Submitted by मोक्षू on 16 May, 2020 - 05:23
चित्रपट कसा वाटला या विषयाचा चौथा धागा नुकताच सुरु झालाय.. म्हणून लगेच हा वेगळा धागा काढला... मराठी चित्रपट पाहायचा असला की नेहमीच्या धाग्यावर खूप शोधाशोध करावी लागते.. म्हणून सगळ्यांनी मराठी चित्रपटांबद्दल ह्या धाग्यावर चर्चा करावी ही विनंती...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्याशिवाय साइड कशी घेणार?
त्याशिवाय साइड कशी घेणार?

गुगलला अनुपम चोपडून घावं लागेल आता.
सिध्दार्थच लग्न का मोडलं?>>>>
मोठ्या मुलात आणि बापात का वितुष्ट आलं आणि नेमकं सिध्दार्थच लग्न का मोडलं?>>>> थोडं सोपं करून सांगते .बहिणीने आईचा माहेरचा हक्क या कारणाने जमीन निवेदिताच्या नावाने करायला वाद करून भरीस पडलेलं असतं (भाऊ बहिनीमध्ये म्हणजे मामा व आई निवेदिता मध्ये). सिध्दार्थच लहानपणापासून मामाच्या मुलीवर प्रेम असतं, जे हे मोठेच म्हणालेले( ठरवतात जसं काही ठिकाणी लहानपणीच भावाची मुलगी देणार आणि लग्न ठरवताना पाहायला मिळतं) असतात की हीच तुजी बायको त्यामुळे ते लग्न करणार हे नक्क्की असतं .पत्रिका ही छापलेल्या असतात पण जमिनीच्या वादावरून लग्न मोडतं सिद्धार्थ बहिणीला आणि ती जमीन ज्या कारणासाठी घ्यावी लागली ,म्हणजे वडील (जे की खूप प्रामाणिक असतात)जर का खूप अनैतिक मार्गाने इतर अधिकारयां प्रमाणे कमवत श्रीमंत झाले असते तर या जमिनीची पर्यायाने पैश्याची गरज लागली नसती.म्हणून वडिलांना दोषी समजत असतो शेवटी मुलांसाठी तुम्ही पैसे देऊ शकत नाही हे सुनावतो त्यामुळे छोट्याला पोल्ट्री स्वतःच्या जीवावर व यालाही कर्ज काढून फोटो स्टुडिओ काढायचा असतोपन कर्ज मिळत नाही. त्यावर वडील छान उत्तर देतात ते चित्रपटात बघा.चित्रपटातून नैतिकतेचे धडे मिळत असतील तर असे चित्रपट का मुलांना दाखवू नयेत.
मला आवडलाय पण आता साईड
मला आवडलाय पण आता साईड घेण्याचा कंटाळा आला
त्याशिवाय साइड कशी घेणार?>>>
त्याशिवाय साइड कशी घेणार?>>>
जोक्स या पार्ट पण भावा बहिणी मधलं प्रेम ,बेबनाव ,भांडण असली तरी असणारी इमोशनल अटॅचमेन्ट ,विनोदी कुरघोडी चेष्टा ,रिलेट होणार नातं (जर तुम्हालाही भावंड असेल)आणि संवाद जर पाहायचे असेल तर चित्रपट नक्की पाहा रानभूली.
मलाही तिन्ही भावंडांचे
मलाही तिन्ही भावंडांचे प्रसण्ग खुप
आवडले. एकमेकांना टोमणे मारायची संधी सोडत नाहीत,
चिडल्यावर त्याला काय वाटेल याचा विचार न करता चार चौघात अब्रुचा पंचनामा करतात पण तरी तितकेच प्रेमही असते.
आपल्याला बुवा आवडला, निर्मळ अकृत्रिम वाटला. ज्यांना आवडला नाही त्यांचेही ठिकच आहे. आवडुनच घ्यावा ही सक्ती नाही. मी परत एकदा बघणारे आज. आत्याबाईसाठी आणि त्या मुर्ख बकर्यासाठी.
पिक्चर बघितला नाही. बघेन. पण
पिक्चर बघितला नाही. बघेन. पण एकच महत्वाचा प्रश्न मुल हवंय तर प्रोटेक्शन कशाला? शुभमंगल सावधानमध्ये जरा नीट कॉंटेक्स्ट आहे की ते लग्नाआधी एकमेकांसाठी आतूर असतात म्हणून प्रोटेक्शन वापरू पाहतात.
तो पुरेसा रिसोर्सफुल आहे, का
तो पुरेसा रिसोर्सफुल आहे, का गूगल न करता माबोवर रुमाल कुठला घेऊ धागा काढा स्कूलचा आहे तो?
>>>>>
आता मला मध्ये आणायची काय गरज होती
बाकी ज्यांना वाटते की आजच्या मुलांना अशी माहिती असतेच, आणि असे काही टेन्शन नसतेच, असा काही प्रॉब्लेम नसतोच वगैरे वगैरे तर त्यांचे जग वेगळे आहे इतकेच म्हणू शकतो.
तो अमेय वाघ तरी एखाद्या गावातील दाखवला आहे. शहरी मुलाना सुद्धा हे प्रॉब्लेम असतात. परफॉर्मन्स प्रेशर हा जो शब्द चित्रपटात वापरला आहे ते आले की तुमच्या अंगात कितीही ताकद असो आणि धमन्यात कितीही सळसळते रक्त असो त्याचा काही फायदा होत नाही. ज्यांना हा अनुभव नाही त्यांना तर वाटत असेल कसले डोंबल्याचे परफॉर्मन्स प्रेशर, उलट सेक्स म्हणजे तर किती मजा असते वगैरे वगैरे.. पण ज्यांना हा अनुभव नाही, किंवा ज्यांच्या जवळच्यांनी त्यांच्याशी असा अनुभव शेअर केला नाही, त्यांना हे समजावणे अवघड. आणि हो, असे विचार असतील तर जवळचा कोणी आपला प्रॉब्लेम तुम्हाला सांगणार ही नाही..
इथे जर एखादा धागा काढला आणि नाव लपवून लोकांना लिहायला लावले तर इथल्याच बरेच जणांनी आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती असे प्रॉब्लेम फेस केले आहेत हे लक्षात येईल.
एकच महत्वाचा प्रश्न मुल हवंय
एकच महत्वाचा प्रश्न मुल हवंय तर प्रोटेक्शन कशाला?>>> चित्रपट पाहा त्यासाठीच म्हणतेय.
स्पोईलर आलेच आहेत तर घ्या.मूल होण्याची घाई मोठ्या लोकांना इतर घरातल्या लोकांना झाली आहे नवरा नवरीला नाही स्पेशली नवरीला. त्यांना नकोय मूल आणि त्याच्या प्लॅंनिंग साठी हवय प्रोटेक्शन.
स्पॉइलर>>>>>>>>>>>>>>>>
स्पॉइलर>>>>>>>>>>>>>>>>
मामे, नवरी पहिल्या रात्री नवर्याशी पहिल्यांदा जे बोलते ते हे असते की मला एम एससि करयचेय आणि त्यानंतरच मुल हवेय. ती गायनॅकला पण भेटते (ती आगाऊ मैत्रिणच घेऊन गेली असणार) गायनॅक प्रोटेक्शन वापरायचा सल्ला देते. अमेय वाघ प्रोटेक्शन शोधत बाहेर फिरतो तेही सगळे हिलारियस आहे.
बहिणीला मुल नाही आणि दुसरा मुलगा देवदास. आई अगदीच निरुपा रॉय. त्यामुळे तिला आता लग्न झाले, आता मुल हवेच ह्या मोड मध्ये टाकलेय.
स्वाती, उद्या मतभेद मतभेद
साधना, वावे, ऋ, सिमरन, माझेमन- सगळ्यांच्याच पोस्टी वाचल्या.
स्वाती, उद्या 'मतभेद-मतभेद' खेळायला मिळणार म्हणून मला आनंदाने झोपच आली नाही. पण-
तू लिहिलेल्या गोष्टी मलाही आवडल्या नाहीत तितक्या म्हणून मी पोस्टीत लिहिल्याच नाहीत, जमेच्या बाजू तेवढ्या लिहिल्यात.
ज्या अर्थी रात्रीबेरात्री वडील बाहेर जातात त्या अर्थी वडीलांचा तर दुसरा घरोबा असणार असं वाटलं. वाटणी व लग्न मोडण्याचे कारणही तीव्र वाटले नाही पण छोट्या छोट्या गोष्टींवरून बैठक/ बोलाचाली मोडलेले पाहिले आहे. शेवटचा सेक्स एज्युकेशनचा भाग मलाही ताणल्यासारखा वाटला, सिनेमा थोडा लांबलाच एकुण.
तुला ज्या गोष्टी खटकल्या त्या मलाही खटकल्यात पण तितक्या तीव्रतेने नाही कारण पिक्चर करमणुक प्रधान आहे. सर्वांनी उत्तम अभिनय केला आहे. जनजागृती वगैरे हा उद्देश नसून त्या कुटुंबातील (फार गंभीर नसलेले) ताणतणाव यापुरतंच पाहिलं तर याकडे सहज दुर्लक्ष करता आले. शेवटी क्षिती कुत्रा आणते व तिला निसर्गकृपेने अचानक बाळ होते हे न दाखवण्याचा मोह आवरल्याबद्दल सुद्धा मी एक बोनस पॉईंट दिला. स्टार्स द्यायची सोय असती तर मी तीन ते साडेतीन दिले असते पाचपैकी. हा चित्रपट एंटरटेनिंग आणि एंगेजिंग आहे हे नक्की.
अतिअनावश्यक आहे म्हणूनचआता 'अमलताश'कडे वळूया. तेथे अनप्रोटेक्टेड सेक्स केला म्हणून मी नावं ठेवली, इथं "प्रोटेक्टेड कसा जमला नाही घोड्यांना" म्हणून तू. आपल्या दोघींना खूश करायचं म्हटलं तर त्यांना ब्रह्मचर्याचे पालन करावे लागेल.सगळ्या पोस्ट वाचल्या. अजून
अस्मिता, स्वाती, साधना, अमित, सिमरन - सर्वांच्या पोस्ट्समधून वेगवेगळे अँगल्स मिळाले. आता पिक्चर पाहिल्यावरच कळेल. पण कोणत्या जमान्यात वडील मुलाला असल्या विषयांबद्दल शिकवतात हा प्रश्न पडला, किंवा कोणत्या जमान्यात मुले ही माहिती वडिलांकडून घेतात, हा ही. त्यामुळे अमेय वाघचा राग अस्थानी वाटला.
अस्मिता - तुला आवडण्याचे एक मुख्य कारण निमशहरी "ओळखीचे" वातावरण व साधनाने लिहीले तसे अकृत्रिम संवाद असे असेल.
सिमरन यांची "सोपी करून सांगितलेली" पोस्ट वाचताना ही जर सोपी असेल तर क्लिष्ट काय असेल असा विचार आला
सिध्दार्थच लहानपणापासून मामाच्या मुलीवर प्रेम असतं, जे हे मोठेच म्हणालेले( ठरवतात जसं काही ठिकाणी लहानपणीच भावाची मुलगी देणार आणि लग्न ठरवताना पाहायला मिळतं) असतात की हीच तुजी बायको त्यामुळे ते लग्न करणार हे नक्क्की असतं .पत्रिका ही छापलेल्या असतात पण जमिनीच्या वादावरून लग्न मोडतं सिद्धार्थ बहिणीला आणि ती जमीन ज्या कारणासाठी घ्यावी लागली ,म्हणजे वडील (जे की खूप प्रामाणिक असतात)जर का खूप अनैतिक मार्गाने इतर अधिकारयां प्रमाणे कमवत श्रीमंत झाले असते तर या जमिनीची पर्यायाने पैश्याची गरज लागली नसती
हा संवाद आठवला
किंवा "खुर्च्या - एक न नाट्य" मधला "....मुक्तिदिनाच्या दिवशी विचार करावा लागेल" वाला मोनोलॉग 
मुक्तिदिनाच्या दिवशी विचार
मुक्तिदिनाच्या दिवशी विचार करावा लागेल >>>
मलाही हेच आठवलं.
>>> जमेच्या बाजू तेवढ्या
>>> जमेच्या बाजू तेवढ्या लिहिल्यात.
हे चीटिंग आहे!
>>> एकूण माहिती वाचता…मला आवडण्याची शक्यता जास्त दिसते
‘एकूण माहिती’ म्हणजे राजसी भावे ना?
सिमरन आणि साधना, ते जमिनीचं खटलं उलगडल्याबद्दल धन्यवाद.
जमीन मुलीचा हक्क म्हणून हवी होती की वडिलांकडे पैसे नव्हते म्हणून? कारण जमीन मिळूनही आर्थिक प्रश्न सुटलेले नाहीतच की! बहुधा जमिनीवरून लग्न मोडलं म्हणून बहिणीवर राग आणि आर्थिक परिस्थितीवरून वडिलांवर राग हे सेप्रेट विषय असावेत.
‘प्रोटेक्टेड कसा जमला नाही घोड्यांना’
lol नाही, पण अशी अडचण आली तर त्यावर कुठून मदत मिळवायची हे समजत नाही हे अतर्क्य आहे. आईवडिलांनी नाडी बांधायला शिकवलं तसं हाताला धरून प्रोटेक्शन वापरायला शिकवायला हवं होतं का या वयात? बायकोही केवळ त्याच पिढीतलीच नव्हे, तर तशाच वातावरणातली, तसंच upbringing असलेली आहे - पण तिला गायनॅकचा सल्ला घ्यावा हे कळलं ना?
आणि त्याचंही उत्तर काय? ‘तुझा नॅचरल गेम खेळ’ हा ‘वैद्यकीय’ सल्ला?! तो मिळताक्षणी प्रश्न सुटला?!
अमेय वाघच्या कॅरेक्टरचा प्रॉब्लेम सेक्स रिलेटेड नाहीच - तो communication (मनातलं नीट कोणाशीच बोलता न येणं) हा आहे. त्यातूनच बहुधा ते तोतरेपणही. बायकोला तिच्याबरोबर तिच्या सासरी पाठराखीण म्हणून येण्याइतकी जवळची मैत्रीण आहे - याचं काही मित्रमंडळ कुठे दिसत नाही, तेही त्यामुळेच असेल का?
मग हा प्रॉब्लेम असा चुटकीसरशी सुटणार नाही! वैताग येतो तो असल्या oversimplificationsचा!
मराठी सिनेमांची ही ‘मळभ आलं / मळभ हटलं’टाइप स्टोरीलाइन आवडती आहे - कारण ती फॉलो केली की फारशी जस्टिफिकेशन्स द्यावी लागत नाहीत.
एडिटून झालं का अक्का? नाही
एडिटून झालं का अक्का? नाही होऊ द्या, काही गडबड नाही.
झालं झालं.
झालं झालं.
)
(तुझा रेकॉर्ड मोडला की शाबूत आहे अजून?
कडेकडेने चालू होतं, तुला कळू
कडेकडेने चालू होतं, तुला कळू नये म्हणून.
(No subject)
हा संवाद >>>
हा संवाद >>>
‘एकूण माहिती’ म्हणजे राजसी
‘एकूण माहिती’ म्हणजे राजसी भावे ना? >>>>
बहुधा जमिनीवरून लग्न मोडलं म्हणून बहिणीवर राग आणि आर्थिक परिस्थितीवरून वडिलांवर राग हे सेप्रेट विषय असावेत.
>>> हो, मलाही तसंच वाटलं. बहिण जरा जास्तच ढवळाढवळ करते माहेरी पण अशा बहिणी असतात. त्याचा राग खरेतर स्वतःवरच असतो पण तो डिनायल मधेही आहे आणि जबाबदारी घेऊन आयुष्य सावरण्यापेक्षा दोष देणं सोपं वाटतंय त्याला. मी खूश नाहीतर मी माधुरीसकट इतरांनाही सुखाने राहू देणार नाही. मी तिरसटासारखं वागत राहिलो तर सगळ्यांना अद्दल घडेल वगैर पण सगळ्यात मोठी अद्दल तुम्हालाच घडत असते.
अमेय वाघच्या कॅरेक्टरबद्दल- त्याला कॉमनसेन्स नाही म्हणून सुचले नाही, राजसीला आहे. पण तिचे प्रयत्नही अल्लडपणातून आलेलेच वाटले. एवढाच फरक आहे. पुरुषांवर जितके पहिल्या रात्रीचे परफॉर्मंस प्रेशर असते तितके स्त्रियांवर नसेल , शिवाय त्याचे कुटुंब -आई इमोशनल ब्लॅकमेल करत आहे. कुणी त्याला सिरियसली घेत नाहीये. बाबांनी शिकवायला हवे हे तरीही झेपले नाहीच मला, फारतर मोठ्या भावाने तोही मित्रासारखा असला तर पण येथे तेही दिसले नाही.
आयव्हीएफचे मी काही पटवणार नाही, ते मलाही पटले नाही. ह्या वरच्यातही तितका दम नाही मला माहिती आहे पण बघ कुठं मांडवली करता आली तर
अमेय वाघच्या कॅरेक्टरबद्दल-
अमेय वाघच्या कॅरेक्टरबद्दल- त्याला कॉमनसेन्स नाही म्हणून सुचले नाही
<<<<<<
घरच्या पूजा, गोंधळ, बोकड कापायला जाणे या कार्यक्रमांमधून जरा फट मिळताच तोही जातोच की डॉक्टरांकडे. तिथे नेमकी बहीण त्याला बघते म्हणून नाहीतर सुमडीत सुटला असता त्याचा प्रॉब्लेम!
हो, त्याला तिने बघितले नसते
थेट नॅचरल गेम खेळायला खोलीत.
थेट नॅचरल गेम खेळायला खोलीत.
<<<<<<
टोटली! नंतर सगळे मिळून क्रिकेट खेळतात तेही लोक नॅचरल गेम खेळायला लागल्याचे प्रतीक आहे.
वडिलांचा दुसरा घरोबा असावा, हा संशय मलाही त्या पहिल्या सीनला आलेला. शिवाय अख्ख्या लग्नात वडील दाखवलेच नाहीयेत. नंतर त्यांचे सत्कृत्य कळल्यावर 'रात्री बांधकामाच्या सामानाचे ट्रक येणार असतील, ते हे स्वतः खाली करून घ्यायला गेले असतील' असे मी मनाचे समाधान करून घेतले. पण बोकड सर्च टीममध्ये सुनेबरोबर बोकड शोधतानाचा त्या दोघांचा सीन फार छान आहे.
हो, तो सीन मलाही आवडला होता.
हो, तो सीन मलाही आवडला होता. वडीलांना काही 'से' च दाखवला नाहीये म्हणजे शब्दशः आणि लाक्षणिक अर्थाने, दोन्ही. संवादच नाहीत फारसे, सारखं आपलं दुधवाल्यासारखे वेळीअवेळी दुचाकीवर बसून निघूनच जातात. पार NPC करून टाकले आहे.
---------
नंतर त्यांचे सत्कृत्य कळल्यावर 'रात्री बांधकामाच्या सामानाचे ट्रक येणार असतील, ते हे स्वतः खाली करून घ्यायला गेले असतील' असे मी मनाचे समाधान करून घेतले.
तेही लोक नॅचरल गेम खेळायला लागल्याचे प्रतीक आहे.
>>>>>

पिक्चर पहिला नाही पण चर्चा
पिक्चर पहिला नाही पण चर्चा मस्त चालू आहे. सापडला तर बघण्यात येईल.
शेवटी क्षिती कुत्रा आणते व तिला निसर्गकृपेने अचानक बाळ होते>> हे वाचून एकदम हम आपके मधली बिंदू आठवली.
वरची चर्चा वाचून माझी
वरची चर्चा वाचून माझी अवस्था फ्रेंडस मधल्या जो सारखी झाली ( एन्सायक्लोपेडिया सेल्समन )
https://www.youtube.com/watch?v=5pkARVEFLzc
‘एकूण माहिती’ म्हणजे राजसी
‘एकूण माहिती’ म्हणजे राजसी भावे ना? >>>
आता इथे मूळ उद्देश कितीही लपवला तरी लपत नाही 
नंतर सगळे मिळून क्रिकेट खेळतात तेही लोक नॅचरल गेम खेळायला लागल्याचे प्रतीक आहे. >>>
शेवटी क्षिती कुत्रा आणते व तिला निसर्गकृपेने अचानक बाळ होते हे न दाखवण्याचा मोह आवरल्याबद्दल सुद्धा मी एक बोनस पॉईंट दिला >>>
वैताग येतो तो असल्या oversimplificationsचा! >>> यावरच्या या खालच्या तिन्ही कॉमेण्ट्स जबरी आवडल्या
- मळभ आलं / मळभ हटलं
- स्किन डीप समस्या आणि फुंकर हेच औषध
- चवीपुरते प्रॉब्लेम्स आणि अय्या सोप्पी उत्तरं
मुलीला गायनॅक प्रोटेक्शन वापरा हा सल्ला देते पण ते कुठल्या टाइमिंगला ते हिला माहित नसते. >>> यातले गायनॅकही असे अर्धवट सल्ले देतात का? प्रोटेकशन वापरा असा मोघम सल्ला देते का गायनॅक?
मोघम प्रोटेक्शनचा जोक वेस्ट विंग मधेच भारी आहे: झोई ही अमेरिकेच्या प्रेसिडेण्टची मुलगी, चार्ली बरोबर डेटवर जाणार असते. लीओ हा प्रेसिडेण्टचा चीफ ऑफ स्टाफ व झोई त्याला मुलीसारखी. आधीच्या धमक्या/हल्ल्यांमुळे त्याला यांची काळजी असते.
Charlie: Zoey and I are going out.
Leo: Charlie, you are taking extra protection, right?
Charlie: (या प्रश्नाने एकदम अचंबित होउन) Leo, I....
Leo: Secret service protection, Charlie, but thanks for loading me up with that image
विकु
तुमचा अपेक्षित सीन बहुधा त्या क्लिपच्या नंतर आहे. एनसायक्लोपिडियातील फक्त "व्ही" वाले पुस्तक तो घेतो. त्यातील बरेच काही वाचून व्हिएटनाम युद्धाबद्दल फुल माहिती काढून जोई त्यांच्या गप्पांत विषय काढतो पण बाकीचे तेथून चर्चा कोरियन युद्धावर नेतात तो
त्यावेळचे त्याचे हावभाव प्राइसलेस आहेत. हसूही येते आणि वाईटही वाटते 
बाकी काही असो एन्ड ला उगाच
बाकी काही असो एन्ड ला उगाच देवकृपे ने बाळ न होता ते पेट आणतात हा शेवट तर अतिशय आवडला. तो डॉगी हेमंत ढोमेचा स्वतः चा आहे .त्याला आणि बोकडाला स्टार्टटिंग क्रेडीट्स मध्ये नावासाहित समाविष्ट करणे हेही आवडलं.
> गायनॅक प्रोटेक्शन वापरा हा
> गायनॅक प्रोटेक्शन वापरा हा सल्ला देते पण ते कुठल्या टाइमिंगला ते हिला माहित नसते. >> आता अशी कुठली कुठली टायमे असतील जेव्हा तिला वाटेल की अय्या आता... आता प्रोटेक्शन वापरलं तर? यावर मी विचार करतोय. तो अमेय ऐन समरात धनुष्य टाकून उलट्या करतो तर आता हाच प्रेग्नंट झालाय की काय वाटू लागलेलं. ते नाही तर नाही किमान त्यावर दोन जोक तरी टाकतील वाटलं होतं. नोप! येथेही निराशाच.
तो अमेय ऐन समरात धनुष्य टाकून
तो अमेय ऐन समरात धनुष्य टाकून उलट्या करतो तर आता हाच प्रेग्नंट झालाय की काय वाटू लागलेलं >>>
सिम्पथी पेन लेजेण्ड लेव्हल 
आधी एकदा दाजी पोटात मारतत
आधी एकदा दाजी पोटात मारतत तेव्हा दुखते आणि नंतर उलट्या.. मला वाटले चित्रपटाचा आनंद होतोय की काय… घाबरलेच एकदम, चांगले आनंदात हसत होते, आता हास्पुटलात नेतात का काय..
Pages