मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दक्षिणा Lol
ज्यु. सो.कु.चं लग्न झालेलं नाही ना? मग इला भाटेला माजी भावी सासू म्हटलं पाहिजे. तेवढंच अजून एक कन्फ्यूजन.

Daxina Lol

गुलकंद ..
नावातच केवढा गोडवा! चित्रपटही एकदम झकास - अगदी पोट धरून हसवणारा, कधी किंचित हळव करत नेणारा..

समीर आणि इशाचचं अफाट टाइमिंग, धमाल ॲक्टिंग - या वेड्या जोडगोळीने धमाल उडवून दिली आहे. इशाचा अभिनय बघताना ‘पुत्र नसावा असा’ या सिरीजची वारंवार आठवण येत होती तर समीरचा ऑफिसमधला बायकांचा बॉस ही मध्ये मध्ये आठवत होता.
इतर सगळ्यांचीही कामे उत्तम. सई ताम्हणकरने - एका लग्नाळू मुलीची आई, गृहिणी, बायको, तसेच पूर्वाश्रमीची प्रेयसी - खूप छान सादर केलिये. विशेष आवडलं ते पंचवीस वर्षांनी भेटलेल्या जुन्या प्रियकराला मुलीच्या भावी सासऱ्याच्या रूपात बघते तेव्हा.. सुरुवातीला त्या जुन्या प्रेमात ती वाहत जाते की काय असं वाटत असतानाच तिच्यातली आई, बायको जागी होते तो सर्व तोल - समतोल तिने फार छान दाखवलाय आणि सांभाळलाय.
प्रसाद आणि सई हे दोन्ही कसलेले/ प्रथीतयश कलाकार असले तरीही त्यांनी स्वतः मागे राहून समीर इशाला बॅटिंग करायला पूर्ण मैदान मोकळं दिलंय.. त्यांनीही त्याचा पुरेपूर उपयोग केला आहे.
उत्तम संवाद, पटापट पुढे जाणारी किंवा खिळवून ठेवणारी कथा मांडणी..

एक महत्त्वाचं सांगायला आवडेल,
बे एरियातील चित्रपट गृहात घडलेला हा प्रसंग,
चित्रपट सुरू होताना आमच्यासमोर व्हीलचेअरमधून एक मुलगी आली.
चित्रपट संपल्यावर बाहेर आलो, तर ती मुलगी ( बहुविकलंग किंवा स्पेशल ) खूप आनंदात भराभरा व्हीलचेअर घेऊन थेटरच्या खालच्या भागात एक चक्कर मारून आली. ती गुलकंदाच पोस्टर शोधत होती, त्याच्याबरोबर फोटो काढायला. दुर्दैवाने त्या थिएटरला शनिवारचे दोनच शो असल्यामुळे तिला पोस्टर काही मिळालं नाही तिला.
तिच्या पालकांशी बोलताना कळलं की तिला पूर्ण चित्रपट फारसा समजला असे नाही पण तरी ती अतिशय खूश होती. समीर चौगुले इशा डे हास्य जत्रेतले तिचे फेवरेट कलाकार तिला मोठ्या पडद्यावर दिसले म्हणून तिचा आनंद ओसंडून वाहत होता. महाराष्ट्राच्या हस्यजत्रेच्या टीमने त्यांच्या नकळत (अशाही) कित्येक लोकांना इतका/ असा आनंद दिलाय ह्याबद्दल पूर्ण टीम चं विशेष अभिनंदन आणि कौतुक !

जाता जाता महत्वाच..
एकाच आठवड्यात दोन नवीन, अतिशय भिन्न आणि तितकेच चांगले मराठी चित्रपट बघायला मिळाले. ह्या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांचे खूप चांगले अभिप्राय/ प्रतिसाद ही मिळतायत ..
तेव्हा आता मराठी चित्रपटांना प्रेक्षक नाकारतात छापाच रडगाण बंद करून काय आणि कसं दाखवलं की प्रेक्षक प्रति साद देतात याचा अभ्यास करून मराठी चित्रपटकर्ते पुढील चित्रपट बनवतील तर परत रडण्याची वेळ त्यांच्यावर कदाचित येणार नाही.

छन्दीफन्दी लास्ट पॅराग्राफ अगदी पर्फेक्ट, प्रेक्षकाची नाडी ओळखा ते साउथचे पिक्चर हिट करतात्,हिन्दी बघतात यावरुन प्रेक्षकानाच ट्रोल करु नका..कस्टमरला आपल्याकडे आणण्यासाठी तुमच प्रॉडक्ट खणखणीत हव..

मन शुद्ध तुझ बघितला नाहिये पण 'मोगरा फुलला' मधे, एका लग्नाची दुसरी गोश्ट, मुबै-पुणे-मुबै या तिघात त्याने चागल काम केलय.

अनुमोदन. छान काम करतो फक्त त्याचा वीग आवडत नाही मला. फारच जास्त कृत्रीम वाटतो म्हणुन त्याच्या अभिनयातली नैसर्गिकता (?) जाते.

स्वजो व्हिलन करतो तेव्हा आवडतो. जिवलगा मधे आवडलेला, त्यात आधी गुडी गुडी होता ते बोअर झालेलं पण नंतर व्हिलन झाला तेव्हा अभिनय चांगला केला आणि समांतर एक मधे (यात व्हिलन अ‍ॅज सच नव्हता पण काम चांगलं केलेलं), दोन बघायचं डेरींग नव्हतं.

तो गुडी गुडी चॉकलेट बॉय असला की आवडत नाही, कृत्रिम अभिनय वाटतो मला.

“मी-तवा” – एक असा सिनेमा, जो तुम्हाला हसवतो, रडवतो, आणि शेवटी विचार करायला भाग पाडतो – “हे सगळं काय चाललंय?” >>> दक्षिणा Lol

मितवा या शब्दाची उकल फक्त दोन वेळेला केलेली आहे , एक मितवा लिहिलेली बाहुली दोन वेळा सिनेमात दिसली आहे >>> Lol

मी पाहिला आहे. पकाऊ होता. मला कथा जाम आठवत नाही. प्रा बे या पिक्चरमधे मला क्रश मटेरियल वाटली होती. पण नंतर तिचे इतर पिक्चर पाहिले तेव्हा तो क्रश ओसरला. ती याची मैत्रिण व त्याचे सगळे व्यवहार मॅनेज करणारी गव्हर्नेस टाइप पण असते का? तसे काहीतरी आठवते. अगदी घट्ट मैत्री असलेली व्यक्ती जपानला गेली आहे हे तिला फोन लावेपर्यंत याला माहीत नसते?

असे कोण रिसोर्ट ओनर्सच्या मुलाखती घेतात?

तिला थेट लग्नाचं वचन देतो! >>> तिने मागितलेले असते का? Happy

जी इतकी समजूतदार आहे की ती स्वजोला मुलाच्या दिवसांना बोलवते! >>> अरे ती काय पार्टी आहे का कोणीही कोणालाही बोलवायला, आणि कोणीही कोणाकडेही जायला? Happy

सासूच्या या ‘दिल से’ स्पीचमुळे ज्यू सो कू लग्नाला तयार होते, आणि लगेच तिला ‘गुड न्यूज’! >>> Lol खुनाचा आरोप, दिल से स्पीच, गुड न्यूज व गुड न्यूज करता आवश्यक असलेली कामगिरी यातले काय कोणत्या सिक्वेन्सने झाले व मधे किती काळ गेला याचा काही अंदाज पिक्चरमधे दाखवला आहे का? आणि ज्युसोकु असल्या स्पीचनंतर खुनाचा संशय असला तरी सासूला आवडलाय तर ठीक आहे असा विचार करते असे दिसते.

मला शेवट कळाला नाही - म्हणजे इथे लेखातील. पिक्चरमधला लक्षात नाही. पिक्चरमधले फारसे काहीच लक्षात नाही. "नात्याला काही नाव नसावे, तूहीरे माझा मितवा" असे एक गाणे आहे. पण ते याचे टायटल साँग आहे की, "तू ही रे" चे, लक्षात नाही.

वाटाणा >>> Lol

दक्षिणा आणि फा, मस्त लिहिलंय. Lol बरेचदा प्राईमवर दिसतो, पण कधी बघावासा वाटला नव्हता. आता (नाही बघायचं हे) नक्की झालं.

दक्षिणा आता लगेहात "फुगे" ही बघुन टाक..मग तुला "हे सगळ काय काय चाललय" हा प्रश्न पडेल...यातला हायलाइट एकच...सुभा कोणत्याही बायोपिक रोल मधे नाही.

स्वजो, अभिनेता म्हणून चांगला आहे.
पण त्याचे हिंदी नाव असलेले पिक्चर्स बघावेसे वाटत नाहीत. त्याचं शाखाची कॉपी मारणं पण आवडत नाही.
दुनियादारी, बळी मधे तो आवडलाच होता. त्याची ती झबा हेअरस्टाईल बदलावी असं वाटतं.
हिंदीमिश्रित नाव नको म्हणून भिकारी, जिलबी असली नावंही चालवून घेऊ असंही नाही. Happy

अजूनही बरसात आहे ची एक क्लिप पाहिली. मुक्ता बर्वे , उमेश कामत. दोघंही मस्त वाटले.
खूप शोधाशोध केली पण असा मूव्ही सापडला नाही. मालिका आहे का ही ? स्थिर कॅमेर्‍यामुळे शंका आली.

दक्षिणा, ' फुगे ' अजिबात बघू नकोस. अतिशय भयंकर आहे.

रानभूली, अजूनही बरसात आहे ही सिरीयल आहे. तिच्या फक्त क्लिप्स छान आहेत. पहिल्या काही एपिसोड्स नंतर मालिका स्वतःचा कडेलोट करून घेते आणि डोक्यावर पडते. आपला वेळ वाया जातो. मी या मालिकेत त्याचं लग्न होईपर्यंत पाहू शकले. त्यानंतर पकले. मुक्ताच्या बहिणीचा सब प्लॉट बकवास आहे. आणि नंतर या मालिकेत बहुधा सगळेच व्हिलन होत जातात. म्हणून मी बघणं बंद केलं. फक्त उमेश आणि मुक्ताचं एक रोमँटिक गाणं आहे मधेच - तेवढं पहा.

"मी-तवा">>> Lol
मित्र तत्वज्ञ, वाटाणा?? >>> Lol
बे एरियातील चित्रपट गृहात घडलेला हा प्रसंग>>>> छान वाटल. मस्त.

लगेहात "फुगे" ही बघुन टाक
>>
फुगे अन् मिटवा ची डायरेक्टर एकच आहे
तिनी हिमेश रेशिममियां चा ही एक सिनेमा डायरेक्ट केला होता
स्वप्ना वाघमारे जोशी

पण ते याचे टायटल साँग आहे की, "तू ही रे" चे, लक्षात नाही
>>
याचंच
हिट गाण्यातून ओळ उचलून त्याच क्रू च्या पुढच्या सिनेमाचं नाव द्यायचा फंडा तू ही रे मधे वापरला
(संदर्भ - रॉक ऑन : जिंदगी ना मिलेगी दोबारा :: दूल्हे राजा : अखियोंसे गोली मारे ई ई)

फारएन्ड Lol

रानभूली >>> 'अजूनही बरसात आहे' चांगल्या प्रिमायसेस वर सुरु झाली आणि नंतर ती पाकिस्तानसारखी सेल्फ डिस्ट्रक्शन मोडमध्ये गेली.
तुला झी 5 ने पैसे दिले तरी बघू नकोस.

आणि नंतर ती पाकिस्तानसारखी सेल्फ डिस्ट्रक्शन मोडमध्ये गेली. >>> Lol

अगदी!
ते दोघं परत भेटतात तोपर्यंतची पाहिली होती. मग बोअर व्हायला लागली. उपकथानकांनी वात आणला.

अन्जू, रमड धन्यवाद.
आणि नंतर ती पाकिस्तानसारखी सेल्फ डिस्ट्रक्शन मोडमध्ये गेली. >>>>> Lol
क्लिप्सच बघेन आता Happy

Pages