मराठी चित्रपट कसा वाटला? - 1

Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23

चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुले लहान असताना आमच्या गावी पडदा बांधून दाखवला होता. दोन सीन्स आठवतात फक्त त्यातले.
आता बघायचा आहे. पण अनंत महादेवन यांचा आधी पाहीन.
आचार्य function at() { [native code] }रेंचा सिनेमा जर आधी पाहिला तर नवीन आवडणार नाही.
युट्यूबर गेल्या आठवड्यात दहा मिनिटे पाहिला. त्यात संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील दिसले.स्वतः आचार्य function at() { [native code] }रेंनी यात काम केलेले आहे. याशिवाय आणखी काही थोर लोकांचा ( शाहीर अमर शेख, कर्मवीर शिंदे, प्रबोधनकार ठाकरे) हातभार या सिनेमाला लागलेला आहे. अत्रेंनी या सर्वांना एकत्र आणले.

बरोबर. मीही हा चित्रपट अजून पाहिला नाही. प्रबोधनकार ठाकरेंनी आभिनयही केला आहे, असं श्रेयनामावली पाहून वाटलं.

फुले लहान असताना आमच्या गावी पडदा बांधून दाखवला होता >>> हे वाक्य नीट समजायला दोन मिनिटे लागली Happy आधीच्या पोस्ट आधीच वाचून गेलो होतो, त्यामुळे तो संदर्भ डोक्यात लोड व्हायला वेळ लागला.

मी प्रत्येक सीन मध्ये सिगरेट ओढीन. थोड्या थोडया वेळाने एखादी स्त्री माझ्यावर फिदा आहे हे दाखवायचे म्हंजे दाखवायचेच . >>> Lol

जेम्स बॉण्ड पेक्षा तेलुगु सृष्टीतीलच इफेक्ट असेल. इतर पिक्चर्स मधेही दिसलाय. त्यांना एक ते हीरो आजूबाजूच्या दुनियेपेक्षा कोणीतरी भारी दाखवण्याचे फॅसिनेशन आहे, तसेच याच्या एक दोन पिक्चर्स मधे होते.

फुले लहान असताना आमच्या गावी पडदा बांधून दाखवला होता >>> हे वाक्य नीट समजायला दोन मिनिटे लागली >>> Lol मला पण

जिलबी पोस्ट Lol

' चुंबक ' म्हणून एक मराठी सिनेमा पाहिला.
मला समहाऊ शेवटाला काहीच धड क्लोजर नसलेले सिनेमे आवडत नाहीत. कितीही भारी अभिनय केलेला असला तरी. हाही तसाच आहे.

स्वानंद किरकिरे यांची मुख्य भूमिका आणि अप्रतिम अभिनय सोडल्यास चित्रपटात विशेष काहीच नाही.

गावी गाळा घ्यायचा म्हणून अर्जंट पैसे मिळवण्याच्या नादात मुंबईतील एक वेटर आणि त्याचा मोबाईल रिपेअर करणारा मित्र नायजेरियन फ्रॉड वाली स्कीम वापरून पैसे उभे करायला बघतात. त्यांच्या गळाला डोक्याने थोडा कमी असलेला ठोंबरे हा माणूस लागतो. थोडी रोख रक्कम आणि सोन्याची चेन तो माणूस या दोघांना देतो आणि वाट बघत तिथेच २ दिवस सलग उभा राहून तोंडाला फेस येऊन (प्रचंड अशक्तपणा येऊन) पडतो. इकडे वेटरला मनाने या माणसाला फसवल्याचे पटलेले नसल्याने तो चक्कर आलेल्या ठिकाणी परत येतो. आणि मग पदोपदी त्याला ' उनो रिव्हर्स ' चा अनुभव येत जातो. शेवटी काय होते ते इथे लिहिणे योग्य ठरणार नाही.

या एका माणसाच्या अभिनयासाठी सगळा सिनेमा बघू शकणार असाल तर अवश्य बघा. पण तेवढंच !!

विष्णुपंत पागनिसांच्या संत तुकाराम चित्रपटात मंबाजीचं काम सगळ्यात बेस्ट आहे. मला आता बाकी चित्रपट बघवणार नाही, पण त्या नटाचं काम अजूनही बघू शकतो.

का का का???
छावा दिसला नेफिवर म्हनून क्लिक केलं. श्रेयनामावलीत कणभर इंट्रेस्ट नसल्याने थेट औरंगजेबाच्या दरबारात उतरले. अन इतका भुकेकंगाल, करूण अन कमकुवत औरंगजेब बघूनच ऑ असे झाले. मग इतर कळकट्ट दरबारी अन नंतरचा गलेलठ्ठ काळा सरदार बघून अन सपक संवाद ऐकून मन धास्तावलेलेच. तरी धीर धरून पुढे सरकले. अन मग लांबून हजारों मराठे चाल करून आले. प्रत्येक घोडेस्वार भगवा झेंडा घेऊन. दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम असेल तर मग तलवार कुठल्या बरं हातात असेल? हा विचार करेपर्यंत "मराठे बर्हाणपूरमधे आलेच" म्हणे. मग शहराच्या मोठ्या दरवाजा बाहेर असलेले मोगल लगबगीने आत आले. दोन माणसांनी लगालगा दरवाजातला अडथळा लाकडी चाक फिरवून खाली आणला. अन मग....
घोड्याला टाच वगैरे न देता एकटा संभाजी घोड्यासह ( नशीब माझं) त्या अडथळ्यावरून थेट आतच की. एकटाच तो अन आजूबाजूला सगळे मोगल तलवारी परजत. अन बाकी सगळे मावळे बाहेर "आता काय बरं करायचं आपण" अशा चेहऱ्याने....

इतका वेळ दाबलेलं हसू फर्कन बाहेर आले. म्हणजे, संभाजीला आततायी म्हटलं जातं. पण इतका आततायीपणा??? Biggrin
संपला माझा पेसन्स. बरोब्बर सहाव्या मिनिटाला छावा बंद केला. इतिहासाचा असा क्षणा क्षणाला होणारा खून बघणं मला झेपणारं नाही हे माहिती असून मीच सामोरी गेले. भोआकफ!
ज्या ज्या लोकांनी पूर्ण चित्रपट बघितला त्या सर्वांना माझा कडक सॅल्युट Proud

मंबाजी म्हटलं की मला असामी मधलं 'जे कारंजे गंजले...' आणि त्यातील प्रश्नोत्तरे आठवतात. मंबाजीचा नाट्यप्रवेश लिहा, मंबाजी चे काम मास्तरांना द्या आणि नाटकात खरी काठी वापरा... Lol

मंबाजीचं काम छानच आहे. निळू फुलेंची आठवण होते.
सर्वांचीच कामं छान आहेत.

गौरी या अभिनेत्रीनं संत तुकारामांच्या पत्नीचं काम असं काही केलंय जसं काही खरी खुरीच व्यक्ती समोर आहे.
त्या वेळच संवाद जर आता असते तर कसला गोंधळ झाला असता..
"आमचं ते येडं कुठं उलथलंय "
"अ‍ॅ हॅ हॅ .. आग लावा तुमच्या पांड्याला "
" खबरदार, जीभ हासडून देईन त्या पांड्याचं नाव घेतलं तर "

"विठ्या, काळ्या माझ्या घरादाराचा इस्कोट केलास, हे बघितलंस का माझ्या हातात काय हाई ते" असं म्हणत ती चप्पल उगारते. त्या काळात या सीनवरून कुणाच्याच भावना दुखावल्या नाहीत. म्हणजे त्या वेळचे प्रेक्षक अडाणी म्हणायचे का ?

त्याच सीन मधे तिचा चपलेचा हात धरून तिला बाहेर ओढतात तेव्हां विठ्ठलाच्या पुढ्यात घातलेल्या तिच्या आजारी मुलाच्या अंगावरून विठ्ठलाचा हात फिरतो. त्या हातात घड्याळ दिसलं.

तिच्या भूमिकेतला तोरा, ठसका भुरळ पाडणारा आहे. जिचा नवरा असा देवाधर्माच्या नादी लागलेला असेल तिची तगमग जिवंत केलीये. तिचा राग येण्या ऐवजी सहानुभूती वाटते, हसू पण येतं.
शेवटी मात्र तिचा अभिनय डोळ्यात पाणी आणतो.

>>> विष्णुपंत पागनिसांच्या संत तुकाराम चित्रपटात मंबाजीचं काम सगळ्यात बेस्ट आहे. मला आता बाकी चित्रपट बघवणार नाही, पण त्या नटाचं काम अजूनही बघू शकतो.

चित्रपटात ‘सालोमालो’चं पात्र आहे, भागवत नावाच्या नटाने साकारलेलं. मंबाजी त्या चित्रपटात नाहीच.
तुकारामाच्या मुलीचं काम केलेली कुसुम भागवत बहुतेक प्रत्यक्षातील या भागवतांची मुलगी.

आवली झालेल्या गौरी आणि हे भागवत ‘प्रभात’च्या बऱ्याच चित्रपटांत दिसतात आणि अगदी छोट्या रोलमध्येही छाप पाडून जातात!

छान लिहिले आहे राभु. पियूची 'चुंबक' वरची पोस्टही आवडली. चुंबकचा शेवट असा न लिहिण्यासारखा का आहे? उत्सुकता दाटून आली. ट्रेलर पाहिले होते, स्लो आणि क्रिंज असेल वाटलं होतं.

संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पाहिले होते. आता विसरून गेले आहेत सगळेच तपशील. संत ज्ञानेश्वर नवीन चे (लांजेकर) ट्रेलर बघून वैराग्य आलं. अतिशय कृत्रिम आणि खोटं वाटतं. चेहरे सोडून सगळं ॲनिमेटेड. मृणाल कुलकर्णी रुक्मिणी बाई आणि समीर धर्माधिकारी विठ्ठलपंत आहेत. मागे समीर धर्माधिकारी 'बाई गं' मधे देव झाला होता. दर्शन देऊन गेला. तो सुपरमॉडेल लूक मुळे देव/ सात्विक/ आध्यात्मिक वगैरे वाटत नाही अजिबात. फार फार तर इंद्र म्हणून चालेल. इंद्र उथळच होता.

जुन्या चित्रपटात एकदम सात्विक चेहऱ्याची लोक आणि कृष्णधवल रंगाच्याच सगळ्या छटा असूनही नीटनेटका/ डिक्लटर लूक असायचा फ्रेम्सना. सगळी घरं, चौसोपी वाडे, वाड्यातल्या ओसऱ्या व खांबं , इंद्रायणीचा काठ, पायऱ्या - सगळे साधे, स्वच्छ व सुंदर दिसायचे. मुक्ताईला नदीकाठी पायऱ्यांवर ढकलून देण्याचा व ज्ञानेश्वरांना भिक्षा न देताच हाकलून देण्याचे दृष्य बघून डोळ्यात पाणी व घशात आवंढा येतो. असं मला फार क्वचित होतं. जुना संत तुकाराम खूप आठवत नाही पण आवडला होता. मला जितेंद्र जोशीचाही आवडला होता.

जुन्या चित्रपटात एकदम सात्विक चेहऱ्याची लोक आणि कृष्णधवल रंगाच्याच सगळ्या छटा असूनही नीटनेटका/ डिक्लटर लूक असायचा फ्रेम्सना. सगळी घरं, चौसोपी वाडे, वाड्यातल्या ओसऱ्या व खांबं , इंद्रायणीचा काठ, पायऱ्या - सगळे साधे, स्वच्छ व सुंदर दिसायचे. मुक्ताईला नदीकाठी पायऱ्यांवर ढकलून देण्याचा व ज्ञानेश्वरांना भिक्षा न देताच हाकलून देण्याचे दृष्य बघून डोळ्यात पाणी व घशात आवंढा येतो. >> अगदी.

चित्रपट आहे हे माहिती असूनही त्या वेळची बोलण्याची (चित्रपटात) ढब आणि जुने चित्रीकरण - कृष्णधवल मुळे आपण जुन्या काळात पोहोचल्याचा फील येतो. त्यातच वर वर्णन केलेली गावातली घरं (आता नाहीत गावाकडं पण फारशी अशी घरं यामुळं आपोआप वातावरणनिर्मिती होते. चकचकीत फ्रेम्स मधे ते हरवून जातं.

आम्ही आणि आमची आजी तर तुकोबा वैकुंठाला गेले यापेक्षा आवलीचा शेवटचा "आवो..." ऐकूनच रडलो होतो. आम्ही तरी लहान, काही फारसं कळत नव्हतं पण तुकोबा प्रसन्नपणे विमानात बसून जातायत तर ठीके... आवली बिचारी एकटीच राहिली म्हणून हुंदके देत होतो.
आणि ती जेव्हा देवळात येते तेव्हा बहुतेक सालोमालो यांनाच इतकी आवेशात ढकलून देते की आपणच दचकतो!
ते सगळे सिनेमे ना अगदी आपलेसेच वाटायचे. मग भले ते तांत्रिकदृष्ट्या कसे का असेनात. ती सगळी माणसं त्या भूमिकांतून अगदी खरीखुरी माणसंच असायची.

आणि ती जेव्हा देवळात येते तेव्हा बहुतेक सालोमालो यांनाच इतकी आवेशात ढकलून देते की आपणच दचकतो>>>>

तो माझा एकुणच चित्रपटांतील आवडत्या दृष्यांमध्ये पहिला आहे. ती ढकलुन देत नाही. सालोमालो भजन करत असतात, त्या ओघात ते नाचत मागे मागे होत दारात येतात. भयंकर संतापलेली आवली पोराला बखोटीला धरुन तरातरा चालत येते व दारातुन आत पाऊल टाकताच तिच्यावर आपटुन सालोमालो हवेत उडतात. हा प्रसंग मी कितीही वेळा पाहु शकते.

चुंबकचा शेवट असा न लिहिण्यासारखा का आहे?

>> Almost सगळेच प्रॉब्लेम्स unsolved राहतात. त्यामुळे कोणत्याच पात्राला सुख, आनंद नि आपल्याला क्लोजर मिळत नाही.

तुम्हाला zigvato आवडला आहे का कपिल शर्माचा?
त्याच्यासारखाच आहे. दुःखी शेवट नाही नी आनंदी तर अजिबात नाही. प्राईमवर आहे. थोडा बघून आपलं आपलं ठरवा.

समजले पियू. हो, झ्विगाटो आवडला होता. क्लोजर नाही मिळाले तरी चालते. शेवटपर्यंत अभिनय आणि कथा दोन्ही खणखणीत असल्या की झाले.

जुना संत तुकाराम पाहिलाय लहानपणी खूप वेळा.
मागच्याच महिन्यात जुना संत ज्ञानेश्वर चित्रपट आणि संत सावता माळी चित्रपट पाहिला होता.
छान आहेत चित्रपट हे.
संत गोरोबा चित्रपट लहानपणी पाहताना बाळ माती तुडवताना पायाखाली येते त्या दृश्यावेळी फार टेन्शन आलं होतं.

माबोवर चर्चा झालेला "काय हो चमत्कार"
ह्याच आठवड्यात पाहिला युट्युबवर.
कथेचा जीव बारीक आहे.
त्या काळचा रोमँटिक चित्रपट आहे एकदम.
जिवू आणि शिवा हे हिरोईन आणि हिरो.
जिवा शिवाची गाठ अशी थीम असेल नावात.
चमत्कार फक्त शेवटी घडतो ज्याबाबत माबोवर भरपूर चर्चा झालीय.
हिरो पावा वाजवतोय आणि हिरोईन खेचली जातेय त्याच्याकडे.
स्वादानुसार नमक तसे व्हिलन आहे आणि एक vamp type character आहे. व्हिलन रमेश देव. एक चामखीळ लावून.
Vamp ला गाणी आणि भरपूर अंग हलवत नाच आहेत.
जुन्या चित्रपटात दिसणारे बरेच लोकं ह्यात देखील आहेत. सगळ्यांची नावं माहीत नाहीत.
हिरॉईन चे वडील, त्यांच्या भरघोस मिशा, त्यांची बहीण , व्हिलन च्या घरचा गाडीवान असे बरेच जण.

अरुण सरनाईक देखणे दिसतात, जयश्री गडकर देखील सुंदर आणि सात्विक.
फार काही ग्रेट नाही.
ह्याच जोडीचे इतर अनेक अधिक चांगले चित्रपट आहेत.

ती ढकलुन देत नाही. सालोमालो भजन करत असतात, त्या ओघात ते नाचत मागे मागे होत दारात येतात. भयंकर संतापलेली आवली पोराला बखोटीला धरुन तरातरा चालत येते व दारातुन आत पाऊल टाकताच तिच्यावर आपटुन सालोमालो हवेत उडतात.>>> हो बरोबर! मला नीट आठवत नव्हतं पण ते दृष्य आलं डोळ्यासमोर तू केलेलं वर्णन वाचून.

संत ज्ञानेश्वर नवीन चे (लांजेकर) ट्रेलर बघून वैराग्य आलं. अतिशय कृत्रिम आणि खोटं वाटतं. चेहरे सोडून सगळं ॲनिमेटेड >>> त्यांचे चेहरे पण कृत्रिमच वाटतात. प्लॅस्टिकी. Sad ट्रेलर पाहून पिक्चर पहावासा अजिबातच वाटत नाही

चित्रपटात ‘सालोमालो’चं पात्र आहे, भागवत नावाच्या नटाने साकारलेलं. मंबाजी त्या चित्रपटात नाहीच. >> माझी आजपर्यंत अशी समजूत होती की सालोमालो म्हणजेच मंबाजी. तसं नाही काय?

बहीण आणि भाची गेलेल्या संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई बघायला. मला फोन आलेला पण त्यावेळी माझी डेंटिस्ट अपॉईंटमेंट होती त्यामुळे मी नाही म्हणाले तसंही संत ज्ञानेश्वरांवरचे पिक्चर्स टीव्हीवर खूप बघितलेत (मला सर्वात आवडायचे ते रेडा वेद म्हणतो, चांगदेव शरण येतो तो सीनही आवडायचा, पण सर्व भावंडांना दिलेला त्रास बघवायचा नाही). त्यांना आवडला नवीन. भाचीच्या शाळेतले दोघे आहेत पिक्चरमध्ये. संत ज्ञानेश्वर यांच्या बालपणातली भूमिका शाळेतल्या एकाने केलीय आणि मध्ये शाळेचे गॅदरिंग झालेलं त्यातल्या नाटकात त्याने माझ्या भाचीच्या मुलाचा रोल केलेला, त्यामुळे भाचीला बघायचाच होता त्याच्यासाठी. असो तिला आवडला हे बरं झालं. तिला जुना ब्लॅक अँड व्हाईट बघ सांगणार आहे, विशेषत: ताटी उघडा ज्ञानेश्वरा गाणं ज्यात आहे तो. तोच मला आठवतोय actually.

दुसरं म्हणजे तिच्या दादाचे (माझ्या मुलाचे) जिजाई (मेव्हणे) व्हिलन आहेत त्यात (योगेश सोमण) . त्यांचंही काम आवडलं दोघींना.

अरे व्वा अन्जूताई, तुमच्या घरीच सेलिब्रिटी आहेत. Happy
सालोमालो अजिबात आठवेना. कुणाचे तरी बोबडे बोल वाटत आहेत दरवेळी.
------
हिरो पावा वाजवतोय आणि हिरोईन खेचली जातेय त्याच्याकडे.
स्वादानुसार नमक तसे व्हिलन आहे आणि एक vamp type character आहे. व्हिलन रमेश देव. एक चामखीळ लावून.
Vamp ला गाणी आणि भरपूर अंग हलवत नाच आहेत.
>>>> झकासराव, Lol 'बंदिवान' धाग्यावर 'काय हो चमत्कार' वर भरपूर धमाल झाली होती. मायग्रेनला चोळी बांधणारे भूत/ ये कबर छपवा दो अखबार में- पर्यंत कुठेही गेलो आपण सगळे.

रमड, मृकु आहे. त्यामुळे हो, सगळेच प्लास्टिक.

Pages