसटासारखं वागत राहिलो तर सगळ्यांना अद्दल घडेल वगैर पण सगळ्यात मोठी अद्दल तुम्हालाच घडत असते.<<<<<<<<<<<<
आहेत अश्या बहिणी व असेच लहान भाउ जे मोठ्या बहिणीच्या "मीच" बरोबर करते व ते तुमच्या भल्यासाठीच बाण्याचे बळी पडलेले.
आणि मुर्ख लहान भाउ स्वतःची चुकी( स्वतःचे मत वा बाजु मांडणे योग्य वेळी न कळम्याने) लपवायला जिंदगीभर आई-बाप नाहितर कोणा कोणाला दोष देणार..
त्यामुळेच चित्रपट अगदीच बेकार नाही वाटला.
तरीही, अमेय वाघाचा पात्रं बरोबर नाही दाखवलं. प्रेशर मुलींना नसतं कारण तसे तसं अजुनही कंडिंशनिंग असते, जे काही करणार सुरुवात ते नवराच. आपण फक्त अर्पण करायचं मगच सुशील मुली. किंवा ज्यास्त उत्साह दाखवलेला मुली म्हणजे आगाउ वगैरे वगैरे....
नेपोकिड पप्पी बरोबर आहे
नेपोकिड पप्पी
बरोबर आहे तुमचं हेमंत ढोमे ने नेपो कीड ऐवजी नव्या लोकांना संधी द्यायला हवी होती जस नागराज मंजुळे देतात .
पण एक गोष्ट दोघांनी सारखी केलीय ढोमेनेही नागराज मंजुळे प्रमाणे स्वतःच्या गावात आणि गावातल्या लोकांना पिच्चर मध्ये शूट केलंय दाखवलंय.
मावशी, तमाशा कुठे लावलाय?? फुटलेच या प्रश्नाला.>>मी पण परत पाहिला यावेळी घरच्यां सोबत आम्ही भावंड पण आत्याच्या अंगात यायच्या सीनला तेव्हढेच हसलो जेव्हढे चित्रपटात तिघे हसतात.
प्राईमवर "गुलाबी" बघितला.
प्राईमवर "गुलाबी" बघितला.
सगळ्या दर्जेदार कलाकारांना एकत्र घेऊन गुलाबी रंगाची माती खाल्लेला सिनेमा.
इतका स्टिरीओटिपिकल आणि प्रेडिक्टबल की आपणच झोपेत पटकथा लिहिली आहे का असं वाटून गेलं.
तीन मैत्रिणी.. म्हणजे योगायोगाने तिघीही प्रभात रोडवर राहणाऱ्या.. आणि योगायोगाने एकाच ट्रॅव्हल्स थ्रू योगायोगाने राजस्थानालाच जाऊन योगायोगाने एकाच हॉटेलमध्ये योगायोगाने सेम पिरियडसाठी राहून तिथे योगायोगाने मैत्रिणी झालेल्या..
त्यातली एक वय वाढलं तरी जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी अविवाहित.. एक करिअरमध्ये यशस्वी पण नवऱ्याची बाहेर अफेअर्स चालू असल्याने तो घटस्फोट मागतोय.. एक या दोघींपेक्षा वयाने लहान.. करिअरिस्टिक. दोनदा प्रेमभंग झाल्याने आता No strings attached अश्याच मुलांना Tinder वर शोधणारी.
मग यात तिसरीच्या बॉसची एन्ट्री होते जो योगायोगाने वयाने पहिली पेक्षा थोडासाच मोठा आहे आणि योगायोगाने सिंगल (घटस्फोटीत) आहे. पुढची एन्ट्री हिचाच लहान भाऊ लंडनला असतो ज्याला पण no strings attached अशीच गर्लफ्रेंड हवी आहे.
लावा डोकं !!
पियू
पियू
पियू
पियू
पियू मी पण बघितला , परफेक्ट
पियू
मी पण बघितला , परफेक्ट लिहिलं आहेस. मृणाल कुलकर्णी कडे तर बघवत ही नाही...
गुलाबी रंगाची माती >>
गुलाबी रंगाची माती >>
चित्रपटात शो कॉलड मॉडर्न
चित्रपटात शो कॉलड मॉडर्न दाखवलेल्या बायकांच्या टोळीपेक्षा पारंपारिक दाखवलेल्या बायका केव्हाही परवडल्या हे आता अनुभवातून शिकलो आहे..
पियू
पियू

गुलाबी रंगाची माती >>> हे फार
गुलाबी रंगाची माती >>> हे फार आवडलंय
भारी लिहिलंय, पियू
चित्रपटात शो कॉलड मॉडर्न
चित्रपटात शो कॉलड मॉडर्न दाखवलेल्या बायकांच्या टोळीपेक्षा पारंपारिक दाखवलेल्या बायका केव्हाही परवडल्या हे आता अनुभवातून शिकलो आहे. >>>
हे धमाल निरीक्षण आहे 
पियू हाहाहा, भारीच.
पियू हाहाहा, भारीच.
पियू गुलाबी माती...
पियू
गुलाबी माती...
केवढे ते योगायोग आणि!
गुलाबी माती
गुलाबी माती
'मुक्काम पोस्ट देवाचं घर'
'मुक्काम पोस्ट देवाचं घर' बघितला.
गुलाबी पेक्षा कमी प्रेडिक्टबल आणि लहान मुलगी केंद्रस्थानी असल्याने जास्त हृदय झाला आहे.
शहीद जवानाची मुलगी असलेल्या जिजाला वक्तृत्व स्पर्धेत "माझे वडील" या विषयावर भाषण करायचे असते. तिची आई व आजी जिजाचे वडील गेल्यावर सरकारकडून पेन्शन न मिळाल्याने परिस्थितीने गांजलेल्या व त्यातल्या त्यात आई तर दुसऱ्यांच्या शेतात मेहनत करून करून जास्तच किरकिरी झालेली असते. त्यामुळे तिला भाषण देण्यासाठी वडिलांच्या बाबतीत काहीच माहिती मिळत नाही.
तिला अचानक वडिलांना पत्र लिहून त्यांच्याशी संपर्क साधायची क्लृप्ती सुचते व ती वडिलांना पत्र लिहित सुटते.
चित्रपटात ग्रामीण बाज आणि पात्रे छान जमून आली आहेत. खुलता कळी खुलेना वाल्या मायराचे काम छान झाले आहे. बाकी कलाकार पण चांगले घेतले आहेत. कथा साधी सरळ आहे आणि मध्ये मध्ये लहान मुलांना कळतील असे साधे सोपे विनोद आहेत.
सुट्टीत घरातल्या लहान मुलांना दाखवायला छान आहे.
वरातीमागून घोडं तसा मी
वरातीमागून घोडं तसा मी 'फर्स्टक्लास दाभाडे' बघितला. वन टाइम वॉच वाटला. बोअर नाही झाला. गाणी मात्र नाही आवडली.
त्याच वेळी 'कुलकर्णी चौकातला देशपांडे'चा ट्रेलर दाखवत होते. त्यातलं 'सुंदरा मनामध्ये भरली' आवडलं.
मी पाहिला फसक्लास दाभाडे.
मी पाहिला फसक्लास दाभाडे. इतका काही वाईट नाहिये.
पियू
पियू
मृकुला दोनच गोष्टी जमतात. हे असे सो कॉल्ड मॉडर्न रोल नाहीतर पी एन जी ची जाहिरात.
दाभाडे मधे सिद्धार्थ चांदेकरचं एकच वाक्य मला जाम हसवून गेलं.. बहिणीचा नवरा शॉवर मधे चुकून त्याला पकडतो... तो सात्विक संतापाने म्हणतो... अहो मी आहे इथे! काय काय करत असता तुम्ही दोघं
सध्या मला काय झाले आहे कळत
सध्या मला काय झाले आहे कळत नाही .
आधी जिलबी सिनेमा पहिला. स्वजो बहुदा जेम्स बॉण्डचा सिनेमा पाहून किंवा एखादा साऊथचा सिनेमा पाहून प्रचंड भारावला असावा . मग मला पण असाच रोल करायचा म्हणून हटून बसला असावा. प्रोड्युसरने म्हटले असेल 'अरे पण तुझी शरीरयष्टी , तुझा चेहरा आणि मुख्य म्हणजे आवाज ! त्याचे काय करायचे ?' पण स्वजोने म्हटले ' ते काही असो. मी प्रत्येक सीन मध्ये सिगरेट ओढीन. थोड्या थोडया वेळाने एखादी स्त्री माझ्यावर फिदा आहे हे दाखवायचे म्हंजे दाखवायचेच . स्टोरीमध्ये सारखे खून दाखवा म्हणजे लोकांना गोंधळात पाडा हे आपण नक्की का आणि काय पाहत आहोत ? आणि शेवटी माझी आणि हिरोईनची मारामारी दाखवूया . काय मस्त यूनिक आयडिया आहे . '
हा अत्यंत बिनडोक सिनेमा मी शेवटपर्यंत पाहिला. का?कारण सध्या असेच सिनेमे पाहावे असा मूड आहे.
बरं तिथेच न थांबता, न डगमगता आता गुलाबी बघायला सुरवात केली आहे .
जिलबी मध्ये त्याचं नाव मठ्ठा
जिलबी मध्ये त्याचं नाव मठ्ठा आहे का ?
नाव मठ्ठा आहे की नाही माहित
नाव मठ्ठा आहे की नाही माहित नाही. पण विशेषण तुपकट असावं.
(No subject)
गुलाबी रंगाची माती >>>
गुलाबी रंगाची माती >>>
चित्रपटात शो कॉलड मॉडर्न दाखवलेल्या बायकांच्या टोळीपेक्षा पारंपारिक दाखवलेल्या बायका केव्हाही परवडल्या हे आता अनुभवातून शिकलो आहे. >>> खरच.
जिलबी मध्ये त्याचं नाव मठ्ठा आहे का ?>>>>> पाहिजे होतं
पाच सेकंदासाठी गाड्यावर जिलबी तळताना दाखवली आहे. त्यावरून हे नाव का द्यावं वाटल.
पार्ट 2, 3, 4 काढायचे आधीच
पार्ट 2, 3, 4 काढायचे आधीच ठरले असेल.
शीर्षकातून प्रामाणिकपणा दिसला.
माझी मराठी चित्रपटाबद्दलची
माझी मराठी चित्रपटाबद्दलची पोस्ट जनरल धाग्यावर पडली. इथे कॉपी पेस्ट करतेय.
संत ज्ञानेश्वर (जुना ) सहज म्हणून बघायला सुरूवात केली आणि मग स्किप करता येईना म्हणून अर्ध्याच्या वर पाहून झाला.
जुनं तंत्र, ब्लॅक अॅण्ड व्हाईट , संवादांची जुनी शैली ( दीपक देशपांडे खूप मस्त नक्कल करतात ) हे सुरूवातीला पाच दहा मिनिटं खटकतं पण नंतर आपन त्यात ओढले जातो. किती तरी वेळा आवंढा येतो गळ्यात. हाच पिक्चर नव्या तंत्रज्ञानाने चकचकीत बनवला तर इतका प्रभावी वाटणार नाही असं वाटतं. ब्लॅक अॅण्ड व्हाईट ने हा जुना काळ आहे असा समज होतो. संत तुकाराम पण असाच दोन तीन वर्षांपूर्वी पाहिला होता. तो ही असाच खूप आवडला होता. नवीन नाही पाहिला. वेगळंच युग होतं प्रभातचं.
आचार्य function at() { [native code] }रेंचा महात्मा फुलेंवरचा पिक्चर आहे, सतत यु ट्यूब फीड मधे पण दिसतोय. पण नवीन पाहिल्यानंतरच तो पाहणार. आधी पाहिला तर नवीन आवडणार नाही असे होण्याची शक्यता आहे.
मराठीतले ब्लॅक अॅण्ड व्हाईट
मराठीतले ब्लॅक अॅण्ड व्हाईट मधे असलेले प्रभातचे जुने सिनेमे, संतांवरचे सर्वच सिनेमे, शिवाकालीन सिनेमे ( भालजी पेंढारकर कृत) आजही पहायला आवडतात.
Pages