Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23        
      
    चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users
शेअर करा
 
 
त्या दादीमां ला चक्क संदर्भ
त्या दादीमां ला चक्क संदर्भ आहे कारण त्याच्या दादीमांला गंगोत्री का गोमुखला जायचं असतं आणि वयामुळे जाता येत नाही म्हणून तो गंगाजल आणायला गेलेला असतो. पुढे आपल्याला जल आणायचंय हे विसरून भलत्याच गंगेच्या नादाला लागतो. दादीमांचं पुढे काय होतं ते मी विसरले. त्याच्या तरी लक्षात होतं का नाही कुणास ठाऊक.
बालपणी याचं कटयुक्त सोज्वळ वर्जन कुठल्यातरी चॅनेलवर पाहिल्याने या पिक्चरबद्दल का कॉंट्रोव्हर्सी झाली असेल असा प्रश्न पडलेला. आणि उत्तराखंडचं अप्रतिम चित्रीकरण पाहून मी गंगोत्रीच्या प्रेमात पडले. भुगोलाच्या धड्यातून ऑटम/फॉलचं सौंदर्य कधी लक्षात आलं नव्हतं ते या पिक्चरने दाखवलं.
श्रीपाद रेडिओ ऐकून पाहायला
श्रीपाद रेडिओ ऐकून पाहायला हवा

गाणं भारी आहे
दादी माँ>>>
रच्यकने या कडव्याची चाल एका
रच्यकने या कडव्याची चाल एका गाजलेल्या अल्बमची आठवण करून देते का ?
>>>चाल ओळखीची वाटतेय खरी.
रच्यकने या कडव्याची चाल एका
रच्यकने या कडव्याची चाल एका गाजलेल्या अल्बमची आठवण करून देते का ?
<<<<< मला थोडं चालीवरून पण मुळात शब्दांमुळे 'गारवा' आठवला.
'आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे...'
अचूक ओळखलं श्रद्धा
अचूक ओळखलं श्रद्धा
मुळात शब्दांमुळे 'गारवा'
मुळात शब्दांमुळे 'गारवा' आठवला >>> करेक्ट! पण राभु चालीवरून आठवलं म्हणत होती त्यामुळे कन्फ्युजन झालं
करेक्ट! पण राभु चालीवरून
करेक्ट! पण राभु चालीवरून आठवलं म्हणत होती त्यामुळे कन्फ्युजन झालं >>

हो. मला ती ओळ किंचित बदल करून घेतल्यासारखी वाटतेय.
त्या दादीमां ला चक्क संदर्भ
त्या दादीमां ला चक्क संदर्भ आहे कारण त्याच्या दादीमांला गंगोत्री का गोमुखला जायचं असतं आणि वयामुळे जाता येत नाही >>> हो तसेच काहीतरी आठवते.
 हो तसेच काहीतरी आठवते.
आणि उत्तराखंडचं अप्रतिम चित्रीकरण पाहून मी गंगोत्रीच्या प्रेमात पडले >>> हो पूर्ण पिक्चर आठवत नाही. पण ते सुरूवातीचे चित्रीकरण सुंदर आहे. गाणी, संगीत आणि इव्हन पार्श्वसंगीत! मंदाकिनीने त्या गाण्यात टीआरपी खाल्ला पण लताचा आवाज (इव्हन त्या गाण्यातील सुरूवातीचे आलाप किंवा जे काही आहे ते) काय मस्त येतो!
मला थोडं चालीवरून पण मुळात शब्दांमुळे 'गारवा' आठवला. >>> _/\_ श्रद्धा तुझी तिकडे चिकवावर गरज आहे. तो एक एक्स्ट्रॉ कलाकार ओळखायला. सुपरबॉइज ऑफ मालेगाव मधल्या त्या ग्रूपमधला.
मित्र माझा मध्ये गिरीश
मित्र माझा मध्ये गिरीश कुलकर्णी यांची मुलाखत पाहून समजलं कि देऊळ या सिनेमा ला पुरस्कार मिळाला आहे. म्हणून prime वर सिनेमा पहिला. अभिनय उत्तम असला तरी कथा एकांगी आहे. UPA सरकारने बरोब्बर हेच पाहून पुरस्कार दिला आहे.
(No subject)
गुलकंद आणि आता थांबायचे नाही
गुलकंद आणि आता थांबायचे नाही या दोन्ही चित्रपटांचे रिव्ह्यू चांगले येत आहेत.
कोणी पाहिले आहेत का इथे?
लहान मुलांना दाखवावा असा कुठला आहे का?
शामची आई
शामची आई
दोन्हीचे ट्रेलर आवडलेच होते.
दोन्हीचे ट्रेलर आवडलेच होते..होपफुली मुव्ही चान्गले असतिल.
प्रमोशन मात्र अति करतात, तेच तेच प्रश्न आनी तिच तिच उत्तर..झाडून सगळे मराठी चॅनेल वाल्याकडे मुलाखती.
आता थांबायचं नाय..
आता थांबायचं नाय..
डोळ्यात आसू आणि हसू एकच वेळी आणणारा एक अतिशय तरल आणि हृदयस्पर्शी चित्रपट.
आपण केलेली घाण/कचरा स्वच्छ करणारे, ज्यांच्या दोन एक दिवसांच्या अनुपस्थितीनेही सर्व शहराच रूपडचं पालटत, परंतु ज्यांना स्वतःला मूलभूत सोयी सुविधांपासूनही वंचित रहाव लागत.. ते चतुर्थ श्रेणी कामगार. त्यांना दाखवलेले स्वप्न जे त्यांच्या आयुष्यात एक सोनेरी किरण घेऊन येतं, शिवाय बरोबरच आत्मविश्वास, आत्मभान, आणि स्वतःच्या मूलभूत अधिकारांची जाणीवही आणत.
रोबोटिक्सचा उपयोग (खर तर) ही अशी माणसाचा जीव धोक्यात जाईल अशी काम करण्यासाठी केला जावा.. तंत्रज्ञान अशावेळी वरदान ठरते.. असे काहीसे विचार चित्रपट बघताना मनात येत होते.. आणि शेवटच्या काही मिनिटांमध्ये असं एक जापनीज यंत्र दाखवलंय.. अर्थात मग त्याने नोकऱ्या गेल्या तर हीही एक भीती त्यांच्या मनात येण स्वाभाविक आहे. पण त्यावर तोडगा निघू शकतो, नवी. उद्योग निर्मिती होऊ शकते वगैरे असे पदर त्याला आहेत.. अर्थात हे ह्या चित्रपटाच्या कक्षेत येत नाही..
काथा आवडली- जरी थोडी अस्वस्थ करणारी आहे.. सशक्त आणि संतुलित वाटली. सगळ्यांनीच कामे छान केलीयेत. भरत जाधवने जीव ओतलाय.. ऑल द बेस्ट पासून अनुभवलेला तो त्यांचा विनोदी अभिनय, सही रे सही सारख नाटक करून आता हा चित्रपट… (१०० टाळ्या:))
Hi भूमिका बघताना मला त्यांनी आजवरच्या मुलाखतीत सांगितलेले किस्से - त्यांची तरुणपणची परिस्थिती ते आता मिळालेले यश, आईवडिलांप्रति असलेली भक्तिवजा प्रेम ह्या सगळ्याची नकळत आठवण आली.. वाटलं ह्या वैयक्तिक अनुभवातून असा इतका जिवंत अभिनय साकारला गेला असेल.
नक्की बघावा असा.. आता थांबायचं नाय!
होय नक्की बघावा असाच आहे.
होय नक्की बघावा असाच आहे. आता थांबायचं नाय!
आता थांबायचं नाही कुठे आहे ?
आता थांबायचं नाही कुठे आहे ?
थिएटर मध्ये आहे
थिएटर मध्ये आहे
आता थांबायचं नाही कुठे आहे ?
आता थांबायचं नाही कुठे आहे ? >>> हे चित्रपटाचं नाव आहे हे आत्ता कळलं
थिएटर मध्ये आहे >> ohhh, मला
थिएटर मध्ये आहे >> ohhh, मला वाटलं ott वर आहे.
आता थांबायचं नाही कुठे आहे ?
आता थांबायचं नाही कुठे आहे ? >>> हे चित्रपटाचं नाव आहे हे आत्ता कळलं
>>>>>
हो, एखादा मराठी पिक्चर चांगला असतो पण त्याचे नावही आपल्यापर्यंत दुर्दैवाने उशीरा पोहोचते. म्हणून आपल्याला जेव्हा समजेल तेव्हा पुढे पास करावे. मी ट्रेलर धाग्यावर सुद्धा शेअर केले होते मागे ट्रेलर आवडला होता म्हणून. माझ्या व्हाट्सअप ग्रूपवर सुद्धा फॉरवर्ड केलेला.. आता चांगला आहे हे समजले तसे तिथेही कोणी पाहिला का म्हणून चौकशी केली. तेवढेच माऊथ पब्लिसिटीला हातभार
मराठी सिनेमा "मी-तवा"
मराठी सिनेमा "मी-तवा"
पूर्वी फक्त हिंदी सिनेमातले हिरोचं ‘देखणेपण’, ‘खानदानी श्रीमंती’ आणि ‘छंदीफंदी’ स्टाईल बघायला मिळायचं. पण आता हा ताप मराठी सिनेमातही पसरलाय! बॉलिवूडच्या ‘मर्क’ स्टाईलला आता मॉलिवूडही कमी नाही. आणि असा एक मराठमोळा जेम्स बाँड आहे – स्वजो! हा भाऊ श्रीमंत, रिसॉर्ट्सचा मालक, सिंगल, आणि त्याच्यावर जीव टाकणारी एक काजोल-टाईप मैत्रीण (प्रार्थना बेहरे) पण आहे. पण इथे ट्विस्ट आहे – कुकुहोहैच्या काजोलचं लग्न शेवटी होतं, इथे तसं काही नाही!
तर, स्वजोच्या रिसॉर्टवर मुलाखतीसाठी येणारी ज्यू सो कु (ज्याचं नाव ऐकताच स्वजोच्या हृदयात ढोल वाजायला लागतात) त्याला ती पटकन आवडते. हा माणूस, जो इतर मुलींशी ‘केसा’ इतकीही तडजोड करत नाही, तिला थेट लग्नाचं वचन देतो! पण इथे क्लायमॅक्स आहे – ज्यू सो कूचं आधीचं लग्न ठरलंय, पण तिचा होणारा नवरा तिच्या ‘फास्ट अँड फ्युरियस’ गाडी चालवण्यामुळे अपघातात पडलाय. तो गेली पाच वर्षं बेडवर लोळतोय, आणि ज्यू सो कूला दिवसातून फक्त दोन तास त्याची सेवा करायची आहे. स्वजो म्हणतो, “मला काही प्रॉब्लेम नाही, तू फक्त माझ्याशी लग्न कर!” म्हणजे, भाऊ, तुझी तयारी बघ!
पण ज्यू सो कू ची एक अट आहे – स्वजोने तिच्या भूतकाळातल्या नवऱ्याला भेटायचं नाही. पण स्वजो काय, तो तर जेम्स बाँड! चोरून हॉस्पिटलमध्ये जाऊन त्याला भेटतो, आणि काय आश्चर्य? तासाभरात तो बिचारा औषधांना प्रतिसाद द्यायचं बंद करतो आणि ‘गेम ओव्हर’! ज्यू सो कू थेट स्वजोवर खुनाचा आरोप ठेवते आणि रिलेशनशिपचे ‘डिलीट’ बटन दाबते. पण इथे ट्विस्ट आणते ती भूतकाळातली सासू (इला भाटे), जी इतकी समजूतदार आहे की ती स्वजोला मुलाच्या दिवसांना बोलवते! ती म्हणते, “माझ्या मुलाचा जीव सो कु त अडकला होता, पण तुला पाहून त्याला समाधान मिळालं की माझं (त्याचं)ओझं आता तू (स्वजो ) उचलशील!” (आता इथे प्रश्न पडतो – बेडवर पडलेला माणूस हे सगळं कसं मॅनेज करत होता? पण असले प्रश्न विचारायचे नसतात, सिनेमाचं लॉजिक आहे!)
सासूच्या या ‘दिल से’ स्पीचमुळे ज्यू सो कू लग्नाला तयार होते, आणि लगेच तिला ‘गुड न्यूज’! स्वजो ही बातमी आपल्या काजोल-मैत्रिणीला फोनवर सांगतो, पण ती? ती तर बिझनेस पार्टनर म्हणून जपानला पळालीय, कोणाच्यातरी स्टार्टअप सेट करायला! सिनेमातून तिला असं गायब केलंय, जसं गाढवाच्या डोक्यावरून शिंग! असो, स्वजो म्हणतो, “ही गोड बातमी तुला समोर सांगायची होती गं,” आणि ज्यू सो कूसोबत कुठेतरी निघतो. पण ड्रामेबाजी कुठे थांबते? अपघात होतो! आता आपण विचार करतो, आता ज्यू सो कू बेडवर, स्वजो तिची दोन तासांची सेवा करणार, मग कोणीतरी येऊन स्वजोला लग्नाची ऑफर देणार, आणि ही साखळी चालूच राहणार, ना?
पण लेखक काय, तो तर हुश्शार! तो असलं काहीच करत नाही. त्याऐवजी, ज्यू सो कूला पुन्हा तिच्या भूतकाळात अडकवतो, जिथे ती रोज हॉस्पिटलमध्ये त्या रिकाम्या बेडशी गप्पा मारत बसते, जणू ती ‘भाग प्यायलेली’! आणि हाच आहे “मी-तवा” – एक असा सिनेमा, जो तुम्हाला हसवतो, रडवतो, आणि शेवटी विचार करायला भाग पाडतो – “हे सगळं काय चाललंय?”
फिनिश... पण खरं सांगू? हा सिनेमा बघा, आणि पॉपकॉर्न विसरू नका! आणि विचार अजिबात करू नका की या सिनेमात मितवा या शब्दाची उकल फक्त दोन वेळेला केलेली आहे , एक मितवा लिहिलेली बाहुली दोन वेळा सिनेमात दिसली आहे तरी सिनेमाला हेच नाव का दिलं? इतका 'उडता तिरंदाज' स्वजो अचानक सोकूच्या प्रेमात पडून थेट जमिनीवर कसा काय येतो ? इला भाटे इतकी समजूतदार का ? स्वजो कधीच काम करताना दिसत नाही पण इतका गब्बर श्रीमंत कसा काय असतो ? स्वजो मोस्ट ऑफ द टाईम शारुख ची नक्कल का करतो ? हुश्श ! दमले .
एक असा सिनेमा, जो तुम्हाला
एक असा सिनेमा, जो तुम्हाला हसवतो, रडवतो, आणि शेवटी विचार करायला भाग पाडतो – “हे सगळं काय चाललंय?” >>>> 
 
मी-तवा
मी-तवा
>>
हा तोच ना, मित्र तत्वज्ञ, वाटाणा??
त्यात तो तात्या विंचू चा बाहुला स्वतः बद्दल नेहमी थर्ड पर्सन मधे बोलतो
वाटाणा >>>
वाटाणा >>>
भारी कथा आहे इतकी डिटेल मी
भारी कथा आहे इतकी डिटेल मी पहिल्यांदा वाचली
 इतकी डिटेल मी पहिल्यांदा वाचली
स्वजो मोस्ट ऑफ द टाईम शारुख ची नक्कल का करतो ?
>>>
कारण तो त्याचा प्रचंड मोठा चाहता आहे. हे बरेचदा त्याने बोलून दाखवले आहे.
दक्षे
दक्षे
दक्षिणा मस्त झाला आहे
दक्षिणा मस्त झाला आहे रिव्ह्यू!
 मस्त झाला आहे रिव्ह्यू!
मी तवा पाहिलाय मागेच. पण खूप जोरात मनापासून विसरून टाकला आहे
कधीच काम करताना दिसत नाही पण इतका गब्बर श्रीमंत >>> हे असं एकदा व्हायचं आहे मला
कधीच काम करताना दिसत नाही पण
कधीच काम करताना दिसत नाही पण इतका गब्बर श्रीमंत >>> हे असं एकदा व्हायचं आहे मला>> अगदी ग !
स्वजो मोस्ट ऑफ द टाईम शारुख ची नक्कल का करतो ? >>> भ्रष्ट नक्कल !! म्हणजे त्याच्यासारखच हात बित पसरवायचे पण ते करताना आपल्या गोल्रमटोल शरिराच्या मर्यादा विसरायच्या...
स्वजो वाइट अभिनेता नाहि पण शाखाची नक्कल करताना तो अत्यत बेकार दिसतो...किबहुना शाखाच आता" अजुन योवनात मी" टाइप डन्कि डान्स करताना किती वाइट्ट् दिसतो.
दक्षे
दक्षे
स्वजो वाईट अभिनेता नाही >>> खरंय... त्याला दिग्दर्शकांनी सांगायला हवंय की फुकाची स्टाइलगिरी न करता तुझा स्वत:चा अभिनय कर
रमड, बस्स इतना सा ख्वाब है ना?
मी-तवा
मी-तवा

एक सेकंदभर ट्यूब लागली नाही आणि नंतर फुटलेच.
सॉल्लीड रिव्ह्यू आहे. आज नेमकं असंच खुसखुशीत वाचायची इच्छा होती
Pages